फ्लॅशबॅक

आता प्रेम हे चित्रपटांत दाखवतात तसे कधीच नसते, हे मज पामराला प्रेमात धप्पकन पडल्याशिवाय कसे कळणार? आणि ते कळलंही मला तसं झाल्यावरच...
झालं काय...
(चित्रपटांत दाखवतात तसा, फ्लॅशबॅक...)

मी दहावीत होतो. सेकंड टर्म उरकत आलं होतं. शाळेत माझी बऱ्यापैकी इज्जत वगैरे होती. त्यामुळे तोपर्यंत मी प्रेमातही पडलो नव्हतो. (इमेज का सवाल होता है भाई...) पण, हाय रे आपले ह्युमन इन्स्टिन्क्टस्. त्यांनी मला हे कृत्य करायला भाग पाडलंच. शाळेतील एका सुंदर, हुशार मुलीच्या मी प्रेमात पडलो. (मीही हुशारच होतो!) झालं. एकदा आम्ही दोघंही, म्हणजे मीही वर्गात येत असताना व ती बाहेर जात असताना, आमच्या दोघांच्याही हातात पुस्तकं होती. पिक्चरमधील जोडीप्रमाणेच आमचीही धडक झाली. (हाय रे, काय तो क्षण होता. तो आठवून अजूनही मी महिरतो...!) पिक्चरप्रमाणेच तिने माझ्या डोळ्यांत डोळे घालून (काहीही फालतू जोक करू नका. मला माहिती आहे, सगळे पांचट जोक करता तुम्ही...) पाहिले. मनात 'आँखों ही आँखों में' टाइप फीलिंग होती. मुन्नाभाई टाइप, साला अपुन को भी प्यार हो गया, असं वाटलं. मी तिची व तिने माझी पुस्तकं उचलली. (स्साला, अजूनही पुस्तकंच म्हणा. बुक्स म्हण लेका बुक्स...)

ती चालू लागली. मी वळून तिला पाहत 'पलट, पलट' असू म्हणू लागलो. ती पलटली. (वळाली राव. भाषा नको भावना पहा...) पुढे अर्धं सेमिस्टर आम्ही एकमेकांकडे पाहायचो. दहावी झाली. आणि आमची 'शाळा'ही झाली. राजेश खन्ना, अमोल पालेकर वगैरे टाइप आमची धडक ही झाली. पण, पुढे काहीच झालं नाही. (तेव्हा मोबाइलची चलती नव्हती, मित्रों...)

थोडक्यात, प्रेम हे चित्रपटांत दाखवतात तसं कधीच होत नसतं, हे मला त्यात धडपडल्यावर कळालं. झालंच तर 'शाळा' टाइप होतं...

तळटीपा :-
1. लेखक इमोशनल झालाय.
2. टीप एकनुसार घडलेले असल्याने नस्त्या सूचना देऊ नका.
3. दोनप्रमाणे न वागल्यास फार अपमान होईल.

----------

लवकरच 'व्हिज्युअल काॅमेडी' या विषयावर एक लेखमालिका प्रकाशित करणार आहे. तोपर्यंत हे इतर काही बाही प्रकाशित करत राहिल. हे लेखनही थोडं जुनंच आहे. तरीही कसे वाटले ते प्रतिसादात कळवा. लोभ असावा. (मुळात ही वाक्यं द्यायची काहीही गरज नव्हती. पण, भविष्यातील लेखनाची प्रसिद्धी करावयात कसली आली लाज!)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म‌स्त!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो आम्हाला रोज रोज प्रेम होत हो आणि फिलिन्ग ची तर गोष्ट काढू नका. ठीक है जो आँखो कि फील्लिंग आईली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो आम्हाला रोज रोज प्रेम होत हो

काय‌ हे शोभ‌त‌ं का तुम्हाला? आम्ही प‌हा फ‌क्त द‌र‌ आठ‌व‌ड्याला होत‌ं आणि जेव्हा म्ह‌णुन होत‌ं तेव्हा खात्री अस‌ते की "य‌ही है वो म‌ंझील्" जिस‌की ७ ज‌न्मोंसे त‌लाश‌ थी Wink
सिरीअस‌ली माझा लॉंगेस्ट क्र‌श ४ व‌र्षे टिक‌ला. म‌ग‌ प‌र‌त‌ न‌वा भिडू न‌वे राज्य‌ Wink (ज‌स्ट किडींग‌ आय विल‌ नॉट गेट ओव्ह‌र‌ धिस टाइम)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला, या बहाण्याने का होईना, सगळे आपल्या क्रश बद्दल बोलतील...
बादवे, धन्स् ..शुचि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... सगळे आपल्या क्रश बद्दल बोलतील.......

असल्या काहीतरी अवाजवी अपेक्षा ठेऊ नका .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा.
म्हणजे तुम्ही नै बोलणार वाटतं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छे छे !! असं काहीच होणार नाही. अस्वल यांच्या म्हणण्याशी सहमत. काहीजण याला क्रश पॉर्न व‌गैरे म्हणतील. थोडे इकडचे तिकडचे, काही नवीन इन्सायडर जोक्स आणि काही जार्गन्स वाचायला मिळतील. जे तुम्हाला पाहिल्यापहिल्यांदा समजणार नाहीत विचारल्याशिवाय आणि नंतर नंतर विचारण्याचा कंटाळा येईल. मलाही समजत नाहीत अँड इट्स नॉर्मल.
त‌सा आपला सातवीतच होता क्रश पण हे त्या व्यक्तीलाही समजलं नाही शेवटपर्यंत. तो जेमतेम सहा महिने टिकला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छे छे !! असं काहीच होणार नाही. अस्वल यांच्या म्हणण्याशी सहमत. काहीजण याला क्रश पॉर्न व‌गैरे म्हणतील. थोडे इकडचे तिकडचे, काही नवीन इन्सायडर जोक्स आणि काही जार्गन्स वाचायला मिळतील. जे तुम्हाला पाहिल्यापहिल्यांदा समजणार नाहीत विचारल्याशिवाय आणि नंतर नंतर विचारण्याचा कंटाळा येईल. मलाही समजत नाहीत अँड इट्स नॉर्मल.
त‌सा आपला सातवीतच होता क्रश पण हे त्या व्यक्तीलाही समजलं नाही शेवटपर्यंत. तो जेमतेम सहा महिने टिकला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अब‌,
तुम्ही न‌वे आहात‌. इथे "आपाप‌ल्या क्र‌श‌ब‌द्द‌ल‌ बोला" म्ह‌णून‌ चाल‌त‌ नाही.
इक‌डे
"क्र‌श‌ अस‌णं हे स‌माजासाठी चांग‌ल‌ं का वाईट"
"क्र‌श‌ असण‌ं पुरोगामी आहे का"
"ब्राम्ह‌ण आणि द‌लितांच्या क्र‌श‌ब‌द्द‌ल‌ एक‌ आढावा"

अशा टाय‌पाचे प्र‌श्न‌ टी.आर‌.पी खेच‌तात‌. तेव्हा.. ब‌घा त‌स‌ं काय‌ ज‌म‌त‌ंय‌ त‌र!
===========================
तुम्ही विचार‌ल‌ंच‌ आहे त‌र्-
हे म्ह‌ण‌जे ब‌घा, मे.हू.णा पिक्च‌र‌ याय‌च्या आधीच‌ं आहे. नाय‌त‌र‌ म्ह‌णाल कॉपी केलीये.

माझी आम‌ची आम‌च्या शाळेत‌ल्या एका शिक्षिकेव‌र‌ सॉलिड‌ क्र‌श‌ होती. मेज‌र‌. देवदयेने त्या शिक्षिका आम्हाला २-३ व‌र्षं शिक‌वाय‌च्याही.
फुडे काहीच‌ झाल‌ं नाही, होणार‌ही न‌व्ह‌त‌ं.
कालिजात‌ गेल्याव‌र‌ क‌ळ‌ल‌ं की त्याला क्र‌श‌ म्ह‌ण‌तात‌. म‌ग‌ म‌हिन्यांम‌हिन्यांनी क्र‌श‌ येत‌ जात‌ गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे बापरे, म्हणजे आता असे विषय शोधून त्यावर बोलावं लागेल तर. बोलू, त्यावरही बोलूच.
----------
बाकी बहुतेक जणांचा क्रश हा शिक्षिका आणि नंतर मित्राची बहीण, हाच असतो. मे. हू. णा. नंतर 'शिक्षिका'वालं जरा फेमस झालं इतकंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+११११११
अस्व‌ल ह्यांच्या रंध्रारंध्रात ऐसी भ‌र‌लेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

लेखन छान. थोडे लांबवा. कोणत्यातरी मुलीला वाटत असतं याचं आपल्यावर क्रश असावं पण ते आम्हाला समजलंच नाही आणि आम्ही उगाचच अनक्रशेबालांच्या मागे लागलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळीकडे थोड्याफार फरकाने असंच होतं. म्हणजे दहावी असताना ववर्गातील एका मुलीचा माझ्यावर व माझाही तिच्यावर क्रश होता. पण दोघेही कधीच बोललो नाहीत. आता जिच्यावर क्रश आहे, तिच्या मनातील भावनाच कळत नाही. सर्वांना वाटतं की आमचं काहीतरी असावं... पण तसं काही नाही हे आम्हाला माहित आहे.
थोडक्यात, सगळाच गुंतागुंतीचा प्रकार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही 'भ‌यान‌क‌ पाठ‌लाग‌चे' भाऊ आहात‌ का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

नाही बुवा. मुळात हे नाव मी पहिल्यांदाच वाचतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0