मी ....अब्जशीर्ष

मी ....अब्जशीर्ष मानवता

मीच फुलविते विझू पाहणारी पहिली ठिणगी
जिला क्रान्तीच्या सहस्र धगधगत्या जिभा फुटतात

मीच गुणगुणते आमूलाग्र बदलांची बीजाक्षरे
जी दुमदुमतात प्र‌ग‌तीचा मंत्र होऊन आसमंतात

ती मीच, जिच्या पायाशी चिरेबंद चिलखते
भुगा होण्याआधी लोळण घेतात

मीच मळते विश्व वेढून दशांगुळे उरणाऱ्या
अदम्य ज्ञानलालसेच्या पायवाटा

कैकदा मरून
प्रतिकूलांना पुरून
मीच उरते पुनःपुन्हा

अब्जशीर्ष.
अजिंक्य.

रंग,वंश,लिंग,ध‌र्म‌ या चौक‌टीत‌ मला चिणू नकोस
दिव्यत्वाच्या शोधात व्य‌र्थ शिणू नकोस.

field_vote: 
0
No votes yet