चंद्रकोर

जुनी क‌विता अव‌चित‌ साप‌ड‌ली.
.
http://www.spaceweather.com/swpod2011/05may11/Tavi-Greiner1_strip.jpg
.
अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे
मंदिरात का ग सखे सोडिसी उसासे

कुस्करुनी टकिलीस माळ ही कळ्यांची
चालविली उघडझाप नेत्र-पाकळ्यांची
मोकळाच केशपाश, वसन तुझे साधे
का धरिसी हरिवरती मधुरुसवा राधे

कंसदमन करण्या हरि मथुरेला गेलेला
येइल परतुनी खचित घेउनी जयमाला
रथ दारी राही उभा, कोण गे तयात
आण गडे पंचारती, आले यदुनाथ

प्रणयसागरावरती रमणिहृदय नाचे
अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रणयसागरावरती रमणिहृदय नाचे
अंबरात नाजुकशी चंद्रकोर हास>>>>>>>या ओळींसाठी शुचिमामीला हजार गावे इनाम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

ओके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0