बरेली के बाजार मे

मी वंदना पाटील आता मंजिरी मणेरीकर. टाटा मेमोरियल सेंटरमधून MD in Pathology करूनही मला मुंबईत म्हणावा तसा चांगला जॉब मिळाला नाही. मला मुंबई सोडायची जराही इच्छा नव्हती. तरी पुणे, तळेगाव अश्या ठिकाणी जॉब केले व शेवटी Pathology सोडून देऊन पुन्हा विद्यार्थिनी झाले. आधी MA with Sanskrit केले आणि मग BA with German la प्रवेश घेतला होता. अशी 5 वर्षे गेली. मला आपण एवढी मोठी डीग्री घेऊनही त्या क्षेत्रात काम करत नाही याची रुखरुख होती.
पण एक दिवस मला ऑनलाइन जॉबच्या वेबसाईट वरून फोन आला आणि ती मला विचारत होती कि तुम्ही बरेलीला जॉबसाठी जायला तयार आहात का? मी आत्तापर्यंत मुंबईच्या बाहेर जायला सरळ नकार देत होते. ह्या वेळी मात्र मी बोलून गेले, मला राहायला घर देणार असाल तर मी करिन. आणि काय आश्चर्य ती लगेच तयार झाली.
ती म्हणाली, हा हम आपको सिटी के अच्छे एरिया मी residence देंगे.। और इतनी भी बुरी नही है हमारी सिटी।
मग मला नाही म्हणायला काही कारणच उरले नाही. रीतसर माझा टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाला आणि मला त्यांनी व्यवस्थित appointment letter दिले.
मग मला भीती वाटायला लागली. उत्तर प्रदेश म्हटल्यावर गुंडागर्दीच आपल्याला आठवते. शेवटी मी आमच्या शेजारच्या काका काकूंना बरोबर येता का विचारले आणि तेही तयार झाले. मग मी railway चे रिझर्वेशन केले. दिल्लीला गाडी बदलायची होती.
1ऑगस्ट ला मी जॉईन होणार होते. आम्ही 28 जुलै ला निघून 29 ला पोचणार होतो. माझी कल्पना मला hostel accomodation देणार असतील म्हणून माझे काका काकूही माझ्याबरोबर राहिले तर चालतील का असे तिथल्या hr ऑफिसर ला विचारून घेतले होते. तिनेही कोई दिक्कत नही म्हणून सांगितले होते.
शेवटी आम्ही निघालो. उशिरा tichets काढल्यामुळे ऑगस्ट क्रांती राजधानीने निजांमुद्दीनला येऊन पुन्हा दुसऱ्या गाडीने दिल्लीला आलो. पुढच्या गाडीसाठी 4 तास होते. ते आम्ही स्टेशनवर बसून काढले. आणि 4.30 ला बरेलीची गाडी आली आणि वेळेवर सुटली. पण नंतर उशीर होत होत रात्री 11 वाजता आम्ही बरेली स्टेशनवर उतरलो.
Sigma MRI and Diagnostic Centre ची ऍम्ब्युलन्स आम्हाला न्यायला आली होती. HR ने मला विचारून ढोकळा आणि इडली पाठवली होती. इतक्या रात्री सगळी restaurants बंद होती. रात्री 12 ला आम्ही घरी पोचलो. दोन मजली घरातला दुसऱ्या मजल्यावरचा terrece फ्लॅट मला दिला. घराच्या मालकिणीने आल्या आल्या बातमी दिली इकडे वीज कितीही वेळ जाते. आज 10 तास नव्हती पण आत्ताच आली आहे.
ऐकून अंगावर काटा आला. घर सुंदरच आहे. आम्ही फराळ केला आणि चटई अंथरून झोपलो. Non furnished accomodation दिले होते. एका पंख्याशिवाय तिथे काहीच नव्हते.
झोपलो आणि वीज गेली. पंखा बंद. डास चावायला लागले. नशिबाने काकूने good night coil आणली होती. ती लावली. मी विचार करत होते उद्या लॅबसुद्धा न बघता चार दिवस राहून ह्यांच्या बरोबरच परत जायचे. इतके पहिले दर्शन भयंकर होते.

भाग २
भाग‌ ३
भाग ४

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुभाप्र..
रोचक अनुभव असणार आहेत तुमचे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

वाचाय‌ला म‌जा येइल्. भाग मोठे येऊ द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

और इतनी भी बुरी नही है हमारी सिटी।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुंबा आणि अनुताईंना 'मम'. मुंबईहून बरेलीसारख्या ठिकाणी जाण्याचे अनुभव गमतीशीर असणार. मस्त, आरामशीर बैठक मारून लिहायला बसा आणि तपशिलात लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाट पाहतोय पुढच्या भागाची. आणि विक्षिप्त म्हणतात तसं तपशिलात लिहा. त्या भागात राहिलेल्या मराठी माणसाचे अनुभव हटके असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम‌च्या हिंम‌तीला दाद‌ देतो. पुढ‌चे भाग वाच‌ण्याच्या प्र‌तीक्षेत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.