गावाकडच्या मावळतीचे …….रंग बिलोरी

गावाकडच्या मावळतीचे
…….रंग बिलोरी
प्रसन्न पिवळे, गडद गुलाबी
निवांत निळसर, कबरे करडे
पाहून निवती माझे डोळे
…....निब्बर शहरी

प्रसन्न पिवळ्या संध्याकाळी
खेळ अ॑गणी रंगुनी जावा
दावण तोडुन, आचळ सोडुन
....अचपळ गोऱ्हा
.....पिऊन वारा....
उधळत जावा

गडद गुलाबी संध्याकाळी
शुक्र जरासा तेजाळावा
उडता उडता पुन्हा थव्याची
......... मोडुन नक्षी....
.........चुकार पक्षी......
उतरून यावा

निवांत निळसर संध्याकाळी
फड गप्पांचा मस्त जमावा
सळसळ रोखून वृद्ध वडाने
........टाळीसाठी........
.......पारंबीला.......
झोका द्यावा

कबऱ्या करड्या संध्याकाळी
धूसर ढग ओथंबुन यावा
पायतळीच्या वाटेवरचा
.......भिरभिरणारा.......
........एक काजवा.......
लखलख व्हावा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

स‌र‌ळ साधी क‌विता आव‌ड‌ली. कुठ‌लेही तात्प‌र्य‌,सार,च‌म‌त्कृतीपूर्ण‌ अंतिम ध‌क्का न‌स‌लेली.
म‌स्त‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेच बोल‌तो. आव‌ड‌ली क‌विता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

There's too much blood in my caffeine system.

आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

There's too much blood in my caffeine system.

म‌स्त आहे क‌विता. आव‌ड‌ली. मूड झाला क‌धी त‌र सुलेखनात वाप‌रेन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

अप्र‌तिम.. पुन्हा वाच‌ली, पुन्हा आव‌ड‌ली..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अतिश‌य उत्त‌म क‌विता आहे. माझे सुदुर खेड्यात गेलेले बाल‌प‌ण आठ‌व‌ले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे खेडे म्ह‌ण‌जे मौजे मुहियाबाद काय‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटोबा, तुला उप‌हास क‌राय‌ला काय जाते, तुझ्या निब्ब‌र श‌ह‌री डोळ्यांना क‌ळ‌णार नाही ती खेड्यात‌ली म‌जा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेही ख‌रेच म्ह‌णा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खूप‌च‌ आव‌ड‌ली. श‌ब्द‌र‌च‌ना सुंद‌र‌, च‌म‌त्कृतीशिवाय‌. आज‌ ख‌रे, अनंताचे द‌र्श‌न‌ घ‌ड‌व‌लेत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'राम' हवा म्हणून 'त्यांना' बडवतो,काम हवे म्हणून 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे हो दास, आम्हाला बडवे होण्यातच रस|

ही क‌विता वाचून‌ प्र‌श्न‌ प‌ड‌लाय‌ की तू सिझोफ्रेनिक‌ आहेस‌ का काय‌? Wink ते दिक्काल‌बंध‌ आणि अश्व‌त्थामा अस‌ल‌ं लिखाण‌ (क‌विता या स‌द‌रात‌ टाक‌लेल‌ं लिखाण‌) क‌र‌णारा आणि ही झ‌कास‌ र‌च‌ना क‌र‌णारा तू एक‌च आहेस‌? आता अर्थात‌च‌ प्र‌त्येक‌ क‌विता/लिखाण‌ आव‌ड‌णार‌ंच‌ असेल‌ अस‌ं होण‌ं श‌क्य‌ नाही. प‌ण‌ ..... असो. क‌वीने लिहित‌ र‌हाव‌ं आणि आम‌च्यासार‌ख्याने, काहीत‌री हाती लागेल‌ या आशेने, वाच‌त‌ र‌हाव‌ं.

प‌र‌त‌ एक‌दा दाद‌ देतो, मित्रा, फार‌ छान‌ आहे ही क‌विता....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

....क‌दाचित असेन‌ही! प‌ण खात्री आहे की मी एक‌टा नाहिये!! Smile
क‌वितेला जी दिल‌खुलास दाद दिलीस त्याब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

सुंद‌र क‌विता!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...म‌न:पूर्व‌क ध‌न्य‌वाद‌ !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)