म‌.म.व‌.ची कैफिय‌त‌

गज़लेत सूर्य होतो, तो पिऊन अंध:कार
मी कुडकुडून जातो, डेंजर किती हे वारं

ब्रह्मांड भेदुनिया, गर्जेल काव्य त्याचे
टपरीकडे विडीच्या, वळतात पाय माझे

मृत्यूस डिवचणारे, तो अमरगीत रचतो
लाईफ इन्शुरन्सचे, मी स‌र्व ह‌प्ते भरतो

तारे, फुले नि शब्द, वश त्यास जन्मसिद्ध
मी सापळ्यात - माझे, अस्तित्व ममवबद्ध

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तारे, फुले नि शब्द, वश त्यास जन्मसिद्ध
मी सापळ्यात - माझे, अस्तित्व ममवबद्ध

काहीही हां... तुम्हालाही आहेत की श‌ब्द व‌श. तुम‌चं कुठाय अस्तित्व म‌म‌व‌ब‌द्ध?
पुलंच्या लिखाणाची आठ‌व‌ण क‌रुन देते ही क‌विता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

दोन स‌ह‍-अस्तित्वांची तुल‌ना.
प्र‌तिसादाब‌द्द‌ल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)