येईल आता मृदगंध

येईल आता मृदगंध..

तापलेली ही धरती ।
नजर लावे वरती ।।
बरसेल तो धुंद ।
येईल आता मृदगंध ।।१।।

आठवणी ह्या चित्ती ।
वारा वाहे भोवती ।।
होईल कसा मंद ।
येईल आता मृदगंध ।।२।।

व्याकुळलेली ती पोरटी ।
वाट पाहे गोरटी ।।
जुळतील पुन्हा बंध ।
येईल आता मृदगंध ।।३।।

प्रित ही चोरटी ।
ओढ लागे घरटी ।।
मिळतील जाता अंग ।
येईल आता मृदगंध ।।४।।

―₹!हुल

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

व्याकुळ‌लेली पोर‌टी,
वाट पाहे गोर‌टी

आणि काय, 'ज्ञान‌पीठ'क‌डे न‌ज‌र तुम‌ची चोर‌टी?
नाय, तुम‌ची त‌र

प्रित ही चोरटी

प‌ण म‌ग

ओढ लागे घरटी

का ब‌रं? घ‌रीच असेल ती प्रित अस‌णारी व्य‌क्ती त‌र चोर‌टी क‌शी काय? न‌सेल, त‌र तुम‌च्या चोर‌ट्या 'प्रित'धारी व्य‌क्तीला सांगित‌लं पाय‌जे की ह्यांची ख‌री ओढ घ‌र‌टी आहे, सांभाळून ब‌रंका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

What is history but a fable agreed upon