स्त्रीवाद -- फेमिनिझ‌म‌ एकाच‌ लिंगाचा, एकाच‌ लिंगासाठी का ?

ख‌फ‌व‌र‌ चालेल्या च‌र्चेत‌ले मुद्दे इथे टंक‌त आहे. ज‌र इथं टाक‌णं ठीक‌ न‌सेल‌; त‌र‌ धागा उड‌व‌लात‌ त‌री चालेल‌.

३_१४ विक्षिप्त अदिती
बुधवार, 24/05/2017 - 18:59
अनुतै, पदवीचं किंवा कसलंही शिक्षण कुठे घेतलं याला फार महत्त्व नसतं.
आणखी एक गंमत सांगते. मागे काही महिन्यांपूर्वी सोना मोहपात्रानं आयायटी मुंबईची काय ती सांस्कृतिक समिती आहे, त्यांच्यावर टीका केली होती. (बातमी) मला तेव्हा सोना मोहपात्रा फारच आवडली, मी त्याबद्दल काही तरी बातमी शेअर केली. तर एक माजी आयायटीयन आणि एका माजी आयायटीयानाची पत्नी (हिला मी स्त्रीवादी म्हणेन), सोनाला प्रसिद्धीची हाव आहे, असं कायसं म्हणून गप्प बसले. एक सध्याच्या, केजीपीवाला, 'हा स्त्रीवाद नाही', असा वाद माझ्याशी घालायला लागला. (पुरुषानं बाईला 'स्त्रीवाद म्हणजे काय' हे शिकवण्यासारखा, आणि नियमितपणे व्यवहारात दिसणारा विनोद विरळाच.) तिसरा आयायटीयन मला खाजगीत म्हणाला, "मी त्या सगळ्या प्रकाराबद्दल गप्प बसलोय." आणि हे आपण होऊन म्हणाला. (मला त्याच्या बोलण्याचा अर्थ लागला तो असा - आयायटीची बाजू लंगडी आहे; सोना आणि माझ्या भिंतीवर मी समर्थ असल्यामुळे तिची/आमची बाजू घेण्याची आवश्यकता नाही.)

मन
बुधवार, 24/05/2017 - 19:35
(पुरुषानं बाईला 'स्त्रीवाद म्हणजे काय' हे शिकवण्यासारखा, आणि नियमितपणे व्यवहारात दिसणारा विनोद विरळाच
.)
i usually refrain from commenting about feminism ; due to my lack of knowledge on the subject. However are people supposed to stay silent just because of his gender/sex?
Gents are even gynaecologist.
so shpuld gents keep their mouth shut ?
again, please do not take my individual case. I'm not an authority on the matter of feminism.
But why to pre emptovely deny the possibility of boy talking about feminism?

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 25/05/2017 - 05:03
स्त्रीवाद हा प्रामुख्यानं स्त्रियांनी कसं असावं, कसा विचार करावा; मग प्रगती झाल्यावर स्त्रियांबद्दल स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसा विचार करावा, याबद्दल विचार. स्त्रीवाद - स्त्रियांनी कसं असावं - हे पुरुषच सांगणार असतील तर त्यात कसलं डोंबलाचं स्वातंत्र्य!
स्त्रियांच्या शरीरातली पुनरुत्पादन संस्था पुरुषांपेक्षा खूप अधिक जटील असते. त्या शरीररचनेचं, त्याच्या देखभालीचं शास्त्र म्हणजे गायनॅकॉलॉजी; त्याचा छोटासा भाग प्रसूतीशास्त्र. या विज्ञानशाखांचा, स्त्रीवाद या समाजविद्यानाशी अर्थाअर्थी का-ही-ही संबंध नाही. बाई स्त्रीवादी असली किंवा नसली तरीही तिच्या सी-सेक्शनची किंवा पॅप-स्मियरची प्रक्रिया बदलत नाही. त्यामुळे गायनॅक पुरुष असला तरीही काही फरक पडत नाही.
देवा! एवढ्या मूलभूत गोष्टी समजून सांगितल्यावर मला आज भातुकलीतला चमचा शोधावा लागणार आहे... चमचाभर पाण्यात जीव देण्यासाठी.

स्त्रीवाद‌ ही एक‌ विचार‌धारा आहे ना ? त्यात‌ स‌ह‌भागी व्हाय‌ला, एखाद्या शारिरीक‌ अव‌य‌वाची अप‌रिहार्य अट क‌शी काय असू श‌क‌ते ?
स्त्रियांनी क‌सा विचार‌ क‌रावा, स्त्रियांनी क‌सं असावं; हा एकूण स्त्रीवादाचा एक भाग‌ असं मी स‌म‌ज‌त‌ होतो.
कार‌ण एकूण‌च‌ स‌माज‌ र‌च‌ना, स‌माज‌ व्य‌व‌हार‌ ह्याबाद्द‌ल थोडं व्याप‌क‌ म्ह‌ण‌ता येइल असं भाष्य‌ स्त्रीवादा संद‌र्भाच्या लिखाणातून दिस‌लं.
ज‌र स‌माजाब‌द्द‌ल भाष्य‌ असेल; पुरुषांब‌द्द‌ल भाष्य्त असेल; त‌र‌ पुरुष हे स्टेक होल्ड‌र्स‌ ठ‌र‌तात ना ?
स्टेक‌ होल्ड‌र्स‌नी तोंड न उघ‌डुन क‌स्म चालेल्. शिवाय‌ ज‌गाब‌द्द‌ल‌चा जो स्त्रीवादी न‌ज‌रिया अस‌णारे; त्यात‌ पुरुषांचा स‌ह‌भाग अस‌णार की नाही ? असेल‌च‌ की. म‌ग त्यांनाही स्त्रीवादाचे ध‌डे/शिक्ष‌ण(चांग‌ल्या अर्थाने "ध‌डे" म्ह‌ण‌तो आहे ) द्यावं की नाही ?
ते त‌सं द्याय‌चं;त‌र‌ म‌ग त्यांना शंका अस‌णार की नाही ? शंका अस‌ल्या त‌र‌ विचाराव्या त‌र‌ लाग‌णार‌.
किंवा काय प‌ट‌त नैय्ये ते बोलावं त‌र‌ लाग‌णार की. म‌ग ते चालेल की नै ?
( प्लीझ नोट‌ -- ह्यात‌ स्त्रियांना अक्क‌ल् शिक‌व‌ण्याचा सूर‌ नाहिये. प‌ण जी काय च‌ळ‌व‌ळ म्ह‌ण‌तात त्यात य‌थाश‌क्ती स‌ह‌भागी होणं; किंवा त्य‌ब‌द्द‌ल निदान प्राथ‌मिक म‌हिती अस‌णं म्ह‌ण‌तोय‌. )

काही उदाह‌र‌णं --
फुल्यांनी सावित्री बाईंना शिक‌वाय‌ला ध‌ड‌प‌ड‌ केली. र‌ धों चं काम आणी स्त्रिवादाची उद्दिश्ट ह्यात काही स‌मान बाबी आहेत‌ म्ह‌ण‌तात‌.
आग‌र‌क‌रांनी किम्वा तेव्हाच्या सुधार‌कांनी ज्या स‌म‌ज‌घ‌टाकाब‌द्द‌ल‌ची (स्त्रिया, मागास‌व‌र्गीय, इत‌र‌ शोषित‌ ,पीडित‌ ) भुमिका मांड‌ली , त्यात ते स्व‌त: न‌व्ह‌ते. म‌ह‌र्षी विठ्ठ‌ल राम‌जी शिंदे आणि शाहू म‌हाराज स्व‌त्: द‌लित न‌व्हेत. प‌ण द‌लितांच्या च‌ळ‌व‌ळित त्यांची काही एक भुमिका होती.

ह्यांना स्व‌त्: द‌लित‌ न‌स‌णं; स्त्री न‌स‌णं आड‌ आलं नाही. म‌ग ते ह्यावेळी येइल‌ असं का वाटत‌य‌.

डिस्क्लेम‌र‌ --
विविध विचार‌धारांचा माझा अभ्यास‌ शून्य आहे. शाळ‌क‌री इतिहासात‌ आणी छापील माध्य‌मांत‌ जी काही फुट‌क‌ळ‌/किर‌कोळ‌/ल‌हानशी माहिती छापुन येते; तित‌प्त‌च‌ म‌ला म‌ला ठौके. माझ्यासार‌खे लाखो न‌व्हे त‌र क‌रोडो लोक आहेत‌. ह्यात‌ले कित्येक टक्के ;लोक‌ अशा च‌ळ‌व‌ळींचे स‌हानुभुतीदार‌ असु श‌क‌तात‌. किंवा य‌थाश‌क्ती स्व‌त्:च्या म‌र्यादित व‌कुबात‌/व‌र्तुळात‌ गोष्ह्टिंत ब‌द‌लही घ‌ड‌व‌तात‌. (स्व‌त्: अडाणी अशिक्षित‌ अस‌णारा पुरुष‌ किंवा स्त्री स्व‌त्:च्या मुलीला शाळेत धाड‌तात‌; त्यासार‌ख‌च‌.)
.
.
ब‌द‌ल‌ व्हाय‌चा त‌र‌ हा असा ज‌मिनीव‌र‌ व्हाय‌ला ह‌वा ना. "तुमी न‌का सांगु ज्जा" असं म्ह‌णून क‌स्म चालेल ?
हां. कुणाचा टर‌ उड‌व‌ण्याचा सूर दिस‌ला किंवा अक्क‌ल शिक‌वाय‌चा आवेश अस‌ला त‌र‌ इग्नोर मार‌णं स‌म‌जू श‌क‌तो.
प‌ण एकूणात‌च‌ अमुक लिंगाच्या लोकांनी बोलाय‌चं नै; हे क‌सं श‌क्य आहे ?
त्या लिंगात‌ल्या व्य‌क्ती स्टेक होल्ड‌र्स आहेत‌. शिवाय च‌ळ‌व‌ळीविष्ह‌यी स‌हानुभूतीदार‌ही अस‌णं श‌क्य‌ आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुरुषांब‌द्द‌ल भाष्य्त असेल;

हे अॅझ‌म्श‌न आहे का तुला ही माहिती आहे?

त्यात‌ पुरुषांचा स‌ह‌भाग अस‌णार की नाही ? असेल‌च‌ की. म‌ग त्यांनाही स्त्रीवादाचे ध‌डे/शिक्ष‌ण(चांग‌ल्या अर्थाने "ध‌डे" म्ह‌ण‌तो आहे ) द्यावं की नाही ?

गुप‌चुप ध‌डे/शिक्ष‌ण घ्याय‌चे, शंका, प्र‌श्न विचाराय‌चे नाहीत्. तुम्हाला प‌ट‌वुन देण्यापेक्षा खुप म‌ह‌त्वाची कामे आहेत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विविध विचार‌धारांचा माझा अभ्यास‌ शून्य आहे.

"अभ्यास वाढ‌वा" हे सांगाय‌चा चांस मिळाला. अभ्यास नाही प‌ण म‌ते मात्र आहेत ( हा ख‌रा प्रोब्लेम आहे ), उप‌देश प‌ण क‌राय‌चा आहे हे मात्र‌ रोच‌क आहे.

मुळात क‌शाला हे कॅव्हिआट लिहाय‌चे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॅव्हिआट अशासाठी की म‌नोबाला पॉलिटिक‌ली क‌रेक्ट बोलाय‌ला आव‌ड‌तं म्ह‌णून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिनेम‌के.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

किंवा त्यांना भिती वाट‌त असेल‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

न‌क्की क‌स‌ली भीती ते पाह‌णे रोच‌क ठ‌रावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

स्त्रीवादी विचार‌प्र‌णालीत‌ल्या थिय‌ऱ्या तोंडाव‌र फेकून मार‌ल्या जातील याची? किंवा स्त्रिवादी विचार‌वंत‌, त्यांच्या पोथ्यांची नावे तोंडाव‌र फेकून तोंड‌ बंद केले जाईल‌ याची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

इथे प्रतिसादांमध्ये मनोबा काय विचारतोय ,यापेक्षा मनोबा कशाला आणि का घाबरतोय आणि काय काय फेकून मारलं जाईल यावर जास्त चर्चा दिसतीय , मनोबाच्या मूळ प्रश्नापेक्षा . गम्मत आहे . काय कारण असेल याचे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याचे एक‌मेव कार‌ण‌ म्ह‌. पूर्वेतिहास माहिती आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

याचे एक‌मेव कार‌ण‌ म्ह‌. पूर्वेतिहास माहिती आहे.

बॅटोबा, या ठिकाणी 'म्ह.' चा अर्थ , 'म्ह‌शीचा' , असा घ्याय‌चा का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंगी व्याली, चिंगी झाली, तिचे दूध किती
अठरा रांजण भरुन उरले प्याले बारा हत्ती|

हा हा हा. नाय नाय‌. म्ह‌. = म्ह‌ण‌जे. इन‌फ्याक्ट आप‌ के ज‌मानेवाल्या काही पुस्त‌कांत हे क‌न्व्हेन्श‌न‌ पाहिलेले आहे तिथूनच‌ उच‌ल‌ले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

बाप‌ट‌ण्णा, लेख‌क साहेबांना जे पाहिजे ते मी/आम्ही द्याय‌चा प्र‌य‌त्न केलाय्. किती स‌फ‌ल झालो ते तुम्हीच सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे मी कसं सांगणार ? हे ते किंवा तुम्हीच सांगू शकाल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीवाद - स्त्रियांनी कसं असावं - हे पुरुषच सांगणार असतील तर त्यात कसलं डोंबलाचं स्वातंत्र्य!

काहीही! स्वातंत्र्य पाहिजे तर दुसऱ्या स्त्रीने सांगितलेले तरी का ऐकावे एखाद्या स्त्रीने?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेमिनिझम म्हणजे नक्की काय हे मला अजून समजलेलं नाही तितकं .
जिथे "वाद" हा शब्द शेवटी लागतो तिथे नकळत कुठेतरी श्रेष्ठत्वाची भावना सुरु झालेली असते असं मला वाटतं. स्त्रीवाद म्हणजे स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा सरस आहे हा विचार त्यामागे आहे की स्त्री ही पुरुषाइतकीच सक्षम आहे आणि तिला कमी लेखू नका तिच्या मर्जीने जगू द्या हा विचार आहे?
कारण इतकी वर्षे स्त्रीला दुर्बल, अबला वगैरे म्हणून हिणवलं गेलं. बंधने घातली गेली, अन्याय केला गेला. तुच्छतापूर्वक वागवलं गेलं. तीच तुच्छता पुरुषांबद्दल दाखवून आणि त्याच्यापेक्षा बाई हीच श्रेष्ठ असते असा नारा लावून त्यातून आनंद मिळवणे हा स्त्रीवाद आहे का ? का बंधनातून मुक्त होण्यासाठीची धडपड आहे? म्हणजे जेन्युइन प्रश्न आहे माझा हा. मला कुणाचा अपमान करायचा नाही.
कारण मी काही पालक असे पाहिलेत की जे "आमच्या पोरीला आम्ही पोरासारखा वाढवलंय" असं सांगतात अभिमानाने. हा स्त्रीवादाचा भाग आहे काय ?
नैसर्गिक लांब केस असताना मुद्दाम मुलासारखे कमी केस ठेवणे आणि टॉम बॉय म्हणवून घेणे हा नकळत पुन्हा पुरुषी वर्चस्ववाद मान्य असल्याचं लक्षण नाही का ?(हा स्त्रीवादाचा भाग नसेल तर मग ठीकाय).

किंवा आजकाल अजून एक फॅशन आहे. अनेक आईबाबा विशेषकरून बाबा आमची मुलगी आमच्यासाठी "प्रिन्सेस" आहे तिला प्रिन्सेस सारखे आम्ही वागवतो असे डायलॉग मारतात. म्हणजे इतकी वर्ष मागील पिढ्यांवर झालेल्या अन्यायाची भरपाई म्हणून आजच्या मुलीला जास्तीच खास वागणूक देणे म्हणजे फेमिनिझम आहे का ?
मध्यंतरी एकदा एका स्त्रीवादी स्त्रीने फेसबुकवर "बाई ही बाप्यापेक्षा सरसच असते " अशी कॉमेंट केलेली वाचली. हे काय आहे? म्हणजे हे फेमिनिझममध्ये मोडतं का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अडाणीपणातून निपजणारा मूर्खपणा आणि स्त्रीवाद* यांची सरमिसळ करण्याची हौस अनेकांना असते. तुम्ही विचारलेले प्रश्न पाहाता, तुम्ही त्या मार्गाला लागलेले नाही, हे स्पष्ट आहे.

नैसर्गिक लांब केस असताना मुद्दाम मुलासारखे कमी केस ठेवणे आणि टॉम बॉय म्हणवून घेणे हा नकळत पुन्हा पुरुषी वर्चस्ववाद मान्य असल्याचं लक्षण नाही का ?

बहुतेकांचे केस नैसर्गिकरीत्या, दिसतात त्यापेक्षा बरेच लांब वाढू शकतात. केस कापणं अनैसर्गिक असतं; पुरुषांसाठीही.

'टॉमबॉय' म्हण‌वून न घेताही अनेक मुली टॉमबॉयिश असतात. त्यांचं तसं वर्तन नैसर्गिकच असतं; त्यांच्यावर बायकीपणा लादणं अनैसर्गिक आणि अन्यायकारकही असतं. हीच गोष्टी स्त्रैण समजले जाणारे गुणधर्म - नीटनेटकी राहणी, कपडेखरेदीची हौस, सौंदर्यप्रसाधनांचा अधिक वापर, आपल्या सोबत असणाऱ्या लोकांशी सहानुभूतीपूर्ण, सहृदय वर्तन इ. - बाळगणाऱ्या पुरुषांचीही. त्यांच्यावर माचोपणा लादणं अनैसर्गिक आणि अन्यायकारकही असतं.

*स्त्रीवाद हे प्लेसहोल्डर. आपल्याला न आवडणाऱ्या कोणत्याही विचारधारेचं नाव इथे वापरता येईल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पदवीचं किंवा कसलंही शिक्षण कुठे घेतलं याला फार महत्त्व नसतं.

कैच्याकै

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्यात‌ स्त्रियांना अक्क‌ल् शिक‌व‌ण्याचा सूर‌ नाहिये. प‌ण जी काय च‌ळ‌व‌ळ म्ह‌ण‌तात त्यात य‌थाश‌क्ती स‌ह‌भागी होणं; किंवा त्य‌ब‌द्द‌ल निदान प्राथ‌मिक म‌हिती अस‌णं म्ह‌ण‌तोय‌.

मूळ माझी कॉमेंट अक्कल शिकवण्यावरूनच केलेली होती. सोना मोहपात्राचा दावा स्त्रीवादी नाही, अशा अर्थाचं विधान मला अक्कल शिकवणं होतं. कोणती गोष्टी स्त्रीवाद आहे किंवा नाही, हे पुरुषानं स्त्रीला शिकवणं आणि वर त्या अक्कल शिकवण्याला स्त्रीवादाचं लेबल प्रच्छन्नपणे देणं विसंगत आहे.

म. फुले, आगरकर, आंबेडकर किंवा रधोंपैकी कोणीही 'मूर्ख स्त्रिये, तुला काय समजतं! मी तुला स्त्रीवाद शिकवतो!!' किंवा 'मी म्हणतो तेवढाच काय तो स्त्रीवाद!' असं काही म्हणत नव्हते. त्यांच्या कृती स्त्रीवादी - स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक आणि/किंवा पूरक - होत्या.

यापुढे लिहिण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे सायोनारा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>कोणती गोष्टी स्त्रीवाद आहे किंवा नाही, हे पुरुषानं स्त्रीला शिकवणं आणि वर त्या अक्कल शिकवण्याला स्त्रीवादाचं लेबल प्रच्छन्नपणे देणं विसंगत आहे.

स्त्रीवाद‌ म्ह‌ण‌जे काय‌ याबाब‌त‌ "कोण‌त्याही" स्त्रीची स‌म‌ज‌ निर्दोषच‌ असणार‌ अशी खात्री? उद्या राम‌तीर्थ‌क‌र‌बाई आप‌ल्या उत्प‌ल‌रावांना त‌स‌ंच‌ म्ह‌ण‌तील‌. उत्प‌ल‌राव‌ पुरुष अस‌ल्याने त्यांनी स्त्री अस‌लेल्या राम‌तीर्थ‌क‌र‌बैंना स्त्रीवाद‌ शिक‌वू* नये !!!

*उत्प‌ल‌रावांनी त्या बैंच्या नादी लागू न‌येच‌ अस‌ं आम‌च‌ं म‌त‌ आहे त‌री एक‌ क‌ल्प‌ना क‌रून‌ पाहिली.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रामतीर्थकरबाई - भारत
उत्पल - ब्रिटिश (हे नको असेल तर स्पॅनिश किंवा अझरबैजानी म्हणा)
स्त्रीवाद - स्वातंत्र्य.

वसाहतीचं का पूर्ण स्वातंत्र्य हवं, याचा निर्णय कोणी घ्यायचा?

तुमचं मत काय माहीत नाही, पण माझ्या मते रामतीर्थकरबाई प्रच्छन्न, क्लोजेटेड स्त्रीवादी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विचार‌प‌द्ध‌त‌ क‌ळ‌ली.

त‌र‌ म‌ग‌ असोच‌ !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एक‌त‌र अदितिबाईचं किंवा माझं म‌राठी बिघ‌ड‌लंय. काय‌ लिहितात काही बोध होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

साडेचार हजार वर्षांपुर्वीच्या इजिप्शन संस्कृती मधल्या स्त्रियांचे राहणीमान,वेषभूषा वगैरे पाहिली तर आपण फारच वाइट पुढारलेलो आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्यांनी धाग्याच्या विषयासंद‌र्भात‌ काही टिका - टिप्प‌णी केली आहे अशा स‌र्वांचे आभार‌.
थ‌त्ते म्ह‌ण‌तात‌ तीच‌/त‌शीच माझी शंका आहे.
जाउ दे. लोक व्य‌ग्र असावेत‌ प‌ण इत‌र‌.
स‌ध्या छाया थोरातांचं पुस्त‌क लाग‌ल‌य हाताल‌ , ह्याच संद‌र्भात‌लं.
ते ज‌रा चाळून ब‌घीन म्ह‌ण‌तो.
बाकी, धाग्याचा विष‌य‌ सोडुन "म‌नोबा " ह्या विष‌याची द‌ख‌ल घेणाऱ्यांचे विष‌य आभार‌. चालु देत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0