Woman with dead child

Woman with dead Child

हे चित्र पाहून अजूनच कसंतरी झालं....
कितीतरी गोष्टी आठवत राहील्या. अकरावीत असताना काॅलेजातून घरी परत येत असताना एका घराजवळ गर्दी होती. जास्त आवाज नव्हतेच, माणसं होती भरपूर. आणि फक्त एकाच बाईचं रडणं ऐकू येत होतं. त्यावेळी जाणीवा इतक्याही समृद्ध नव्हत्या की तिच्या रडण्यातून तिच्या दुःखाचा अंदाज बांधता यावा. पण एक जाणवत होतं की ती एकटीच रडतेय आणि भवतालच्या गर्दीतलं कुणीच तिचं सांत्वनही करत नाहीये. रस्ता खोदल्यामुळं त्या घराच्या अंगणातूनच चालणाऱ्यांना जा ये करावी लागत होती. तिथं गेल्यावर दिसलं... त्या रडणाऱ्या आईच्या मांडीवर एक पाच एक वर्षांचं मुल होतं त्याच्या अंगावर चादर होती पण ते मुल जिवंत नव्हतं. खूप भिती वाटली मला त्याक्षणी, त्या मुलाच्या आईचा चेहरा पाहूच शकत नव्हते इतकी भिती वाटली. मी अक्षरशः धावत गेले तिथून.

सारा शायरा कशी झाली ते एका पत्रात वाचलं. ती कहाणी वाचून दोन आठवडे पूर्णपणे अस्वस्थतेत गेले. काल हे चित्र पाहून परत साराची ती कहाणी आठवत राहीली.
सारा फॅमिली प्लानिंग मध्ये काम करत होती. तिथे तिच्यासोबत एक शायर काम करत होता. तो भेटेपर्यंत साराने फार शायरी वाचली नव्हती. पण शायर लोकं कोणीतरी खूप मोठे असतात असं मात्र तिला वाटत होतं. पुढं नंतर त्या शायरने साराला लग्न करण्यासाठी विचारलं. आणि लगेच त्या दोघांनी लग्न केलं. जवळ पैसे नव्हतेच. काझीला देण्यासाठी लागणारे पैसे त्या दोघांनी अर्धे अर्धे कर्ज काढले आणि काझीचे पैसे देऊन जवळ अगदीच कमी म्हणजे केवळ सहाच रूपये उरले. झोपडी वजा घरात पोहोचेपर्यंत जवळ दोनच रूपये शिल्लक राहीले ते ही शायर ने तिच्याकडून घेऊन त्याच्या मित्रांना दिले. नंतर "हमारे यहाँ बीवी नौकरी नही करती..." असं सांगून तिची नोकरी बंद झाली. आता तिच्या घरी रोज वेगवेगळे शायर लेखक जमत असत आणि सतत वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत. नंतर ती झोपडी भाडं थकलं म्हणून त्यांना सोडावी लागली. आणि एका अर्ध्याच खोलीत तिचा संसार सुरू झाला. तिचा सातवा महीना संपला होता. पण कळा सुरू झाल्या आणि तो शायर हीची अशी अवस्था असताना कुठेतरी मुशायऱ्याला गेला. शेवटी हीच्या किंकाळ्या ऐकून जवळ रहाणाऱ्या घरमालकीणीने साराला दवाखान्यात नेऊन सोडले आणि तिच्या हातात पाच रूपये ठेवले. प्रचंड थंडी होती. साराला मुलगा झाला. पण त्या कडाक्याच्या थंडीत बाळाला गुंडाळण्यासाठी एक चिटोराही नव्हता. बाळाला तिच्याच उबेत मग तिनं घेतलं. पाचच मिनिटांसाठी साराच्या बाळाने डोळे उघडले आणि ते गेलं. सारा सिस्टरला म्हणाली, " मला घरी जाऊदे, तिथं कुणालाच माहीत नाही माझ्याबद्दल" सिस्टरने तिच्या (साराच्या) शरीरात विष पसरण्याची शक्यता आहे असं सांगून तिला जाण्यापासून अडवलं. मग सारा म्हणाली ," माझ्याकडं फी चे पैसे नाहीत ते तरी घेऊन येते, माझं हे मेलेलं मुल तुझ्याकडं गहाण ठेवते हवंतर..." साराला त्यावेळी अंगात प्रचंड ताप होता. तशीच ती चालत धावत घरी गेली. नुकतीच बाळंतीण झाली होती. तिला पान्हा फुटला होता. तिने घरी गेल्यावर एका पेल्यात ते दूध काढून ठेवलं. तेवढ्यात शायर आणि त्याचे मित्र घरी आले. साराने त्याला सांगितलं ," आपल्याला मुलगा झाला पण तो मेला..." शायरने ऐकलं आणि मित्रांना सांगितलं. अर्धा मिनीट सारे गप्प झाले आणि बोलू लागले,
" फ्रायड के बारेमें तुम्हारा क्या ख़याल है?"
" रांबो क्या कहता है?"
"वैसे वारस शाह बहुत बड़ा आदमी था...."
सारा म्हणते., " यह बातें तो मैं रोज़ ही सुनती थी, लेकीन आज लफ़्ज़ कुछ ज़्यादा ही साफ़ सुनाई दे रहे थे। मुझे ऐसा लगा-जैसे यह सारे बड़े लोग मेरे लहू में हों, और रांबो और फ्रायड मेरे रहम से मेरा बच्चा नोच रहे हों।"
नंतर तिथून सारा तिच्या एका मैत्रिणीकडे गेली तिच्याकडून तिनशे रूपये घेतले दवाखान्याचं बिल 295 रूपये भरलं आणि परत तिच्याजवळ मेलेलं मुल आणि पाच रूपये होते. शेवटी तिने डाॅक्टरांना सांगितले की तुम्ही वर्गणी गोळा करून माझ्या मुलासाठी कफन आणा आणि कुठेही दफन करा. "बच्चे की असल क़ब्र तो मेरे दिलमें बन चुकी है..." परत सारा घरी आली, बसचे पैसे दिले. आणि पेल्यात काढून ठेवलेल्या दूधाकडे पहात राहीली. सारा म्हणते," गिलास में दूध रखा था। कफ़न से भी ज़्यादा उजला। मैने अपनेही दूध की कसम खाई - शे'र मैं लिखूँगी! मैं शायरी करूंगी, शायरा कहलवाऊंगी। और दूध बासी होनेसे पहलेही मैंने एक नज़्म लिख ली..." त्यानंतर खरंच सारा कविता करत राहीली. पण शायरा म्हणून ती जिवंत असताना कोणीच संबोधलं नाही तिला. सारा अमृताला म्हणते ," अमृता! मुझे कोई शायरा ना कहे... शायद मैं कभी(तो) अपने बच्चे को कफ़न दे सकू...
बाजी! आज चारो तरफ़से शायर शायरा की आवाज़े आती है, लेकीन अभीतक कफ़न के पैसे पूरे नही हूए है.... "

मुलाचं जाणं कसं सहन करू शकत असेल आई? आपल्यापासून आपलं जवळचं माणूस नुसतं नजरेआड होणार या कल्पनेनीपण आपण प्रचंड अस्वस्थ होतो. आईचं आणि मुलाचं नातं तर किती वेगळं असतं!!! मुल मेलं तरी बाईतली आई संपत नाही!...

हे चित्र Kathe Kollwitz (मला मराठी उच्चार येत नाही) या जर्मन चित्रकारने काढलंय. या बाईच्या बालपणी तिनेही खूप मृत्यू पाहीलेत. तिच्या लहानग्या भावंडांचे, त्यांचे निष्प्राण देह हातात घेऊन सतत आक्रोश करणाऱ्या आपल्या आईला लहान वयातच या बाईंनी पाहीलंय कदाचित तेच सारं या चित्रातून उतरलं असेल.

~अवंती

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ह्या संदर्भात कदाचित 'केट कोलविट्झ - मनस्वी, प्रशांत चित्र-शिल्पकर्ती' हा लेख रोचक वाटू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ग‌ड‌क‌ऱ्यांची "राज‌ह‌ंस‌ माझा निज‌ला" क‌विता वाचुन त‌र‌ र‌डू येत‌ं.
.
हें कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला!'

दुर्दैवनगाच्या शिखरीं। नवविधवा दुःखी आई!
तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं ।
जें आनंदेही रडतें । दु:खांत कसें तें होइ--

हें कुणी कुणां सांगावें!
आईच्या बाळा ठावें !
प्रेमाच्या गांवा जावें--
मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला!"

मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।
होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।
मग हृदय बधिरची झलें । अति दुःख तिजवि चित्ताला ।

तें तिच्या जिवाचें फूल ।
मांडीवर होत मलूल!
तरि शोकें पडुनी भूल--
वाटतची होतें तिजला। 'राजहंस माझा निजला!'

जन चार भोंवतीं जमले। मृत बाळा उचलायाला।
तो काळ नाथनिधनाचा। हतभागि मना आठवला।
तो प्रसंग पहिला तसला। हा दुसरा आतां असला!

तें चित्र दिसे चित्ताला!
हें चित्र दिसे डोळ्यांला!
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां। 'राजहंस माझा निजला!'

करुं नका गलबला अगदीं। लागली झोंप मम बाळा!
आधींच झोंप त्या नाहीं। खेळाचा एकच चाळा!
जागतांच वाऱ्यासरसा। खेळाचा घेइल आळा!

वाजवूं नका पाऊल!
लागेल तया चाहूल!
झोंपेचा हलका फूल!
मग झोपायाचा कुठला! राजहंस माझा निजला!

हें दूध जरासा प्याला। आतांसा कोठें निजला!
डोळ्याला लागे डोळा। कां तोंच भोवतीं जमलां?
जा! नका उठवुं वेल्हाळा। मी ओळखतें हो सकलां!

तो हिराच तेव्हा नेला!
हिरकणीस आतां टपलां!
परि जिवापलिकडे याला--
लपवीन! एकच मजला! राजहंस माझा निजला!

कां असलें भलतें सलतें। बोलतां अमंगळ याला!
छबकड्यावरुनि माझ्या या। ओवाळुनि टाकिन सकलां!
घेतें मी पदराखालीं। पाहूंच नका लडिवाळा!

मी गरीब कितिही असलें।
जरि कपाळ माझें फ़ूटलें।
बोलणें तरी हें असलें--
खपणार नाहिं हो मजला! राजहंस माझा निजला!

हें असेच सांगुनि मागें। नेलात जिवाचा राजा।
दाखविलाहि फिरुनी नाहीं। नाहिंत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां। राजहंस राजस माझा!

हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा--
पाहुनी गरिब कोणाला। राजहंस माझा निजला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

Sad किती शोकार्त क‌विता आहे..
हा लेख‌देखिल आव‌ड‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0