एकदा काय झालं...

एकदा कैदच करतो बघ तुला माझ्या कवितेमध्ये
मनाने जणू ध्यासच धरला...
घरी येतांना मनामध्ये मग
शब्दांनीही फेरच धरला,
एकापेक्षा एक सरस,
कवितांनी जसा माळच फुलला...
आता कशी सुटका सये
बघ लिहून काढतोच तूला,
नसतिल तुझ्याऐवढे सुंदर शब्द माझ्याकडे
पण माझाही हट्टच मग,
लिहायला बसलो तर कवितेचा
धडा होत राहिला,
कवितेचा एक एक शब्द
माझ्या मनातून पळून चालला
शेवटी कबूल केली चूक
माझ्या पामर शब्दांनी
नंतरही खूप केले प्रयत्न
अन् हा पाठशिवनीचा खेळ
आजही तसाच चालू राहिला...

MindsRiot...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान हे क‌वितेचे "बिहाइन्ड द‌ सीन्" दृश्य‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो