प्रोफाईल.. समूहावर वावरणारी एक अमानवि गुढ व्यक्ति....एक कथा

प्रोफाईल.. समूहावर वावरणारी एक अमानवि गुढ व्यक्ति....एक कथा
......................................................
हजारोची सदस्य संख्या ओलांडणारा तो एक फेसबुका वरील समुह ..
त्यावर धनंजय जोशी हा एक सदस्य..
समुहावर अनेक वेळा मीट्स..संमेलने..मिसळ पार्ट्या आदी चालत असायच्या..
सदस्य एक मेकास काहि प्रमणात भेटले पण होते..
मात्र धनंजय..ज्याला डी.जे या नावाने ओळखले जायचे.. तो सा-या चर्चा भेटी गठी पासून दूर असायचा..
समूहावर अनेक विषयावर चर्चा चालत असत त्यात पण त्याचा फारसा सहभाग नसे.
खरा म्हणजे त्याला प्रत्यक्ष पाहिलेले कुणी नव्हते.. ना कधी त्याने कुणाशी च्याट केल्याचे आढळले होते
प्रोफाइल फोटो पण कृष्ण धवल रंगातला त्याने लावला होता..
बहुतेक त्याच्या तारुण्यातला तो फोटो असावा..
मात्र कुणाच्या वाढदिवसाची पोस्ट असली की त्यावर तो लिहितं असे..
ते मात्र तो नियमाने करत असे.
मात्र समूहात त्याची ओळख पोस्ट कर्ता अशीच होती..
रोज नित्य नेमाने तो २-३ पोस्ट्स पोस्ट करत असे..
कधी कविता..कधी कथा..कशी फोटो..कधी चर्चा विषय..तर कधी मुक्तक..
एक ना अनेक प्रकारच्या नव नव्या पोस्ट तो टाकत असे..
पोस्टस वर लाईकस व कॉमेंट्सचा पाऊस असे तर काहो पोस्ट्स्स वर मोजकेच कोमेंट्स असायचे..
पोस्ट टाकल्यावर तो पोस्ट कडे फिरकत नसे...
काही वेळा त्याला जरी प्रश्न विचारल्याचे प्रसंग आले तरी तो त्यावर मौन बाळगत असे.
**
विक्रम वर्तक उर्फ व्हिकि हा एक तरुण सदस्य समूहावर होता..
तो डी.जे च्या पोस्ट्स चा फ्यान होता..
पोस्ट वर त्याचे हमखास लाईक्स व काही वेळा कॉमेंट्स पण असायचे..
व्हिकि ला त्या प्रोफाइल ला जाणून घेण्याची उत्सुकता होती..
एक दोन वेळा तो डी.जे च्या भिंतीवर पण गेला होता पण डी जे ची प्रोफाइल लिंक क्लिकुन पण तो प्रोफाइल चे पान उघडू शकला नाही..
आपल्या आवडत्या प्रोफाइल ला भेटावे..गप्पा माराव्यात असे त्याला कायम वाटे.
**
त्या दिवशी डी.जे ने एक हटके गूढ अशी कविता पोस्टली होती..
व्हिकी ति वाचत होता शब्द रचना आशय सारेच गूढ होते..त्याला कविता आवडली त्या लाइक मारला...व ठरवले डी,जे ला भेटायचेच..
*
तो डी.जे च्या प्रोफाइल वर क्लिकला..
आश्चर्य म्हणजे लिंक उघडली..
तो प्रोफाइल चेक करत होता..
पण त्यावर त्याला फारसे काही आढळले नाही..बहुतेक डी.जे प्रोफाइल वर फारसा फिरकत नसावा याचा त्याला अंदाज आला..
भिंतिवर पण फार काहीसे नव्हते..
एक फुलाचा फोटो होता..एक सुविचार..
तो त्याच्या मित्र यादीत गेला..मोजून ६-७ मित्र त्याला दिसले..
फोटो मध्ये पण त्याचा प्रोफाइल फोटो त्याला दिसला..
मित्र यादीत त्याला "शाम पोंक्षे" नाव आढळले..
क्लिकुन तो शाम च्या अकाउंट वर गेला अन मेसेज बॉक्स मध्ये मेसेज लिहिला.
*
या गोष्टीला १५-२० दिवस झालेले होते
रविवारचा दिवस होता आरामाचा दिवस..
८ वाजून गेले होते तरी व्हिकी अंथरुणावर लोळत होता..
फोन वाजला..त्याने हात लांब करून फोन घेतला..
हॅलो..मी शाम पोंक्षे बोलत आहे..
शाम पोंक्षे नाव ऐकताच व्हिकी ताडकन उठला..
काका मी विक्रम वर्तक बोलत आहे..
विक्रम वर्तक....काही संदर्भ लागत नाही...शाम.
काका मी आपले मित्र धनंजय जोशी यांच्या फेसबुक अकाउंट वर गेलो होतो..आपण त्यांचे मित्र ना???
धनंजय जोशी..अंअं हा आठवले..अरे मी फेसबुकवर फारसा येत नसतो..धनंजय माझा फेसबुक मित्र आहे पण आता त्याला ५-६ वर्षे झाली असतील..मी सद्ध्या अमेरिकेत मुलाकडे असतो..
काका तुम्हि त्यांना भेटला आहात का?.व्हिकी
हो म्हणजे ६ वर्षापूर्वी एका फंक्शन ला आम्हाला जायचे होते..त्या वेळी त्याचा फोन आला की त्याची गाडी सर्व्हिसिंग लागेली आहे..व विनंती केली त्याने त्याला पिक अप करण्यासाठी...मी रिक्षा खाली थांबवून त्याला फोन केला तर त्याने धरी येण्याचा आग्रह केला मी त्याच्या घरी पण गेलेलो आहे..शाम
काका तुम्ही मला घराचा पत्ता देऊ शकाल का?
का? कशाला?
आमच्या समूहावर ते खुप छान लिहितं असतात..त्या मुळे त्यांना भेटायचे आहे..गप्पा मारायच्या आहेत..बघायचे आहे..
ओके
पत्ता.... प्रभात रोड ला तो राहतो म्हणजे रहात होता..आताचे माहीत नाही कारण गेल्या ५-६ वर्षात आमची गाठ भेट नाही....तिसरी की चवथी गल्ली..कांचन मृग सोसायटी .. फ्ल्याट नंबर ३०२
ओके धन्यवाद काका..अन भेटल्यावर आपला फोन नंबर पण देतो.
चालेल..
धन्यवाद काका
*
९ वाजेपर्यंत व्हिकी तयार झाला व मोटर सायकल वरुन प्रभात रोड च्या दिशेने निघाला..
ह्याला विचार त्याला विचार असे करत तो "कांचन मृग" सोसायटी मध्ये पोहोचला.
सोसायटी तशी जुनीच दिसत होती..
४ मजली बिल्डिंग..
त्याने सोसायटीच्या बोर्डावर नावे पाहिली..फ्ल्याट नंबर ३०२..धनंजय दत्तात्रेय जोशी..
जीने चढून तो ३०२ फ्ल्याट वर पोहोचला.दारावर धनंजय दत्तात्रेय जोशी. पाटी लागलेली होतो.. मात्र दाराला कुलूप लावलेले होते..
तो समोरच्या फ्याट मध्ये गेला...राजाराम गोपीनाथ कुलकर्णी..व त्याने डोअर बेल वाजवली..
थोड्याच वेळात एक वयस्कर माणूस बाहेर आला.
नमस्कार काका..मी विक्रांत वर्तक..धनंजय काकांचा मित्र..
राजाभाऊ नी दीर्घ श्वास घेतला व दार पूर्णं उघडले व त्याला बसण्याची खूण केली..
आपण कोण?? धनंजय चे नातेवाईक? राजाभाऊ म्हणाले...नाही काका मी मित्र..
आमच्या फेसबुकवरच एका समूहात ते असतात..छान पोस्ट्स लिहितं असतात..त्या मुळे त्यांना भेटायची बघायची उत्सुकता आहे...
राजाभाऊ बराच वेळ त्याच्या कडे बघत होते व म्हणाले अरे धनंजयाला जाऊन आता पाच साडेपाच वर्षे झाली असावीत..
तो आता या जगात नाही...
हे ऐकताच व्हिकीला घाम फुटला..
पण समोर फ्ल्याट वर त्यांचे नाव?/दाराला कुलूप???
त्याला एकुलती एक मुलगी आहे ति लंडन ला स्थायिक असते..२-३ वर्षातून ति फ्यामिली भारतात येते व इथेच फ्याटवर रहातात..किल्ली माझ्याकडेच असते..मी सोसायटी बिले पाणी आदीच्या बिलांचे बघतो..राजाभाऊ म्हणाले..
व्हिकि चक्रावून गेला होता..त्याने मोबाईल काढला व डी.जे चा प्रोफाइल फोटो दाखवत विचारले..काका तुम्ही यांच्या बद्दलच बोलता आहात ना??
फोटो पाहत राजाभाऊ म्हणाले हो हाच धनंजय आहे...
धन्यवाद काका..माफ करा तुम्हाला त्रास दिला..
अरे ओके त्यात त्रास कसला?
*
व्हिकी जीना उतरून खाली आला..मो सायकल जवळ थांबून तोविचार करत होता सा-या घटनांचा.
डी के चे ५ वर्षापूर्वी झालेले निधन त्याचा समूहावर वावर..त्या कथा..सारेच अत्यर्क..आकलनाच्या बाहेर होते...
निघणार तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला..त्याने पाहिले अन नॉन नंबर वरूण फोन होता..त्याने तो घेतला...
हाय व्हिकी...
कोण?
मी डी जे बोलत आहे..,,डी जे च नाव ऐकल्यावर तो उडालाच..काका तुम्ही तर...
हो बरोबर आहे..मी आता निराळ्या दुनियेत आहे मित्रा..
मला बंधन नाही..तू माझ्या घरी मला भेटण्यासाठी आलेला आहे हे मला माहीत आहे..पण आपली भेट होणे नाही...
माझे वय काय..जीवनं शैली काय याचा शोध घेणे थांबव..कारण त्यांतून काहीच निष्पन्न होणार नाही..
माझ्या कथा कविता लेख वाचत जा..
त्यांतून तुझ्या मनात माझे जे व्यक्तिमत्त्व उभे राहिलं त्यालाच खरे मान..
माझा हा पहिला व शेवटचा फोन आहे..आनंदात जीवन जग..
फोन कट झाला..
*
व्हिकी घरी आला डोके जड झाल्यागत वाटत होते..पण डी के च्या फोन ने सारे ताण तणाव दूर झाले..
तो मस्त पैकी जेवला व ताणून दिली त्याने..
संध्याकाळ झाली होती व्हिकी जागा झाल..
कट्ट्यावर मित्र वाट पाहतं असणार..तिकडे जायला हवे
तो फ्रेश झाला..व निघाला...
जाता जाता त्याने फेसबुक उघडले..ब-याच पोस्ट्स समूहावर पडल्या होत्या..
त्यात एक डी जे पण होती..
त्याने पाहिले पोस्ट ला ६-७ लाईक्स पडले होते..
तो पोस्ट वाचू लागला..
ती एक कविता होती.. मुक्त छंदातली
*
तुमचे स्वागत आहे....
खरच, वय काय असते?
एक नंबर, १८-२०-४० वर्षे..
मग त्यावरुन ठरते
सज्ञान कि अज्ञान
मतदान केंव्हा करायचे.
लग्नास वय योग्य कि अयोग्य?
मरायच वय किति....
वेळ..एक भ्रम
आमच्या कडे बघा..
आम्हाला कुठलेच नियम लागु नाहित...
बंधन नाहि आम्हाला, वय, वेळ, काळाचे...
आम्हि मुक्त आहोत..
या आमच्या दुनियेत...
तुमचे स्वागत आहे....
अरे घाबरलात...???हा हा हा...
[घाबरुन काय होणार??? आज ना उद्या यावेच लागेल]
*
व्हिकी ला हसू आले त्याला माहीत होते ती कविता डी जे नी त्याच्या साठीच लिहिली होती

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पालींची बदनामी थांबवा!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

ह्यांना काय झालंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

पाल

क्यूट पाल.

(चित्र जालावरून साभार.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

पालीचे डिन‌र (लंच‌ ही असेल‌ ) चालू अस‌ताना फोटो क्लीक‌लेला दिस्तोय‌ .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रात्रीस खेळ चाले - या गूढ चांदण्याचा |
संपेल ना कधीही - हा खेळ सावल्यांचा ||

पालीच्या प्रशंसेबद्दल हार्दिक आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

ट्यूब‌लाईट डिन‌र‌ - हाउ रोम्याण्टिक‌!!!!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण एकट्यानेच! Sad

(किडा जमेस धरलेला नाही. वन डझण्ट काउण्ट वन्'स फूड अॅज़ वन्'स कंपनी, लेट अलोन अॅज़ वन्'स कन्सॉर्ट.)

(आता या पालीसाठी साथीदार शोधणे आले!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

(बोले तो, आतापर्यंत चाललेले सवांतर किंवा किंचितच अवांतर होते अशा थाटात...)

पालींसाठी डेटिंग साइट्स, झालेच तर वधूवरसू़चकमंडळ, या बिझनेस आयडियाज़ म्हणून वाईट नाहीत. शिवाय (व्हॅलेण्टाइन्स डेकरिता) पालीच्या आकारातील चॉकोलेटे (तोंडात किडा धरलेल्या पोज़मध्ये बनवावी किंवा कसे, यावर गहन विचार चालू आहे. पण नको, दॅट वुट बी जस्ट अ नॉव्हेल्टी, नॉट नेसेसरिली रोमँटिक.), झालेच तर (चॉकोलेट कोटेड रेझिन्सच्या धर्तीवर) चॉकोलेट कोटेड किडे... कल्पना पुष्कळ आहेत, पण योजकस्तत्र दुर्लभ:|

एनी टेकर्स?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

न‌कादुचेण्याप‌कासके काढा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोले तो, पालीचे केस दाखवून द्या (वानगीदाखल केसाळ पालीची एखादी तरी केस वगैरे), म्हणजे मग फीज़िबिलिटी, व्हायेबिलिटी नि प्रॉफिटेबिलिटी वगैरेंचा विचार करून दुकान उघडण्या-न उघडण्याबद्दल ठरवता येईल.

अवांतर: यावरून आठवले. काहीसे अश्लील आहे, सबब पांढऱ्या ठशातील भाग - वाचायचाच असल्यास - स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा, ही आगाऊ नम्र विनंती. आम्ही वसतिगृहात असताना, वसतिगृहातील उत्तरेकडील - खास करून दिल्लीच्या बाजूची - मुले एकमेकांस "छिपकली की झाँ* के पसीने" अशी शिवी देत, त्याची आठवण झाली. (पंजाब्यांच्या या क्षेत्रातील कल्पकतेची दाद दिलीच पाहिजे!)

नाही म्हणजे, त्याही दृष्टिकोनातून विचार करता येईल, परंतु मग ती अंमळ पर्सनलाइज़्ड सर्व्हिस ठरेल; सामान्य केशकर्तनालयांच्या कार्यक्षेत्रात ते मोडणार नाही. अशा अतिव्यक्तिगत सेवांच्या धंद्याची गणिते अंमळ वेगळी असावीत, ज्यात आम्हांस काहीही अनुभव नाही. सबब, यातील शिवजन्माची जबाबदारी शेजारच्याच्या घरावर सोडून आम्ही अतिशय विनम्रपणे या क्षेत्रातून काढता पाय घेत आहोत. क्षमस्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

ल‌घुउद्योगाच्या क‌ल्प‌ना चांग‌ल्या आहेत‌.

उद्योग‌ भार‌तात‌ क‌र‌णार‌ की फॉरीनात‌?
स‌ध्या "मेक‌ इन इंडिया " चे वारे वाह‌ताहेत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रात्रीस खेळ चाले - या गूढ चांदण्याचा |
संपेल ना कधीही - हा खेळ सावल्यांचा ||

बोले तो, भारतात बनवून घेणे स्वस्तात पडेल. लेबर कॉष्ट कमी ते तर आहेच, शिवाय कच्चा मालही मुबलक. (चॉकलेटात घालण्यासाठी किडे वगैरे...)

पण सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बऱ्यापैकी मोठे मार्केट तिथल्यातिथेच असल्याकारणाने, (तत्त्वत: 'इंपोर्टेड' म्हणता आले नाही, तरी 'फॉरीन ब्रांडेड' म्हणून) तिथल्या तिथेच विकता येईल. (हं, आता त्यात भारताला फॉरीन एक्सचेंज मिळणार नाही म्हणा, विच प्रॉबेबली डिफीट्स द पर्पज़ ऑफ 'मेक इन इंडिया', पण आपल्याला काय त्याचे?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

हाय‌ फाय‌ न‌कादु काढा हो... स‌लोन‌ का काय‌ म्ह‌ण‌तात‌ ते....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्यूब‌लाईट डिन‌र‌
BiggrinBiggrin

( पालीच्या बॉय‌फ्रेन्ड‌ला काय‌ म्ह‌ण‌तात ? पाला? )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रात्रीस खेळ चाले - या गूढ चांदण्याचा |
संपेल ना कधीही - हा खेळ सावल्यांचा ||

पालेक‌र‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

पालीची नख‌ं अजून‌ वाढ‌लीत‌..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दॅट गिव्ज़ मी अनदर आयडिया!

पालींकरिता नेलपॉलिशचा धंदा काढायला पाहिजे. जोरात चालेल.

(पुढे पालींकरिता लिपस्टिक बनवण्यातसुद्धा बिज़नेस एक्सपॅन्शन करता येईल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

"पाल‌"क‌ झालात एक‌द‌म‌!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जस्ट अ वॉनाबी बिज़नेसमन.

-.(नोकरी करणारा) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

कुत्र्यामांज‌रांचे स्पा अस‌तात‌.. पालींचे प‌ण‌ असाय‌ला ह‌वेत‌.. न‌ख‌ं त‌री कापून‌ मिळ‌तील‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बादवे, पालींसाठी लिपस्टिकच्या कोणत्या शेड्स छान दिसतील? यलो ऑकर? लेमन यलो? बर्न्ट सिएना? 'मेरा वाला क्रीम!!!!!', ?

अवांतर: पालींच्या पार्लरास 'पाल्लर' म्हणता यावे काय?
..........
हे म्हणत असताना पालीने डोळ्यांची पिटपिटपिटपिट केल्यास ती अधिकच मोहक दिसेल, असा अंदाज आहे.
संदर्भ: https://youtu.be/ADGGsoPuDKw (लेट १९८०'ज़मधली - बोले तो 'आमच्या जमान्या'तली - दूरदर्शनवरील एक जाहिरात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

अक्का - ह‌ल्ली न‌खं वाढ‌विण्याची फॅश‌न‌ आहे ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रात्रीस खेळ चाले - या गूढ चांदण्याचा |
संपेल ना कधीही - हा खेळ सावल्यांचा ||

होय हो म‌न्शा ताई, प‌ण‌ पालींची अजून‌ पाह्य‌ली न‌व्ह‌ती फ्याश‌न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अकु क‌थेत‌ली व्य‌क्ती, मेल्याव‌र पाल‌ झाली होती का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'राम' हवा म्हणून 'त्यांना' बडवतो,काम हवे म्हणून 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे हो दास, आम्हाला बडवे होण्यातच रस|

व्यक्ती 'अमानवि' आहे, असे शीर्षकातच स्पष्ट केलेले आहे. मग तो पाल का असू नये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

म‌राठी आंत‌र‌जालाव‌र‌ देखिल‌ काही गूढ व्य‌क्ती ह‌ल‌के ह‌ल‌के वाव‌र‌त‌ अस‌तात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रात्रीस खेळ चाले - या गूढ चांदण्याचा |
संपेल ना कधीही - हा खेळ सावल्यांचा ||

स‌ध्या ऐसीव‌रील‌ गुढ‌ व्य‌क्ति अनु राव आहेत‌, शेजारील‌ धाग्यात‌ शोध‌काम‌ चालू आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1