लोक‌ल | ऐसीअक्षरे

लोक‌ल

मुंब‌ईची जीव‌न‌वाहिनी, र‌क्त‌न‌लिका, वेस्ट‌र्न, सेंट्र‌ल, हार्ब‌र व‌गैरे.
कोऱ्या करकरीत पहाटेपासून काजळभरल्या रात्रीपर्यंत धावणारी.
क‌धी धीमी, क‌धी तेज, क‌धी सेमी फास्ट, क‌धी उशीराने, ब‌रेच‌दा र‌द्द.
क‌धी फ‌लाटांव‌र, क‌धी फ‌लाटांच्याम‌ध्ये थांब‌णारी, क‌धी भ‌र‌धाव फ‌लाटाव‌रच च‌ढ‌णारी.
लोक‌ल.
स्वातंत्र्य, स‌म‌ता, बंधुता व‌गैरे पुस्त‌की मूल्यं प्रत्य‌क्षात आण‌णारी.
अणुरेणूइतकी जागाही कधीच रिकामी नसतानाही,
क‌र्क‌श्श ख‌ड‌ख‌डाटातही प्र‌त्येकाला अल्ल‌द स्व‌प्नांच्या न‌ग‌रीत नेणारी.
त्याच गच्च गर्दीतही प्रत्येकाचं एकलेपण जपणारी.
लोकल.
हिवाळ्यात गार बोचऱ्या वाऱ्याचे सपकारे मारणारी.
उन्हाळ्यात घामाच्या धारांनी न्हाऊ घालणारी.
पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या स्वप्नांआधी विस्कळीत होणारी.
तरीही, सातबारा गाठताना तीनतेरा होऊ न देणारी.
लोकल.
दररोज, कोणा व्यथित जीवाचं, किंवा अभाग्याचं आयुष्य रूळावर संपवणारी
कोणा गर्भवतीच्या कळा तिच्याबरोबर साहणारी
कुणा अबलेच्या किंकाळ्या पोटात दडवणारी
चोरांची, पोलिसांची, हमालांची, पांढरपेशांची, तिची, त्याची, 'त्यां'चीही, तेव्हढीच.
लोकल.
घड्याळातलं एक मिनिट, स्वत:ची ओळख बनवून घेणारी.
एखाद दिवशी उशीर झाल्यास असंख्य शिव्याशाप खाणारी.
मग कधीतरी पेंटोग्राफ मोडल्याचं निमित्त करून बसून राहणारी.
रुळांच्या पट्ट्यांच्या तालात आयुष्याचीच चाल बांधणारी.
लोकल.
असती आपल्यातलीच कोणी, तर एकदा विचारायचं होतं मला
"बये, कसं गं जमतं असलं निर्मोही जगणं,
ज्यांना कुशीत घेऊन फिरावं त्यांच्याच पिंका झेलणं?"
हाल्ट घेतला असता क्षणभर, आणि म्हणाली असती
"बाळा, लोकलचा जन्म असतोच ह्यासाठी:
तुमच्या वेळांची गणितं सोडवता आमचीच होते कोंडी मोठी.
काय सांगू पोरा, आमचं आयुष्य कायम मिनिटकाट्यापाठी."
हसली असती अगदी आईसारखीच, आणि निघालीच असती लगबगीने,
कारण तिच्यासाठी वाट नसती पाहिली ना,
तिच्याही:
लोकलने.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लोक‌ल‌ या मुंबापुरीच्या नीट‌ अभिस‌र‌ण चालू ठेव‌णाऱ्या र‌क्त‌वाहीन्या आहेत‌ हे ख‌रे आहे.

कारण तिच्यासाठी वाट नसती पाहिली ना,
तिच्याही:
लोकलने.

हे बाकी क‌ळ‌ले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आईशी तुल‌ना केल्यामुळे, लोक‌ल‌चीही वाट तिच्या लोक‌ल‌ने नस‌ती पाहिली, असं लिहून क‌विता खोल खोल क‌र‌ण्याचा प्र‌य‌त्न. ख‌रंत‌र लिहीताना ही ओळ प‌हिले सुच‌ली होती, म‌ग आधीचं स्फुर‌लंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

हां तो अर्थ‌च‌ वाट‌ला होता. स्प‌ष्टीक‌र‌णाब‌द्द‌ल‌ ध‌न्य‌वाद्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशी कृत‌द्न्य‌ता श‌ह‌रांब‌द्द‌ल‌ फार‌ फार वाट‌लेली आहे. की विसाव्याचे एक‌ स्थान‌ दिले, म‌ला सामावुन घेत‌ले ई.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0