ये हलके हलके मागे

बदामी.
वो जब मिले हैं तो उनसे हर बार, की है उल्फ़त नये सिरे से असं म्हणू?
त्या विलक्षण मातीवर नव्याने जीव जडवावा वाटत राहतं इतक्या आत्मीयतेने ती मी मनात जपलीय.
तीवर त्या अर्जेंतिनी महावाक्याला खरे ठरवणारे क्षण वेचले आहेत.
खिडकीच्या काचेवर डोकं टेकवलं आणि उघड्यागच्च डोळ्यांनी गतीवर नजर लावली
की मागे मातीवर बदलत जाणारे रंग बेसावध चित्ताला एकदम चिमटीत धरतात.
त्या रंगा-पोतांचे विभ्रम साठवत प्रवासाचे टप्पे वाढत जातात,
परिचित-अनोळख्या मातीवर पाय लागेस्तोवर रिकाम्या होत राहणाऱ्या वेळा माती भरून टाकत असते.
माझ्यावर अतिरम्यतेचा असलेला आरोप सिद्ध करणारी ती एक गोष्ट आहे.
प्रांजळपण मातीशी खूप जोडलेले आहे असे मला सतत वाटत आलेले आहे.
या वाटण्याला तर्काचा टेकू नाही, उदाहरणांचे आधार सुद्धा.
त्या गावची माती,
तिच्यासारख्या कधी कणदार कधी मऊसूत स्मृती,
क्षण-काळ यांच्या नष्टचर्याचे सगळ्या अवकाशात भरून राहिलेले संदर्भ,
मृत्यूच्या शांततेत आपल्या लहान असण्याचे,
उरून राहण्याचे,
असल्या सगळ्या अर्थांचे लाल पत्थर झिजवत वाढणारी माती.
आणि तरीही तिला जीवनाच्या अप्रुपाचे एवढे भान कसे.
तिचा स्वत: जन्म पत्थराच्यात नाहीश्या होण्याने होत आलेला आहे.
म्रुत्यूची दलदल आहे तिथे,
आणि जननमार्ग उघडून बसलेली देवीही.
तिच्या कमळांचे त्या दलदलीला सौंदर्य येवो.

मी गेलो तिथे तेव्हा रानगंधी उग्रता होती माझ्या संप्रेरकांत.

महाकुट मंदिरांच्या दिशेने गेलेली वाट,
आणि कलत्या उन्हातला केशरी प्रवास.
शब्दांनी तीट लावून सोडावं म्हणून सांगावं वाटतं.
त्या लालसर रंगाला नजर लागू नये.
मी मुका होऊन जातो. जनन-मृत्यूचे भव्य प्रश्न कुणी मिठीत विचारेल याचं पोरकं भय वाटतं.त्या सगळ्या अननभूत सौंदर्याने लहान झालेला मी कुठेतरी उरलेला आहे.
महाकुट मंदिरांच्या दिशेने गेलेली वाट आता पक्की केलीय.
त्या मंदिरांच्या प्रवेशदारावरचा सांगाडा पुन्हा अंगावर येणार नाही इतकं
धैर्य त्या दगडांनी, आणि त्यांना भेदून मऊ उरलेल्या मातीनेच दिलंय.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

महाकुट मंदिर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

की मागे मातीवर बदलत जाणारे रंग बेसावध चित्ताला एकदम चिमटीत धरतात.
त्या रंगा-पोतांचे विभ्रम साठवत प्रवासाचे टप्पे वाढत जातात,

मेम‌रीगॅझ‌म. ज‌ब‌री.

इतकं
धैर्य त्या दगडांनी, आणि त्यांना भेदून मऊ उरलेल्या मातीनेच

म‌स्त! छान ब‌स‌लंय रुप‌क.
खूप आव‌ड‌ली क‌विता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

असा भास‌ झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)