लास्ट सीन

आजही तो नेहमीप्रमाणेच रात्री एक नंतरही जागा होता. नेहमीप्रमाणेच त्याने व्हाॅटस्अॅपवरील तिचं लास्ट सीन पाहिलं. ते 12:49 चं होतं. आजही 'चान्स' गेला, असं म्हणून त्याने नेट बंद केलं. आणि तिचाच विचार करत तो झोप येण्याची वाट बघत बसला...
त्याच्याकडे तिचा नंबर गेल्या दोन महिन्यांपासून आहे. तिने व्हाॅटस्अॅपवर अकाउंट उघडून पंधरा दिवस झालेत. दीड महिन्यांपूर्वी त्याने तिला फोन केला, सुदैवाने तो तिनेच उचलला. (सुदैवाने यासाठी की एकदा तो तिच्या आईने उचलला होता.) पण, काही बोलण्याआधीच त्याच्या ह्रदयाचे वाढलेले ठोके त्याला जाणवत होते. शेवटी कसंबसं त्याने तिचं नाव उच्चारलं. तिनेही हो मीच बोलतेय असं सांगितलं. आणि इथेच तो म्हणाला की मी 'सर्व्हेमंकी' या कंपनीकडून बोलतोय, वगैरे वगैरे. तिनेही फोन ठेवला. हा स्वतःलाच शिव्या देत शांत बसला.
आजही त्याने तिचं लास्ट सीन पाहिलं, आणि तो गप्प बसला.
Z म्हणून सेव्ह केलेला तिचा नंबर तसा सेव्ह करण्याचं कारण हेच की कोणी तितक्या खाली जाण्याइतका पेशन्स कुणाकडेच नाही. आणि याच्याकडे तो इतका आहे की त्याचा वीट यावा.
त्याने इकडच्या कुशीवरून तिकडे वळत, मोबाईलमध्ये सेव्ह करून, हाइड केलेला तिचा फोटो पाहिला. एक दीर्घ श्वास घेतला. फोटो पुन्हा व्यवस्थित हाइड करून, तो डोळे मिटून पडला. त्याला झोप कधी लागली, हेही कळालं नाही.
आजचा दिवसही इतर दिवसांप्रमाणेच जात होता. तेच फेसबुक, तेच व्हाॅटस्अॅप, सगळं काही तेच. आज त्याने धाडस करून अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस करून टाइप केलेला मेसेज तिला केला. तो इतक्यावेळा टाईप करून झाला होता की तो ऑटोकम्प्लीट होत गेला.
एरवी पन्नास वेळा व्हाॅटस्अॅप चेक करणाऱ्या तिने, पुढचे चार तास तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अखेर तिचं लास्ट सीन दिसलं. पण, नंतरही एक तास काहीच घडलं नाही.

इतक्यात अननोन नंबर वरून काॅल आला. तो तिचाच असावा असं समजून तो थरारून गेला. त्याचं अंग शहारून उठलं होतं. त्याने फोन अटेंड केला. तो तिच्या वहिनीचा आवाज होता. तिकडून नावाची विचारण्यात होत होती आणि हा फक्त आवाज येत नाही, इतकंच घोकत होता. अखेर त्याने फोन ठेवला. थोड्या वेळाने आपण कोण आहात सांगा प्लीज, असा मेसेज आला. त्यालाही त्याने उत्तर दिले नाही.
नंतर तिला फोन केला. तो आता तिनेच उचलला. कारण, तिने नवा स्मार्टफोन घेतल्यापासून तो तिच्याकडेच असतो. तो पुन्हा काहीच बोलू शकला नाही. तिने फोन ठेवला. हा दिवसही असाच गेला, असं म्हणत त्याने दिवसही घालवला.

अन् रात्री पुन्हा एकदा तिचं लास्ट सीन चेक करून तो झोपी गेला.

- अब

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>त्याच्याकडे तिचा नंबर गेल्या दोन महिन्यांपासून आहे.<<

प‌ण मुल‌गी प्र‌त्य‌क्ष ओळ‌खीत‌ली आहे की नाही?

>>Z म्हणून सेव्ह केलेला तिचा नंबर तसा सेव्ह करण्याचं कारण हेच की कोणी तितक्या खाली जाण्याइतका पेशन्स कुणाकडेच नाही.<<

>>मोबाईलमध्ये सेव्ह करून, हाइड केलेला तिचा फोटो पाहिला.<<

आप‌ल्याच‌ फोन‌व‌र मुलीचा नंब‌र‌ ख‌ऱ्या नावानं सेव्ह‌ क‌राय‌ला किंवा फोटो ठेवाय‌ला न‌क्की कुणाची चोरी? तुम‌चं व‌य‌ किती? म्ह‌ण‌जे अजून शाळेत आहात आणि घ‌री रोज बाबा फोन चेक क‌र‌त अस‌तात व‌गैरे असं काही आहे का?

एक संभाव्य‌ धोक्याची सूच‌ना :

 • तिच्याक‌डे तुम‌चा नंब‌र आहे
 • तुम‌चा पुन्हापुन्हा फोन येतोय
 • नुस‌तेच उच्छवास‌ इ. ऐकू येताय‌त‌
 • हे तिच्या घ‌र‌च्यांना माहीत आहे

एव‌ढ्याव‌रून पोर‌गी किंवा तिच्या घ‌र‌चे पोलिसात‌ व‌गैरे जाऊ श‌क‌तात‌. अशा गोष्टींम‌ध्ये पोलिस एक‌द‌म‌ टाइट‌ क‌र‌तील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तर मुलगी ही पात्राच्या प्रत्यक्ष ओळखीतील आहे.
साधारणतः पात्र व मुलगी दोघेही एकाच परिसरात राहतात.
त्या मुलीचंही मुलावर क्रश आहे, ह्याची त्याला खात्री नसली तरी साधारण कल्पना आहे. शिवाय, मोबाईलमध्ये ट्रू काॅलर असतेच. त्यामुळे ती तक्रार करेल, याची शक्यता नाही.

अवांतर : तुम्हाला तर पात्राची फारच काळजी आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>आप‌ल्याच‌ फोन‌व‌र मुलीचा नंब‌र‌ ख‌ऱ्या नावानं सेव्ह‌ क‌राय‌ला किंवा फोटो ठेवाय‌ला न‌क्की कुणाची चोरी?<<

ह्याचं उत्त‌र‌?

>>त्या मुलीचंही मुलावर क्रश आहे, ह्याची त्याला खात्री नसली तरी साधारण कल्पना आहे. शिवाय, मोबाईलमध्ये ट्रू काॅलर असतेच. त्यामुळे ती तक्रार करेल, याची शक्यता नाही.<<

म‌ग -

 • व‌हिनी का फोन क‌र‌ते?
 • नाव माहीत आहे त‌र‌ ते पुन्हा का विचार‌तात‌?
 • मुल‌गा का बोल‌त‌ नाही?
 • स‌र्व्हे व‌गैरे थापा मुल‌गा का सांग‌तो?
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कदाचित घरातील कोणीतरी क्वचित फोन पाहिल्यास, चेक केल्यास लक्षात यायला नको म्हणून.

साहजिकच मुलीच्या वहिनीने फोन केला असेल म्हणून तो घाबरला असेल.
त्याने फोन लावला तेव्हाही तो ऐनवेळी पुढे काय होईल, या भीतीने इतर थापा मारल्या असतील व फोन ठेवला असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अब‌ के ह‌म बिछ‌डे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

Z म्हणून सेव्ह केलेला तिचा नंबर तसा सेव्ह करण्याचं कारण हेच की कोणी तितक्या खाली जाण्याइतका पेशन्स कुणाकडेच नाही. आणि याच्याकडे तो इतका आहे की त्याचा वीट यावा.

वाक्य आव‌डल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकुणात तुम‌चं क्र‌श या गोष्टीव‌रच फार मोठं क्र‌श आहे असं दिस‌तंय्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कृष्णालाही न‌वीन पिढीने 'क्र‌श‌' असे संबोधावे. त्याला त‌र‌, प्र‌त्येक‌ गोपीब‌द्द‌ल‌ आणि गोपींना त्याच्याब‌द्द‌ल‌ क्र‌श‌ असाय‌चा. शिवाय‌, एक‌दा भेट‌ल्याव‌र, काय‌ काय‌ क्र्श‌ होत‌ असेल‌ त्याची,
कुच‌भ‌ल्ली व‌क्षाला टोचुनिया शिक्षेला ... अशी व‌र्ण‌नेही आहेत‌च‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.