इंग्र‌जी शिनेमांच्या थिमा

मंजे इंग्र‌जी शिनेमांच्या थिमांचे म‌ला अलिक‌डे माझे कौतुक शिगेस पोच‌ले आहे.
आता एक थीम घ्या - ज‌ग‌बुडी.
कोण‌त्याही हिंदी सिनेमात‌ ज‌ग‌बुडी (हिरोच्या स्व‌प्नात देखिल) झाल्याचे म‌ला आठ‌व‌त नाही. मात्र‌ इंग्र‌जी सिनेमात ब‌ऱ्याच्दा ज‌ग‌बूडीचा धोका असाय‌ची संभाव‌ना अस‌ते. ज‌न‌र‌ली ज‌ग‌बुडीची ठीण‌गी अमेरिकेतच प‌ड‌ते. ती ही इस्ट कोस्टव‌र. न्यू यॉर्क प्रेफ‌र्ड. मॅन‌हॅट‌न अजून‌च‌ शोभ‌तं.
इंग्र‌जी सिनेमांचा प‌रिच‌य होताना प्रारंभी माझी अपेक्षा असाय‌ची कि ज‌ग‌बुडी हि ट‌ळ‌लीच पाहिजे. काहीत‌री मूर्खासार‌खी गाव‌ठी अपेक्षा! म‌ग‌ ल‌क्षात आलं कि ब‌रेच उप‌प्र‌कार आहेत -
१. प्रेक्ष‌कांनी ज‌ग‌बुडी ट‌ळ‌णार आहे असे गृहित ध‌रून ब‌घाय‌चे शिनेमे - बेसिक‌ली या सिनेमांत हिरो न‌क्की काय युक्ति क‌रून ज‌ग‌ वाच‌व‌तो हे म‌ह‌त्त्वाचं अस‌तं. उगाच‌ हिरोनी पिच्च‌र‌भ‌र आटापिटा क‌राय‌चा नि शेव‌टी पृथ्वी न‌ष्ट होणार‌ अस‌ला प्र‌कार चाल‌णार नाही.
२. ज‌ग‌बुडीनंत‌र‌चे सिनेमे - यात पृथ्वी, म‌नुष्य‌ जात, देश , युनो या गोष्टी मंजे त‌द्द‌न भिकार. त्यांची फार त‌र फार औकात मंजे ते क‌से ख‌प‌ले याचा कोण‌ता उल्लेख पात्रांनी क‌र‌णे. यात‌ही एक उप‌प्र‌कार मंजे एनारायांच्या सात‌व्या पिढीला भार‌त‌ कुठे, का , क‌सा अस‌तो ते माहित न‌स‌ते त‌से सिनेमांतील म‌नुष्यांचा आणि पृथ्वीचा किंवा आज‌च्या ज‌मानाच्या कोण‌त्याच‌ गोष्टीचा संबंध न‌स‌णे.
३. आता ज‌ग‌बुडी आणि उत्क्रांती या थीम्स‌चा ओव‌रलॅप होईल, प‌ण "मूल‌त्: न‌ष्ट झालेल्या पृथ्वीव‌र‌चे, प‌ण उत्क्रांती झालेले" म‌नुष्य‌ हिरो अस‌लेले सिनेमे.
४. म‌नुष्य‌जातीचा विनाश‌च‌ क‌रावा असं काही आहे का? त्यामुळे मान‌वांची साव‌र‌क‌री गाय क‌रू इच्छिणारे प‌र‌ग्र‌ह‌वासी आणि ज‌ग‌बुडी अशी थीम.
५. पृथ्वीचा विनाश पाहून बोर झालात्? दुस‌रे ग्र‌ह अक्ष‌र‌श: फोडून काढू!!!
६. पृथ्वीचा विनाश अल‌रेडि झालाय हे माहित न‌स‌लेले तुम्ही एक‌टेच मूर्ख आहात प्रेक्ष‌क‌साहेब!

त‌र मंड‌ळी ही एक थीम झाली. मी काही थीम्स‌ सुच‌व‌तो, तुम्ही सुच‌वा, उदाह‌र‌णे द्या, त्यात‌ली म‌ज्जा किंवा वैताग किंवा भाब‌डा र‌स‌ एंजॉय क‌रा.
१. अमेरिक‌न प्रेसिडेंट अॅज चिफ ह्यूम‌न निगोशिएट‌र
२. अमेरिक‌न प्रेसिडेंट इन डेंज‌र
३. राशाचे अमेरिकेविरुद्ध कुटिल कार‌स्थान
४. हिरोला, इ आग‌ळि वेग‌ळि श‌क्ती प्राप्त होणे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अजून‌ एक‌ म्ह‌ण‌जे - हे अमेरिक‌न‌ ज‌गात‌ कुठेही क‌सेही जाऊन विध्व‌ंस‌ क‌रू श‌क‌तात‌. ज‌स‌ं काही पिताश्रींच‌ंच‌ घ‌र‌.
आणि डाय‌रेक्ट‌ ताज‌म‌हाल‌च‌ फोडतील‌, आय‌फेल‌ टाव‌राव‌र‌ जाऊन‌ आप‌ला जांग्या वाळ‌त‌ घाल‌तील‌.
उ.दा. जीआय‌जो. क‌सेही कुठेही क‌धीही घुसून‌ मारामारी चालू. किंवा ट्रान्सफॉर्म‌र्स‌. पिरॅमिड‌ च्या आजूबाजूला एक‌द‌म ढिन‌चॅक‌ मारामारी.

एक‌दा म‌ला ब‌घाय‌ला आव‌डेल‌ की अमेरिक‌न‌ सैनिक‌ ल‌ढाय‌ला चाल‌लेत‌ आणि त्या देशाने स‌रळ‌ "न‌ही मांग‌ता है" म्ह‌णून‌ सांगित‌लेलं अस‌ं.
----------------------
दुस‌र‌ं म्ह‌ण‌जे टोक‌न‌ बाईमाणूस‌. गुंफास‌ंशोध‌नापासून‌ ते एलिअन्स‌शी ल‌ढ‌ण्याप‌र्य‌ंत‌ कुठेही कधीही हिरोसाठी म्ह‌णून एक‌ बाईमाणूस‌ रेडी अस‌त‌ं.
म‌ग‌ ती शास्त्र‌द्न‌ अस‌ते किंवा सैनिक‌. आणि मुख्य‌ म्ह‌ण‌जे एलिअन तिच्यापासून‌ ३ फूटाव‌र‌ लाळ‌ गाळ‌त‌ असून‌ही ती म‌र‌त‌ नाही, शेव‌टी हिरोच‌ं थोबाड‌ चुंबाय‌ला मान‌ तिर‌की क‌रून त‌यार‌ अस‌ते. त्यासाठीच‌ तिला २०४९२८ स‌ंकाटातून‌ वाच‌व‌ल‌ं जात‌ं आणि तो टोक‌न‌ काळा माणूस‌ त्यात‌ ब‌ळी प‌ड‌तो. घ्या!
---------------------
साय‌फाय‌ प्र‌कारांत‌ खूप‌च‌ टेंप्लेट्स‌ आहेत‌. टाईम‌ ट्रॅव्ह‌ल‌ प्रायव्हेट‌ लि., एलिअन्स‌ विरूद्ध‌ राज‌ ठाक‌रे, प्रृथ्वीचा विनाश‌ आणि आप‌ण‌, अंत‌राळ‌यानात‌ झोल‌ आणि यात्रेक‌रू कृप‌या ध्यान‌ दे, पर‌ग्र‌हाव‌र‌ कुकुच‌कू, शेडाबुड‌खा न‌स‌लेले अप‌घाती चित्र‌प‌ट - त्यामुळे प्र‌त्येकात‌ खोल‌ घुस‌ण‌ं क‌ठीण. त‌री एक‌ र‌ंज‌क‌ प्र‌कार‌ म्ह‌ण‌जे "शार्क‌नेडो" किंवा ब‌र्डेमिक‌. हे जाणून‌ बुजून‌ बी ग्रेडी चित्र‌प‌ट‌ आहेत जे वाईट अॅक्टिंग‌/डिरेक्श‌न‌/लिखाण‌ इ.इ ब‌न‌व‌ले जातात‌. ग‌र‌जूंनी यूट्यूब‌ प‌हाव‌ं.
-----------------------
हार‌र‌ चित्र‌प‌टांच्या थीमा त‌र‌ आता इत‌क्या घिस्यापिट्या(?) झाल्या आहेत‌ की क‌धी भूत‌ येणारे व‌गैरे ब‌ऱ्यापैकी क‌ळाव‌ं. त्यात‌ली टीन‌ स्क्रीम्स‌ (म‌ट‌ण‌ की दुकान‌ पोर‌गा, सेक्सी पोर‌गी, अभ्यासू मूल‌, साधी मुल‌गी ही ज‌ग‌ते, एक‌ बाव‌ळ‌ट‌/विचित्र‌/आगाऊ मित्र‌) आणि त्यांच‌ं क्र‌माक्र‌माने म‌र‌णं ह्याचं विड‌ंब‌न‌ म्ह‌णून‌ आलेला "केबिन‌ इन द वूड‌स्" ब‌घ‌ण्याजोगा आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याला अप‌वाद एक‌च‌ - अरेबिया. २०१२ पिच्च‌र‌म‌ध्ये आय‌फेल‌, व्हॅटिक‌न‌ इ.इ. स‌र्व उध्व‌स्त होते प‌ण म‌क्का मात्र अनुल्लेखाने मार‌लीय‌. कार‌ण काय त‌र डोस्क्याव‌र फ‌त‌वा नको. शांत‌ताप्रिय लोकांची ख‌प्पाम‌र्जी न‌को.

टोक‌न सिद्दी न मेलेला प्र‌थ‌म पिच्च‌र मी पाहिला तो म्ह‌ण‌जे ब्ल‌ड डाय‌मंड‌. सिद्द्यासाठी टोपीक‌र फिरंगी मेलेला प्र‌थ‌म‌च पाहिला तिथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आफ्रिकेच्या जंग‌लांत ते जे समाज‌कार्य (आणि सोब‌त एखादा कौमार्य‌भंग) क‌र‌तात, स्थानिक‌ लोक‌ त्यांना वाच‌व‌तात‌, इ इ. नैत‌र म‌ग‌ त्यांनी ब‌ळी च‌ढ‌व‌ण्यापूर्वी त्यांची एखादि मोठि स‌म‌स्या सोड‌वून सुट‌का. चार दिव‌सात‌ भाषा शिक‌णे. कंच्या मिश‌न‌मुळे इथे आलो ते आठ‌व‌णे. भावूक पाठ‌व‌णी. ट्राय‌ब‌लांच्या प्र‌था हिरोपेक्षा प्रेक्ष‌कांना विचित्र‌ वाटाव्या म्ह‌णून काक‌लूत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आफ्रिकेच्या जंग‌लांत ते जे समाज‌कार्य (आणि सोब‌त एखादा कौमार्य‌भंग) क‌र‌तात

बाकं वाज‌वून अनुमोद‌न‌, भेंडी काय निरीक्ष‌ण आहे!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

८०' च्या सर्व कॉपपटांना, कुंगफु पटांना, गॉडझिलापटांना, हॅकरपटांना आणि सायन्स फिक्सना कडकडीत सलाम. अत्यंत उत्तम स्पेशल इफेक्टस, ८०च्या वीएचएस चे टेक्श्चर, जबरा प्रासंगिक विनोद आणि खिल्ली!
साक्षात हिटलरला कुंग फु मास्टर, सुपर विलन बनवले आहे त्यामुळे अधिक सांगत नाही. पडद्यावरचं आख्खं ८०चं दशक ३० मिनिटांत उभं करणार्‍या आणि जाता जाता कलात्मक युरोपिअन चित्रपटांचीही मारणारा असा क्रेझी चित्रपट आजवर पाहिला नाही!

https://www.youtube.com/watch?v=bS5P_LAqiVg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा तर मिथुनदाच्या अन् कैक साऊथ चित्रपटांचा खापर पणजोबा दिसला. कोटिकोटि प्रणाम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

प्र‌चंड‌ भारी.... साठ‌व‌णीत ठेवाय‌ला पाहिजे हे पिस...म‌स्त‌ विडंब‌न

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे दोन‌दा प‌हिलं. अनेक‌दा पाह‌ण्यासार‌खं आहे. अस‌ला म‌साला शेअर क‌रित‌ च‌ला म‌स्त‌पैकी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्टैचू ऑफ लिबर्टी तर जणू काय पडायलाच तयार केलाय.
(स्ट्रिट) फाईट पण असते, ते नै का कराटे, मॉर्टल कॉमबॅट, बॉक्सर्स ई ई.
शेवटी मरणार भूत.
हळूहळू चालणाऱ्या झोंब्या.
अफाट प्लानिंग न चोऱ्या करणं, उ. ocean series, इटालियन जॉब, स्वर्डफिश ई ई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

जगबुडी होत असली, म्यानह्याटनात दहा फूट पाणी घुसताना दिसत असलं तरीही फ्रेंच नागरिकांना पासपोर्ट हरवण्याची भीती वाटते. असल्या समाजवादी, कागदी घोड्यांसाठीच मी हाँलिवुडी सिनेमे बघते. तुम्हीपण 'डे आफ्टर टुमाॅरो' बराच. फ्रेंच बाई पासपोर्टासाठी हवालदिल होणं, हाच चित्रपटाचा मुख्य बिंदू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पासपोर्टावर अजून एक झ्याक चित्रपट म्हणजे द टर्मिनल. टॉम हँक्स न लै भारी अभिनय केलाय त्याच्यात. त्यो कास्ट अवे वाला नायक. ह्या दोन्ही चित्रपटाची खूपदा रिविजन केलाव. आवर्जून बघाव अस्सेचेत ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

ज‌ग‌बुडी हा श‌ब्द‌ बाजूला ठेव‌ला त‌र दुस‌री थीम क्लाय‌मेट‌ चेंज. क्लाय‌मेट चेंज अमेरिकेत इत‌का प्र‌ब‌ल‌ अस‌तो की त्याचा प‌रिणाम एक आठ‌व‌डा किंवा एक म‌हिना इतक्या वेळात स‌ग‌ळा ब‌ट्ट्याबोळ‌ क‌र‌ण्यात होतो. क्लाय‌मेट‌ चेंज‌साठी मान‌वाने केलेल्या हानिचे विप‌रित प‌रिणाम अंत‌राळात सुदूर आणि पृथ्व्वीच्या पोटात‌ल्या लाव्हाव‌र देखिल होतात. मंजे हिरो आन हिरोईन एकाच‌ मॉल‌म‌धे एकाच‌ स्टोर‌म‌धे एकाच‌ कॉरिडॉर‌म‌धे दोन वेग‌वेग‌ळ्या रॅक‌म‌धे शॉपिंग‌ क‌र‌त‌ अस‌ताना त्यांच्याम‌धून पृथ्वीला त‌डा जातो मंजे काय क‌माल!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हिरो आन हिरोईन एकाच‌ मॉल‌म‌धे एकाच‌ स्टोर‌म‌धे एकाच‌ कॉरिडॉर‌म‌धे दोन वेग‌वेग‌ळ्या रॅक‌म‌धे शॉपिंग‌ क‌र‌त‌ अस‌ताना त्यांच्याम‌धून पृथ्वीला त‌डा जातो मंजे काय क‌माल!!

अहो अजो, इतकंच नाही हो.. नायकाची पत्नी आणि मूल त्याच्यापासून घटस्फोटित असण्याची सक्ती असते. पण तो जगबुडीप्रसंगी त्यांनाच वाचवायला जातो. आणि अगदी तो त्यांना घेऊन विमानाने टेकऑफ करत असताना एक एक इंच मागे रनवे दुभंगत जातो.

आहात कुठे? व्हेअर आर यू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, ज‌णू काय‌ ज्वालामुखी हिरोच्या मागे लाग‌लाय कि असं शेव‌ट‌प‌र्यंत वाट‌त राह‌तं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तो 'डे आफ्टर टुमॉरो' तसलाच आहे. क्लायमेंट चेंज, जगबुडी, दोन दिवसांत संपूर्ण कर्कवृत्ताच्या उत्तरेचा सगळा भाग गोठवला, काय न‌ काय. हे सगळं कशासाठी? तर फ्रेंच लोकांना पासपोर्ट हरवण्याची फार भीती वाटते, हे दाखवण्यासाठी! एवढा समाजवाद-विरोधी-कांगावा आणि प्रलयघंटावाद दाखवणारे लोक गब्बरच्या पार्टीतलेच असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>मी काही थीम्स सुचवतो, तुम्ही सुचवा, उदाहरणे द्या,>>
दिलेले थीमचे पिच्चर येऊन गेलेतच॥

बुडीच्या निमित्ताने शेवटच्या मिठ्या मारताना दाखवता येतात. हिंदिवाले गाण्यांवर भागवतात.म्हाताय्रा हिरोला प्रेक्षकांच्या दृष्टिसुखाकरता कमी पैशात घेतलेल्या नवीन तरुण हिरवानीला मिठ्या मारण्यात काही इंट्रस्ट नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी ती अॅलेक्झान्डर काळातली ढाल वापरण्याची हौस भारी क्याप्टनला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदी शिनेमे ब‌घून हिन्दी सुधार‌ते त‌से इंग्र‌जी शिनेमाबाब‌त होत नाही असा अनुभ‌व्. त्यामुळे झेप‌तील तित‌केच इंग्र‌जी पिच्च‌र ब‌घित‌लेत.
त्याव‌रून क‌थान‌कात न‌व्हे, त‌र वाप‌र‌लेले त‌ंत्र‌ आणि क्लाय‌मॅक्सात य‌शाप‌य‌श द‌ड‌लेले अस‌ते असे म‌त झाले आहे. युद्ध थीम‌वाले रुचीपाल‌ट म्ह‌णून ब‌रे वाट‌तात. क‌थेपेक्षा क्षुल्ल‌क घ‌ट‌ना र‌ंग‌व‌त नेऊन मान‌वी स्व‌भावाचा प‌ट उल‌ग‌ड‌णारे (ब‌रोब‌रे का?) चित्र‌प‌ट आव‌ड‌तात. त्याबाब‌त र‌श्य‌न किंवा युरोपीय शिनेमे स‌र‌स वाट‌तात. स‌ग‌ळे ड‌ब किंवा सुब‌टाय‌ट‌ल वाले अस‌ल्याने फ‌र‌क प‌ड‌त नाही. म्ह‌णून इंग्र‌जी न‌ म्ह‌ण‌ता स‌र‌स‌क‌ट बोल्लो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅक‌र्स लोक ही अजून एक थीम. अझीम ब‌नाट‌वालाचा हा व्हिडीओ प‌हा.
त्यांच्या स‌मोर अस‌लेली कुठ‌लीही सिस्टीम त्यांनी क‌धीच वाप‌रलेली न‌स‌ते, आणि ते साधारण १५ मिन्टात हॅक क‌रून मोक‌ळे होतात. "I taught myself code" हे अजून एक लेम‌प‌णा.

वेस्ट‌र्न काऊबॉय फिल्म्स- कित्तीही त‌ग‌डा, द‌ण‌क‌ट, भ‌र‌पूर ह‌स्त‌क अस‌लेला ख‌ल‌नाय‌क अस‌ला त‌री शेव‌टी फेसऑफ म‌ध्ये नाय‌कच काय‌तरी लाईट‌स्पीड‌ने पिस्तूल काढून गोळी झाड‌तो. एक किंवा दोन नाय‌क साधार‌ण ५० लोकांना स‌टास‌ट गोळ्या घाल‌तात आणि ह्यांना साधार‌ण ० ते १ गोळी लाग‌ते. हे ब‌व्हांशी स‌ग‌ळ्याच फिल्मात.

बॉंड‌छापचित्र‌प‌ट (बोर्न, रीच‌र, मिश‌नइम्पॉ इ.)- अक्ष‌र‌श: काहीही होवो. हीरोला ह‌ग्यामार ब‌स‌ला त‌री तो जिव‌ंत. एक दोन प‌ट्ट्या इथे तिथे बांधून प‌रत तेव्ह‌ढेच स्ट‌ंट क‌राय‌ला मोक‌ळा. टॉर्च‌र कित्तीकित्तीही केलं त‌री तो जिव‌ंत.

सुप‌रहीरो मूव्हीज्- व्हिल‌न काय‌त्त‌री अफाट अफाट प्र‌च‌ंड ताक‌द‌वान अस‌ला त‌री स‌ग‌ळे किंवा आप‌ला एक‌टा सुप‌रहीरो त्याला ह‌ग्याद‌म देणार. नंत‌र आफ्ट‌रक्रेडीट्स म‌ध्ये तो किंवा त्याचं पिल्लू प‌र‌त ब‌द‌लेकी आग में.

अजून एक: पोक‌र- हिरो एक‌द‌म ह‌राय‌ला येणार, आणि कायत्त‌री ०.०१% संभाव्य‌ता अस‌लेला डाव त्याला मिळ‌णार. स्ट्रेट फ्ल‌श वि. रॉय‌ल फ्ल‌श, किंवा रॉय‌ल फ्ल‌श म‌ध्येही हाय कार्ड‌स वाला. आणि तो जिंक‌णार. व्हील‌न‌ही तित्काच हुश्शार असून तो फोल्ड न क‌र‌ता ऑल इन क‌र‌णार हे ओघानं आल‌ंच.

संपाद‌न: बुद्धिब‌ळ: उगीच फार अक्क‌ल व‌गैरे कामांशी संबंध न‌स‌लेले हिरो तोंडी बुद्धिब‌ळ खेळ‌णार. ब्लाईंड‌फोल्ड खेळून दाख‌वा म्ह‌णावं एक‌दा.
सुटांव‌र‌ची च‌र्चा पाहिली. सूट घालून हे लोक तो फ‌ड‌फ‌ड‌त ठेवून अफाट प‌ळ‌तात. झोंबाझोंबी, मारामाऱ्या क‌र‌तात. ज‌म‌तं क‌सं तिच्याय‌ला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

हॅक‌र्स‌/हिरो कोड‌ लिहिण्यात इत‌के ज‌ब‌र‌द‌स्त‌ं आणि फास्ट अस‌तात‌ की त्यांच्याक‌डून क‌धीच‌ चूक‌ होत नाही. क‌ळ‌फ‌ल‌काव‌र‌ची बॅक‌स्पेस‌ किंवा डिलिट‌ की ह्यांच्यासाठी अस्तित्वात‌च‌ न‌स‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

तो टाय‌पिंग स्पीड प‌ण काय म्ह‌णावा!
ह्यांचे ओळींच्या शेवट‌चे अर्ध‌विराम न दिल्याने होणाऱ्या चुका क‌ध्धीक‌ध्धी म्ह‌णून होत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

"हॅक‌रिंग‌" ब‌द्द‌ल आप‌ले बॉलीवुडी लोक्स‌ही काही मागे नाहीत‌.

एका पिच्च‌र‌म‌ध्ये आय‌पीकॉन्फिग क‌मेंट‌चे ब्र‌ह्मास्त्र वाप‌रून हॅकिंग केले होते.

साउथ‌च्या एका पिच्च‌र‌म‌ध्ये त‌र याव‌र‌ही क‌डी क‌र‌त‌ विंडोज मीडिया प्लेय‌र‌म‌ध्ये प्रोग्रॅमिंग केलेले दाख‌व‌लेय‌. म्ह‌ण‌जे हीरो तिथे एक‌द‌म व्हाय‌ सो सीरिय‌स‌ चेह‌ऱ्याने कळ‌फ‌ल‌काव‌र बोटांचा भांग‌डा क‌र‌तोय त‌र कोप‌ऱ्यात मीडिया प्लेय‌र‌ स्किन आणि क्लोज‌वाली आय‌कॉन दिस‌ते.

https://www.youtube.com/watch?v=xUyRWVlwTSg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यांच्या हॅकिंगच्या सॉफ्टवेअरचे GUI लै भारी असतात. कवटी बोलतेय, "पासवर्ड क्रॅक्ड" वगैरे पॉपअप्स येताहेत इ.इ.

शिवाय लहान मुलं या हॅकिंगमधे सर्वाधिक एक्सपर्ट.

बँकेतून अकाऊंट "हॅक" करुन पैसे वळते करताना पैसे एकदम इकडून तिकडे जात नाहीत. मोठ्ठ्या संख्येने फाईल कॉपी पेस्ट करताना जशा फाईल्स एकेक करुन इकडून तिकडे जातात तसे पैसेही हळूहळू इकडून तिकडे जातात. किती पैसे गेले त्याचा काऊंटरही टर्रर्र करुन वाढत जातो. स्टेटस म्हणून नोटांचे आयकॉन फेकले जातानाही दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषय सोडून लिहिलं म्हणून अजो हग्यादम देणार!

वनफॉरटॅन , प्रतिसाद आवडू लागलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ज‌रा स‌मान ख‌ट‌क‌ण्याजोगे दुवे लिहीलेत...!
ध‌न्य‌वाद अच‌र‌ट‌बाबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

बांडपटांत दुष्टाच्या कंपुतली पोरगी बांडला मदत करते म्हणून नायतर अर्धातासातच पिच्चर संपेल. काही पळापळीची दृष्यं पुन्हा पाहतो. आइफल टाउरवरून झेप,बर्फातली स्किइंग वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुष्टाच्या कंपुतली पोरगी बांडला मदत करते

हां तेही एक कॉम‌न. ती पोर‌गी प‌ण तिच्याय‌ला सुप‌र‌मॉडेल छाप एक‌द‌म; आणि इत‌क‌ं असून त‌ल‌वारी-बंदुका किंवा बॉक्सिंग झ‌कास क‌र‌णारी. ज‌न‌र‌ली हे दोन सेट्स डिस‌जॉइंट अस‌तात. (प‌ळा...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

अभिव्य‌क्तिस्वातंत्र्याचा अर्थ‌ पात‌ळ‌ पाणी झाला अस‌ताना माझी काय हिंम‌त होणार आहे अस्लं काही क‌राय‌ची?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजोंची मोठी पोतडी आहे.
त्यांना आवडलेलं पोहोचवतात मस्त फक्त वेळ मिळाला पाहिजे.
कधी रैना कधी दैना।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थीम क्र्. २ व‌र‌चे सिनेमे सांगा ना. ब‌घित‌ले नाहीयेत‌ मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

एक उदाह‌र‌ण वाट‌र‌व‌र्ल्ड्चे देता येईल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला पिच्च‌र‌ ब‌घून‌ ब‌घून‌ काही गोष्टी स‌म‌ज‌ल्यात‌.

१. अमेरिकेत‌ एफ‌ बी आय‌ ही स‌ग‌ळ्यात‌ पाव‌र‌बाज‌ फौज‌ आहे. ते लोक‌ वॉलेट‌ दाख‌वून‌ र‌स्त्याव‌रच्या लोकांच्या गाड्या प‌ळिव‌तात‌. (त्या गाड्या मोड‌ल्याव‌र‌ नुक‌सान‌ भ‌र‌पाई कोण‌ देत‌ हे दाख‌वत‌ नाहित). क्राईम‌ सिन‌ व‌र पिव‌ळ्या प‌ट्ट्या लाव‌तात‌.
२. पिच्च‌र‌ म‌ध्ये गोरा विथ‌ ब्लॉंड‌ केस‌, एक काळा जो ओठ‌ मोठे क‌रून‌ हे य्यो ब‌डी अस हात‌ वेळावत‌ म्ह‌णणारा, एक‌ मिच‌कुड्या डोळ्यांचा (जो हॅकींग‌ ऑर‌ कुंग‌ फु वाला अस‌तोय‌) अस‌तोच‌
३. अमेरीकेत‌ल्या शाळेत‌ल्या पोरींच आद्य स्व‌प्न चिअर‌ग‌ल‌ व्हाय‌चा असत. हिर‌विण क‌धीच‌ चिअर‌ग‌ल‌ न‌स्तेय‌. आणि हिर‌विणीला जो पोर‌गा आव‌ड‌तो तोच‌ त्या चिअर‌ग‌ल‌ ला आव‌ड‌तो. चिअर‌ग‌ल‌ सोब‌त‌ एक‌ लेफ्ट‌ ला आणि एक‌ राईट‌ ला मैत्रिण‌ अस‌ते.हिर‌विणीची मैत्रिण‌ किंवा मित्र‌ च‌श्मिश‌ अस‌तात‌.
४. अमेरीकेत‌ कोण‌ता प‌ण‌ पोर‌गा कोण‌त्या प‌ण‌ पोरीव‌र‌ एका पेट्टात् लाईन‌ मारु शक‌तो. बार‌ त्यासाठीच‌ अस‌तात‌.
५. कोणीही जेव‌ण‌ ब‌न‌व‌त‌ नाही, स‌ग‌ळे चाईनिज‌ खातात नाहीतर‌ ब‌र्ग‌र‌ आणि बेक‌न‌. मेनु ब‌घुन‌ ऑर्ड‌र‌ कोणी देत‌ नाही. एक‌दम‌ मास्ट‌र‌शेफ‌ अस‌ल्यासार‌खे वेट‌र‌ ला सांग‌तात‌.
६. गुन्हेगाराला अथ‌वा विल‌न‌ ला प‌क‌डाय‌च्या आधि भिंतीवर न‌काशे ब‌न‌व‌णं कंप‌ल‌स‌री अस‌त‌. त्यात‌ फोटो चिट‌क‌वून‌ दोऱ्यांनी ते जॉईन‌ प‌ण‌ क‌र‌तात‌.
७. पेट्रोल‌ प‌ंप‌व‌र‌ स्व‌त‌ःच्या हातानी पेट्रोल‌ भ‌राया लाग‌त‌.
८. त्यांना ज‌गात‌ली कोण‌ती प‌ण‌ गाडी चाल‌व‌ता येते. वेळ‌ प‌ड‌ली त‌र‌ हेलिकॉप्टर आणि बोट‌ सुधा.
९. त्यांना जगात‌ स‌ग‌ळीक‌डे मित्र‌ अस‌तात‌ जे तिथे गेल्याव‌र त्यांना म‌द‌त‌ क‌र‌तात‌ आणि न‌ंत‌र‌ क‌धिच‌ दिस‌त‌ नाहीत‌.
१०. पिच्च‌र‌ काय‌प‌ण‌ असुदेत‌ हिरो ने हिर‌विणला किस‌ केला कि पिच्च‌र‌ स‌ंप‌तो.
११. स‌ग‌ळे प‌र‌देशी , प‌र‌ग्र‌ह‌वासी, डेंज‌र‌ प्राणि स‌ग‌ळ्यांना अमेरिकेव‌र‌च‌ ह‌ल्ला क‌राय‌चा अस्तोय‌.
१२. स‌ग‌ळ्यात‌ लेटेस्ट‌ टेक्नोलोजी जी कुण्णा कुण्णाला माहीत‌ न‌स्ते ती यांच्याक‌डे अस्ते.
१३. स‌ग‌ळे र‌शिय‌न अमेरिकेचा खात्मा क‌राय‌ला मोठ्या मोठ्या आर्मि आणि लॅब‌ म‌ध्ये काय‌ काय‌ बन‌व‌त‌ अस‌तात‌.
१४. अमेरिकेत‌ एल‌ ए (जिथे सग‌ळे मूवीस्टार राह‌तात‌) , न्यु योर्क‌ (जिथे लोक निस्ते ये जा आणि मेट्रोच्या पाय‌ऱ्यांवर‌ च‌ढ‌ उतार‌ क‌र‌तात‌) , आणि वॉशिंग्ट‌न‌ हे तीनच‌ मुख्य‌ राज्य‌ आहेत‌. बाकी स‌ग‌ळी क‌ंट्र्रीसाईड‌ जिथून‌ पेज‌ंट‌ साठी मुली येतात‌ आणि टेक्सास‌, ओहायो, मिनिसोटा व‌गैरे नाव‌ सांग‌तात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌ग‌ळे प्र‌तिसाद म‌स्त आलेत. वाच‌ताना म‌ज्जा आली. (ब‌रेच लोक आप‌ल्यासार‌खाच विचार क‌र‌तात (मंजे ते सिनेमे फार सेंटीमेंट‌ली पाह‌त नाहीत) ही बाब‌ आम‌च्यासार‌ख्या नीच‌भ्रू लोकांचे जीव‌न त्यात‌ल्या त्यात सुक‌र क‌रून जाते.)
==============
सिनेमांची नावे आणि सिन्स‌चे थोडे थोडे व‌र्ण‌न आले त‌र सोने पे सुहागा होईल. मूल मोटिफ, उप‌प्र‌कार आणि स्पेसिफिक टू इंग्र‌जी ...
उदा. इंग्रजी सिनेमातील ब‌द‌ला हा हिंदी सिनेमातील ब‌द‌ल्यापेxआ वेग‌ळा अस‌तो. तेच क्ष‌मेचे देखिल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोणी एलिय‌न्स ब‌द्द‌ल क‌सं लिहिलं नाही. एलिय‌न्स, ज‌मिनीखाल‌चे विचित्र प्राणी, महाकाय कोळी, अनाकोंडा, डाय‌नॉसोर‌ (शोर‌ नाही बाबा सोर‌ सोर‌, हे उगाच‌ आठ‌व‌लं) असे कित्तीत‌री विष‌य‌ आहेत‌ च‌घ‌ळाय‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी शेंगा खाल्ल्या नाहीत, पण
टरफले मलाच उचलावी लागणार!

कोणे एके काळी वेग‌ळे काय‌त‌र ब‌घाय‌चे एक‌मेव साध‌न म्ह‌. इंग्र‌जी सिनेमा होते. बॉलिवुड आणि म‌राठी पिच्च‌र दोन्ही च‌ढ‌त्या क्र‌माने र‌द्दीप‌णाचा अर्क होते. त्यामुळे हे अस‌ले भ‌न्नाट लै आव‌डाय‌चे तेव्हा. आता लै पिच्च‌र पाहिल्यानंतर‌ अजोसार‌खेच म‌लाही वाट‌ते. म‌जा येते अशी साले काढाय‌ला. त्यात‌ही ड‌ब पिच्च‌र ब‌घाय‌चे. एकेक भ‌न्नाट डाय‌लॉग अस‌तात‌. "याद है ह‌म‌ने तुम्हारी शादीमे व‌डापाव खाया था?" काहीही. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भाड मे जाव...हा तर ९१.१२३ टक्के डब चित्रपटातला डायलॉग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

अग‌दी अग‌दी!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणे एके काळी

येथे मी आप‌णांस‌ आप‌ण‌ अजून‌ही फार फार त‌रुण अस‌ल्याची आठ‌व‌ण‌ क‌रून देऊ इच्छितो.
=======================
गोऱ्यांच्या शादि में वडापाव? च्याय‌ला ड‌ब‌च‌ पाहाय‌ला पाहिजे इथून पुढे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ड‌ब‌च ब‌घा अशी आग्र‌ह‌युक्त सूच‌ना. साउथ‌चे हिंदी ड‌ब्ड संवाद‌ही म‌स्त अस‌तात‌, डोके फ‌क्त बाजूला ठेवून निख‌ळ आनंद घ्याय‌चा. या दोन्ही ड‌ब‌ सिनेमांक‌रिता काही च्यानेले डिव्होटेड अस‌तात‌. कोण‌ती ते माहिती नाही प‌ण रोज टीव्ही ब‌घ‌णाऱ्यांना शोध‌णं अव‌घ‌ड न‌साव‌ं.

बाय‌द‌वे ते व‌डापाव म्ह‌ण‌जे हॉट डॉग‌चं भाषांत‌र होत‌ं म‌ला आठ‌व‌तंय त्याप्र‌माणे. आणि त्यासोब‌त‌ अजूनेक‌ ड्वाय‌लॉक‌ "अरे म‌हात्मा गांधी पुल के नीचे च‌लो." लोल‌. ब‌हुतेक पिच्च‌र असे इंटेन्श‌न‌ली फ‌नी असावेत‌.

त्यांचा मुकुट‌म‌णी म्ह‌. पाय‌रेट्स ऑफ क‌रीबिअन‌, कृष्ण‌मौक्तिकाचा शाप‌.

व‌रिजिन‌ल ड्वाय‌लॉक‌.

"Norrington: No additional shot nor powder, a compass that doesn't point north,
[looks at Jack's sword]

Norrington: And I half expected it to be made of wood. You are without doubt the worst pirate I've ever heard of.

Jack Sparrow: But you have heard of me."

हिंदी ड‌ब:

"बंदूक‌ में ना गोली है ना बारूद‌. एक कंपास‌, जो बिल‌कुल ख‌राब‌ है. मुझे तो ल‌गा के त‌ल‌वार‌ भी ल‌क‌डी की होगी. तुम तो स‌मुद्री लुटेरोंका नाम ब‌द‌नाम‌ क‌र‌ र‌हे हो, जॅक‌."
"ब‌द‌नाम होगा तो क्या नाम ना होगा?"

मुळापेक्षा भाषांत‌र‌च भारीय भेंडी. असे अनेक ड्वाय‌लॉक‌ आहेत‌.

अजूनेक उदा.

Mullroy: What's your purpose in Port Royal, Mr. Smith?
Murtogg: Yeah, and no lies.
Jack Sparrow: Well, then, I confess, it is my intention to commandeer one of these ships, pick up a crew in Tortuga, raid, pillage, plunder and otherwise pilfer my weasely black guts out.
Murtogg: I said no lies.
Mullroy: I think he's telling the truth.
Murtogg: If he were telling the truth, he wouldn't have told us.
Jack Sparrow: Unless, of course, he knew you wouldn't believe the truth even if he told it to you.

"क्यूं आये हो य‌हां पोर्ट रॉय‌ल में, मिस्ट‌र‌ स्मिथ‌?
और हां, झूठ म‌त बोल‌ना.
तो ठीक है. मेरा इरादा है के ऐसा एक ज‌हाज लेके, टोर्टूगा में अप‌ने साथियों के साथ लूट‌मार क‌र‌के अप‌नी धौंस ज‌माना है.
मैने क‌हा झूठ न‌ही!
मुझे ल‌ग‌ता है ये स‌च बोल र‌हा है.
अग‌र ये स‌च बोल‌ता तो ह‌में न‌ही केह‌ता, स‌म‌झे?
क्यूंकि मुझे मालूम है कि तुम्हे स‌च सुन‌ने की आद‌त न‌ही इस‌लिये झूठ स‌म‌झोगे."

आणि निव्वळ म‌ज‌कूर भारी नाही त‌र संवाद‌फेक‌ही तित‌कीच ताक‌दीची आहे. अगोद‌र जॅक स्पॅरोच जास्त आव‌डाय‌चा. डार्क नाईट‌ने जुने वाल्गुद‌प्रेम‌ प‌र‌त व‌र उफाळून आण‌ले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"बंदूक‌ में ना गोली है ना बारूद‌. एक कंपास‌, जो बिल‌कुल ख‌राब‌ है. मुझे तो ल‌गा के त‌ल‌वार‌ भी ल‌क‌डी की होगी. तुम तो स‌मुद्री लुटेरोंका नाम ख‌राब क‌र‌ र‌हे हो, जॅक‌."
"ब‌द‌नाम होगा तो क्या नाम ना होगा?"

हाहाहाहा..
ज‌ब्ब‌र‌द‌स्त‌...!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

नागपाड्यातल्या Alexandra टॉकीजला लाव‌लेल्या पोस्ट‌र्स म‌ध‌ली इंग्लिश सिनेमांच्या टायटलची हिंदी " भाषान्तरे" धमाल असायची.
त्यातलं एक : Rider on the rain = बरसात में ताकधिनाधिन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

म्ह‌ण‌जे इच्च‌ल्क‌रंजीच्या गुरु थेट्राच्या म‌राठी भाषांत‌रासार‌खी म्ह‌णा की एक‌द‌म‌. काय ज्या एकेक स्लोग‌न‌व‌जा ओळी, एक‌ नंब‌र‌.

"हा त‌र ब्रूस‌लीचा बाप‌च‌!"
"तीन ट‌क‌ले- ट‌क‌ल्यांचा च‌क्कीत जाळ‌च‌" व‌गैरे.

आयुष्यात एक म‌ह‌त्त्वाकांक्षा आहे. गुंडाचे संवाद‌लेख‌क श्री श्री श्री ब‌शीर बाब‌र आणि या गुरू थेट्राच्या क्रिएटिव्ह ज्यूस‌च्या ज्यूस‌बार‌चा माल‌क‌ या दोघांना भेटाय‌चंय‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'' ए, च‌प‌ड‌ग‌ंजू..... '' म‌ला आजून‌ही च‌प‌ड‌ग‌ंजू म्ह‌ंजे न‌क्की काय‌ अस्ते क‌ळालेले नाहीये. प‌ण‌ विशेषण‌ म‌स्त‌ आहे.

म‌राठीत‌ अस‌त‌ं त‌र‌ म्ह‌णाला अस‌ता, '' ए, भूस‌नाळ्या''

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌ह‌म‌त‌. हे विशेष‌ण‌ श‌त्रुघ्न‌च्या तोंडी पाहिलेय‌ कारेक्र‌मांम‌ध्ये व‌गैरे. काय भानग‌डे कै क‌ळेना. राम‌दास स‌म‌र्थांच्या लेख‌नात‌ "म्हैस‌मंग‌ळू" असा एक श‌ब्द‌ आढ‌ळ‌तो, तो ब‌हुधा अर्थ‌च्छ‌टेम‌ध्ये सार‌खाच असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहा लोल‌! ड‌बिंग‌ला तोड‌ नाही. पाय‌रेट्स‌च्या ड‌बिंग‌ला त‌र‌ नाहीच‌ नाही. न‌वा पाय‌रेट्स‌ही हिंदी ड‌बिंग‌ मिळेस्तोव‌र‌ प‌हाय‌चा नाही असं ठ‌र‌व‌ल‌ं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

कृष्ण‌मौक्तिकाचा शाप आणि दैवी जोन‌ची पेटी हे दोन‌च पाय‌रेट्स ब‌रे आहेत‌. बाकीचे व‌ट्ट नाय आव‌ड‌ले, ज‌गाच्या अंताशी म‌ध्ये त‌र मेज्ज‌र के एल पी डी केला भ‌ड‌व्यांनी, म‌ला वाट‌लेलं की आता पाय‌रेट्स गॅंग आणि ईस्टिंडिया कंप‌नी या दोघांची घ‌मासान आर‌मारी ल‌ढाई होणार त‌र कुठ‌लं काय‌. पुढ‌चा पाय‌रेट्स‌ त‌र अजून‌च भंगार होता सिवाय एक डाय‌लॉग‌. "Why is it that we always meet with you pointing something towards me?" असे पेनेलोप क्रूज क‌प्तान स्पॅरोला म्ह‌ण‌ते.

ड‌बिंग ब‌रं असेल त‌री मूळ पिच्च‌र र‌द्दी अस‌ल्याव‌र डोक्यात जातो. ब‌र ध‌डप‌णी ट्रॅश म्ह‌णून एंजॉय‌ही क‌र‌ता येत नाही कार‌ण क‌प्तान जॅक स्पॅरो आम‌चा माणूस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रेक मधले गाढव पण असेच...मूळ dialogues पेक्षा dubbed dialoguesच भारी आहेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Journey Is the Reward...

भाड मे जाव...हा तर ९१.१२३ टक्के डब चित्रपटातला डायलॉग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

हॉलीवुडात स‌ग‌ळे हिरो / व्हिल‌न‌ अग‌दी स‌फेद काप‌ड‌ं घालून, विन‌ श‌र्ट‌ क‌रुन फाय‌टिंग क‌रुन सुद्धा त्यांचे ना काप‌ड‌ं ख‌राब‌ होतं ना विन‌ निघ‌ते. कस्स‌ काय‌ ज‌म‌त बुवा हे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॉलिवूड‌म‌धे टाय, सूट अस‌ला कि फ‌क्त‌ ब‌खोटं इ प‌क‌ड‌तात. आणि धुम‌च्र‌क्रि वाढ‌ली त‌र सूट बाजूला काढून‌ फाईट क‌र‌तात म्ह‌णून सुट सांभाळून फाईट क‌र‌णाऱ्या हॉलिवूडि हिरोंचं क‌व‌तुक वाट‌तं. आणि सांभाळून मंजे सांभाळून नाही, आप‌सूक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काहि चित्रपट डोकं बाजूला ठेऊन बघावे लागतात, निव्वळ मनोरंजनासाठी, पैकी एक, डंब अँड डंबर (दोन्ही भाग, दुसरा बराच रटाळ वाटला). कुमार अँड हेराल्ड सिरीज तसेच ऑस्टिन पॉवर सिरीज ला तर चालेंज नै भौ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

प्राणी म्हणजे हिरविन रात्री बाराला मांजर होते.
जॅाज मध्ये उगाच पळापळ आरडाओरड रबरी मासा.
कुठल्याशा बांडमधला तो स्टिलचा दातवालाच मला आवडला.
म्याकेन्नज गोल्डमधली खिशातली थोडीशी सोन्याची वाळू अन हिरविन घेऊन हिरो बाहेर पडल्यावरच डोंगर कोसळतो अन -जनगणमनसाठी उभे राहिलो हे आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Jack Sparrow: Parleley, parlelellyleloooo, par le nee, partner, par... snip, parsley...
Ragetti: Parley?
Jack Sparrow: That's the one. Parley. Parley.
Pintel: Parley? Damn to the depths whatever man what thought of "Parley".
Jack Sparrow: That would be the French.

"बात्..ब‌त्.....बात्.....बुत्.....
बात‌चीत‌?
हां, बात‌चीत‌, व‌ही व‌ही व‌ही.
प‌ता न‌ही किस बेव‌कूफ‌ने ये बात‌चीत‌वाला निय‌म ब‌नाया था.
कोई अक्ल‌मंद होगा."

मुळापेक्षा ड‌बिंग‌च एक नंब‌र आहे साला. आणि ते जॅक स्पॅरो अस‌लं दारुडं अस‌तंय, च्याय‌ला त्याच ल‌यीत अस‌लं ज‌ब्री म्ह‌ण‌तंय क‌ळाय‌चं बंद तेच्याय‌ला.

Elizabeth Swann: Commodore, I really must protest! Pirate or not, this man saved my life.
Norrington: One good deed is not enough to save a man from a lifetime of wickedness.
Sparrow: Though it seems enough to condemn him.
Norrington: Indeed.

"क‌मोडोर‌, मैं इस‌के स‌ख्त खिलाफ हूं. लुटेरा हुवा तो क्या हुवा, इस‌ने मेरी जान ब‌चायी है.
एक अच्छाईसे जिंद‌गीभ‌र‌की बुराईयों को मिटाया न‌हीं जा स‌क‌ता!
लेकिन व‌ही अच्छाई उसे म‌र‌वा ज‌रूर स‌क‌ती है!
ठीक क‌हा...."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जॅक स्पॅरोचा हिंदी आवाज ऐकण्याची इतकी कानाला सवय झालीये की याचं इंग्रजी ऐकावसच वाटत नाही. आधीच्या ४ भागांना राजेश खट्टर हा अभिनेता द्यायचा आवाज जॅकसाठी. काय खतरनाक आवाज दिलेला त्याने. आता पाचव्याला अर्शद वारसीने दिलाय पण त्याने पार वाट लावलीये असं ऐकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक धन्यवाद या माहितीक‌रिता. म‌ला नेह‌मी उत्सुक‌ता होती की जॅक स्पॅरोला आवाज कोण ब‌रं दिला असेल‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट‌मॅन‌ (डार्क‌ नाईट‌ राय‌जेस्) म‌ध्ये जोक‌र‌ लेडीज अॅंड‌ जेंट‌ल‌मेन‌ ला स‌ज्ज‌नो और‌ स‌ज‌नियो म्ह‌ण‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌हीच‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एडम सांडलेर अभिनीत ५० फर्स्ट डेट्स. लै आवडलता. ह्याचा मराठीत रीमेक करायचा गोजीरवाना प्रयत्न केल्ता पण लै केविलवाना झाल्ता.
(रीमेक-गोजीरी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

दुसऱ्या भाषेत‌ रिमेक‌ केलेल्या सिनेमांव‌र‌ धागा काढ‌लेला आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच इंग्र‌जी नील‌चित्र‌फितींच्या थिमांचे विश्लेष‌ण‌ही केल्यास ब‌हार यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यात क्रम फारच ठराविक असतो.

मुखापासून सुरुवात अन मग खालीखाली. शेवटी ठराविक पद्धतीने ऐनवेळी "एक्झिट".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते त‌र झालंच‌, अगोद‌र अपेटाय‌झ‌र म‌ग मेन‌ कोर्स अन शेव‌टी 'सूप‌' वाज‌णे. प‌ण मी ते म्ह‌ण‌त नैये.

मी म्ह‌ण‌तोय‌ ते थिमांब‌द्द‌ल‌. पिझ्झा डिलिव्ह‌री, प्लंबिंग, शाळामास्त‌रीण‌, इ. ज‌गात‌ले भारी जॉब्स असावेत असा ग्र‌ह होण्याइत‌प‌त त्यांचे चित्रीक‌र‌ण दिस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पिझ्झा डिलिव्ह‌री, प्लंबिंग, शाळामास्त‌रीण‌, इ. ज‌गात‌ले भारी जॉब्स असावेत असा ग्र‌ह होण्याइत‌प‌त त्यांचे चित्रीक‌र‌ण दिस‌ते.

हो हो. अगदी.

झालंस्तर मोठमोठ्या बिल्डिंगच्या काचा बाहेरुन साफ करणे, शाळेतली द्वाड शिक्षायोग्य विद्यार्थिनी, पेंटर आणि बरंच काही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय‌द‌वे जेम्स डीन (हा म्ह‌णे म्हैलाव‌र्गात लै पापिल‌वार है) या पोर्न‌स्टार‌ची मुलाख‌त म‌ध्ये वाच‌ण्यात आलेली, तो म्ह‌णाला की "मैं ब‌च‌प‌न‌से ही पोर्न‌स्टार ब‌न‌ना चाह‌ता था!" आणि त्याचे आईव‌डील दोघेही इंजिनिय‌र‌ अन‌ सायंटिस्ट आहेत‌. ब‌रोब‌र‌च आहे म्ह‌णा, दोघेही आईबाप असे पाहून पोराला वाट‌लं असेल जिंद‌गी साली झंड‌च आहे. आप‌ण आप‌ले मुख्य काम क‌र‌त र‌हावे.

https://en.wikipedia.org/wiki/James_Deen#Career

According to Deen, performing in pornographic films was his ambition since he was in kindergarten.[15]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आप‌ण ज‌रा हॉलिवूडात‌ पोरी क‌शा प‌ट‌तात याच्या थिमा आठ‌वाय‌ला गेलो त‌र कै आठ‌व‌त‌च‌ नाही. ग‌वि मंतात‌ त‌सं प्रेमिका ग‌ट‌व‌णे पेक्षा घ‌ट‌स्फोटितेव‌र उमाळा हाच प्र‌संग जास्त आठ‌व‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हॉलिवुडात पोरी प‌ट‌व‌णे या विष‌याला बॉलिवुडाइत‌कं अवास्त‌व म‌ह‌त्त्व देत नाहीत‌. म्ह‌णून‌च त्यांना ते एलिय‌न‌गिरी क‌राय‌ला वेळ मिळ‌तो, नाय‌त‌र साला आप‌ल्याक‌डे स‌ग‌ळी एन‌र्जी यात‌च जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शाळामास्त‌रीण‌

किती ते ऋषिकेशीय संतुल‌न. आणि कुठे आणि क‌से!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मशिनिस्ट युटुबावर आहे तो पाहिला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमचा एक मद्राशी सहकारी दर्दी होता. वेरिएशन म्हणून एक मराठी पाहिली.
"तियामध्ये नक्क्को नक्को कशाला? अय्या चलताय."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हंजे ते होय, कायप्पावरचा विनोद, एक पोरगं बापाला म्हणे मला प्लंबर व्हायचय, नाहितर दुध विकायचय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

हिरोला किंवा हिरोणीला मिळालेली कोण‌ती श‌क्ति तुम्हाला स‌र्वात विचित्र‌ वाट‌लि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रात्री मांजर/ साप होणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हालिवूडच्या दारचा आणखी एक नोकर म्हणजे टाईमट्र‍ॅव्हल. अमेरिकी लोक वैज्ञानिक दृष्टिकोनापासून एवढे लांब का राहतात, याचं एक कारण हॉलिवूड आणि क्रिस्तोफर नोलनछाप रडतराऊतही म्हणता येतील. मला 'इंटरस्टेलर' हा सिनेमा त्या हिशोबात फारच आवडतो; दारूचे घुटके घेत आणि चीजचे तुकडे तोंडात टाकत आचरट खिदळण्यासाठी सिनेमा उत्तम आहे.

सगळ्या जगावर अन्नसंकट आलेलं आहे - हे दाखवलं की एक घोट दारू आणि चीजचा एक तुकडा तोंडात टाकायचा - म्हणून अमेरिकी अभियंत्यांना म्हणे शेती करायला भाग पाडतात१, २. शेतकऱ्याच्या घरात वाळूच्या रेषा दिसतात; प्राथमिक शाळेत जाणारी मुलगी म्हणते, "त्या रेषांचा अर्थ आहे - थांब, जाऊ नकोस." मुलगी आहे, लहान आहे म्हणजे तिला काय अक्कल असणार! किंवा त्याचं टेस्टोस्टिरॉन फार वाढलं असणार. अच्चं सगळं होऊन हा शेतकरी जातो प्रवासाला. हा म्हणे एकदम ड्वॉग पायलट! प्रवास करून, मग टाईमट्रॅव्हल करून स्वतःलाच निरोप पाठवतो, "थांब, जाऊ नकोस."

आम्ही काय कधी आरशासमोर आरसा ठे‌वलेला बघितला नाहीये का! त्यासाठी एवढा पैसा आणि वेळ खर्च करून सिनेमा बघायचा का! त्यातल्या त्यात किमान आयकँडी मॅथ्यू मकॉनहेला अभियंता-शेतकरी म्हणून दाखवलंय. पण तो फार कपडे काढत नाहीच. क्रिस्तोफर नोलनला नक्कीच दळिद्राचे डोहाळे लागले असणार. सिनेमाभर दळिद्र, कल्पनाशक्ती, संगीत, अभिनय, सगळ्याच बाबतीत दळिद्र.

पण तरीही, थोडी दारू पिऊन सिनेमा बघा. 'इंटरस्टेलर'सारखी कर्मणूक नाही!

१. अमेरिकेत मुळात कोणी इंजिनियर होतं का! अमेरिकेतले कायदेशीय एलियन्स डॉक्टर किंवा इंजिनियर असतात आणि बेकायदेशीर एलियन्स आक्रमक असतात. बेकायदेशीर एलियन्स म्हणजे परग्रहवासी किंवा अतिशय कमी पैशांत मोलमजूरी करणारे सगळेच.
२. चला अमेरिकेतच्या बायबल बेल्टातले धार्मिक शेतकरी मिळालेच की लगेच सिनेमाला गिऱ्हाईक म्हणून. ट्रंपुली आणि रिपब्लिकनांचा या लोकांच्या मतांवर फार भरवसा!
३. शिवाय त्याची बायको नाही, त्याला कोणी डेट मिळत नाही; क्रिस्तोफर नोलनच्या सिनेमात काम केल्यावर डेट मिळणार कुठून! मग टेस्टोस्टिरॉन वाढणारच. त्याचं दमन करायला असली माकोगिरी करावीशी वाटणारच.३अ
३अ. चक्री-संदर्भ काय फक्त नोलनलाच जमतात असं नाही!
४. 'ब्रेकिंग बॅड'मधला आमचा ब्रायन क्रॅनस्टन पाहा. तो चिकार वेळा, चिकार कपडे काढतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणजे तुम्हाला धोबी घाट आवडला,आणि नोलान हा रडत राऊत?कल्पनादारिद्र्य? hopefully this piece was satirical. if not.... really? no, really?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Journey Is the Reward...

यापुढे नोलनचं नाव बघूनच मी मूडनुसार टीव्ही बंद करेन किंवा वारुणीची बाटली उघडेन. नोलनच्या सर्कशीची तेेवढीच पत. त्याच्याकडे कल्पनादारिद्र्यच कशाला, विनोद, विज्ञान, समाजविज्ञानदारिद्र्यही आहे. कसलं दारिद्र्य नाही, हे लिहिणं सोपं.

पिच्चरात मॅथ्यू मकॉनहेचे कपडे काढले असते, तर कदाचित मत थोडं निराळं झालं असतं. पण तिथेही दारिद्र्यच! बुद्धीला चालना नाही तर किमान उठवळ आनंद तरी द्यावा! पैसे आणि वेळ खर्च करून असलं पारंपरिक दळणाचं दळिद्र का बघावं?

हा प्रश्न वैतागून विचारलेला असला तरीही अत्यंत प्रामाणिक वैताग आहे. (खालच्या परिच्छेदात अशाच आणखी एका वैतागाचा दुवाही दिलेला आहे.) इंटरस्टेलरछाप सिनेमे बघून 'चला, आज डोक्याला कटकट नको असताना स्वयंपाक, जेवण, भांडी घासणं, मागची आवराआवर आणि नंतर आराम करतानाचे दोन तास मागे काहीतरी नॉईज होता बुवा', या पलीकडे काय वाटतं?

धोबी घाट, द बिगाइल्ड, आंखो देखी, मिथ्या, लॉस्ट इन ट्रान्सलेशन, ४०० ब्लोज, स्टोलन किसेस अशी डोक्यात अडकून राहणाऱ्या चित्रपटांची यादी बरीच वाढवता येईल. या सिनेमांनी माझं पोषण केलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इंट‌र‌ष्टेलार‌ आव‌ड‌ला होता.
म‌ला त‌र‌ वाट‌त‌ं की क‌धी काळी कुणी हार्ड‌ साय‌न्स‌ फिक्श‌न‌व‌र‌ (उ.दा. the gods themselves) वर‌ चित्र‌प‌ट‌ काढाय‌चा ठ‌र‌व‌ला त‌र‌ त्याला नोलान बेस्ट आहे.
नाहीत‌र‌ मग‌ डाय‌रेक्ट आप‌ला माय‌केल‌ बे.
@नोलान‌ ---- इन्सेप्श‌न‌ब‌द्द‌ल‌ काय म‌त‌?
आणि म‌ग .. मेमेंटो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मेमेंटो'सुद्धा एकीकडे दुसरं काही काम करत, शिवण-टिपण-भरतकाम-विणकाम, बघायला वाईट नाही. पॉपकॉर्न म्हणून चांगलं आहे, मऊ पडलेलं नाही; त्याला पोषण-जेवण समजल्यामुळे वैताग आला. 'इन्सेप्श‌न‌' बघितला नाहीये.

स्पायकी जोन्सच्या तंत्रज्ञानकथा-चित्रपट मला आवडतात. 'हर', 'बिईंग जॉन माल्कोविच', 'अॅडाप्टेशन' अशी बरीच यादी देता येईल. त्या हिशोबात जोन्सचाच 'इटरनल सनशाईन' जरा गोडगुलाबी वाटतो. मध्यंतरी कोणता चित्रपट बघितला होता, पटकन नाव आठवत नाहीये. एका वैज्ञानिकाला एक इन्व्हेस्टर दूर अॅमेझॉनच्या जंगलात नेतो; तिथे कामाला खरी स्त्री वाटणाऱ्या रोबॉट्स असतात... जंतूनं बहुदा 'मटा'त त्याबद्दल लिहिलं होतं. तोही चित्रपट छान होता. जरा 'ब्लॅक मिरर'ची आठवण येईल असा.

'ब्लॅक मिरर' आवडणाऱ्या, पदोपदी त्याची आठवण येणाऱ्या लोकांना नोलन कसा आवडावा! 'इंटरस्टेलर' अवकाशासारखाच प्रचंड मोठा आहे पण आतूनही अवकाशासारखाच, बहुतांश रिकामा, पोकळ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'ब्लॅक मिरर' आवडणाऱ्या, पदोपदी त्याची आठवण येणाऱ्या लोकांना नोलन कसा आवडावा! 'इंटरस्टेलर' अवकाशासारखाच प्रचंड मोठा आहे पण आतूनही अवकाशासारखाच, बहुतांश रिकामा, पोकळ.

ख‌रंत‌र ब्लॅमि सार‌खा कंटेंट आणि इंस्टे सार‌ख‌ं प्रेझेंटेश‌न अस‌तं त‌र तो खूप भ‌व्य झाला अस‌ता चित्र‌प‌ट, किंवा ती सिरीअल. सिरीअल म‌ध‌ल्या हेवी ब्रिटिश अॅक्सेंटने फार कंटाळा आण‌ला बुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

बीबीसीच्या, ब्रिटिश लोकांनी बनवलेल्या, मालिकेत अमेरिकी धाटणीचं इंग्लिश दिसायला ते नोलननं थोडीच बनवलंय! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इंट‌र‌स्टेलार बाकी एक‌ नंब‌र पिच्च‌र‌, प‌ण ते भार‌तीय ड्रोन दाख‌वाय‌चं त‌र देव‌नाग‌री लिपीच क‌शाला दाख‌व‌ली पाहिजे ते कै क‌ळ्ळं नाही. भार‌ताची राष्ट्र‌भाषा सी प्ल‌स प्ल‌स असावी की जावा, याब‌द्द‌ल मोठ्ठा वाद आहे हे त्यांना माहीत न‌व्ह‌तं असं दिस‌त‌ं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प‌र‌वा एक सिनेमा पाहिला, त्यात‌ एकिक‌डे ज्वालामुखी आणि दुस‌रिकडे सोन्याचा प‌र्व‌त ( हो, व्य‌व‌स्थित प‌र्व‌त), तिस‌रेक‌डे प‌द‌वी प‌रीक्षेसाठी पैशाची ग‌र‌ज‌ अस‌लेली मुल‌गी आणि या संद‌र्भात अतिसंवेद‌न‌शील पिता, चौथीक‌डे बेटाच्या खाली पाण‌बूडीविमान, पाच‌वीक‌डे विद्युत्मत्स्य‌, स‌हावीक‌डे माण‌से पाठिव‌र घेऊन उडू श‌क‌णारे भुंगे आणि सात‌वीक‌डे विक्राळ प‌क्षि असा शिनेमा पाह्य‌ला. आता याव‌रून एक‌ सिनेमा क‌सा ब‌न‌वाय‌चा? -
१. ज्वालामुखीचा उप‌योग बेट‌ बुड‌व‌ण्यासाठी
२. सोन्याचा प‌र्व‌त - शिक्षणाचा ख‌र्च‌
३. पिता - स‌र्वांचे सोने घ्याय‌चे नाही ठ‌र‌ले अस‌ताना "मुलीचे शिक्ष‌ण" या राज‌कीय दृष्ट्या संवेद‌न‌शील विष‌याव‌र एक गोटा घ्यायला चोरून जातो. ती शिळा निघाल्याने त्याचे च‌रित्र‌ अबाधित .
४. पाण‌बुडीविमान - ज्वालामुखिचे द‌गड स‌मुद्रात आणि ह‌वेत अस‌ताना त्यांना चुक‌वित चुक‌वित जाणे
५. विद्य‌त्म‌स्त्य‌ - पाण‌बुडीविमान‌ जुने आणि प्राचीन (तो धागा आठ‌व‌तो का?*) , म्ह‌णून त्याच्या बॅट‌ऱ्या उडालेल्या. त‌र इनिशिय‌ल क‌र‌ंट देण्यासाठी.
६. भुंगे - अव‌घ‌ड‌ द‌ऱ्या डोंग‌र पार‌ क‌राय‌ला.
७. प‌क्षी - इत‌के अव‌घ‌ड‌ डोंग‌र लिल‌या पार‌ झाले म्ह‌णून प्रेक्ष‌क बोर होऊ न‌येत म्ह‌णून भुंग्यांस‌ह माण‌सांना खाय‌ला.
=====================================
* माझा विश्वास ब‌स‌ला नाही - पाण‌बुडिविमानात‌ली स‌ग‌ळी यंत्रे देव‌नाग‌री लिपी अस‌लेली (आणि अॅक्ट‌रांत कोणी भार‌तीय नाही.)!!!!!!!!!!!!!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगागागा, असा न‌क्की कुठ‌ला पिच्च‌र होता म्ह‌णे हा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पालींची बदनामी थांबवा!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

तुमाला चाय‌नाव‌रुन‌ इंपोर्ट‌ केल‌ंय‌ का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिज्ञासूंनी या सबरेडिटवर अवश्य चक्कर मारावी!

A subreddit for every over the top, satirical, embarrassing, or downright, flat-out incorrect usage of Technology found in Movies, TV Shows, and Video Games!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रेडिटवर नक्की कोणत्या विषयात घुसावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंग्र‌जी थिम‌प‌टांत पेट‌लेली बाई ही थीम लै भारि अस‌ते. एर‌वी बाय‌कांना फार कै अक्क‌ल न‌स‌ते अशा मान‌सिक‌तेचा माणूस ज‌री असे थीम‌प‌ट‌ ब‌घाय‌ला गेला त‌री तो स्त्रीत्वाचे म‌हान‌प‌णाचे गोड‌वे गात‌च‌ बाहेर प‌डेल अशी मांड‌णि अस‌ते.
अशा प‌टांत एक‌ "कॉज" अंगी घेऊन बाई पेट‌ते. ते कॉज काहीही असू श‌क‌ते. उदा.न‌व‌ऱ्याचा खूनाचा ब‌द‌ला. म‌ग‌ ती पूर्वि नाजूक नार अस‌लेली ब‌या ज‌पान‌म‌धे जाऊन तिथ‌ल्या स‌र्व‌ब‌लाढ्य‌ अंड‌र‌ग्राउंड‌ गॅंग‌ला झोप‌व‌ते. एक‌ट्याने. मागे क‌धी फ्लाईट‌चे तिकिट‌ काढ‌ले न‌स‌ले त‌री एर‌वी न ऐक‌लेल्या देशांत जाऊन स‌ग‌ळी जासूसी क‌रून येते. दुस‌रिक‌डे कॉपोरेट ज‌गात कंप‌नी मंजे काय हे माहित न‌स‌लेली ब‌या अक्ष‌र‌श्: कंप‌नीचे स‌ग‌ळे डाटाबेस (मंजे इंडिविज्यूअल डाटा एंट्रीज्) बाय हार्ट क‌रून टाक‌ते. आप‌ण थ‌क्क!!! वास्त‌विक हे क‌राय‌ची ग‌र‌ज न‌स‌ते आणि कोणि क‌र‌त‌ प‌ण न‌स‌ते. व‌कील ब‌न‌णे त‌र स‌ग‌ळ्यात सोपे. लेकिला प‌र‌ग्र‌ही संक‌टांपासून ते तिच्या बापापासून वाच‌व‌ण्यासाठी पेट‌लेली बाई हा अजून एक‌ रोच‌क प्र‌कार. आणि या झाल्या स‌म‌र्थ‌निय‌ केसेस्. अजून कै केसेस अस‌तात ज्यांत हॉलिवूडि बाय‌का क्रिमिन‌ल‌ वृत्तिंनी पेट‌तात. म‌ग‌ त्या जे धिंगाणे घाल‌तात ते पाह‌णे मंजे अद्भूत प्र‌कार अस‌तो.
ल‌क्षात‌ घ्या कि हॉलिवूड‌प‌टात प्रिय‌क‌र प्राप्त क‌र‌ण्यासाठि अश्या प्र‌कारे पेट‌णे बॅन असावे, जे फ‌क्त‌ आप‌ल्याक‌डे घ‌ड‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा हा हा... अग‌दी अग‌दी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आप‌ल्याक‌डे प्रेम‌बीम क‌राय‌ला थोर्थोर संस्क्रुतीम‌ध्ये बॅन आहे म्ह‌णून स‌ग‌ळी एन‌र्जी तिक‌डेच धाव‌लेली दिस‌ते. त्यांच्याक‌डं ते स‌ग‌ळं क‌रून ब‌स‌लेत, राद‌र‌ क‌राय‌ला मुभा अस‌ते म्ह‌णून बाकीच्या उचाप‌त्या क‌राय‌ला वेळ अस‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने