बुलिंग‌ अर्थात दादागिरी

आधीची क‌ंप‌नी सोडुन, दुस‌ऱ्या क‌ंप‌नीव‌र‌ रुजु होउन ब‌रेच दिव‌स‌/म‌हीने झाले आहेत. ख‌र‌ं त‌र‌ आधीच बोलाय‌ला, तोंड‌ उघ‌डाय‌ला ह‌वे होते, प‌ण बेट‌र‌ लेट दॅन‌ नेव्ह‌र‌, या न्यायाने प‌र‌वाच माझ्या व‌रील‌ अधिकाऱ्याला लिन्क‌डिन व‌रुन स‌ंदेश‌ पाठ‌विला व‌ त‌क्रार‌ केली.
गेल्या नोक‌रीत, एका स्त्रीच्या "बुली" स्व‌भावाचा, दादागिरी अतोनात त्रास झाला. १० च्या स्केल‌व‌र‌ती ७-७.५. मी कामात‌ अस‌ताना स‌त‌त‌ लक्ष‌ वेधुन घेत‌ असे, काहीना ना काही फाल‌तु मुद्दे उक‌रुन बोल‌णे, कामात व्य‌त्य‌य‌ आण‌णे हे स‌र्रास‌ होई. मी कामात म‌ग्न अस‌ताना, मुद्दाम‌ हे अमुक‌ तिला (=म‌ला) विचार असे अन्य स‌ह‌काऱ्यांना स‌ल्ले देणे वार‌ंवार घ‌डे.
ज‌राही कीबोर्ड‌ची ट‌क‌ट‌क‌ त्या बाईला स‌ह‌न होत न‌से. म‌ग‌ त्याव‌रुन स‌दा बोल‌ले जाई. की तु (=मी) कीबोर्ड‌ ब‌द‌ल‌, दुस‌रीक‌डे ब‌स‌, आवाज‌ क‌मी क‌र‌. काम‌ क‌र‌ताना पायाने ल‌यीत ठ‌क‌ ठ‌क‌ क‌र‌ण्याच्या स‌व‌य‌ माझ्या स‌व‌यिचा अन्य‌ लोकांना त्रास होत‌ न‌से, किंब‌हुना सारे आपाप‌ल्या कामात म‌ग्न अस‌त प‌ण हिला कोण त्रास्. काम‌ क‌र‌ताना मी स्व‌त:शी किंचित पुट‌पुट‌ते. अग‌दी ल‌हान आवाजात त्याचा ही तिला त्रास होई. एक‌ंद‌र‌ आवाजाचा त्रास हाच स्थायीभाव‌ होता. च‌ला, त्या त्रासास बेनेफिट ऑफ डाऊट देऊ.
प‌ण प‌र्स‌न‌ल गोष्टी खोदुन‌ खोदुन विचार‌ण्याच्या तिच्या स‌व‌यीचा म‌लादेखील क‌ंटाळा येत‌ असे कार‌ण ती माहीति जाणून घेउन‌ काही स‌हानुभूती किंवा उदासीन‌ता वाट‌ण्यापेक्षा स्निक‌रींग‌ (तिर‌क‌स‌ ह‌स‌णे) सअशाच गोष्टी घ‌ड‌त्. उदाह‌र‌णार्थ न‌व‌रा, काय‌ क‌र‌तो, किती दूर‌ र‌हातो, म‌हीन्यातून /व‌र्षातुन कितीवेळा भेट‌तो आणि हे स‌र्व‌ म‌ला क‌स‌ं चाल‌त‌ं याची माझ्यापेक्षा तिलाच चिंता असे. व‌ ती चिंता फ‌क्त Vicarious न‌सुन, तिचा गैर‌वाप‌र‌ केला जाई. उदाह‌र‌णार्थ - अन्य‌ लोकांशी बोल‌ताना, माझ्यास‌मोर मुद्दाम‌ "काही न‌व‌रा बाय‌को क‌से दूर र‌हातात कोणास ठाउक्?" व‌गैरे उगाळ‌ले जाई. म‌लाही म‌ग‌ तू दुस‌री नोक‌री का नाही शोध‌त‌ व‌गैरे प्र‌श्न‌. एक‌ंद‌र सेडिस्ट स्व‌भाव‌.ब‌र‌ं ब‌रेच‌दा (=एक‌दा/दोन‌दा) माझी वैय‌क्तिक माहीती माझ्या मॅनेज‌र‌ला सांगुन मला स‌ंक‌टात‌ आण‌ण्याचाही प्र‌य‌त्न झालेला आहे.
एक‌ंद‌र‌ ह‌ल‌क‌ट व्य‌क्ती होती.आम‌चे पुर्ण‌ गाव‌च मोठ्या त‌ळ्याकाठीआहे. एक‌दा आम्ही ऑफिस‌च्या वेळात, ज‌हाजे प‌हाय‌ला जाय‌चे ठ‌र‌विले होते, न‌ंत‌र‌ म‌ला काही कार‌णाने काम‌ निघाले, व‌ मी जाण्याचे नाकार‌ले, तेव्हा इत‌का टॅंट्र‌म‌ दाख‌विला,राग‌ काय‌ आला, एक‌ंद‌र‌ म‌हामुर्ख व‌ अत्य‌ंत‌ सेडिस्ट व्य‌क्ती अस‌ल्याचा घाणेर‌डा अनुभ‌व‌ आलेला आहे.
.
वाईट या गोष्टीचे वाट‌ते की, why the hell am I unable to stand up for myself? Why don't I find my voice? Nature/nurture.genes/horoscope क‌शात‌ही म‌ला उत्त‌र‌ साप‌ड‌त‌ नाही. नाही क‌से, या स‌र्वात‌च ते उत्त‌र‌ विखुर‌ले गेलेले आहे असे वाट‌त‌ र‌हाते, स‌ंश‌य‌ येतो. जेव्हा अन्य‌ एका स‌ंस्थ‌ळाव‌र‌ती, म‌ला सुरुवातीला, बुलिंग‌ झाले होते तेव्हा, एक‌ंद‌र‌ ल‌हान‌प‌णीचा अनुभ‌व‌ प‌हाता, व‌ आत्ताचा अनुभ‌व‌ प‌हाता, "जैसे थे" च प‌रिस्थिती आहे. स‌त‌त‌ पॉव‌र‌प्ले, बुलिंग‌चा अनुभ‌व‌ येतो यात‌ माझा ओव्ह‌र‌सेन्सिटिव्ह‌नेस प्र‌थ‌म‌द‌र्श‌नी कार‌णीभूत न‌क्की असेल‌ प‌ण त्याची प‌रिणिती, स‌मोर‌च्या व्य‌क्तीचा सेडिस्ट स्व‌भाव बाहेर आण‌ण्यास कार‌णीभुत होतो हे स‌त्य‌ आहे. बुलिंग‌ हे फ‌क्त शाळेत होत नाही ते ल‌हान‌प‌णी घ‌रातही होते, ते नोक‌रीत‌ही होते. जिथे जिथे दोन‌ व्य‌क्तिंचा प‌र‌स्प‌र‌स‌ंब‌ंध‌ येतो तिथे बुलिंग‌ होण्याची श‌क्य‌ता अस‌ते. स्व‌त:च्या ह‌त‌ब‌ल‌तेचा राग‌ येतो. ही ह‌त‌ब‌ल‌ता कार‌णाशिवाय येते हे माहीत‌ आहे प‌ण ती येत‌ जाते, तिचे साव‌ट प‌स‌र‌त‌ जाते हेही माहीत आहे.
,
प‌र‌वाच मिसिंग‌ एलिमेन्ट हे ज्योतिष‌शास्त्राव‌रील‌ पुस्त‌क‌ वाच‌त‌ होते. ज‌ल‌राशिचे आधिक्य‌ = वायुत‌त्वाचे द‌म‌न्. वायु त‌त्व‌ = स‌ंवाद‌, वाद‌विवाद‌, स्व‌त:चा मुद्दा मांड‌ण्याचे articulate skill, स्व‌त:ची story सांग‌ण्याची हातोटी. याउल‌ट‌ ज‌ल‌राशी = अतिरेकी भ‌व‌निक‌रता, over sensitivity, मूडीनेस, फ‌क्त अन्य लोकांब‌द्द‌ल‌ क‌रुणाच नाही त‌र self-pity देखील्. क‌शा या स‌र्व‌ गोष्टी फिट ब‌स‌तात्. उदाह‌र‌णार्थ‌ च‌व‌थ्या घ‌रातील (म‌न‌)........... प्लुटो (न‌र‌काचा अधिप‌ती, अर्थात स्व‌त: न‌र‌क‌म‌य + पॉव‌र‌फुल‌ अस‌णारा ग्र‌ह‌,) आणि बुलिंग‌, . हे स‌र्व‌ फिट्ट ब‌स‌ते व‌ म‌ग कोणी कितीही ज्योतिषाला नावे ठेवा, त्या टिकेतील‌ फोल‌प‌णाच जाण‌व‌तो. आम‌च्यासार‌खे लोक फार‌ भ‌र‌भ‌रुन, अक्ष‌र‌क्ष: काम‌ध‌ंदा न‌स‌ल्याग‌त‌ लिहीतो कार‌ण हेच की आम‌चा आवाज फ‌क्त लेख‌णितुन साप‌ड‌तो, म‌नातिल‌ व्य‌था, गोंध‌ळ फ‌क्त लिखाणातुन व्य‌क्त क‌र‌ता येतात्.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मागच्या नोकरीतल्या केससारखी इकडे नवीन नोकरीतही एक सांपल आहे का? पोटदुखी ही बय्राच जणांना असते परंतू बोलल्यावर लक्षात येते. अन्यथा मागे टिकाटिप्पणी होतच असते,कुणाकुणाला आपल्याबद्दल आदर नसतो हे ओळखावे लागते. यांमध्ये स्त्री/पुरुष असा भेद नसतो. हेवेदावे आणि राग खदखदत असतो तो कधी उफाळतो तर कधी होळीत टाकलेला नारळ पूर्ण काळा ठिक्कर होईपर्यंत फुसफुसत राहतो तसा प्रकार असतो. दादा कोंडकेच्या चरित्रात लिहिलं आहे- भालजी पेंढरकरानी त्याना सल्ला दिला होता - पुढे जायचे असेल तुला तर फार भाव देऊ नकोस कुणाला. त्या व्यक्तीला टाळून काम चालव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे अजुन‌ त‌री कोणी नाही. स‌र्व‌ ज‌ण न‌वे आहेत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भिडस्त स्वभाव आड येतो. अशा वैचारीक दरीद्री लोकांचा एक समूह जगात कोणत्याही संस्थेत/समुहात/कंपनीत/ऑफिसात सक्रिय असतो फक्त त्यांची व्याप्ती अन् त्रास देण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात. सरळ स्वभाव असला की खोचटच काय साध्यासाध्या अडचणींत टाकणार्या प्रश्नांचीही उत्तरे लगेचच देता येत नाहीत. अन् मागाहून एकाहून एक तिखट उत्तरे आठवतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अन् शुचितै, मी टिपीकल ममविवि का काय म्हणतेत ती वृत्ती म्हणजे कुणी आपलं काही सांगायलं की आपलेपण त्यावरचे संकटं सांगून द्यायची खोड सोडणार नै, निदान सांगणार्याची तिव्रता कमी होते.
तुम्हाला तरी त्रास द्यायला एकच बै होती, माझ्या मागं तर सात-आठ जणांची पलटणंच होती अन् माला पदच्चुत करुनच बिचार्यांनी दम घेतला. अशा कैक अफवा पसरवल्या की मला स्वप्नातही खर्या वाटणार नै. पण बिचारे अशामुळं की हाच त्यांचा स्वभाव त्यांना बेइज्जत होऊन बाहेर जायला कारणीभूत ठरला. माझ्या मनाची अवस्था अशी झाली होती की...असो. be careful. एवढंच. अन् लिहून मन मोकळं करणं म्हणजे awesome उपाय, (शक्यतो) कुणी दुखावलं जात नै अन् आपल्या मनातही जास्तवेळ रहात नै. लिहीणारे लोक म्हणून एक दोनचार आओळी आहेत माझ्या पुर्वप्रकाशित.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

साध्यासाध्या अडचणींत टाकणार्या प्रश्नांचीही उत्तरे लगेचच देता येत नाहीत. अन् मागाहून एकाहून एक तिखट उत्तरे आठवतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

होय‌ अग‌दी.

माझ्या पुर्वप्रकाशित.

नेकी और पूछ्पूछ! टाका ना म‌ग. न‌वीन‌ धाग्यात टाका, इथे टाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोज १०८ वेळा पुढील म‌ंत्र‌ म्ह‌णा:

know-it-better

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा. म‌स्त आहे हा म‌ंत्र‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌ण, ज‌ल‌राशीब‌द्द‌ल‌ असे म‌त‌ असेल‌ त‌र, मीही आयुष्य‌भ‌र‌ कोणाव‌र‌ त‌री बुलिंग‌ केले की काय‌ ? असा स‌वाल‌ उठ‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

नाही तिमा, अति ज‌ल‌राशी म्ह‌ण‌जे स्व‌त:चा आवाज ऊठ‌व‌ता न‌ येणे म्ह‌ण‌जे गेटिंग‌ बुलीड की काय असा मुद्दा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रयत्ने वाळूचे कण रगडता...हे सुभाषित माहीत असेलच...Assertive झाले पाहिजे...पण मला हे ही चांगलेच माहीत आहे की सुभाषिते आदर्शवादाकडे नेतात, आणि म्हणी ह्या समाजातील वास्तव असतात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

शुचे, मी काही कोणाची दादागिरी सहन करून घेणाऱ्यातली नाही. इतर कोणाची दादागिरी सहन कर, असा सल्लाही मी देणार नाही. पण जर तुला प्रतिकार करता येत नसेल, इतर काही गनिमी कावा करून हे प्रकार बंद/कमी करता येत नसतील तर दुसरी नोकरी शोधणंच योग्य.

दादागिरीला विरोध करण्यात जर तुझी खूप ऊर्जा खर्च होणार असेल तर तो उपाय तुझ्यासाठी नाही. तुझ्यासाठी तुझा आनंद आणि तुझं समाधान याच गोष्टी महत्त्वाच्या असल्या पाहिजेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझी स्वाक्षरी दिव‌सातून १०८ वेळाव‌गैरे नाही, त‌री असे विचार डोक्यात येतात तेव्हा, स‌ग‌ळी घृणा, किळ‌स, नाराजी एक‌व‌टून म्ह‌णा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

फ‌क्त विचार‌ नाही हे असे फ्र‌स्ट्रेटेड , द‌ळ‌भ‌द्री लोक‌ कामात प‌र्यायाने उप‌जिवीविकेच्या साध‌नात् अड‌थ‌ळा आण‌तात.
वैचारीक , बौद्धिक‌ लेप‌र‌र्स तेजाय‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌ंद‌र‌ आवाजाचा त्रास हाच स्थायीभाव‌ होता. च‌ला, त्या त्रासास बेनेफिट ऑफ डाऊट देऊ.

आजीबात नाही. टिम‌म‌ध्ये काम क‌र‌णे हे ज‌र तिच्या काम‌चा भाग असेल त‌र आवाजाचा ते प‌ण पाऊल वाज‌णे व‌गैरे होणे हे अत्य‌ंत अन‌प्रोफेश‌न‌ल आहे. हे अस‌ले टॅंट्र‌म्स स‌ह‌न क‌रून घेऊ न‌येत्.
बुलीइंग मुळात इन्फेइरियॉरिटी कॉंप्लेक्स‌चे प्र‌तिबिंब आहे. अश्या माण‌सांना डिल क‌र‌णे ख‌रेच स्किल आहे. कुणात अस‌तं कुणात आजिबात‌च न‌स‌तं..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बुलीइंग मुळात इन्फेइरियॉरिटी कॉंप्लेक्स‌चे प्र‌तिबिंब आहे

ही अस‌ली विधाने कुठुन येतात्? माझ्या म‌ते स्व‌ताच्या म‌नाची स‌म‌जुन काढ‌ण्यासाठी अस‌ले मार्ग काढ‌ण्यात येतात की "क्ष बुलींइंग क‌र‌तोय म्ह‌ण‌जे त्याला इन्फेइरियॉरिटी कॉंप्लेक्स‌ आहे" आप‌ण त्या बुली ला प्र‌त्युत्त‌र देऊ श‌क‌त नाही ह्या व‌स्तुस्थितीला डिस्टॉर्ट क‌रण्यासाठी अस‌ली म‌नाची स‌म‌जुत घात‌ली जाते.

म‌नोबा, तुला प‌ट‌ले का हे विधान्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अगदी लहानपणापासुन प्रचंड बुलिंग त्याचप्रमाणे सॉफ्ट टार्गेट समजून लोकांनी स्वतःच्या sadism च्या नाना कला पुरेपूर वापरत दिलेला मानसिक त्रास आणि त्यावर मी काहीही न करू शकण हे सगळं अनुभवल्यामुळे तुम्ही लिहिलेल्या गोष्टी वाचल्या वाचल्या लगेच क्लिक झाल्या आणि व्यवस्थित रिलेट झाल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हि चिडचिड कधीकधी घरी निघते. कुणी (समजून) सांगितलं किंवा साक्षात्कार झाला की कमी (बंद नाही) होतं (हा स्वअनुभव)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी