मृद्गंधार

मी आणि माझे मुंब‌ईला क‌ंटाळ‌लेले स‌म‌दु:खी मित्र, पेणज‌व‌ळ‌च्या आंबेघ‌र इथे 'मृद्गंधार' वसाह‌तीत, एक रात्र काढाय‌ला गेलो होतो. पोर्टेब‌ल त‌ंदूर आणि बास‌री.

स‌क्काळी स‌क्काळी एस्टीत ब‌स‌लो. मुंब‌ईचा ट्रॅफिक टाळाय‌च्या उद्दिष्टाने. साधारण ४ ला उठावं लाग‌ल्याने एस्टीच्या ख‌ड‌ख‌डाटात हिंदुत्व, डावे, र‌सेल पीट‌र्स चांग‌ला की बिस्व, चौर‌सिया, स्त्रिया इ. विष‌यांव‌र च‌र्चा न होता स‌ग‌ळे निद्राधीन झालो. ख‌रंत‌र म‌धून म‌धून रिपरिप पाऊस झाला, प‌ण वाताव‌र‌ण ज्याम ग‌र‌म. मुंब‌ई झोप‌ली होती. पाव‌साआधीचे ज्याम उक‌डण्याचे दिव‌स. कुठ‌ल्यात‌री डेपोम‌ध्ये (ब‌हुतेक प‌न‌वेल) उसाचा र‌स प्याय‌लो. प्र‌चंड पाण‌च‌ट.
शेव‌टी पेणम‌ध्ये पोहोच‌लो. ब‌रा म्ह‌णावा असा पाऊस सुरू झाला होता. त्यात प‌र‌त उन. स‌ग‌ळा चिक‌चिकाट. डेपोस‌मोर मिस‌ळ‌पाव चेपून चिक‌न शोधाय‌ला निघालो. एका ग‌ल्लीत फ‌क्त चिक‌नची दुकानं. भाव इत‌का केला की कोंब‌ड्यांच्याही डोळ्यांतून पाणी आल्याचा भास झाला. ३ कोंब‌ड्यांचं अडीच किलो झालं.
तो स‌ग‌ळा ऐव‌ज घेऊन ट‌मट‌म म‌ध्ये ब‌स‌लो. पेणहून आंबेघ‌र साधार‌ण द‌हा मिनीटं, प‌ण वाट म‌स्त आहे. दोन्ही बाजूंनी झाडी. ट‌मट‌मवाल्याने म‌ध्येच उत‌र‌व‌लं कुठेत‌री. तिथून थोडी च‌ढ‌ण, आणि ती मृद्गंधार वसाह‌त.

इथ‌लं प्र‌त्येक घ‌र आय‌ट‌म आहे. जागा ब‌ऱ्यापैकी. प‌ण मुंबैच्या लोकांनी मुंबैत‌लंच एखादं घ‌र तिथे आणून टाक‌ल्याग‌त घ‌र‌ं बांध‌लेली. स‌र‌ळ‌सोट. एसी असेल त‌र टिव्ही, फ्रिज इत्यादी अस‌णार‌च. अॅक्रिलीक डिस्टेंप‌र बाहेरुन चोप‌लेला. फ्रेंच विंडोज नी अंग‌णात ट्युलिप्स की काय ते. काही लोकांनी मात्र डोकं वाप‌र‌लेल‌ं. एक्स्पोज्ड ब्रिक्स, फ्रेंच विंडो, मोठ्ठ्या ग्याल‌ऱ्या, ग‌च्ची, बागबगीचा इत्यादी.
आम‌चं घ‌र एकद‌म स‌र‌ळ. ब‌रंच कोप‌ऱ्यात. एकच खोली. घ‌र‌माल‌क ब‌रेच र‌सिक अस‌ल्याने घ‌राच्या निम्म्या साईझची बाल्क‌नी. चारी बाजूंना त्यांची बाग. बागेत गव‌ती च‌हा इत्यादी उप‌योगी व‌न‌स्प‌ती, आणि इत‌र‌ही. घ‌राचं बांध‌काम एक्स्पोज्ड ब्रिक. घ‌रात‌ली क‌पाटं इत्यादींव‌र स‌नमायका वगैरे नाही. क‌ड्याही लाक‌डीच. व‌र कौलं. एकूण, वाताव‌र‌ण त‌सं प्र‌स‌न्न.

गेल्या गेल्या तिथे ब्यागा टाक‌ल्या, आणि बास‌री काढ‌ली. थोडा शुद्ध सार‌ंग आळ‌वल्याव‌र जोरानं वारं सुट‌लं. म‌ग बंदिश. म‌ग आलाप. वारा जोरात‌च.

दुपार‌चं जेव‌ण तिथ‌ल्याच एका माण‌साने दिल‌ं. चार तांदळाच्या भाक‌ऱ्या, अंडा क‌री, ज‌व‌ल्याचं भुज‌णं, सोलक‌ढी, भात. झोप‌ झाल्यामुळे प‌र‌त बास‌री, आणि ग‌प्पा. पारा काही उत‌र‌त न‌व्ह‌ता. थोडा य‌म‌न, म‌ग भैर‌व. सूर्य उत‌राय‌ला लाग‌ला त‌शी त‌ंदूर ज‌म‌व‌ण्याची ख‌ट‌प‌ट सुरू झाली. चिक‌न म‌साले चोपडून ठेव‌लं होत‌ंच. कोळ‌से ज‌म‌व‌ले, पेट‌व‌ले. हातानेच कांबीव‌र‌च्या तुक‌ड्यांना तेल लावून ग्रिलव‌र ठेव‌ल्या. भ‌रपेट च‌रून झाल्याव‌र, प‌ब्लिक‌ला झोप‌वाय‌ला प‌र‌त भैरव.
काही झोप‌ले. आम्ही काही लोक प‌त्ते खेळ‌त ब‌स‌लो. रात्र च‌ढ‌त, आणि पारा उत‌र‌त गेला त‌से निद्राधीन झालो.

स‌काळी उठून अंग‌णात‌ल्या ग‌व‌ती च‌हाच्या पात्यांचा झ‌क्कास च‌हा, आणि अग‌दीच रिपरिप पाव‌सात प‌र‌तीचा प्र‌वास. मुंब‌ईला त‌र प‌त्ताच नाही त्याचा.
काल लोकस‌त्ताम‌ध्ये पेणला मुस‌ळ‌धार पाव‌साने झोड‌प‌ले वाचून स‌ग‌ळे सामूहिक ह‌ळ‌ह‌ळ‌लो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फोटो फेबुव‌र टाक‌ले की इथे टाकेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

audio clip टाका इथे एक‌दा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

इतक‌ंही चांग‌ल‌ं नाही वाज‌व‌त मी. ठीक‌ठाक‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

सुटी घालवायची कल्पना भारी. पावसाचं ठीक आहे पण अम्हादिकास झोडपण्यास बासरीची तीन मिनिटे पुरेशी ठरतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अम्हादिकास झोडपण्यास बासरीची तीन मिनिटे पुरेशी

इत‌कं हिंस‌क नाही हो वाज‌व‌त मी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

मध्यम वाजवता आणि इतका वेळ वाजवता म्हणजे छानच. बाकी आम्ही औरंगझेब असल्याने तीन मिनिटे म्हटलं.
तबला पेटीपेक्षा बासरी आणि छोटं वायलिन बरी वाद्यं आहेत. बोजड नाहीत.स्वतंत्र गाणीही वाजतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला बास‌री आणि व्हायोलिन ही दोन्ही वाद्य‌ं ज‌ब‌री आव‌ड‌तात. एक‌द‌म जीव ओत‌ता येतो त्यांच्यात. आणि सोलो, साथीला अशी दोन्हीक‌डे वाज‌व‌ता येतात म्ह‌ण‌जेत‌र बेष्ट‌च.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

व्हायोलिन वाज‌व‌ता येणाऱ्या माण‌साब‌द्द‌ल म‌ला आद‌र अस‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...व्हायोलिन वाजवता येणाऱ्या माणसाच्या आईबापांच्या पेशन्सबद्दल त्याहूनही जास्त आदर असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

माणूस माणसाला चंद्रावर धाडू शकला, परंतु व्हायोलिनकरिता व्हॉल्यूम कंट्रोलचा शोध आजतागायत लावू शकलेला नाही.

पॉइंट ब्लँक रेंजमध्ये व्हायोलिन हे एक (बऱ्यापैकी प्रभावी) शस्त्र आहे. (खास करून घरात एखादे पोर व्हायोलिन वाजवायला शिकत असेल तर.)

- (फार पूर्वी 'त्या' फेजमधून गेलेला बाप) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

सुट्टी घालवण्यासाठी अशी आणखी हटके निवांत गर्दी नसलेली ठिकाणं असतील तर सांगा राव त्याच त्याच नेहमीच्या ठिकाणी आता जाववत नाही. हू म्हणून माणसांची , पोरासोरांची आणि गाड्यांची गर्दी बघितली की मूड जातो सगळा. जी काही पूर्वी दुर्मिळ ठिकाणं होती तिथे पण आता प्रचंड गर्दी वाढलीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे म्ह‌ण‌जे एका मित्राचं घ‌र होतं म्ह‌णून जाऊ श‌क‌लो. बाकी अशी ठिकाणं मुंब‌ईत त‌री नाहीतच. प‌ब्लिक तिच्याय‌ला येडा होतो मोक‌ळी जागा दिस‌ली की.
त‌रीही, मुंब‌ईत दानापानी बीच होता ज‌रा चांग‌ला गेल्या २ व‌र्षांप‌र्यंत.

अवांत‌र: दानापानी म्ह‌ण‌जे जिथे दिलदोस्तीदोबाराचं शूटींग सुरु आहे तो. मार्वेहून ब‌राच पुढे. त्यांना लाल‌बाग म्ह‌णाय‌ला जातंय काय? लाल‌बाग‌ला त्यात दाख‌व‌ल‌ंय असं हाटेल अस‌तं त‌र लोकांची इत‌की धो धो ग‌र्दी अस‌ती, की मित्रांची ल‌ग्नं, क‌रीअर काऊन्सेलिंग व‌गैरे टुकार ध‌ंदे क‌राय‌ला ज‌न्मात वेळ मिळाला न‌स‌ता त्यांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

सुट्टी घालवण्यासाठी अशी आणखी हटके निवांत गर्दी नसलेली ठिकाणं असतील तर सांगा राव त्याच त्याच नेहमीच्या ठिकाणी आता जाववत नाही. हू म्हणून माणसांची , पोरासोरांची आणि गाड्यांची गर्दी बघितली की मूड जातो सगळा. जी काही पूर्वी दुर्मिळ ठिकाणं होती तिथे पण आता प्रचंड गर्दी वाढलीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्यांना गर्दी नकोय असे लोक जाहीर स्थळावर का टाकतील नावं शांत जागांची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हा वाद घालायचा विषय नसून genuine प्रश्न आहे विचारलेला आणि नसलेल्या विषयात वाद उकरून काढण्यात काही अर्थ नाही त्यामुळे थांबतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राहाण्याचं नाही परंतू एक दिवसात जाऊन येण्यासाठी दोन ठिकाणं देऊ शकतो.
१) नेहरोली डॅम: आसनगाव स्टे पासून १२ किमि
२) जांभिवली डॅम: पनवेल-कोन-सावळा-रसायनि-कराडे-जांभिवली ( रिलाइन्स कंपनीच्या अगोदरचा डोंगराजवळ . पनवेल-जांभिवली २६ किमि)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0