Skip to main content

random one...कविता

पावसाच्या दिसाची कविता वाचून माझीही एक चिटकावी वाटलं म्हणून. बाकी, पावसाच्या दिसात "ती"ची आठवण, लई वंगाळ कॉम्बो.

यावेळीही कोसळत्या पावसात
तसाच चिंब भिजेन मी,
फक्त, तुझी आठवण पाठवू नको...
तसाच भटकत फिरेन मी
माळरानाच्या वाटेवर,
सांजवेळी कात्रीत धरायला
तुझी आठवण आली जरी
सावरायला मला,
तुझे प्रेम मात्र पाठवू नको...
का एकटाही बघवत नाही मी तुला
हळूहळू जमतंय मला
तुझ्याशिवायही रहायला,
नको आठवण अन् प्रेमही तुझं,
तुला विसरायला तेवढं सांगू नको...