बरॆली कॆ बाजार मॆ 5

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

मी परत आले तो शनिवार होता. रविवार असूनही जॉईन झाले. काम अतिशय कमी होते. पण स्टाफ त्यामुळेच आनंदी होता. आणि मी मात्र कंटाळले होते.
अचानक मला डॉ पी के सिंग यांनी मीटिंग साठी बोलावले.
मी गेल्या गेल्याच त्यांना म्हणाले कि काम खूपच कमी आहे. ते म्हणाले कि हो. सेंटरचा दार महिन्याला खूप तोटा होतोय. दुसरा कोणी असता तर लॅब बंदच केली असती पण मी उपाय शोधतोय. मी जे काही जॉब केले ते सर्व सरकारी. त्यामुळे काम कमी असण्याचा अनुभवच नव्हता. ते म्हणाले आता आपण दर रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांत कॅम्प घ्यायचे. हिमोग्लोबीन आणि शुगर टेस्ट फ्री आणि इतर टेस्ट्स वर 20% सूट. मला खूपच आनंद झाला.
मग मी येऊन स्टाफला हे सर्व सांगितले. नाइलाजाने ते तयार झाले. आम्ही आदल्या दिवशी 3/4 टेबले, 5 खुर्च्या असे भाड्याने मागवायचो. कॅनॉपी बनवली आणि दर रविवारी कॅम्प घ्यायला सुरुवात केली.
पहाटे 5 ला उठून मी त्या थंडीत 6 ला लॅबमध्ये जायचे. स्टाफ पैकी दोघे तिघे 5 वाजताच हजर व्हायचे.
बरेली मध्ये 3 गुरुद्वारा आहेत. त्यांच्या आवारात, बागेत, बॅँकेबिहारी मंदिर, महानगर कॉलनी अश्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कॅम्प लावले. मी स्वतः हजर असून labelling नीट होतंय कि नाही ते पाहतेय हे बघून आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. रविवारी वीक डे पेक्षा जास्त काम व्हायला लागले आणि आधी लॅब सुपरवायझर आणि मग टायपिस्ट आणि टेक्निशियन जॉब सोडून गेले. तरीही मी कॅम्प चालूच ठेवले. एका रविवारी एक दिवसासाठी एका टेक्निशियन ला बोलावले कारण प्रोसेसिंग आणि टायपिंग दोन्ही करणे मला शक्य नव्हते.
मग त्याच टेक्निशियन ला रेग्युलर जॉईन करून घेतले. तोच अजूनही आहे.
हळूहळू उन्हाळा सुरु झाला तसे काम वाढले आणि कॅम्प बंद झाले. बरेली बद्दल बरीच माहिती मला मिळाली होती ती आता सांगते
बरेली ला नाथ नगरी म्हणतात कारण तिच्या चार बाजूंना चार नाथ म्हणजे शंकराची देवळे आहेत. अलोकनाथ, पशुपतिनाथ, टिब्रिनाथ आणि वनखंडी नाथ. कॅम्पच्या वेळी मी वनखंडी नाथांच्या देवळात जाऊन आले.
पावलोपावली हनुमान आणि शिव एकत्र अशी मंदिरे आहेत. माझ्या लॅब जवळही एक आहे. नवदुर्गा मंदिर फक्त बरेली मध्येच आहे. त्यात देवीच्या 9 मूर्ती आहेत.
पण लोक हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे आहेत. आमच्या लॅब मधला टेक्निशियन आणि रीसेप्शनिस्ट मुस्लिम आहेत. अर्ध्याहून जास्त डॉक्टर आणि पेशंट मुस्लिम असतात.
नोकरीसाठी बाहेरगावाहून आलेली मुले घर भाड्याने घेतात तेव्हा हिंदू मुस्लिम असे एकत्र राहतात.
शहरात संजय नगर, राजेंद्र नगर या भागांत मोठे बाजार आहेत. बऱ्याच लोकांच्या सायकली, स्कुटर किंवा गाड्या आहेत. रिक्षा, ऑटो आणि जुगाडने प्रवास करणारेही आहेत. पण खूप गर्दी नसते.
बडा बाजार, कुतूब खाना किंवा सिविल लाईन्स हा मोठा बाजार. इकडे सर्व रेंज मधल्या वस्तू मिळतात. रस्त्यावर किंवा महागड्या दुकानात कशीही खरेदी करू शकतात.
चाट रस्त्यावर पावलोपावली मिळते. मोठी restaurants कमी आहेत. बंगले खूप आहेत पण 4/ 5 मजली इमारती आहेत. फिरण्यासाठी मॉल आणि फनसिटी दोनच ठिकाणे.
सब्जी मंडी, दारावर येणारे भाजीवाले आणि भाजीचे सिंगल स्टॉल सगळे प्रकार आहेत.
अत्यंत उत्कृष्ट डॉक्टर, हॉस्पिटल आहेत. आयुर्वेदिक, होमिओपॅथी सगळे इलाज मिळण्याची सोय आहे.
लॅबमधील पूर्ण स्टाफ बदलून नवीन आला आहे. मला हे आर्टिकल लिहिण्याइतका वेळ मिळतो आहे.
आणि माझ्या मनात सतत येणाऱ्या प्रश्नाला मी उत्तर दिले आहे. एक वर्ष पूर्ण करून मुंबईला जायचे कि अजून एक वर्ष राहायचे? याला सध्या तरी माझे उत्तर अजून एक वर्ष राहायचे असे आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Tumche nirikshan savistar vachayla milale tar maja yeil ... kahi anubhav vistar purvak laha hi Vinanati

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण लोक हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे आहेत. आमच्या लॅब मधला टेक्निशियन आणि रीसेप्शनिस्ट मुस्लिम आहेत. अर्ध्याहून जास्त डॉक्टर आणि पेशंट मुस्लिम असतात.
नोकरीसाठी बाहेरगावाहून आलेली मुले घर भाड्याने घेतात तेव्हा हिंदू मुस्लिम असे एकत्र राहतात.

काय सांगताय काय?

आणि त्यांना "नो 'एम' फॅक्टर", झालेच तर "नो 'एच' फॅक्टर", असली सव्यापसव्ये आड येत नाहीत?

तुमचे हे बरैली (की बरेल‍‍ॆा की बरॆली, एकदाच काय ते ठरवा ब्वॉ!), नक्की हिंदुस्थानातच आहे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात है, त्या लेख लिहिणाऱ्याला दाख‌वा हा लेख‌. ब‌घ म्ह‌णावे ज‌रा डोळे उघ‌डून‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'उघ‌डा डोळे, ब‌घा नीट‌' की काय‌त‌री... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी, बरैली वायले नि राय बरैली (तेच ते इंदिरा गांधी फेम) वायले, नव्हे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान‌ लिहिताय‌. आव‌ड‌त‌य्...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पाच‌ही लेख वाच‌ले. आव‌ड‌ले. अजून येउ देत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0