चित्र‌प‌टातील म‌ला आव‌ड‌लेली व्य‌क्तिरेखा

सिनेमा प‌हाताना आप‌ण क‌धी त्र‌य‌स्थ अस‌तो त‌र क‌धी ख‌रोख‌र‌ व्य‌क्तीरेखेशी त‌न्म‌य‌ आणि एक‌रुप होउन जातो. हिंदी किंवा इंग्रजी सिनेमातील कोणती व्यक्तिरेखा तूमच्या मनावर ठसा उमटवून गेलेली आहे? उदाहरणार्थ - मला ज्या व्यक्तिरेखा नीट आठवतात त्या मी मांडायचा प्रयत्न करते
.
.
.
(१) बालिका बधु मधील "रजनी'. या व्यक्तिरेखेने माझे खूप मनोरंजन केले, मी बालिका बधु सिनेमा ६-७ वेळा पाहिला आहे. आणि दर वेळेला एन्जॉय केलेला आहे. या सिनेमातील बंगाली वातावरणनिर्मिती तर उत्तम आहेच, पण रजनी या पात्रामध्ये लेखकाने, दिग्दर्शकाने जे रंग भरले आहेत ते मोहक आहेत. अवखळ, अल्लड , अजुनी लहानपण ना सरलेली रजनी विवाहाचा अर्थही न जाणणारी, ल‌हान‌ व‌यात अम‌ल (स‌चिन्) ब‌रोब‌र‌ विवाह्. ब‌ंध‌नात ब‌द्ध होउन सास‌री येते काय‌ आणि हा हा म्ह‌ण‌ता तिच्या अल्ल‌ड‌प‌ण निर्म‌ळ‌ स्व‌भावाने अम‌ल‌चे चित्त‌ चोरुन‌ घेते काय्. श‌र‌त् (अस‌रानी) आणि त्याच्या प‌त्नीचा overt प्र‌ण‌य या पार्श्व‌भूमीव‌र‌ त‌र र‌ज‌नी आणि अम‌ल‌ यांच्यातील न‌व‌थ‌र‌, स‌ंकोची प‌र‌स्प‌र‌स‌ंब‌ंध एक‌द‌म‌च ठ‌ळ‌क‌प‌णे उठुन दिस‌तात. पण "र‌ज‌नी" या व्यक्तिरेखेशी मला आयडेंटिफाय करता आले नाही. हां दुरून appreciate जरूर केली.
.

(२) साहेब बीवी और गुलाम मधील छोटी बहू चे पात्र आवडलेले होते असे इम्प्रेशन आठवते बाकी फारसे आठवत नाही. खरं तर परत तो सिनेमा पाहायला हवा. न‌व‌ऱ्याचा स‌ह‌वास व‌ प्रेम‌ मिळ‌व‌ण्याक‌र‌ता आसाव‌लेली व‌ त्याला साथ द्याय‌ला दारु पिता पिता, दारुच्या आहारी गेलेली. निगेटिव्ह आस्पेक्ट अस‌लेले पात्र मीनाकुमारीने ज‌ब‌र‌द‌स्त र‌ंग‌विले अस‌ल्याचे स्म‌र‌ते.
.
https://upload.wikimedia.org/wikipedia/en/4/43/Guide_1965_film_poster.jpg
.
(३) गाईड‌ म‌ध‌ली स्व‌त:च्या व‌य‌स्क आणि स्व‌भावाने रुक्ष न‌व‌ऱ्याला क‌ंटाळ‌लेली वैवाहिक‌ दृष्ट्या अस‌माधानी रोझी. स‌त‌त न‌व‌राबाय‌कोचे होणारे झ‌ग‌डे. प‌र‌त न‌व‌ऱ्याच्या उप‌काराच्या खाली द‌ब‌लेली, म‌न‌ मारुन , अतिश‌य‌ आव‌ड‌रत्या छ‌ंदास तिलाञ‌ली देउन ज‌ग‌णारी रोझी. हे पात्र व‌हीदाने चांग‌ले र‌ंग‌विलेले आहे प‌ण अधिक चांग‌ले र‌ंग‌विता आले अस‌ते असे राहून राहुन वाट‌ते. दिग्द‌र्श‌काने थोडि घिसाड‌घाई केल्यासार‌खी म‌ला वाट‌ली. या पात्राब‌रोब‌र‌ही आय‌डेन्टिफाय‌ क‌र‌ता आले नाही.
.
http://3.bp.blogspot.com/_pCG_c3Rq788/TN5Wej8QvoI/AAAAAAAAJKQ/P8wagC-79j0/s1600/1959+Bollywood+Poster+NAVRANG+%257E+V+Shantaram.JPG
.
(४) नवरंग मधली जमुना. मला हे पात्र फार आवडतं. जमुना अगदी नॉनग्लॅमरस तर आहेच पण ती कर्तव्यदक्ष आहे. घरात सासू-सासरे. ती सतत कामात, व्यापात व्यग्र आहे. इतकी कि ती नवर्याला रिझवण्यातही संकोच करते. खरं तर तिच्य मनात अढी आहे कि नवर्याला मोहिनी आवडते. आता हि मोहिनी कोण ते तिला कळणे शक्यच नाही कारण मोहिनी आहे,दिवाकराची, तिच्य नवारयाची प्रेरणा. काल्पनिक muse . पण झालय‌ काय त्यामुळे आधीच स्वभावाने संकोची असलेल्या, किंचित रुक्ष पणाकडे झुकणार्या जमुनेला नवर्याशी मानाने एकरूप होताच येत नाही.हा जो भावनिक अडसर आहे तो इतका मस्त रंगवला आहे, कुठेही एक्सप्लिसिट बोलून न दाखवता, संध्याने तिच्य विभ्रमातून, त्राग्यातून तो प्रकट केलेला आहे. दिवाकर तर कवीच आहे, सदैव सरस्वतीच्या उपासनेत बुडालेल्या त्याचे जमुनावरती अतिशय प्रेम आहे. पण जमुनाला ते कळत नाही, तिचे जे मत्सरायुक्त दु:ख आहे, ते दिग्दर्शकाने खूप छान रंगविले आहे.ती फणसासारखी आहे. बाहेरुन काटेरी आतुन गोड. रुक्ष भासते पण मनात भावनांचा कोलाहल जपते. तिला नवर्याचे प्रेम हवे आहे पण कसे मिळवायचे ते कळत नाही. खरं तर आपण आपल्या कवी नवर्याला पुरेशी साथ देऊ शकू कि नाही याबद्दल ती साशंक आहे. हा न्यूनगंड, मत्सर,, भावनिक अडसर .... तिचे सगळे सर्व shadow aspects मला अतिशय "मानवी" आणि म्हणून विलोभनीय वाटतात.
.
तुम्हाला कोण‌ती कोण‌ती पात्रे आव‌ड‌ली व‌ का आव‌ड‌ली त्याब‌द्द‌ल‌ ऐकाय‌ला म‌ला ज‌ब‌र‌द‌स्त आव‌डेल‌. त्याव‌रुन "म‌निषा" यांनी लिहीलेला एक सुंद‌र‌ लेख आठ‌व‌ला तो - http://aisiakshare.com/node/2215
तेव्हा हा धागा इन्ट‌रॅक्टिव्ह‌ क‌रा. प्र‌तिसादांनी चार चांद‌ लावावा, भ‌र‌भ‌रुन लिहावे ही विन‌ंती. ख‌र‌ं त‌र अग‌दी गेल्या पीढीचे जुनाट सिनेमे मी उधृत केले आहेत्. इथे न‌वीन चित्र‌प‌ट प‌हाणारी र‌सिक म‌ंड‌ळी अस‌तिल, कोणी अन्य एखाद्या सिनेमातिल पात्राविष‌यी काही रोच‌क लिहू श‌केल त‌र ख‌र‌च म‌जा येईल्.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'च्र‌ट‌जी तुम्हाला कोण‌त्या व्य‌क्तिरेखा का आव‌ड‌लेल्या आहेत तेही भ‌र‌भ‌रुन लिहावे ही विन‌ंती. ज‌से आन‌ंद‌म‌धील राजेश ख‌न्नाची किंवा अन्य्. कोण‌तीही. मी "वेक‌ अप सिड्" पाहीलेला नाही प‌ण गाण्यातुन जेव‌ढी क‌ळ‌लेली आहे त्यातुन आयेशा ची व्य‌क्तीरेखा फार आव‌डेल असे वाट‌ते.
अमोल‌ पालेक‌र‌च्या साध्या व्य‌क्तीरेखा, दीप्ती न‌व‌ल‌च्या "ग‌र्ल नेक्स्ट डोअर्" व्यक्तीरेखाही म‌स्त अस‌तात्. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुष्यात तीनचारच सिनेमे पाहिलेत त्यामुळे पास. इंग्रजी सिनेमातली नावे लक्षात राहात नाहीत. बाँड सिनेमे गम्मत म्हणून. चार्लीचापलिनचा किड ,डिक्टेटर विशेष आवडलेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ध‌न्य‌वाद्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) "सीमा"मधील बलराज साहनींचा आश्रमचालक:

हिंदी चित्रपटाचा नायक कसा असावा ह्याच्या कोण‌त्याही रूढ संकेतात न बसणारी ही व्यक्तिरेखा. नायिकेहून वयाने बराच मोठा, रूपाने डावा, "डॅशिंग" अजिबात नसलेला एक ध्येयवादी आश्रमचालक बलराज साहनींनी विलक्षण ताकदीने उभा केला आहे. खरे तर "सीमा" हा पूर्णपणे नूतनचा चित्रपट. तिच्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक. तरीही साहनींची व्यक्तिरेखा दीर्घकाळ लक्षात राह्ते, एवढेच नाही तर मनावर कोरली जाते.

२) "हम दोनो"मधील मेजर वर्मा:

देव आनंद आणि अभिनय हे दोन्ही शब्द एकत्र उच्चारणे हा फाऊल आहे (आणि हे मी त्यांचे अनेक चित्रपट स्वेच्छेने अनेकदा पाहूनही म्हणतो आहे). पण चर्चाविषय अभिनयक्षमता नसून ठसा उमटवून गेलेल्या व्यक्तिरेखा हा आहे. त्यामुळे निदान मला तरी ही व्यक्तिरेखा टाळून पुढे जाणे शक्य नाही. ह्या चित्रपटातील कॅप्टन आनंद म्हणजे देव आनंदच्या कोणत्याही चित्रपटातील देव आनंद. परंतु मेजर वर्मा हा करारी पण संवेदनशील अधिकारी वेगळा आहे. ज्या भूमिकेत प्रत्यक्ष देव आनंदही छाप पाडून जातो त्यात निश्चित काहीतरी आहे.

३) "सिटीझन केन"मधील ऑर्सन वेल्सने साकारलेला केन:

ह्या चित्रपटाविषयी व भूमिकेविषयी आजवर इतके लिहिले गेले आहे की आता लिहिण्यासाठी काहीही उरले नाही.

४) "एक ही रास्ता"मधील मीना कुमारी:

सुरुवातीला आपल्या पती व लहान मुलाबरोबर संसारात सुखी, आनंदी, हसरी, नाचरी गृहिणी; पतीच्या निधनानंतर दु:खी, चिंताग्रस्त; सांत्वनासाठी येणार्‍या पतीच्या मित्रावरून शेजार्‍या-पाजार्‍यांनी पिकवलेल्या कंड्यांनी व वाग्बाणांनी घायाळ विधवा; पुनर्विवाहानंतर तिच्या मुलाच्या मनात सावत्र बापाबद्दल असलेली अढी व त्यामुळे मुलगा व नवरा ह्यांच्यामध्ये तिची होणारी घुसमट - सारे अत्यंत प्रत्ययकारी आहे.

5) "जागते रहो"मधील खेडूत:

राज कपूरच्या प्रतिमेपेक्षा खूप वेगळी ही व्यक्तिरेखा. तहानेने व्याकूळ होऊन एका प्रचंड चाळवजा इमारतीत शिरलेला व तिथे माणसांचे वेगवेगळे नमूने पाहून भांबावलेला खेडूत "दो बिघा जमीन"मधल्या बलराज साहनींच्या शंभू महातोच्या बरोबरीने मनात घर करून बसला आहे.

६) "गॉन विथ द विंड"मधील स्कारलेट ओ'हारा:

केवळ अविस्मरणीय!

७) "समाप्ती" ह्या बंगाली चित्रपटातील मृण्मयी:

अपर्णा सेन ह्यांनी साकारलेली रवींद्रनाथ ठाकूर-सत्यजीत राय ह्यांची ही मानसकन्या. हाच चित्रपट हिंदीत उपहार ह्या नावाने नंतर आला होता व त्यात ही व्यक्तिरेखा जया भादुरीने उत्तम साकारली होती. कलकत्त्यात कॉलेजात शिकणारा अमुल्य सुट्टीत गावी आपल्या घरी येतो. त्याची आई त्याला आता लग्न केल्याशिवाय परत जाऊ देणार नसते. लग्नाला तो तयार होतो खरा पण आईने निवडलेल्या मुलीला नाकारून गावातील लहान मुलांबरोबर दिवसभर उंडारणारी, खोड्या काढणारी, अल्लड टॉमबॉय मृण्मयी पसंत करतो. त्याच्या हट्टापुढे हात टेकून आई त्याचे तिच्याशी लग्न लावून देते, आणि लग्नानंतर तिला 'माणसात आणण्याचा' प्रयत्न करू लागते. मृण्मयीचा व सासूचा कलगीतुरा रंगात येतो. अमुल्य तिचा अल्लडपणा समजून घेत तिला समज येण्याची वाट पाहत असतो. शेवटी सुट्टी संपते व तो पुन्हा कलकत्त्याला निघून जातो. त्याच्या जाण्यानंतर व कदाचित जाण्यामुळेच मृण्मयी हळूहळू मोठी होऊ लागते, तिच्यातील मुलीची जागा स्त्री घेऊ लागते. अपर्णा सेन ह्यांनी ही व्यक्तिरेखा फार छान रंगवली आहे. वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षी त्यांनी दाखवलेली भूमिकेची समज, जाण थक्क करणारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

वेलकम बॅक मिलिंद राव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌विस्त‌र‌ प्र‌तिसादाक‌र‌ता अनेक ध‌न्य‌वाद मिलिंद‌. ह‌म‌ दोनो म‌धील देवान‌ंद‌च्या दोन्ही भूमिका फार आव‌ड‌तात म‌ला.दोन्हीत एक म‌ज‌बूरीर आहे, व्याकुळ‌प‌णा आहे. प‌ण म‌ला मेज‌र‌ पेक्षा दुस‌री भुमिका जास्त आव‌ड‌ते. मेज‌र‌च्या बाय‌कोला न‌ंदाला त‌र तो तिचा न‌व‌रा आहे अशी खात्री आहे, मेज‌र‌च्या आईला ह्रुद‌य‌विकार आहे त्यामुळे कोंडित‌ साप‌ड‌लेला कॅप्ट‌न आन‌ंद‌. बाप‌ रे, काय विल‌क्ष‌ण कोंडीअसेल, घुस‌म‌ट असेल्.
.
सीमा प‌हाय‌चा धीर‌च होत‌ नाही म‌ला. फार सिरीअस वाट‌तो. ते गाणे आहे ना "तू प्यार‌ का साग‌र है" वा! काय विल‌क्ष‌ण सुंद‌र आहे. त्यात द‌त्ताची मूर्ती आहे. हिंदी सिनेमात द‌त्त‌मूर्ती मी प‌हील्यांदा व‌ शेवट‌ची पाहिलेली.
.
"जाग‌ते र‌हो" ठीक वाट‌ला म‌ला.
.
"गॉन विथ द‌ विंड्" फ‌क्त र्हेट ब‌ट‌ल‌र‌क‌र‌ता प‌हाते मी. तो न‌ट देख‌णा आहे म्ह‌णुन न‌व्हे त‌र त्याचे व्य‌क्तिचित्र‌ण लोभ‌स आहे, देख‌णे, virile, मिष्किल‌ आहे म्ह‌णुन्.
.
"स‌माप्ती" सिनेमा, प‌हाय‌ला ह‌वा.
.
म‌ला "दो आंखे बार‌ह‌ हाथ्" म‌धील स‌ंध्याही खूप आव‌ड‌ते.
.

देव आनंद आणि अभिनय हे दोन्ही शब्द एकत्र उच्चारणे हा फाऊल आहे (आणि हे मी त्यांचे अनेक चित्रपट स्वेच्छेने अनेकदा पाहूनही म्हणतो आहे).

हाहाहा त्याल‌ अस‌ग‌ळ्या भुमिका चॉक‌लेट हिरो च्या, आय कॅंडि च्याच आल्या. क‌दाचित त्याला दिग्द‌र्श‌क चांग‌ले मिळाले नाहीत त्यामुळे क‌स‌ लाग‌ला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेज‌र‌च्या आईला ह्रुद‌य‌विकार आहे

हृद‌य‌विकार‌ न‌ंदाला अस‌तो, आणि मेज‌र‌ व‌र्माच्या मृत्यूची बात‌मी तिला स‌ह‌न‌ होणार‌ नाही असे डॉक्ट‌र‌ कॅप्ट‌न‌ आन‌ंद‌ला सांग‌तो, व‌ मेज‌र‌ अस‌ल्याचे नाट‌क‌ क‌रण्याची विन‌ंती क‌र‌तो. प‌ण‌ ह्या नाट‌काची पूर्व‌क‌ल्प‌ना मेज‌र‌च्या आईस‌ डॉक्ट‌र‌ व‌ कॅप्ट‌न‌ का देत‌ नाहीत‌ हे चित्र‌प‌टात‌ स्प‌ष्ट‌ केलेले नाही. (निदान‌ म‌ला त‌री आठ‌व‌त‌ नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

अरे होय‌ होय‌ न‌ंदाला ह्रुद‌य‌विकार अस‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी पण शरदरावांसारखा फारसा चित्रपट न बघणारा , पण किंग्ज स्पीच मधील कॉलिन फर्थ चा अभिनय फार आवडला . ( मी किंवा शरद यांच्यासारखे चित्रपट विषयातले औरंगजेब प्रतिसाद देताहेत . पण इथे बरेच खरे चित्रपट प्रेमी/दर्दी/रसिक असावेत ते लिहीत नाहीयेत याचे सखेद आश्चर्य वाटते .)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह‌ळूह‌ळु प्र‌तिसाद येतील असे वाट‌ते. ऐसीक‌र‌ प‌ट‌क‌न उडी घेत नाहीत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिट्टो..
हा एक नितांत‌सुंद‌र चित्र‌प‌ट आहे. 'सुर‌वंटाचं फुल‌पाख‌रू' या प्र‌कारातील स‌र्वात उत्त‌म चित्र‌प‌टात किंग्ज स्पीच‌चा न‌क्की स‌मावेश होईल असे वाट‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अबा आणि पुंबा,किंग्ज स्पॅच मी हि पाहिला आहे. वाद‌च नाही. सुंद‌र‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

1. मनोज वाजपेयी अभिनेता म्हणून आवडतो. त्याच्या बहुतांशी सर्वच व्यक्तिरेखा आवडतात. पण त्यातल्या त्यात त्याने गँग्स ऑफ वासेपुर मध्ये रंगवलेला सरदार खान आणि अलिगढ मधील प्रा. सायरस या व्यक्तिरेखा आवडतात. शिवाय, सत्या मधील भिकू म्हात्रे आवडतो.
2. पियुष मिश्राने गुलाल मध्ये रंगवलेला पृथ्वी बना आवडतो.
3. शाहरुखचा विशेष फॅन नाही. पण, चक दे मधील कबीर खान आवडतो.
4. आमिर खानने थ्री इडियट्स मध्ये साकारलेला रँचो आवडतो.
5. शाहिद कपूरने हैदरमध्ये उभा केलेला हैदर प्रचंड आवडतो. उडता पंजाबमधील टाॅमी सिंगही भारी आहे.
6. अभय देओलचा देव डी मधील देव आवडतो. त्याचा यातील परफॉर्मन्स भारी आहे.
7. सौरभ शुक्लाचा जाॅली एलएलबी मधील न्यायाधीश त्रिपाठी आवडतो, प्रचंड आवडतो.
8. नवाजुद्दीन सिद्दिकीचा रमण राघवमधील रमण आवडतो.
9. क्वीनमधील कंगना राणावतची राणी आणि तनू वेड्स मनू मधील तनू आवडते.
10. विकी कौशलचा मसान आणि रमण राघवमधील परफॉर्मन्स आवडतो.
11. रिचा चढ्ढाची मसान आणि गँग्स ऑफ वासेपुर मधील भूमिका आवडतात.

बऱ्याच इतर भूमिका आणि कलाकार राहिले आहेत. पण, तूर्तास इतकंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉह‌लिड!!! भिकु म्हात्रे न‌ आव‌ड‌ला त‌र‌च न‌व‌ल्. म‌लाहि त्याची व‌ त्याच्या बाय‌कोचीही व्य‌क्तीरेखा फार आव‌ड‌ली. फार्. म‌नोज‌ बाज‌पाई प्रॉमिसिंग‌ अॅक्ट‌र‌ आहे ख‌रा. बाकी नाही ना पाहीलेले.
गॅंग्ज ऑफ वासेपुर‌ म‌ध्ये एकेक व्य‌क्तीतरेखा ज‌ब‌री आहे. म‌स्त सिनेमा आहे. तो अॅक्ट‌र म‌ला माहीत नाही प‌ण एक ग‌र्दुल्या दाख‌व‌लेला आहे. बाप‌ रे काय अभिन‌य‌ केलेला आहे त्याने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌नोज‌ बाज‌पाई प्रॉमिसिंग‌ अॅक्ट‌र‌ आहे ख‌रा.

हे वाक्य आक्षेपार्ह आहे.

म‌नोज बाज‌पाई ब‌ल‌द‌ंड अॅक्ट‌र आहे.
तो प्रॉमिसिंग होता ... ते १९९५ च्या आस‌पास्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा स‌ह‌र्ष मान्य‌ है!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त‌रीप‌ण‌, स‌ध्या 'त‌नू वेड्स म‌नू' हा पिक्च‌र‌ पुन्हा ब‌घित‌ला- म्हणून‌ त्याब‌द्द‌ल‌ लिहिते.
- ब‌हुतांश‌ लोकांना ह्यात‌ली क‌ंग‌नाची व्य‌क्तिरेखा खूप‌च‌ आढ्य‌तेखोर‌, rebel without a cause वाट‌ते, आणि म‌नू श‌र्मा तिच्या प्रेमात‌ क‌सा काय‌ प‌ड‌तो, तेच‌ क‌ळ‌त‌ नाही. मात्र‌ माझ्या म‌ते अतिश‌य‌ वेग‌ळ्या ढंगाची ही व्य‌क्तिरेखा आप‌ल्या स‌र्व‌साधार‌ण सिनेमाच्या प‌ट‌क‌थेक‌डून‌ अस‌तात‌, त‌स‌ल्या सग‌ळ्या अपेक्षा एकापाठोपाठ‌ एक‌ फेटाळून लाव‌ते!
स्व‌त:च्या रूपाचा ग‌र्व‌ क‌रण‌ं वाईट‌ अस‌त‌ं का? ते वाईट‌च‌ का अस‌त‌ं?
प्रेमात‌ प‌ड‌णे, आणि ल‌गेच‌ प्रेमातून‌ बाहेर‌ प‌ड‌णे, अथ‌वा दुस‌ऱ्या कोणाच्या प्रेमात‌ प‌ड‌णे, हे प‌ण नैतिक‌दृष्ट्या वाईट‌च‌ का अस‌त‌ं- विशेषत: मुलींनी जास्त‌ ज‌बाब‌दारीने प्रेम‌ क‌राव‌ं, अशीच अपेक्षा का अस‌ते?

ह्याव‌र त‌नू आप‌ल्याला विचार क‌राय‌ला लाव‌ते.

किंब‌हुना, तिच्या बिन्धास्त‌प‌णामुळेच‌ लोक‌ तिच्याक‌डे आक‌र्षित‌ होतात. ह्या सिनेमात‌ल्या स‌ग‌ळ्याच‌ व्य‌क्तिरेखा अतिश‌य‌ आव‌ड‌लेल्या आहेत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

हे तर थोडेसेच आहेत. आणखीही बऱ्याचशा व्यक्तिरेखा आहेत. पण, तूर्तास आणि थोडक्यातच तरी याच. आणि यातील ही बहुतांशी तुम्हाला आवडल्या हेच बरेच...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे ते चित्र‌प‌ट‌च‌ नोंद‌तोय‌ ज्यात‌ल्या व्य‌क्ती आव‌ड‌ल्या आणि ल‌क्षात‌ राहिल्या. शिवाय‌ शोलेम‌धले स‌ग‌ळेज‌ण‌, बॅट‌मॅन‌म‌धला जोक‌र‌ इ. नेहेमीचे य‌श‌स्वी सोडून देतोय‌.

१. ब‌न‌वाब‌न‌वीत‌ले विश्वास‌राव‌ स‌र‌पोत‌दार‌ - अतिप्र‌च‌ंड‍, अश‌क्य‌ आव‌ड‌लेली व्य‌क्तिरेखा. कित्येक‌दा सुधीर‌ जोशींचा भाग‌ संप‌ल्याव‌र‌ चित्र‌प‌ट‌ ब‌ंद‌ केला आहे.
म्ह‌ण‌जे "आत‌ च‌ला. न‌म‌स्कार‌ क‌रून‌ घेताहेत‌" झाल‌ं की ब‌ंद‌.

२. खोस‌ला का घोस‌ला म‌ध‌ले खुराना/खोस‌ला/बापू - तिघांचीही काम‌ं क‌माल‌ आहेत‌. चित्र‌प‌ट‌ ए१ आहे यात‌ वाद‌च‌ नाही आणि र‌ण‌वीर‌ शौरीच‌ं काम‌ही झ‌कास‌ प‌ण्-
ज्या न‌जाक‌तीने ह्या तिघांनी काम‌ं केलियेत‌ त्याला तोड‌ नाही.
घ‌रात‌ आप‌ल्या म‌र्जीविरूद्ध‌ जाऊन‌ आप‌ल्याक‌रिताच‌ केलेल्या क‌ट‌कारस्थानात सामील‌ न‌ होणारे खोस‌ला साहेब‌, माग‌व‌लेला पिझ्झा खाताना ज्या वैतागाने "इस‌के साथ‌ च‌ट‌नी व‌गैरा कुछ न‌ही है?" म्ह‌णतात‌ तो प्र‌स‌ंग‌ घ्या
किंवा म‌ग‌ बापूंचा "तो आप‌, चूप‌ रेहेने का क्या लेंगे" घ्या. निव्व‌ळ‌ सोन‌ं.
खुराना हा शेप‌रेट‌ अभ्यासाचा विष‌य‌ आहे राव‌. "सेठी साहाब‌, बैठ‌ना प‌डेगा आप‌ के साथ‌" असो किंवा "कॉम्प्लेक्स‌ म‌ल्टिप्लेक्स‌" असो - खुराना रॉक्स‌.

(आणि तित‌कीच‌ हिडीस‌ "बाsssssपू" म्ह‌ण‌णारी तारा श‌र्मा. जाऊदे.)

३. ब्लॅक‌ फ्रायडे म‌ध‌ले बाद‌शाह‌ खान‌ आणि टाय‌ग‌र‌ मेम‌न‌ - दोन्ही म‌स्त‌. बाद‌श‌हा खान‌ची छोटी भूमिका आहे, प‌ण त्याने रागापासून असहाय‌तेप‌र्य‌ंत‌ सॉलिड‌ प्र‌वास‌ केलाय‌.
प‌व‌न‌ म‌ल‌होत्राचा टाय‌ग‌र‌ मेम‌न खास‌. "अख्खा बॉंबे ज‌ला देगा मै." ही भाव‌ना त्याच्या डोळ्यांतून‌ उत‌र‌ते. बाद‌श‌हाला क‌टात‌ सामिल‌ क‌रून‌ घेतानाचा "किध‌र‌ का बाद‌श‌हा तू" अस‌ं दातात‌ली काडी कोर‌त‌ खेळ‌क‌र‌ प्र‌श्न‌ विचारून‌ म‌ग अचान‌क‌ "कित‌ने हिंदू मारे?" व‌र‌चा थ‌ंड‌ स‌वाल‌ लाज‌वाब‌ वाट‌ला.

४. पांच‌ म‌ध‌ला लूक‌ (Luke) - ब‌घाच‌.

५. प्र‌सिद्ध‌ उद्योग‌प‌ती य‌दुनाथ‌ ज‌व‌ळक‌र‌ - "वॅक्खी वूक्ख्हू विक्खी?".[चू.भू.द्या.घ्या]

आणखी खूप‌ अस‌तील‌...

६.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज‌रुर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रतिसाद मीच लिहिला आहे अस वाटाव इतकी सहमती या प्रतिसादाशी. पवना मल्होत्राने टायगर मेमन फारच भारी केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भारी. प‌व‌न‌ म‌ल्होत्रा आव‌ड‌ता अभिनेता आहे. एक बाघ‌ बहादूर‌ नावाचा चित्र‌प‌ट‌/मालिका पाहिलेली आठ‌व‌ते.. त्यात‌ल‌ं त्याच‌ं काम‌ अजून‌ ल‌क्ष्हात‌ आहे.
यूट्यूब‌व‌र‌ एव‌ढ‌ंच‌ मिळाल‌ं. https://www.youtube.com/watch?v=cg7t7TiPsew

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शोधयला हवा हा सिनेमा. 'सलीम लंगडे पे मत रोना'मध्ये पण छान काम केलय त्याने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पवन मल्होत्रासाठीही 'जब वी मेट' एकदा बघायला हरकत नाही. बारकीशी भूमिका आहे, पण मस्त काम केलंय त्यानं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खोस‌ला का घोस‌ला हा ओप‌निंग सीन‌पासूनच एक भारी चित्र‌प‌ट आहे. एक‌न एक पात्र म‌स्त उभं केलंय. अनुप‌म खेर‌चा खोस‌ला त‌र म‌स्त आहेच. त्याचं स‌र‌कारी नोक‌रीत अस‌णं आणि त्यामुळे अंगात भिन‌लेलं दिल्लीत‌लं हुज‌रेगिरीचं क‌ल्च‌र इत‌कं म‌स्त दाख‌व‌लंय की मुलाब‌रोबर खुरानाचा प‌त्ता शोधाय‌ला जाताना जे बंग‌ले दिस‌तात त्यांच्या माल‌कांची नावं सुद्धा तो 'सिंग साह्ब, ब‌वेजा साह्ब' अशी वाच‌तो.

त्यासोब‌त त्याचा स‌र‌दार मित्र 'साहनीसाब' हासुद्धा झ‌कास. आणि विन‌य‌ पाठ‌क‌चा अभिन‌य‌ही एक‌ न‌ंब‌र. फ‌क्त एक न्यून वाट‌लं ते म्ह‌ण‌जे विन‌य‌ पाठ‌क‌च्या भाषेचा ल‌हेजा म‌ध्य‌ंत‌रानंत‌र अचान‌क ब‌द‌ल‌तो. त्यात‌ली सुरुवातीची टिपिक‌ल दिल्लीच्या हिंदीची झाक जाऊन ते एक‌द‌म पॉलिश्ड हिंदी वाटाय‌ला लाग‌तं. असं का ते क‌ळालं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब‌न‌वाब‌न‌वीत‌ले विश्वास‌राव‌ स‌र‌पोत‌दार‌

ह्यात‌ला 'स‌त्त‌र रुप‌ये वार‌ले' वाला सिन व‌र्ल्ड फेम‌स आहे प‌ण म‌ला हा सिन जाम म्ह‌ण‌जे जाम आव‌ड‌तो. आतादेखील आठ‌वून‌ ह‌स‌तोय.
विश्वास स‌र‌पोत‌दार: काय हो, तुम्ही तिघे राह‌ता इथे(इथे चूक आहे, ख‌रे त‌र दोघेच राह‌त अस‌तात), म‌ग चार क‌प क‌से?
ध‌नंज‌य माने: त्याचं काय आहे, म‌ला रोज स‌काळी दोन क‌प च‌हा लाग‌तो('तो'व‌र खास अशोक स‌राफ स्पेश‌ल जोर), दोन क‌प‌(अ. स‌. स्पे. जो.)
विश्वास स‌र‌पोत‌दार: (एक‌द‌म फ‌स‌फ‌स‌णाऱ्या उत्साहाने), हो काय? तुम‌चं म्ह‌ण‌जे आम‌च्या मंड‌ळींसार‌खं आहे म्ह‌णाय‌चं..
ध‌नंज‌य‌ माने: त्यांना प‌ण दोन‌ क‌प‌ च‌हा लाग‌तो काय?(उत्साहात आण‌खी काही त‌री ब‌र‌ळ‌तो)
वि. स‌: पुरे..
आता, ख‌रे त‌र या सिन‌म‌ध्ये काही विशेष‌ नाही , प‌ण सुधिर जोशी आणि अशोक‌ स‌राफ‌ यांनी आप‌ल्या ज‌ब‌र‌द‌स्त टाय‌मिंग‌ने ध‌माल आण‌लिये.

आव‌ड‌त्या कॅरेक्ट‌र्स‌म‌ध्ये अशोक‌ स‌राफ‌ यांचेच‌ 'निशाणी डावा अंग‌ठा' म‌ध‌ला बंडू भाव‌डा राठोड‌ हा हेड‌मास्त‌र अफ‌लातून आहे.
आंखो देखी म‌ध‌ला राजेबाबू देखिल‌ फार फार आव‌ड‌लेलं पात्र‌.

अवांत‌र: 'अशी ही ब‌न‌वा ब‌न‌वी' क‌ल्ट क‌सा झाला काय माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अशी ही ब‌न‌वा ब‌न‌वी' क‌ल्ट क‌सा झाला काय माहिती.

म‌लाही हे शोधाय‌च‌ंय‌.
साधार‌ण‌ २००० सालान‌ंत‌र‌ क‌धी त‌री ब‌न‌वाब‌न‌वीचा क‌ल्ट‌ झाल्यासार‌ख‌ं वाट‌त‌ंय‍ कुणी त्याआधीपासून‌ ब‌न‌वाब‌न‌वी क‌ल्ट‌ ऐक‌लाय‌ का?
यूट्यूब‌व‌र‌ टाक‌ल्याने ९०न‌ंत‌र‌च्या पोरांना अॅक्सेसिब‌ल‌ झाला असेल‌ असा एक क‌यास‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न‌व्व‌दीच्या द‌श‌कात‌(९६-९७च्या सुमारास‌) आम्हा भाव‌ंडांम‌ध्ये हा लैच‌ हिट सिनेमा होता. प्र‌त्येक‌ सुट्टीत‌ याची कॅसेट‌ भाड्याने आणुन‌ म‌ल्टीप‌ल‌ वेळेला पाहिला जाय‌चा हा सिनेमा. अजुन एक दोन फेव्ह‌रिट होते प‌ण यास‌म‌ हाच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्री, 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' आहे/होता का हो तुमच्या फेव्हरीटसमध्ये? 'ही घ्या सुरळी.... आणि वाचा..(टिपिकल अशोक सराफ स्टाईलमध्ये)'.
मी आणि माझा भाऊ कधीही भेटलो की ह्या असल्या पिक्चरमधले डायलॉग आठवून हसत बसतो..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

एव‌ढा नाही आव‌ड‌त‌ तो सिनेमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान धागा.
मला प्रिडेटरमधला अरनॉल्ड ,त्याची मेजर डचची व्यक्तीरेखा आवडते .सविस्तर लिहीनच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

ज‌रुर्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

( कृपया बूच मारू नये )

भ‌वानी श‌ंक‌र : - न‌र‌म‌ग‌र‌म म‌ध‌ला भ‌वानी श‌ंक‌र (बाज‌पाई) किंवा गोल‌माल म‌ध‌ला भ‌वानी श‌ंक‌र. उत्प‌ल‌ द‌त्त यांनी झ‌कास साकार‌लेले आहेत. स‌र्वात ल‌क्षात राहिलेले किर‌दार.

राघ‌वेंद्र श‌र्मा - चुप‌के चुप‌के मधे ओमप्र‌काश ने साद‌र केलेले कॅरॅक्ट‌र. विशेषत्: भाषेच्या शुद्ध‌तेब‌द्द‌ल‌चा आग्र‌ह‌ एक‌द‌म विल‌क्ष‌ण. "ज‌ल‌वायू के प‌रिव‌र्त‌न के साथ साथ ऐसी यात्रा .... पार‌स्प‌रिक अंत‌र्ग्यान के लिये स‌हाय‌क सिद्ध होती है". झ‌क्कास.

काला प‌त्थ‌र म‌ध‌ला श‌त्रू. त्याने वाप‌र‌लेले श‌ब्द एक‌द‌म म‌स्त्. ओंगेपोंगे, च‌प‌ड‌ग‌ंजू, राजा-बाबु-प‌ह‌ल‌वान, मेरे-ताश-के-तिर‌प‌न्न‌वे-प‌त्ते व‌गैरे. त‌सं त‌र श‌त्रू ने न‌र‌म‌ग‌र‌म‌ म‌धे प‌ण "साला घोचू" म्ह‌णून आम‌चं दिल जित‌लं होतं. ज‌व्वाब नाय.

अंगूर म‌ध‌ला दिन‌कापूर वाला स‌ंजीव‌कुमार् अशोक. त्याचे ते डिटेक्टिव्ह क‌था वाचण्याचे वेड व त्याचा त्याच्याव‌र अस‌लेला प्र‌भाव व त्यामुळे त्याचं ते च‌म‌त्कारिक वाग‌णं. कितीही वेळा पाहिलं त‌री प्र‌त्येक वेळी म‌जा येते. दुस‌रा अशोक‌ प‌ण तित‌काच याद‌गार. "फूल खूब‌सूर‌त है ... तो खूब‌सूर‌त है.... क्यो खूबसूर‌त है ? .... अरे छोडो ह‌टाओ ना यार .... खूब‌सूर‌त तो है !!!!"

च‌ष्मेब‌द्दूर म‌ध‌ली मिस च‌म‌को. आण‌खी काहीही लिहिण्याची ग‌र‌ज नाही.

अस्व‌लाशी जोर‌दार सह‌म‌त. उद्योग‌भूष‌ण य‌दुनाथ ज‌व‌ळ‌क‌र एक‌द‌म‌च आव‌ड‌लेले. वॅह्हॅ विह्हि वुह्हु. व ध‌नाजी राम‌च‌ंद्र वाक‌डे प‌ण झ‌क्कास. ज‌व‌ळ‌क‌र मास्त‌र मात्र ओढून ताणून्.... ( धुम‌ध‌डाका म‌धे न आव‌ड‌लेलं म्ह‌ंजे ग‌ब्ब‌र चं विड‌ंब‌न. विट‌ंब‌ना होती ती.)

आण‌खी एक म‌स्त व्य‌क्तीरेखा म्ह‌ंजे "ज्युलिय‌स नागेंद्र‌नाथ विल्फ्रेड सिंग". ध‌माल उड‌वून दिली होती अशोक‌कुमार ने.

प‌डोस‌न म‌धे मास्ट‌र पिल्ल‌ई आणि विद्याप‌ति या दोघांची भूमिका म‌स्त्. हा सीन स‌र्वोत्त‌म्

( कृपया बूच मारू नये )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग‌ब्ब‌र‌ बुच असा प्र‌कार‌च ऐसीव‌र‌ती नाही. यु कॅन एडिट युअर क‌मेन्ट एनीटाइम Smile
____

मिस‌ च‌म‌को

त्याव‌रुन आठ‌व‌ल‌ं - "क‌था" म‌ध‌ला फारुक शेख ..... डोक्यात जातो. किती ल‌बाड, वाईट अस‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याव‌रुन आठ‌व‌ल‌ं - "क‌था" म‌ध‌ला फारुक शेख ..... डोक्यात जातो. किती ल‌बाड, वाईट अस‌तो.

हेच त्याच्या कॅरेक्टरच्या यशाचे गमक नव्हे काय?

(विनी परांजपे-जोगळेकरणीस मात्र एक खन्नकन कानाखाली ठेवून द्यावीशी वाटते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय‌ म्ह‌णुन‌च ते कॅरॅक्ट‌र ल‌क्षात र‌हाते. न‌स‌रुद्दिन‌पेक्षा जास्त्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुला शोले म‌ध‌ले ग‌ब्ब‌र‌सिंग चे कॅरेक‌ट‌र आव‌ड‌त नाही ग‌ब्बु? सो विअर्ड्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुला शोले म‌ध‌ले ग‌ब्ब‌र‌सिंग चे कॅरेक‌ट‌र आव‌ड‌त नाही ग‌ब्बु? सो विअर्ड्

आत्म‌स्तुतीचा दोष लागेल म्ह‌णून लिहिलं नाही. हॅहॅहॅ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्युलिय‌स नागेंद्र‌नाथ विल्फ्रेड सिंग

कर्नल म्हनायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

विल्फ्रेड‌ ऐव‌जी विल्प्रिट म्ह‌ण‌त अस‌तो ना तो प‌ण‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चुप‌के चुप‌के म‌ध‌ला अमिताभ‌ ब‌च्च‌न‌चा प्रोफेस‌र सुकुमार सिन्हा. तो जे काही उभा केलाय, भारीच. अमिताभ‌ने न‌ंत‌र असा कुठ‌ला रोल केल्याचं ब‌घित‌लं नाही. तेव‌ढा एक‌च.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सत्यजीत रेंच्या चारुलता सिनेमातली चारुलता. तसंच जॊलसाघरमधला जमीनदार.

ब्रिजेस ऒफ मॆडिसम काउंटी मधली मेरिल स्ट्रीपने साकारलेली फ्रान्सेस्का.

एक डाव भुताचा मधलं भूत.

चिमणराव मालिकेतला चिमणराव.

घाशीराममधला नाना, मोहन आगाशेंचा.

अजून खूप आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां घाशीरानम‌ नाट‌काव‌रुन आठ‌व‌ल‌ं म‌ला बॅरिस्ट‌र‌म‌धिल बॅरिस्ट‌र आव‌ड‌तो. स‌ंध्याछ्हाया म‌धील आजीआजोबा ही.
ज‌य‌व‌ंद‌ळ‌वी द‌ ग्रेट्ट्ट्ट्ट्ट!!!!!!!!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणखी एक: 'कथा दोन गणपतरावांची' मधले मोहन आगाशे आणि दिलिप प्रभावळकर. हा एक अफलातून सिनेमा वाटतो मला. शेवट तर इतका विदिर्ण करणारा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

विदीर्ण हा श‌ब्द‌ कैक दिव‌सांनी ऐक‌ला. दारुण‌, अमोघ‌, विदीर्ण‌, प्र‌हार‌, इ. श‌ब्द‌ अलीक‌डे कोणी वाप‌र‌त नाहीत फार‌से.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

1. डर आणि डॉन मधला शाहरुख .यात त्याच्या वागण्याच समर्थन म्हणून आवडलेली नाही . पण अशी व्यक्तिरेखा असतानाही ती हीरो पेक्षा ही प्रभावी वाटते असे त्यात रंग भरले आहेत म्हणून . same goes for आंखे मधला अमिताभ
2. दीवार मधला अमिताभ

3. शोले मधला गबबर

4. दिल चाहता है मधले तिघेही

5. द डार्क नाइट मधला जोकर ऑल टाइम फेवरीट

6. रणबीरचा रॉकस्टार

7. बाबुराव आपटे हेराफेरी

8. शटर आयलंड मधला लियो आणि डॉक्टर दोघेही

9. मोमेंतो मधला नायक

10 . फेलुदा चित्रपटांमधले सौमित्र आणि संतोष दत्ता (सत्यजित राय दिग्दर्शित )

11 . आरण्यर दिन रात्री मधला सौमित्र

12. बर्डमॅन मधला नायक

13. स्लेउथ मधले चौघेही Wink (जाणकारांना समजेल )

अनेक आहेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क‌सा विस‌र‌लो मी , देवा!
प्र‌च‌ंड‌ आव‌ड‌लेली व्य‌क्तिरेखा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा म‌स्त होता आप‌टे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्याचा उल्लेख‌ अदितीच्या धाग्याव‌र पाहिला. चित्र‌प‌ट‌च‌ अद्वितीय‌ आहेच्, प‌ण स‌ग‌ळा चित्र‌प‌ट‌च त्याच्याच‌ व्य‌क्तिरेखेव‌र अव‌ल‌ंबून‌ आहे, म्हणून‌ जास्त‌ क‌माल‌ वाट‌ली. _/\_
इंग्र‌जी सिनेमा म‌ध्ये - फॉरेस्ट‌ ग‌ंप‌ व‌गैरे म‌ंड‌ळी येतात‌, प‌ण‌ म‌ला जिम‌ कॅरि, माय‌क‌ल‌ सेरा, हे फार‌च‌ आव‌ड‌तात‌.

मालिका म्ह‌णाल‌ त‌र‌ साईन‌फेल्ड‌ म‌धील‌ जॉर्ज‌ची व्य‌क्तिरेखा स‌र्वात‌ भारी Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

ख‌र‌ंय‌. क्रेम‌र‌ भाव‌ खाऊन‌ जातो, प‌ण‌ जॉर्ज‌ अतिश‌य‌ भारी प्र‌कार‌ आहे. जेस‌न‌ अलेक्झांड‌र‌ने क‌माल‌ केलीये!
त्याचा प्र‌च‌ंड‌ आत्म‌विश्वास‌ आणि कुठ‌ल्याही प‌रिस्थितीत‌ गिरे तो भी टांग‌ उप‌र‌ वाला अॅटीड्यूड ( आठ‌वा - workplace sex. "I didn't know this kind of thing would be frowned upon.")

OR
Answering ringtone while munching popcorns
व‌गैरे.
जॉर्ज‌ क‌स्टॅंझा म‌हान‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आण‌खी एक‌.. 'ट्रुम‌न्स‌ शो' म‌ध‌ला ट्रुम‌न‌.. स‌माधानी प‌ण अशांत‌, दुर‌चे ज‌ग पाह‌ण्याची आस‌ लावून ब‌स‌लेला, त्याच‌ं अनुभ‌व‌विश्व‌ विस्तार‌ण्याचा प्र‌वास‌. लै भारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

चित्रपटातील माहीत नाही पण जालावर शुचि ही माझी अत्यंत आवडती व्यक्तिरेखा आहे. कितीही नावं बदलली तरी. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय‌ हे ग‌वि. ख‌व‌च‌ट‌प‌णा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खवचटपणा नाही. समस्त जालावरची गोड पर्सनॅलिटी आहेस तू.

विश्वास नसेल तर नको ठेवू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ध‌न्य‌वाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'शुचि' एवढ्या महान व्यक्तिमत्वाची माझ्या 'माझ्या आठवणीतील रीमा लागू' ह्या लेखाला प्रतिक्रिया लाभली, हे मी माझे थोर भाग्य समजतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते त‌र आहेच. शिवाय मामींची साहित्य‌रुचि अनोखी आहे. त्यांनी जेव‌ढा साहित्याचा स्वाद घेत‌ला आहे त्याव‌रून त्या धार्मिक ते रोमॅंटिक आणि ग‌द्य ते प‌द्य स‌र्व प्र‌भागांत टॉप‌र अस‌तील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही त‌स‌ं काही नाही अजो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय इथे वेस्टर्न म्युझिक ( भले फक्त रोमँटिक का असे ना ) त्या एकट्याच!!! त्या अर्थाने आमच्या जातवाल्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग‌वि = गॅम्ब‌ल‌र‌ सॉंग + शी इज‌ ऑल‌वेज अ वुम‌न गही गाणे असे प‌क्के स‌मीक‌र‌ण माझ्या डोक्यात आहे.
कोणाला कोण‌ते गाणे आव‌ड‌ते हे मी म‌ह‌त्वाचे स‌म‌जते ग‌वि Smile

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्हीही शुचिमामींचे फ्यान हाओत‌. फेबुव‌र पेज‌च काढ‌लं पाय‌जे "फॅन्स ऑफ‌ शुचिमामी".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌क‌बूल‌ म‌ध‌ला ज‌हांगीर‌ खान‌ उर्फ‌ अब्बाजी. प‌ंक‌ज‌ क‌पूर‌ने सोन‌ं केल‌ंय‌. त‌शीच‌ ओम पुरीने साकार‌लेली इन्स्पेक्ट‌र पुरोहित‌ची ल‌हान‌ भूमिका. त्या सिनेमात‌ अनेक‌ स‌ंस्म‌र‌णीय‌ कॅरेक्ट‌र्स आहेत. ओंकाराम‌धील‌ ल‌ंग‌डा त्यागी (सैफ‌!), शांघाय‌म‌ध‌ला जोगी (इम्रान‌ हाश्मी!), ह‌जारों ख्वाईशें ऐसीम‌ध‌ली गीता (चित्रांग‌दा) हेही आठ‌व‌णीत‌ राहिलेले. राम‌न‌ राघ‌व‌ २ म‌ध‌ला र‌म‌ण्णा अक्ष‌र‌श: अंगाव‌र‌ येतो (न‌वाजुद्दिन‌). अलिग‌ड़म‌ध‌ला म‌नोज‌ वाज‌पेयी म्ह‌ण‌जे निव्व‌ळ‌ बल‌राज‌ साह‌नी-एस्क‌ आहे. त‌साच‌ शाहिद‌ म‌ध‌ला राज‌कुमार‌ याद‌व‌ही. इर‌फान‌चा पान‌सिंह‌ तोम‌र‌ विस‌र‌ता येत नाही. गुलाल‌ म‌ध‌ले ब‌रेच‌ प‌र‌फॉर्म‌न्सेस ल‌क्ष‌णीय‌ आहेत. क‌ंग‌ना राणाव‌तची क्वीन‌, म‌युरी कांगोची न‌सीम‌, प‌र‌झानिया म‌ध‌ली सारिका, क‌हानीत‌ली विद्या बाग‌ची, त‌शीच‌ इश्किया म‌ध‌ली कृष्णा.. या स‌ग‌ळ्यांब‌रोब‌र‌ म‌ला प‌हेली म‌ध्ये शाह‌रुख‌ने केलेले दोन्ही रोल्स‌ आव‌ड‌ले. आणि ब‌च्च‌न‌ने साकार‌लेला ध‌न‌ग‌र‌सुद्धा.

म‌राठीत‌ ग‌ंध‌मध‌ला म‌ंगेश‌ नाड‌क‌र्णी (गिरीश कुल‌क‌र्णी), गिरीश कुल‌क‌र्णीचे ब‌रेच‌ रोल्स आव‌ड‌लेत‌.

इंग्र‌जीत‌ली लिस्ट क‌र‌णे अव‌घ‌ड‌ आहे. रेजींग‌ बुल‌ म‌ध‌ला जेक‍ लामोटा, डीअर‌ हंट‌र‌ म‌ध‌ले अनेक‌ कॅरेक्ट‌र्स‌, रोनिन‌, टॅक्सी ड्राय‌व‌र‌, केप‌ फीअर‌, गॉड‌फाद‌र‌, ब्रॉन्क्स‌ टेल‌ व‌गैरेत‌ला डी नीरो, माय‌ क‌झिन‌ विनी म‌ध‌ला जो पेसी, रे म‌ध‌ला जेमी फॉक्स‌ असे काही वान‌गीदाख‌ल‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पु.लं च्या तुज आहे तुजपाशी ह्या नाटकामधील श्याम ही आवडती व्यक्तिरेखा आहे . प्रश्न चित्रपटामधील भूमिकेसंदर्भात आहे तर अशोक कुमार यांची छोटीसी बात मधली भूमिका खूप आवडून गेली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी या वीकेंड‌ला "तुझे आहे तुज‌पाशी" प‌हाय‌चे ठ‌र‌विलेले आहे ऑल‌रेडी.
गेल्या वीकेंड‌ला "ख‌र‌ं सांगाय‌च‌ं त‌र्" हे नाट‌क तीस‌ऱ्यांदा पाहीले. सुप्रिया पिळ‌गाव‌क‌र‌ यांचा अभिन‌य इत‌का द‌म‌दार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0