कांदेपोहे -2

कांदेपोहेचा पहिला भाग-
http://www.aisiakshare.com/node/5946

कांदेपोहे (Continued)

७.
एकदा एका मैत्रिणीला एक स्थळ सांगून आलं. भेटण्यापूर्वी त्यांच्यात सुमारे दोन महीने बोलणं होत होतं. मग एकदा भेटायचं असं ठरलं. भेटण्यापुर्वी एकदा मेसेजा मेसेजी झाली की आधी दोघेच भेटू ठीकठाक वाटलं तर घरच्यांना इनव्हाॅल्व करून घेऊ. भेटायच्या आदल्या दिवशी उशीरा मुलाचा तिला मेसेज आला "दीद्दींना भेटायचं आहे तुला, त्या पण येणार उद्या". या 'दीद्दी'म्हणजे मुलाची मोठी बहीण. मैत्रिणीनं सांगितलं, "आधी आपण भेटू मग भेटू त्यांना." तर तो म्हणाला, "दिद्दींना विचारून सांगतो". मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी ते दोघे भेटणार होते त्या दिवशी सकाळी त्याचा मेसेज आला "दिद्दी ओके म्हणल्या, आपण आज भेटूया." मग ते दोघे भेटले. हा सुरुवातीलाच म्हणाला "तुला सांगतो, लग्नानंतरपण हे असं राहिल, दिद्दींना विचारून सगळ्या गोष्टी करायच्या, म्हणजे मी हे आधी सांगितलं नाही कारण आधीचा experience आहे, दिद्दीना मी इतकं मानतो, जिजू माझे फेवरेट आहेत हे ऐकलं की मुली भेटायलाच येत नाहीत मग मी भेटल्यावर सांगायचं ठरवलंय मागच्यावेळेसपासून."
पुढे म्हणे " त्यामुळं तू दिद्दी सांगतिल तसं करायचं, मी दिद्दीचं, जिजूंचं ऐकलंय म्हणून करीयर मधे सेटल्ड आहे. तू पण ऐक त्यांचं, मला वाटतं त्यांना सिद्धी असणार तू ऐकलीस तर तुझं भलंच होणार आणि मग म्हणून माझंपण होणार मग." मैत्रिणीला अंगावर झुरळ पडल्यासारखं झालं. ती काहीच न बोलता तिथं सुमारे तिनेक तास त्याची बडबड ऐकत बसली. आणि तिसऱ्या दिवशी तिच्या आईबाबांकडून त्याला 'योग नाही' असं कळवून आली.

८.
एक मुलगा आणि मी भेटायचं ठरवलं होतं. त्याला एकट्यानी भेटण्यात बहुतेक काहीतरी अडचण वाटत असावी किंवा इतर काही असेल, आधी "आईला बोलवतो" म्हणाला, मग "दादा वहिनीला बोलवतो" म्हणाला "मग बहिणीला तरी बोलवतो, दोघंच कसं भेटायचं?" असं काहीतरी बोलला. "भेटायचं तर दोघांनी भेटायचं नाहीतरी बाय" असं मी सांगितलं त्याला. खरंतर त्यानं इतकं पकवल्यावर मी भेटायला जायला नको होतं. पण मी आधी त्याला भेटण्यासाठी वेळ दिलेली असल्यामुळं भेटायला हवं होतं. आम्ही एका काॅफीशाॅपमध्ये भेटलो. ठरल्यावेळेला मी तिथं गेले होते, हा मुलगा खूपच आधीपासून तिथं आला होता, भेटल्यावर हा म्हणाला "मला ना काही कळतच नाही मी लग्न का करतोय ते, मला खरंतर मी कुठलीच गोष्ट का करतोय ते समजत नाही." मी तेव्हा काॅफीत बुडून गेले होते. फार मस्त काॅफी होती ती. हा पुढे म्हणाला, "मला लग्न नको आहे असं नाही पण ते का हवं आहे हे माहित नाही, मला भीती वाटते, मला नोकरी करायची नाही, मला घर घ्यायचं नाही. मला काहीही करायची भीतीच वाटते. म्हणून मी नोकरी बदलणे, प्रमोशन घेणे असल्या गोष्टीपण करत नाही. मला विपश्यनेची आवड आहे. मी त्या अमक्या आश्रमात/मठात जाऊन राहतो वर्षातून महीना दोनमहीने." खरंतर माझी काॅफी अजून संपायची होती. पण हे असं काहीतरी ऐकल्यावर मला ती मस्त काॅफी गेलीच नाही. मी अतिशय पुचाट जोक करून त्याला म्हणाले, "तू जा बाबा कुठल्याही आश्रमात गृहस्थाश्रमात तेवढा येऊ नकोस ती जी कोण असेल तिला भयंकर पकवशील." खरंतर इथं एरवी असल्या जोकवर समोरच्याकडून "ईईई, श्शी काय पकवतीयेस, आवर गं" असलं काहीतरी अपेक्षित असतं. पण या मुलाला ठसका लागेपर्यंत हसू आलं. हे बघून मला दया आली त्याची. मी म्हण्टलं "मला आता अजून एका मुलाला भेटायला जायचंय, hopefully तिथं असं बोर होणार नाही" आणि काॅफीचं बिल देऊन मी निघाले. दुसऱ्या दिवशी त्याचा फोन "कधीचा मुहूर्त काढायचा लग्नाचा?" माझी हसून पुरेवाट झाली खरी.

९.
एकदा पुण्यात कसबापेठेत एका मुलाला त्याच्या घरीच भेटायला गेले. घरात गेल्यावर त्याचे आईवडील आत्या मावशी अशी सगळी वृद्धमंडळी भेटली आधी. अर्धापाऊण तास झाला तरी याचा पत्ताच नाही. मग त्याची आई म्हणे "अगं जा माडीवर बसलाय तो, तिथंच बोलत बसा. खायला वरच पाठवते." मला आधी हे असले प्रकार बोअर होतात. त्यात खरेदीला जायचं सोडून या मुलाला भेटायला आलेले शनिवारपेठेत/कसबापेठेत गाडी पार्क करताना लागलेली वाट. त्यात मरणाचा उकाडा वगैरे गोष्टींमुळं कपाळावर आठ्यांचं जाळं झालेलं. पण माझ्या बापड्या आईबाबांसाठी मला त्या मुलाशी बोलावं लागलं. मी माडीवर गेले तर हा टीव्हीवर 'पुढचं पाऊल' नावाची सिरियल बघत होता.मी गेल्यावर म्हणाला, "मला भीषण आवडते ही सिरियल, संध्याकाळी बघता येत नाही मग मी टाटास्कायवर रेकाॅर्ड करून ठेवतो आणि सुटीच्या दिवशी बघतो." इथंच 'हा मुलगा ढीस' असं मी ठरवलेलं. मग ह्यानं चक्क टीव्ही बंद केला आणि बोलायला लागला, "तसंतर आमच्या घरी फार मोकळं वातावरण आहे. तुला काही आम्ही कशाला आडकाठी करणार नाही. फक्त ना आमचे अनिरूद्धबापू म्हणून एक गुरू आहेत त्यांची आम्ही सगळ्यांनीच दिक्षा घेतलीये, तुलापण ती घ्यावी लागेल आणि रोज त्यांची पोथी वाचून नामस्मरणही करावं लागेल. (इथं माझा चेहरा व्हाॅट्सअॅपवरच्या त्या नवीन, डोळे मोठे केलेल्या आणि हिरव्या तोंडाच्या स्मायलीचं/इमोजीच एकत्रीकरण केल्यावर जे होईल तसा काहीतरी झाला होता.)" यानंतर त्यानं भरपूर देवांची नावं घेऊन त्या सगळ्यांची नवरात्र त्यांच्याकडं असतात, त्या सगळ्यांचे उपवास असतात. शिवाय नेहमीचे सोमवार, संकष्टी, मोठे उपवास असतातच. तेही होणाऱ्या बायकोनं केलेच पाहीजेत असं सांगितलं. हे सगळं बडबडून झाल्यावर तो म्हणाला तुला काही बोलायचं तर बोल. इथं मला खूप बोलायचं होतं पण मला बोर झालेलं म्हणून मी फक्त एवढंच म्हण्टलं "आयला तुमच्याकडं म्हणजे वर्षातून स्वयंपाक मोजकेच दिवस होत असणार, आणि शिधापण कमी भरावा लागत असणार, भरपूर सेविंग होत असेल ना?, च्यायला या असल्या पोथ्यापुराणं वाचून आणि नवरात्राचे आणि सत्त्याऐंशी देवांचे उपवास करण्यापेक्षा मी मस्त भुर्जीपाव खात, बीयर पित चावट सिनेमे बघणं प्रेफर करीन. असो तुला ऑल द बेस्ट वगैरेची पण गरज नाही तुझे ते कोण बापू शोधतीलच तुझ्यासाठी 'सुयोग्य वधू'. मी भयंकर पापी आहे त्यामुळे मीच त्या बापूस्वामी कोण आहेत त्यांना घाबरून तुला बाय करतेय." (हे बीयर वगैरे मी पित नसते पण त्याच्यासारख्या मुलाला घाबरवायला हे पुरेसं होतं). मी असं बोलून खाली येऊन बूट घालूनच आईबाबांना 'चला आता' आवाज दिला. आणि मग गाडीत हे सगळं सांगितल्यावर आम्ही तिघं हसत होतो त्या माणसांची दया येऊन.

१०.
एकदा एक मित्र एका मुलीला भेटायला गेला. ते दोघे भेटले तेव्हा त्यानं ऑर्डर काय द्यायची असं विचारलं तिला. हीनं डबलचीज पिझ्झा, चोकोलावा केक, आणि ओरिओ मिल्कशेक अशी ऑर्डर दिली. यानं शा.मु.सारखी ऑर्डर दिली. ती मुलगी अत्यंत गचाळपणे खात होती, मचमच करत वगैरे. त्याला भयंकरच बोर झालं. तो सांगत होता तिने हातात कसलेकसले गंडे बांधले होते. कसले आहेत विचारल्यावर म्हणाली म्हणे की एक वाडीचा, एक औंदुबरचा, एक काशीविश्वेशराचा, हा एक आहे तो तुळजापूरला गेले होते ते मागच्यावर्षी तिथला. हे सगळं बोलताना प्रत्येकवेळी ती एका देवाचं नाव घेतल्यावर तिचा हात स्वतःच्याच कपाळाला लावून तोच हात स्वतःच्या गळ्याच्या किंचित खाली लावून नमस्कारासारखं काहीतरी करत होती. ती पुढे म्हणाली म्हणे की वैष्णोदेवीला जायचंय. मी तर नवसच बोलणारे इथून अनवाणी जाणार मी माँवैष्णोदेवीला, लवकरात लवकर माझं लग्न झालं एखाद्या मुलाशी की. ती मग म्हणाली, "मी देवदेव करत असले तरी स्त्री-पुरुष समानतावाली आहे हां." याला जरा बरं वाटलं. निदान यावरूनतरी काहीतरी आता बोलणं होईल वगैरे असं वाटलं. ते दोघे पुढं अर्धातास काहीतरी बोलत राहीले. निघताना त्यानं बिल मागवलं. तिला सांगितलं तुझं हे एवढं बिल झालंय. त्यावर ही म्हणाली, "What nonsense! How mannerless you are!! स्त्रीदाक्षिण्य वगैरे कळत नाही का तुला? मला काय बिलाचे पैसे द्यायला लावतोस? मी काहीपण आणि कितीपण खाल्लं तरी तू म्हणजे मुलगा सोबत आहेस ना? मग तूच नाही काय बिल भरायचं? शी तुम्ही गावठी लोकं. इतकी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? श्शी!! सगळा मूडच गेला माझा." हा तिला तिथंच "ए, हाऽऽऽड, लै आयकून घेटलो तुझं, मगापास्नं वलवलवलवल करायलीस, नुसत्या स्त्रीपुरुष समानता म्हणायचं भर की आता बिल! भर नायतर ऱ्हा हीतच, माझं बिल मी भरलोय तू यायच्या आधीच पेमेंट केलोय." असं शिवाजीपेठी म्हणून त्या तथाकथित समानतावादी मुलीकडं न बघताच तिथून निघून गेला.

~ अवंती

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

सॉलिड अनुभ‌व आहेत्. अशीही माण‌से अस‌तात हे ब‌घुन मी प‌ण अजोंसार‌खी मंग‌ळाव‌र र‌हाते की काय अशी श‌ंका आली. माझ्या माहितीत असे कोणीच नाही. Sad

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्याही माहितीत असे कोणीच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

तेज्याय‌ला त्या दिद्दी न जीज्जूच्या. हे पुराण न संबोध‌न ऐक‌ले की फाड‌क‌न वाज‌वाय‌ची इच्छा होते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌ह‌म‌त‌, च‌प‌लीनं मारावं वाट‌तं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दीद्दी, जिज्जू, मम्मे, पप्पा हे सगळं म्हणत असताना दुसऱ्या अक्षरावर खूप जास्त जोर देऊन जेव्हा म्हण्टलं जातं तेव्हा स्टीलची वाटी उपडी करून फरशीवर किंवा काचेवर घासल्यानंतर जे वाटतं तसं काहीतरी वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

त्याच‌मुळे च‌प‌लीनं मारावं वाट‌तं (पोत्यात‌ घालून‌).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म‌म्मी/प‌प्पा हे फॅड‌ बोकाळाय‌ची माझी प‌हिली पिढी असावी ब‌हुदा. ह‌ल्ली खूप‌ क‌मी झाल्याच‌ं निरीक्ष‌ण आहे. वाय‌ अॅक्सेस‌व‌र‌ बोकाळ‌ण्याची तीव्र‌ता आणि एक्स‌ अॅक्सेस‌व‌र‌ काळ असा ग्राफ‌ काढ‌ला त‌र‌ एक‌द‌म‌ नीट‌स‌ बेल‌ क‌र्व्ह येईल‌.

ल‌हान‌प‌णी भांड‌णांत‌ "[अमुक‌त‌मुक‌ क‌राय‌ला] काय‌ प‌प्पा येणारे का तुझा?" असं उच‌क‌व‌ल‌ं जाई. (उदा० "कॅच‌ काय‌ प‌प्पा घेणार‌ का रे तुझा?") म्ह‌ण‌जे "तू बापाला प‌प्पा म्ह‌ण‌तोस‌ म्ह‌ण‌जे तुम्ही हुच्च‌भ्रू, आणि त्याला एकेरी हाक‌ मारून‌ मी ते काम‌ क‌राय‌ला बोलाव‌तो म्ह‌ण‌जे मी आण‌खी भारी, म्ह‌ण‌जे तू तुच्छ‌" असा काहीसा भाव‌ त्यात‌ होता.

तेव्हा आप‌ल्याएव‌ढं पोर‌टं बापाला प‌प्पा म्ह‌ण‌त‌ असेल‌ हे क‌ल्प‌नेत‌ही याय‌च‌ं नाही. न‌ंत‌र‌ हे घ‌रोघ‌री व्हाय‌ला लाग‌ल्याव‌र‌ यात‌ला हुच्च‌भ्रूप‌णा ओस‌र‌ला आणि म‌जाही स‌ंप‌ली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

ते दिद्दी नि जिज्जू वगैरे ऐकले, की हिंदुस्थानच्या फाळणीचे मुळीच दु:ख न होतासुद्धा पंजाबच्या फाळणीचे परमदु:ख होते. (इथेच थांबतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

महालोल...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लौ यू, अवंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लौ यू आहे ते छानच आहे म्हणजे मी पण लौ यू आहे, पण तू नेमकं कशाबद्दल लौयू आहेस मला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

ती पण तशीच आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर.

(आणखी लिहायचं आहे, पण सवडीनं.)
हे सगळे प्रकार स्वतः अनुभवताना चिडचिड झालेली असेल, याची कल्पना येते. आमचा खेळ होतो म्हणून कोणाचातरी जीव जावा, अशी अपेक्षा नाही. पण असल्या पात्रांना भेटूनही स्वतःची विनोदबुद्धी शाबूत ठेवणं कठीण असतं. एवढंच नाही, असल्या पात्रांना आपण काय कारणानं भेटलो होतो, हे जाहीर करणं म्हणजे अनेक लोकांच्या आपल्याला जोखणाऱ्या नजरा सहन करणं. पण तेही करून, प्रसंग आणि प्रसंगी लोकांच्या कुत्सितपणाकडेही दुर्लक्ष करणं, ही गोष्ट मला फारच आवडली.

मी अशा जगात राहत नाही, कधीच नव्हते, हे तर झालंच. पण त्यामुळे मला अवंतीच्या खेळकरपणाचं अधिक कौतुक वाटतं. म्हणून लौ यू गं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स‌त्य‌क‌था अत्यंत‌ म‌नोरंज‌क‌ आहेत्.
७. त्याला 'सिद्धीयोग‌' नाही असे सांगाय‌ला ह‌वे होते. दिद्दी म्ह‌ट‌लं की सिद्दी जोह‌र‌ आठ‌व‌तो.

८. कुठ‌लीच‌ गोष्ट‌ का क‌र‌तो ते क‌ळ‌त‌ न‌सेल‌, त‌र‌ ध‌न्य‌ आहे. 'ज‌न्माला त‌री का आलास‌ ?' असं विचाराय‌ला ह‌वं होतं.

९. 'सीता और‌ गीता', सार‌खं चाब‌कानं ब‌ड‌व‌त‌ खाली आणाय‌ला ह‌वं होतं त्या येड्याला.

१०. सॉल्लिड‌! अग‌दी म‌स्त‌ बोल‌ला तो, त्या म‌च‌म‌च‌ ब‌येला. गंड्यात‌च‌ गंड‌लेली वेडी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच लता
बाकी साऱ्या लापता|

क ह र .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण दिद्दी,बापू किंवा आणखी कुणाच्या चमच्याने पाणी पिता का ---- हो / नाही

हो असल्यास नाव लिहावे.
Liabilities - known/unseen/incidental/other

हा कॅालम फॅार्ममध्ये घातल्यास वेळ वाचणार नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्ताच‌ वाच‌लं की दिद्दी आणि जिज्जू पिप्पाच्या ल‌ग्नाला आलेले होते. विहीण‌बाई मात्र‌ कार्य‌बाहुल्यामुळे आल्या न‌साव्यात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणत्या बाईचं लग्न झालं, त्यात तुम्हाला बराच रस! Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय‌ हे विक्षिप्त‌बाई...अहो पिप्पा म्ह‌ण‌जे राणीसाहेबांच्या थोर‌ल्या सून‌बाईंची धाक‌टी ब‌हीण‌, मिड‌ल‌ट‌न‌काकांची दुस‌री मुल‌गी. आता आल‌ं क‌नेक्ष‌न‌ ध्यानात‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हायला पिप्पाचं लग्न झालं होय! मला बोलावणं राहून गेलेलं दिसतंय. असो. लग्नकार्य म्हटलं की होतं असं कधीकधी. मिडलटनकाकांच्या थोरल्या लेकीकडे बघून सोडून द्यायचं दुसरं काय...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

थोरल्या सूनबाईंना लेक झाला तेव्हा अनियन.कॉमवर बातमी होती - "ब्रिटिश बाईला मुलगा झाला." (ती शोधत होते, चटकन मिळाली नाही.)

पिप्पाच्या लग्नाची बातमी काल सकाळी एनबीसीवर ऐकली आणि कान तृप्त झाले होतेच. तेव्हाच 'मोठी शेपटी मिरवणाऱ्या ब्रिटिश बाईच्या बहिणीचं लग्न झालं' अशी बातमी मला झाली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे किस्से ज‌रा ख‌रे वाट‌त आहेत. द‌हावा किस्सा माझ्या बाब‌तीत प‌ण झाला होता, प‌ण तेव्हा मी बिल भ‌र‌ले होते आणि न‌ंत‌र शांत‌प‌णे न‌कार क‌ळ‌व‌ला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌हिल्या धाग्याव‌र‌च विस्तृत प्र‌तिक्रिया द्याय‌ची होती, प‌ण वेळ नाही झाला. अनुभव ज‌ब‌री आहेत. असंच अजून वाचाय‌ला मिळावं म्ह‌णून तुमचं ल‌ग्न‌च होऊ न‌ये, अशी आशा ठेव‌णं कितप‌त योग्य ह्या संभ्र‌मात स‌ध्या आहे. शेव‌ट‌चा

१०.
एकदा एक मित्र एका...

ज‌रा फॅब्रिकेटेड वाट‌ला. स‌गळ्या अॅंटी-फेमि व्हिडीओज म‌ध्ये हीच थीम सार‌खी वाप‌रलेली अस‌ते. तुम‌च्यावरून प्रेर‌णा घेत‌लेलीही असू श‌क‌ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

हे कांदे पोहे प्रकरण फारच गंभीर दिसतंय. टोटल करमणूक किंवा वेस्ट ऑफ टाइम . पण मनोबा म्हणतोय कि हे न केल्यास बराच काही मिस केलं . खरी भानगड काय आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

योग्य‌ जोडीदार‌ शोधून‌ काढ‌णं, म‌ग‌ त्याला/तिला प्रेमात‌ पाड‌व‌णं, बाकी सामाजिक‌ गोष्टी (जात‌, कौटुंबिक‌ भान‌ग‌डी, सांप‌त्तिक‌ स्थिती) म्यानेज‌ क‌र‌णं हे ब‌र‌ंच‌ वेळ‌खाऊ आणि किच‌क‌ट‌ काम‌ आहे. कोण‌त्याही बाबीत‌ काही राडा झाला, त‌र‌ पुन्हा प‌हिल्यापासून‌ सुरुवात‌ क‌रावी लाग‌ते. म्ह‌ण‌जे हे "प्रेम‌विवाहाच‌ं मार्केट‌" unorganised आणि inefficient आहे.

याउल‌ट‌ कांदे पोहे हे organised मार्केट‌ आहे. श‌क्य‌ जोडीदारांचा डेटाबेस‌ अनेक‌ निक‌षांव‌र‌ फिल्ट‌र‌ क‌र‌ता येतो, आणि जास्त‌ फोले न‌ पाख‌ड‌ता 'स‌त्त्व‌ ते निकें' शोध‌णं श‌क्य‌ होतं. म‌ला वाट‌तं म‌नोबा म्ह‌ण‌तोय‌ ते 'मिस‌ क‌र‌णं' हे ती निव‌ड‌ण्याची प्रोसेस‌ मिस‌ क‌र‌णं आहे.

आता कांदेपोहे मार्केट‌ efficient आहे का हा ख‌रा प्र‌श्न‌ आहे. माझ्या अंदाजाप्र‌माणे हे व्य‌क्तिसापेक्ष‌ आहे. धागालेखिकेचे अनुभ‌व‌ एका टोकाला आणि अनुराव‌, अनामिक‌ यांचे प्र‌तिसाद‌ दुस‌ऱ्या टोकाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

म‌ग‌ त्याला/तिला प्रेमात‌ पाड‌व‌णं, बाकी सामाजिक‌ गोष्टी (जात‌, कौटुंबिक‌ भान‌ग‌डी, सांप‌त्तिक‌ स्थिती) म्यानेज‌ क‌र‌णं हे ब‌र‌ंच‌ वेळ‌खाऊ आणि किच‌क‌ट‌ काम‌ आहे.

किच‌क‌ट त‌र आहेच, प‌ण त्याही पेक्षा मोठा प्रोब्लेम मुलींच्या साठी स्पेसिफिक‌ली. बाजार‌पेठेत‌ल्या ( श‌ह‌रात‌ल्या, देशात‌ल्या आणि प‌र‌देशात‌ल्या ) स‌र्व‌ दुकानात चौक‌शी क‌राय‌च्या आधीच स‌मोर आलेल्या दुकानात इन्स्टींक्टीव्ह‌ली क‌मीद‌र्जाची किंवा म‌हागात‌ली ख‌रेदी होऊ श‌क‌ते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एवढे असूनही आपण या किचकट , unorganised आणि inefficient मार्केट चे भाग कसे काय झालात बरे ?* SmileWink असेलही किचकट ( म्हणजे आहेच) , पण त्यात जरा मज्जा जास्त असती का हो ? शिवाय नंतर "कोण‌त्याही बाबीत‌ काही राडा झाला" तर जबाबदारी टाळता येत नाही . तिथे मम्मी , पप्पा , जिज्जू , दिद्दी वगैरे कोणावरही दोष ढकलत येत नाही .

आता सांगा बघू तुमचा "न कांदे पोह्याचा "अनुभव ( जागा , काय खाल्ले , बर्बर कोण होते , काय गडबड झाली , सगळे डिट्टेलवार युद्वया . )

* हे मी आपलं गृहीत धरतोय . आपले राजबिंडे , जनप्रिय व्यक्तिमत्व बघता . चूक नसणार माझं बहुधा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वढे असूनही आपण या किचकट , unorganised आणि inefficient मार्केट चे भाग कसे काय झालात बरे ?* SmileWink

लोल‌! ब‌रोब‌र‌ आहे तुम‌चं. 'न‌ कांदे पोह्याचा अनुभ‌व‌' भेटीअंती सांगेन‌च‌. म‌ज्जा जास्त‌ अस‌ते हे अग‌दी १००% मान्य‌.

शिवाय नंतर "कोण‌त्याही बाबीत‌ काही राडा झाला" तर जबाबदारी टाळता येत नाही . तिथे मम्मी , पप्पा , जिज्जू , दिद्दी वगैरे कोणावरही दोष ढकलत येत नाही .

एग्जॅक्ट‌ली! हा भाव‌निक‌ इन्शुर‌न्स‌ आहे म्ह‌णून‌च‌ लोक‌ organised मार्केटला प्राधान्य‌ देणार‌ ना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

म‌ज्जा जास्त‌ अस‌ते हे अग‌दी १००% मान्य‌.

मारुतीच्या बेंबीत बोट घातलं की कसं गाऽर वाटतं! Smile

(हं, आता बकरा ईदच्या दिवशी हलाल होणाऱ्या बोकडास अगोदर हारबीर घालतात, असं ऐकलंय खरं. त्या हाराची त्या बोकडास मज्जाबिज्जा वाटत असावी की काय, ते कोणी सांगावं!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

हे असले उद्दयोग करू लागले (>>आता बकरा ईदच्या दिवशी हलाल होणाऱ्या बोकडास अगोदर हारबीर घालतात, >>) म्हणून इराणचा शहा दिल्लीला आला अन सिंहासन उपटून घेऊन गेला.
इकडे दोन महिने राहिला असता तर त्यालाही हार घातला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्केट एफिशियंट/इनेफिशियंट नसते. विक्रेते एफिशियंट/ इनेफिशियंटअसतात. सहसा इनेफिशियंट विक्रेते उगाच कुचाळक्या करत राहतात.
तुमच्यासारख्या सीएला आम्ही पामर मार्केट इकॉनॉमिक्स बद्दल काय सांगणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दश: अर्थ घेतला तर तुम्ही म्हणताय ते साहजिक आहे. मार्केट काही जितीजागती व्यक्ती नाही, की ती एफिशियंट/ इनेफिशियंट, प्रेमळ/क्रूर, उंच/बुटकी असावी.

मार्केट इनेफिशियंट आहे याचा अर्थ मार्केट 'घडवणारे' घटक इनेफिशियंट आहेत. त्यात विक्रेते आलेच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

पण मनोबा म्हणतोय कि हे न केल्यास बराच काही मिस केलं . खरी भानगड काय आहे ?

...ईदर वेज़, (अंतिमत:) काऽही फरक पडू नये.

'झटका की हलाल' याने बोकडास अंतिमत: काही फरक पडतो काय?

..........
In the ultimate analysis.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

गंभीर विषय लोलमय पद्धतीनं, खरंतर ते मांडायचं कौशल्यच awesomeमय. फजिती होते तेंव्हा ती गंभीरच असते, काही दिवसांनी तिचं रुपांतर (भरपूर वेळेस, मांडणार्यावर) गंमतीत होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...

एका मित्राचं लग्न ठरवणं सुरू होतं. त्याला वडील नाहीत. आई आहे फक्त आणि त्या काकू एकदम कूल वगैरे असतात तश्या आहेत. त्याने मुली बघण्यापूर्वीच सांगितलं होतं की "माझी आई सोबत राहणार. ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, दिवसातले बारा तास तरी ती बाहेरच असते, पण रहाणार एकाच घरात." एक मुलगी आली होती याला बघायला. हा आवडण्यासारखा आहेच.
हे तुम्ही पार्ट-१ मधे लिहिले आहे ना. मग इथे धागे काढून लग्नाळू पणाची झैरात कशाला करताय ? या मुलाशीच का लग्न करत नाही ?
एकंदरच तुच्छतावादी गॉसिपिंग वाटले

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ2

पुण्यात‌ल्या एका मित्राक‌डून आलेला किस्सा :
मुल‌गी आर्किटेक्ट‌. कांदेपोह्यांचा कार्य‌क्र‌म‌ मुलाच्या घ‌री झाला. मुलीनं एक फॉर्म‌ भ‌रून आण‌लेला होता आणि मुलाला एक‌ भ‌राय‌ला दिला. फॉर्म‌व‌र‌ अपेक्षा, प्र‌य‌त्न‌ आणि पूर्ती असे तीन कॉल‌म‌ होते. मुलीनं आप‌ल्या अपेक्षा लिहिल्या होत्या आणि मुलाला सांगित‌ल‌ं की त्यात‌ल्या ज्या गोष्टींची पूर्त‌ता तो कर‌तो आहे त्यांबाब‌त‌ पूर्तीम‌ध्ये लिहाय‌चं. ज्यांबाब‌त तो पूर्ती क‌र‌त‌ नाही त्यांबाब‌त‌ तो प्र‌य‌त्न‌ क‌रेल अथ‌वा नाही हे प्र‌य‌त्न‌म‌ध्ये लिहाय‌चं. त्याच‌प्र‌माणे त्याला दिलेल्या फॉर्म‌व‌र‌ त्यानं त्याच्या तिच्याक‌डून‌ अपेक्षा लिहाय‌च्या आणि तिच्या पूर्ती किंवा प्र‌य‌त्नेच्छेब‌द्द‌ल ती लिहील. माझा मित्र‌ मुलीच्या बापाचा मित्र‌ होता. तो ह्या प्र‌काराव‌र‌ खूश होता. "ह्याला म्ह‌ण‌तात‌ पार‌द‌र्श‌क‌ता!" असा त्याचा अभिप्राय‌ होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ये बात!

खरी पारदर्शकता पाहिजे असेल तर असेच फॉर्म पोरट्याच्या आईबापांकडून भरून घ्यायला पाहिजेत. त्यात त्यांनी 'पोरटं सोळा वर्षांचं असताना त्याच्याकडून काय अपेक्षा होत्या' हे लिहावं. मग पोरट्याने त्या अपेक्षांच्या समोर प्रयत्न, पूर्ती किंवा घोडा असं लिहावं. म्हणजे अपेक्षापूर्तीचा ट्रेन्ड कसा काय आहे ते कळेल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

पुण्यात‌ला आण‌खी एक किस्सा...

मुलीनं मुलाला विचार‌लं : 'मी तुझ्याशीच‌ ल‌ग्न क‌रावं असं तुझ्यात काय आहे ते सांग‌.' मुल‌गा म्ह‌णाला 'काही गोष्टी आईव‌डिलांस‌मोर सांग‌ता येत नाहीत. त्यामुळे ज‌रा बाजूला च‌ल‌.' मुल‌गी गेली. त्यानं काय‌ सांगित‌लं ते मुलीनं किंवा मुलानं आईव‌डिलांना सांगित‌लं नाही, प‌ण ल‌ग्न‌ जुळ‌ल‌ं. नंत‌र‌ मुलाच्या आणि माझ्या कॉम‌न‌ मित्रानं त्याला विचार‌लं तेव्हा त्यानं जे सांगित‌लं त्याचा थोड‌क्यात‌ गोष‌वारा : 'हे अस‌लं काही त‌री एम‌बीए टैप‌ चुत्त्यासार‌ख‌ं विचार‌त‌ जाऊ न‌कोस, कार‌ण‌ तुला क‌धीच‌ ख‌रं उत्त‌र मिळ‌णार नाही. हिंम‌त‌ असेल त‌र‌ म‌ला डेट‌ क‌र‌. डेट‌ क‌रून तुला क‌म्फ‌र्टेब‌ल‌ वाट‌लं त‌र काही काळ‌ आप‌ण‌ लिव्ह‍इन‌म‌ध्ये एक‌त्र‌ घाल‌वू. म‌ग‌ दोघांनाही वाट‌ल‌ं त‌र‌ ल‌ग्न‌. तुझ्या आणि माझ्या घ‌र‌च्यांस‌मोर तुला चुत्त्या म्ह‌ण‌णं म‌ला गैर वाट‌ल‌ं म्ह‌णून खाज‌गीत‌ सांगित‌ल‌ं.' मुलीला हा अॅटिट्यूड‌ आव‌ड‌ला असावा. म‌ग ते दोघं काही म‌हिने एक‌मेकांना भेट‌ले आणि (लिव्ह‍इन‌शिवाय‌) ल‌ग्न‌ ठ‌र‌ल‌ं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प‌ण‌, मुलीला 'च्युत्या' म्ह‌ण‌णं, हे मुलाच्या त्या शिवीब‌द्द‌ल‌च्या अज्ञानाचे द्योतक आहे, असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच लता
बाकी साऱ्या लापता|

त्या शिवीची व्युत्प‌त्ती लिंग‌निर‌पेक्ष‌ आहे त्यामुळे त‌सा वाप‌र चूक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलगी शिक्षिका होती का फॅार्म आणणारी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग‌म‌तीशीर अनुभ‌वेत‌ एकेक‌. आप‌ले हे अनुभ‌व घ्याय‌चे राहुन‌ गेले असं वाट‌त‌ं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं झालं राहून गेलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय एकेक अनुभ‌व‌ आहेत ? लिहीले प‌ण‌ चांग‌ले आहेत्.
प‌हिला भाग‌ देखिल‌ रोच‌क‌ होता.

म‌ला काही इत‌के भारी भारी अनुभ‌व‌ नाही आले ... Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0