कविता...

कविता लिवली की हितले लोक लई कावत्यात कुणास ठौ काऊन ते (उदयजी, लगे रहो, हम भी है साथमे). पण मी आणलोच ऊलशाक कविता अन् ऊलसक तिज्याबद्दल.

(पुर्वप्रकाशित)
किती खरंय ना, मी पण कविता करायचो, करतोय, फरक एवढाचय की
करायचो तेंव्हाची Intensity आणि कारणं आणि करतोय त्याची Intensity आणि कारणं...खूप फरकय यार, आताच्या कविता कामावरुन येता येता आठवतात आणि घरी येई पर्यंत विसरुन जातात, घरी आल्यावर त्यांचे तुकडे जोडताना मग ञासून जातो, काही वेळा तर जोडणंही सोडून देतो. करायचो त्या वेळेसच्या कविता बहुतेकदा लपून छपून लिहायचो तरीही उघड्या पडायच्या आताच्या कवितांची बहुतेकदा तर दखलच घेतली जात नाहीत.वेळ आणि परीस्थिती matters. कवितांमगच एक कारण माञ नक्की ते म्हणजे, inspiration, चैतन्य, कारण, मग त्याच स्वरुप कोणतही असू शकत. बहुतेकदा वयाबरोबर ते बदलत रहात. पण काॅलेज वयातील कवितांमागे 90+ % एकच inspiration, चैतन्य, कारण एक्कच असतं, ज्यांनी हे केलय त्यांना काय ते सांगायची गरज नाही.
दुसरं कारण, वेदना किंवा संवेदनेची त्सुनामी मनात दाटली mind मध्ये विचारांच riot सुरु झालं की ते असं बाहेर पडतं.
कविता करायचो तेंव्हा लाडिवाळपणे फिरकी घेतली जायची, कविता करतोय तेंव्हा संशयाने फिरकी घेतली जाते. करायचो आणि करतोय या मधले फिरकी घेणारेही खूप बदललेत आता. यामुळेच की काय, करायचो तेंव्हा मन खूप हळवं होत, करतोय तेंव्हा ळूहळू आता ते practical होत चाललय.

अशीच एक intensity मय कविता first stroke with no edit.

नाही...
कधीच मला आयुष्य मनासारख जगता आल नाही,
larger than life म्हणजे जसा नाही तसा दाखवता आल नाही,
आज माहितीय कुठल्या कुठे असतो, पण काहितरी चुकल,
काय? ते अजूनपर्यंत ऊमजलंच नाही...
सगळे म्हणतात मी सारखा senty लिहीतो,
पण सगळे सारखेच असतात अस शक्यच नाही,
असतो प्रत्येकाचा भावना व्यक्त करण्याचा मार्ग, माझा आहे असा,
कारण लिहील्या शिवाय जड झालेल मन हलकं होत नाही...
कुणी कितीही म्हणो मी जात नाही भावनांच्या आहारी, त्यामागे असते लपवलेल दु:ख, हे का कुणाला समजत नाही!
असतो प्रत्येकाचा एक दुखरा कोपरा,
मी लिहीतो, सगळे लिहीत नाही...
गुंतलेल्या आयुष्याचा आतापर्यंतच्या सुटेलही गुंता हळुहळु, पण सुटल्यावर तरी कसा सांगू?
दरवेळेस सारखच, कधी तूच...नाही तर कधी मीच...नाही!!!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अप‌ने म‌न‌ को भाया
क‌विता लिख‌ के आया.
अस‌ं पाय‌जे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण सगळेच कवितेच्या मांडवाखालून कधी ना कधी जातोच. फक्त त्यामुळे प्रत्येक मांडवात आपण नवरदेव असा ग्रह करून नाही घेतला म्हणजे झाले. Smile
does that make sense ?

कविता हे हुलकावण्या देणारं पाखरू आहे कधी अलगद न बोलवता तुमच्याजवळ येऊन बसेल, गाणं गाईल तर कधी कितीही आळवणी केली तरी त्या पाखराचं पीसपण दिसणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

छान लेख आणि कविताही!!!!

करायचो आणि करतोय, यातला बदल छान विशद केलाय. Inspiration मुद्दा पटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0