जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १६

त्या जहाजातील जीवघेण्या संघर्षातून त्यांनी यशस्वीरीत्या स्वतःची सूटका करून घेतली होती.

" आपल्याला पाण्यात ऊड्या माराव्या लागतील. आणी ह्या बूडणाऱ्या जहाजापासून लवकरात लवकर दूर जावं लागेल.
नाहीतर आपण पून्हा या जहाजाच्या घेऱ्यात अडकून स्वतःचा जीव गमावून बसू "
कँप्टन स्मीथनी सर्वाना ओरडून सांगीतले.
मग प्रत्येकाने प्रोपेलर ट्यूबमधील तूटलेल्या फँनला बाजूला करत थंडगार पाण्यात ऊड्या घेतल्या.
त्या हाडं गोठवणाऱ्या पाण्यातून पोहत पूढे जाताना सर्वाचीच बिकट अवस्था झाली होती. पण अखेर प्रत्येकाचाच नाईलाज होता.

" सर्वानी त्या बोटीवर चला "
समोरील ऊलट्या होऊन पाण्यावर तरंगणाऱ्या एका बोटीकडे ईशारा करत जँकने सर्वाना त्याच्या मागून पोहत येण्याची सूचना दिली.

" कॉर्नर मला घट्ट पकडून ठेव "
लूसी पाण्यातून कॉर्नरला सोबत घेऊन कशीबशी पोहत होती. शरीरात ञाण ऊरले नव्हते. पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरी निदान त्यांना पाण्यात पोहत राहणंच भाग होतं.
जँकने पूढे जाऊन पाण्यावर तरंगणारी ती छोटीशी बोट सरळ केली. मग त्याने सर्वानाच ताबडतोब वरती घेतलं.
जँकसोबतच ज्युली, कॉर्नर, लूसी, एलीजाबेथ, रॉन, रॉकी, कँप्टन स्मीथ, विल्यम व वेब सर्वजणच त्या लहानशा बोटीमध्ये अगदी दाटीवाटीने बसले होते. त्यांच्या वजणामूळे बोटीचा तोल सारखा जात होता आणी हळूहळू नकळतच समूद्रातील थंडगार पाणी बोटीमध्ये शीरत होतं.

" चला लवकर, पूढे सर्वानी, बोटीला पूढे न्या "
जहाज पाण्यात बूडण्यास सूरवात झाली आहे. एकदा का हे संम्पूर्ण जहाज पाण्याखाली गेलं की जहाजाच्या आजूबाजूचं पाणी मोठमोठ्या लाटांप्रमाणे ऊसळून वरती येईल "
कँप्टन स्मीथ पून्हा मोठ्याने ओरडले.

" कम वॉन मूव्ह,
सर्वानी लवकरात लवकर आपली बोट पूढे न्या. जहाज बोटीच्या दिशेनेच पाण्यात बूडत आहे.
जर आपण जहाजाच्या कचाट्यातून बाहेर पडलो नाही तर आपली ही छोटीशी बोट या पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर पूढे वाहत जाईल "
जँक सर्वाना समजावत होता.

आणी अचानकच बघता बघता त्या प्रचढं जहाजाने आपले प्राण सोडले. सूदैवानं त्या सर्वानीच मोठ्या मेहनतीने त्यांच्या बोटीला जहाजापासून दूर नेलं होतं. त्यामूळे ते थोडक्यात बचावले होते. एका विशाल जलसमूदायाने त्या भव्य जहाजाला आपल्या बाहूत कवटाळून घेतलं.
पाण्याच्या महाकाय लाटांसोबत मोठमोठाले आवाज करत ते जहाज अखेर सूदूर दक्षिणी महासागराच्या कूशीत कायमचंच विलीन झालं.

" ओ शीट हे काय होत आहे "
सर्वजणच डोळे विस्फटून त्या भव्य जहाजाला बूडताना पाहत होते. नकळत एक अनामीक हूरहूर जीवाचा थरकाप ऊडवीत होती.
या जहाजाबरोबर सर्वाच्याच निरागस भावना अवीरत बूडल्या जात होत्या.
आणी मग काही क्षणातच अवघ्या सागर सृष्टीत एक स्मशान शांतता पसरली. समूद्र वाहणाऱ्या संथ पाण्याप्रमाणे अगदी स्थीर झाला. दूरदूरवर त्या विशाल सागरात केवळ त्या एका लहानशा बोटीशीवाय कोणाच्याच अस्तीत्वाला वाव ऊरला नव्हता. फक्त त्या बोटीप्रमाणेच जहाजातून तूटून पडलेल्या अनेक निरूपयोगी वस्तू पाण्यावर अधांतरी तरंगत होत्या.

" कँप्टन आता आपण काय करायचं. या हाड गोठवणाऱ्या थंड पाण्यात बूडून आपला काही तासातच मृत्यू होईल "
रॉनने शांततेचा भंग करत सर्वाना सावध करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

" काळजी करू नकोस रॉन. जहाजातून जी. पी. एस. लोकेटर्स सोडण्यात आले होते. त्यामूळे काहीच तासात सी. एम. ए. ( क्रूझ मरीन ऑफ अर्जेटींना ) चे सूरक्षा दल आपल्याला वाचवण्यासाठी ईथपर्यतं पोहोचतील.

" जर ते नाही आले तर ! आणी समजा जहाजातून पाठवलेला संदेश त्यांच्यापर्यतं पोहोचलाच नसेल तर "
ज्युली ऊगाचच नको नको त्या शकां ऊपस्थीत करून सर्वाची नीराशा करत होती.

" नाही असं काहीच होणार नाही. आपला जीव वाचवण्यासाठी तरी त्यांना ईथे यावच लागेल "
वेब अगदी विश्वासाने म्हणाला.

" तू बघीतलंस ना एवढं मोठं जहाज कसं अगदी सहजासहजी पाण्यात बूडालं "
लूसी लहानग्या कॉर्नरला कूशीत घेऊन रडत होती.

" जेव्हां ती प्रचंढ लाट आपल्या जहाजाला धडकली तेव्हां जहाजाचा वेग ताशी ५० नॉट होता. त्यामूळे जहाजाला सहजासहजी डावीकडे वळवणं खूपच अवघड होऊन बसलं होतं.
शीवाय त्या वेळी मूख्य ईजीनंमध्येही बिघाड झाली होती.
......मी माझ्या डिस्कवरी जहाजासाठी काहीच करू शकलो नाही. याची खंत मला आयूष्यभर राहील. मीच जहाजाच्या या अवस्थेसाठी कारणीभूत आहे "
कँप्टन स्मीथचा चेहरा पडला होता. दूखःची लहर त्यांच्या नजरेत स्पष्ट झळकत होती.

" नाही कँप्टन, तूम्ही आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केलेत. यात तूमची काहीच चूक नाही.
पण या निसर्गाच्या महाकाय विद्रोपापूढे कोणाचंच काही चालत नाही. तूमचाही अखेर नाईलाज होता.
असो जे झालं ते झालं. आता आपल्याला ही बोट बूडायच्या अगोदरच काहीतरी करायला हवं.
कँप्टन तूम्ही मला सांगा आता आपण नक्की आहोत तरी कूठे तूम्हाला काही अंदाज "
जँकने विषयाला कलाटणी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

" काहीच सांगता येणार नाही जँक, खराब हवामानामूळे जहाजातील होकायंञात बिघाड झाली होती.
तरीही माझ्या अंदाजानूसार आपण दक्षिणेकडील साऊथ शेटलँन्ड बेटांच्याच आसपास कूठेतरी असायला हवं.
तूम्हाला कदाचीत कल्पना नसेल पण या दक्षिणी महासागरातील पाणी खूपच थंड आहे. अगदी एखाद्याचा जीव घेण्याईतपत थंड.
-2 सेल्सीअस, या पाण्यात काहीच तासात एखाद्याचा बूडून मृत्यू होऊ शकतो "

" मग आता आपण सी.एम..ए.चं सूरक्षा दल ईथे येईपर्यतं शांत बसून राहायचं का ?"
रॉकीने अगदी योग्य प्रश्न विचारला.

" नाही, हे शक्य नाही, मूळात या एकाच बोटीमध्ये आपण सर्वजणं फार वेळ थांबून राहूच शकत नाही.
शीवाय समूद्रातील जीवघेण्या शार्क माशांपासूनही आपल्याला सावध रहायला हवं. ईथल्या हवामानातही कधीपण अचानक बदल होऊ शकतो.
माझ्या मते आपल्याला लवकरात लवकर एखाद्या जमीनीने व्यापलेल्या पृष्टभागावर पोहचावं लागेल "

" कँप्टन तीकडे बघा काय आहे त्या बेटावर आग लागली आहे वाटतं "
रॉकीने समोरच्या एका लहानशा बेटाकडे ईशारा करत सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.

" काय ?
अरे पण हे कसं शक्य आहे ?
अशा निर्जाण बेटावर कोणी असायलाच नको "
कँप्टन त्या बेटावर लागलेली आग पाहून अगदी चकीत झाले होते.

" पण मग तीथे अचानक आग लागण्याचं कारण तरी काय ?
त्या बेटावर नक्कीच कोणीतरी असायला हवं. कीवां जहाजातून सूखरूप निसटलेले प्रवासीही कदाचीत त्या बेटावर पोहोचले असतील.
त्याशीवाय हे शक्यच नाही. "
जँकने एक पूसटसा अदांज मांडला होता.

" मला तरी असं वाटतंय की आपण तीथे जाऊन एकदा पाहीलेलं बरं
जर त्या बेटावर कोणी असलंच तर कदाचीत त्यांच्याकडून आपल्याला मदतही मीळू शकते "
विल्यमने अखेर तोडं ऊघडलं व तो चर्चेत सहभागी झाला.

" पण अशा ठिकाणी, समूद्रातील एका निर्जन बेटावर कोणाची मनूष्यवस्ती असेल यावर माझा विश्वासच बसत नाही.
कंस शक्य आहे हे ?
नक्कीच ते जहाजातून बाहेर पडल्यामूळे वाचलेले प्रवासी असतील "
कँप्टन स्मीथचा त्या बेटावर कोणी असेल यावर अजूनही विश्वासच बसत नव्हता.

" आपण तीथे गेल्यावर जर या ठिकाणी सी.एम.ए.चं सूरक्षा दल पोहोचलं तर "
लूसीने अगदी योग्य प्रश्न सर्वासमोर ऊपस्थीत केला.

" नाही असं काहीच होणार नाही तू त्यांची काळजी करू नकोस ते नक्कीच जहाजातील प्रवाशांना आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न करतील "
रॉनने लूसीच्या शंकेचं समाधान केलं.

" मला तरी असं वाटतंय की आपण या लहानशा बोटीत बसून राहण्यापेक्षा त्या बेटावर गेलेलं बरं होईल "

" हो ज्यूली तूझं म्हणनं अगदी बरोबर आहे "
रॉनला ज्युलीचं म्हणनं पहील्यांदाच पटलं होतं.

" मग ठीक आहे आपली बोट त्या बेटाच्या दिशेने वळवा "
कँप्टन स्मीथनी पूढाकार घेत प्रत्येकाला योग्य त्या सूचना दिल्या.
अखेर सर्वानीच एकञ चर्चा करून त्या बेटावर जाण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
अजूनही त्या राञीच्या विरळ अंधारात चांदण्याचा लूकलूकाट कायम होता. ते जसजसे बेटापर्यतं पूढे सरकत होते तसतशी पाण्यातील दगडांच्या प्रमाणात अचानकच कमालीची वाढ होत होती. पाण्यात बूडून ऊध्वस्त झालेल्या मोठमोठ्या दगडांवरील चिञविचीञ आकाराच्या भयानक आकृत्या लक्ष वेधून घेत होत्या.

" बघत आहेस जँक निसर्गाचं वाजवी रूप, यालाच म्हणतात कूदरत का करीश्मा "
स्मीथ बोलत असतानाच अचानक निमूळत्या पाण्यामधून वाघाच्या तोडांप्रमाणे भासणारा एक हलका दगड तरंगत वरती आला.
त्या विचीञ दगडाला पाहून ज्युलीने घाबरून मोठ्याने किचांळत जँकचा हात घट्ट पकडला.

" काय गं ? काय झालं ?
ऐवढी घाबरलीस का ?"

" त्या पाण्यामध्ये कोणीतरी भयानक प्राणी होता......मला वाटतंय आपण आणखीन पूढे न गेलेलचं बरं "

" काय पण ?
काहीही मूर्खासारखं बडबडू नकोस ?
तू स्वतःही घाबरतेस आणी मग आम्हालाही घाबरवतेयेस "

" अरे खरंच होतं कोणतरी पाण्यामध्ये "

" कसं शक्य आहे ज्यूली "

" हो जँक तीचं म्हणनं बरोबर आहे
ईथे येणारे पहीले आपणच नाही, आपल्या अगोदरही या ठीकाणी कोणीतरी येऊन गेलयं "

" कशावरून ?"

" ते बघ समोर "
जँकने मान वळवून समोर पाहीले त्या बेटाच्या कीनाऱ्यावर चार-पाच तूटून ऊध्वस्थ झालेली मोठी जहाजं होती. व त्या जहाजांमधून आगीचे मोठमोठे ओघ तळपळत बाहेर येत होते.

" या जहाजांच्या एकदंरीत रचनेकडे पाहता ही जहाजं खूपच जून्या पद्धतीची असायला हवीत असं वाटतयं. अनेक वर्षापासून या कीनाऱ्यावरच अडकून राहील्यामूळे जहाजाचं लाकूडही पूर्णपणे सडलंय "
कँप्टन स्मीथनी जहाजाकडे पाहून एक पूसटसा अदांज मांडला.

" पण ही जहाजं ईथे कशी काय ?"

" त्या बेटावर गेल्याशीवाय आपल्याला काहीच कळणार नाही रॉन "

किनाऱ्यापर्यतं पोहचल्यावर ते सर्वजणच बोटीमधून बाहेर पडले. रॉकीने पेटत्या जहाजामधील एक जाड लाकडाचा तूकडा ऊचलला त्यामूळे त्यांना पूढचा मार्ग शोधण्यास खूपच सोपं होत होतं. त्या बेटावरील बहूतांश जागा वाळूसोबतच काळ्या खडकांनी व्यापली होती. प्रत्येक ठिकाणी वाळूवर सूरकूत्या पडल्या होत्या.
मग ते सर्वजणच समोरच्या मोठमोठ्या दगडांनी व्यापलेल्या जंजाळात शीरले.
जँक अचानक एका ठिकाणी थांबला त्याने एकवार रोखून आजूबाजूला नजर फिरवली.

" सर्वानी सावध व्हा, एकञच राहा का जाणे मला ही जागा खूपच विचीञ वाटतेय "

त्या राञीच्या थंडगार वाळूतून चालताना अचानकच ज्युलीची नजर एका दगडाच्या चिंचोळ्या फटीत गेली.
तीने निट निरखून पाहीलं. दगडांखाली खूपच विचीञ पद्धतीने माणसांच्या कवट्या व तूटलेली हाडं सांभालून ठेवण्यात आली होती.
सर्वच अगदी अनाकलनीय होतं.प्रत्येकालाच त्या निर्जाण बेटावर अचानकच कसलातरी विलक्षण अनूभव येऊ लागला होता.

" ईथे नक्कीच काहीतरी गडबड आहे " जँकने खाली पडलेला एक बाण ऊचलला आणी समोर पाहीले पूढे पूढे तर प्रत्येक ठिकाणी मानवी हांडाची रास पडली होती.

" मला तरी वाटंत आता आपण ईथून निघालेलंच बरं होईल.
या ठिकाणी नक्कीच पूर्वी काहीतरी भयंकर घटना घडली असावी अनेक वर्षापासून एकाच जागेवर मृतदेह पडून राहील्यामूळे कदाचीत ईथे फक्त सांगाडेच शील्लक राहीले असावेत "
जँकने समोर पाहीलं दोन मोठ्या दगडामधून एक चिंचोळी वाट पूढे जात होती.
मग जँकच्या पाठोपाठ त्या लहानशा भूयारातून सर्वजणच हळूहळू पूढे निघाले व एका मोकळ्या ठिकाणी पोहोचले.

" बापरे हे काय ?"
एवढं बोलून ज्युली शांत बसली

समोरचं दृश्य पाहून प्रत्येकजण आच्छर्य चकीत झाला होता.
अनेक मोठमोठ्या गूहाची तोडं आ वासून त्यांच्याकडे पाहत होती.

" ईथे तर कोणीच नाही तूम्ही सर्वजण एवढे घाबरताय का ?"
लूसीने आजूबाजूला नजर फिरवून सर्वाना विचारले.

" सांगू शकत नाही ज्युली
आपल्याला बोटीतून या बेटाच्या किनाऱ्यावरील जहाजांमध्ये जी आग दिसत होती ती आग कोणी लावली असेल मग ?"

" हो तेही खरंच आहे म्हणा "

" मग "

" सांभालून राहा ही जागा खंडर बनली आहे "
जँकला ऐव्हाना हळूहळू परीस्थीतीचा अदांज आला होता.

" मला वाटतं अनेक वर्षापासून ईथे कोणीच आलं नसावं "
सर्वजणच रॉनच्या हातातील पेटलेल्या लाकडाच्या ऊजेडात त्याच्या मागोमाग सावधपणे पूढे जात होते.
समोरच एक मोठा शार्क मासा मरून पडला होता. त्याचे अनूकूचीदार दात जबड्यासकट बाहेर आले होते. पूढे पूढे तर प्रत्येक ठिकाणी माशांटे काटे ऊचं खांबाना लावून ठेवण्यात आले होते. कदाचीत तो एक सूरक्षेचाच ऊपाय असावा.

" ओ माय गॉड ईट ईज अनबिलीव्हेबल यार "
लूसीच्या वाक्याबरोबर जँकने लगबगीने समोर पाहीले. एका काळ्या दगडावर विलक्षण कोरीवकाम करून एक मोठी सूरेख मूर्ती ऊभारण्यात आली होती. व त्या मूर्तीवर कूठल्यातरी हिरवट रान वेळींचे असंख्य हार कोणीतरी चढवून ठेवले होते.
ती निश्चल मूर्ती पाहून असे वाटत होते की वासना, विकार जिंकून बसलेली जगाच्या जंजाळात व झंझावातात अचल राहिलेली ही विभूती तूमच्या आमच्या आटोक्याबाहेर कोठेतरी दूरदूर अगम्य होती. पुन्हा पाहावे, निरखून पाहावे ते त्या शांत अविचल मुद्रेच्या मागे तुम्ही आम्ही जाणल्या नाहीत. अनुभवल्या नाहीत, अशा अपार भावना व उत्कट आवेग होते. त्या मिटलेल्या पापण्यांतून अंतर्ज्ञानाने सर्वांवर दृष्टी होती, ती सबंध मूर्ती चैतन्याने भरलेली रसरशीत दिसत होती. त्या मूर्तीकडे पाहताना ती नक्कीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे असा भास जँकला सारखा सारखा होत होता. त्याने मूर्तीच्या आजूबाजूला नजर फिरवली त्या शीलेभोवती अनेक मानवी कवट्या व हाडं विचीञ पद्धतीने रचून ठेवण्यात आल्या होत्या.
कोणीही मूर्तीला स्पर्श करू नये म्हणून अनूकूचीदार काट्यांची असंख्य टोके प्रत्येक ठिकाणी गूप्त पणे रोऊन ठेवली होती.

" हा काय प्रकार आहे कँप्टन "
जँकने स्मीथना विचारलं.

" माझी तर बूद्धीच आता काम करेनाशी झाली आहे "

त्यांची आपआपसात चर्चा सूरू असतानाच अंधारातून दोन डोळे विल्यमकडे रोखून पाहत होते.
विल्यमची तीकडे नजर जाताच त्याने घाबरून सर्वाना कल्पना दिली.
तरीही तो मोठी हिम्मत करून कसाबसा पूढे गेला.

" विल्यम आता आपल्याला निघायला हवं. ईथे काहीतरी भंयकर घडणार आहे "
वेबने विल्यमला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

" कोण आहे तीथे "
विल्यम डगमगलेल्या आवाजात अडखळतच मोठ्याने ओरडला.
तेवढ्यात विस्कटलेली केसं आणी ऊनाने कालवणलेला भयानक चेहरा घेऊन एक लहान मूलगी अचानक गूहेतून विल्यम समोर आली. तीने अगदी विचीञ पेहराव केला होता. तीच्या गळ्यात माशांच्या दातांनी ओवलेली गोलाकार माळ होती. व कपाळावर सफेद रंगाच्या तीन ऊभ्या रेषा वटवल्या होत्या.
कदाचीत तीच्या विचीञ रूपामूळेच तीची भेदक नजर जीवाचा थरकाप ऊडवण्यासाठी पूरेसी होती.

तीला पाहताक्षणी विल्यमची दातखीळी बसली. तरीही मोठी हिम्मत करून विल्यमने कसेबसे तोडं ऊघडले.

" हाय बेटा
तू ईथेच राहतेस ना ?"

त्या मूलीने विल्यमच्या बोलण्याला काोणताच प्रतीसाद दिला नाही. बराच वेळ तीची एकाकी नजर विल्यम वर रोखून होती.

" तूझं नाव काय ?
प्लीझ तू आमची मदत करशील ?
तूझे आईबाबा कूठे आहेत. त्यांना बोलवून आणतेस का, प्लीझ ?"

" विल्यम चल लवकर आपण आता ईथून निघालेलंच बरं होईल "
जँक विल्यमला कसाबसा समजावत होता.

त्या मूलीने तीचा ऊजवा हात विल्यमपूढे केला. मग विल्यमनेही तीला पाहून त्याचा डावा हात तीच्या समोर धरला
विल्यमच्या हाताचा स्पर्श होताच ती अचानक मोठमोठ्याने ओरडू लागली. तीच्या वागण्यात नकळतच एक विलक्षण बदल जाणवू लागला. एकाएकी विल्यमच्या हाताचा जोरात चावा घेऊन ती धावत एका अंधाऱ्या गूहेत पळून गेली.
मग विल्यमही रागाने हात झटकत तीला पकण्यासाठी ताबडतोब तीच्या मागे धावला.
पण धावताना समोर पाहताच त्याच्या हदयाचा ठोका चूकून गेला. नखशीखांत हादरणं म्हणजे काय याचा त्याला चांगलाच प्रत्यय आला. ती लहान मूलगी एका म्हातारीच्या कूशीत जाऊन लपली होती. त्या म्हातारीचे छद्मी हास्य पाहून विल्यम त्याच्या नकळतच दोन पाऊले मागे सरकला.
वेड्यावाकड्या काठीचा आवाज करत ती दमलेली म्हातारी धापा टाकत गूहेतून हळूहळे बाहेर येऊ लागली.
कीडलेले दात ईचकत तीने आभाळाकडे पाहून एक दिर्घ श्वास घेतला. आणी नकळतच एका विजेच्या लूकलूकाटाने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. मग हळूहळू रिमझीम पाऊस सूरू झाला.
जणू काही त्या म्हातारीच्या बोलवण्यानेच पावसाचे आगमन झाले असावे. ती विचीञ माणंस प्रत्येक गूहेमधून त्यांच्याकडे दाटीवाटीने लपून पाहत होती.

" सर्व ठीक आहे फक्त काही बायका आणी म्हातारी माणंस आहेत
आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही "
विल्यम खरंतर स्वतःच खूप घाबरला होता. पण ऊगाचच तो ईतरांसमोर आपण कीती निडर आहोत हे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता.
एकमेकांसोबत बोलत असतानाच ती विचीञ माणसं अचानकच गूहेतून त्या सर्वावंर धावून आली.
एका गोलाकार जाड रस्सीने त्या माणसांनी प्रत्येकाला गूडांळून ठेवलं.
त्याच धांदलीत गर्दीतून त्यांच्यामधील एक माणूस पूढे सरसावला. दणकट बांधा व कमालीची शरीरयष्टी असलेला तो माणूस कदाचीत त्यांच्या टकील्याचा म्होरक्या असावा.
त्याने जँककडे तीक्ष्ण डोळ्यांनी बराच वेळ एकवार रोखून पाहीले. मग तो जँकच्या जवळ आला. त्याने जँकच्या कपाळावर कसलीतरी पिवळट भूटकी लावली. मग अचानकच डावा हात ऊचांवून तो मोठ्याने ओरडू लागला.

" जथूरा.......जथूरा..... बारफरबोसा "
त्याच्या एका वाक्यानेच सर्व आदिवास्यामध्ये आरडाओरडा सूरू झाला. मग सर्वजणच एकसाथ हात ऊचांवून त्या माणसांपाठोपाठ मोठमोठ्याने ओरडू लागले.

" जथूरा ..... जथूरा .... जथूरा ..... जथूरा "

त्याच्यां पैकी एकाने कसल्यातरी हिरव्या फूलांच्या माळी सर्वाच्यां गळ्यात घातल्या.
त्या सर्वानी जँकला ऊचलून धरलं होतं. मग प्रत्येकजण एका आगीच्या जंजाळापूढे त्यांच्याभोवती रीगंण करून नाचू लागले.

" हा काय प्रकार आहे कँप्टन "

" मला ही काही काहीच कळत नाही आहे "

" त्यांनी जँकला ऊचलून का घेतलयं "
ज्युलीने जँकच्या तोडांकडे बघत रॉनला विचारले.

" ही झीब्बा आदीवाशांची एक जमात आहे हे लोक कदाचीत पूर्वीपासूनच या बेटावर राहत असावेत "
एलीजाबेथने त्या सर्वानां कल्पना दिली.

" पण एलीजाबेथ तूला कसं काय हे माहीत "

" मी एक भाषा विशारद आहे.
मी एन्शीअन्ट लँग्वेज शास्ञामध्ये पी. एच. डी. केली आहे.
आफ्रिकेतील दक्षिणी बेटांमध्ये राहणाऱ्या सर्वात जून्या आदीवास्याच्या जमातीमध्ये यांची गणना होते.
हे लोक गूप्त ठिकाणी टोळ्या करून राहत असल्यामूळे यांचा बाहेरच्या जगाशी केव्हांच संबंध येत नाही. त्यामूळेच यांच्या जमातीविषयी आतापर्यतं फारच कमी संशोधन झालं आहे.

" तूला यांची भाषा समजते का ?" विल्यमने लगबगीने एलीजाबेथला विचारले.

" हो थोडीफार, मी प्रयत्न नक्कीच करेन "

" प्लीझ आम्हाला सांग ना हे आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत "
त्या आदिवास्यांचं म्हणनं खरंतर सर्वानाच जाणून घ्यायचं होतं.

" 'जथूरा' हा प्राचीन आफ्रीकन लिपीमधील एक शब्द आहे.
याचा अर्थ होतो ' सापडणे ' म्हणजे आपल्याला जी गोष्ट हवी असते ती मीळाल्यावर होणारा आनंद व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा प्रयोग करतात "

" म्हणजे आपल्याला पाहून या आदीवास्याना आनंद झाला आहे का ?"

" हो " एलीजाबेथ

" पण का ? तू विचार ना त्यांना " विल्यमने पून्हा तोडं ऊघडले.

" आफरेन्सू बारफरबोसा अंस काहीतरी म्हणतायेत हे "
रॉनने त्या आदीवास्याचे शब्द ऊच्चार निट ऐकून एलीजाबेथला सांगीतले

" आरफेन्सू बारफरबोसा म्हणजे हे आदिवासी बार्बोसावीषयी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत "
एलीजाबेथने त्यांच्या वाक्याचा अर्थ सर्वाना समजाऊन सांगीतला.

" काय ?" रॉन

" हो " एलीजाबेथ

त्यांचं बोलणं सूरू असतानाच त्या आदिवास्यांपैकी एकजण आगीने जळलेला एक लाकूड घेऊन गूहेतून बाहेर आला मग त्याने एकमेकांवर लाकडं रचून मोठा विस्तव पेटवला. त्याने हिरव्या पानात त्या सर्वासांठी मासे शीजवून आणले होते.

" तू काय सांगत होतीस एलीजाबेथ "
विल्यमने पून्हा चर्चेस सूरवात केली.

" हे आदीवासी बार्बोसाविषयी काहीतरी बोलत होते " एलीजाबेथ

" पण या आदिवास्याना बार्बोसाच्या खजाण्याविषयी कसं काय माहीत पडलं "
रॉन

" कारण याच बेटावर बार्बोसाने आपले प्राण सोडले होते "
विल्यमच्या या वाक्याबरोबरच सर्वानी आपआपल्या नजरा विल्यमकडे वळवल्या.

" म्हणजे तूला माहीत आहे विल्यम आपण कूठे आहोत ?"

" हो याच बेटावर बार्बोसाने त्याचा खजाणा कूठेतरी लपवून ठेवला आहे.
जेव्हां बाहेर ऊभी केलेली बार्बोसाची मूर्ती मी जेव्हां पाहीली तेव्हांच मला याची कल्पना आली होती "

" तूला या खजाण्याविषयी जे महत्वाचे पूरावे सापडले होते त्यात नक्की काय होतं विल्यम ?"

" नाही त्या पूराव्यात काय होतं हे मी तूम्हाला सहजासहजी सांगणार नाही "

" विल्यम जर या आदिवाशांच्या कचाट्यातून आपल्याला सूखरूप निसटायचं असेल तर तूला बार्बोसाविषयी आम्हाला सर्वकाही खरंखरं सांगावचं लागेल "
जँकने मूख्य मूद्दा मांडला

" मी एकाच अटीवर तूम्हाला पूराव्यातील सर्व माहीती सांगण्यास तयार होईन "
विल्यमने अखेर आवेढावे घेत विषयाला दूजोरा देण्यास सूरवात केली.

" आता काय आणी " जँक

" जर आपल्याला हा खजाणा सापडला तर तो फक्त मलाच मीळाला पाहीजे.
त्यावर फक्त माझाच अधीकार असेल आणी जर तूम्ही तसं नाही केलंत तर मी कोणाच्याच हाती काही लागू देणार नाही "

" ठीक आहे कबूल
पण कशावरून तू आम्हाला सर्वकाही खरं खरं सांगशील "
जँक थोडावेळ थांबून म्हणाला.

" जर तूम्हां सर्वाना या आदिवास्यांच्या तावडीतून सूखरूप निसटायचं असेल तर तूम्हांला माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागेल.
आता तूमच्याजवळ दूसरा कोणताच पर्याय नाही "

" ठीक आहे विल्यम तूझ्याजवळ बार्बोसाच्या खजाण्याविषयी जी काही माहीती असेल ती आम्हाला लवकरात लवकर सांग "

अखेर आवेढावे घेत विल्यमने एक दिर्घ श्वास घेतला मग बोलण्यास सूरवात केली.

" सूमारे पाचशे वर्षापूर्वीची ही गोष्ट.....त्या काळी आफ्रीकेच्या नैर्यूत्येला एका विशाल बेटावर द ग्रेट एम्पायर कीगं ऑफ बार्बोसा हा बलाढ्य राजा राज्य करत होता. उत्तरेकडून येणाऱ्या ब्रिटीश, डच, स्पँनीश दर्यावर्दीच्यां स्वाऱ्यांना तीव्र प्रतीकार करत बार्बोसाने आपलं साम्राज्य टिकवून ठेवलं होतं.
किगं बार्बोसाच्या नैदलाची ख्याती त्यावेळी अवघ्या जगभर पसरली होती. व्यापार, स्थापत्य, कला व ईतर अनेक क्षेञात त्याचा हातखंडा होता. कदाचीत त्याच्या या गूणांमूळेच त्याचे शेजारच्या दोस्त राष्ट्रांशी सलोख्याचे सबंध निर्माण झाले असावेत "
सर्वजणच विल्यमचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होते.
पण त्या आदिवास्याना माञ विल्यमची भाषा काहीच कळत नव्हती. ते नूसते विल्यमच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच बोलणं समजण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.

विल्यम काही वेळ थांबला मग त्याने पून्हां बोलण्यास सूरवात केली
" ट्रेजर हंटीग एजन्सीकडून मिळालेल्या पूराव्यानूसार बार्बोसाला देवाधर्माची व धार्मीक विधीची विशेष आवढ होती. शीवाय आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी तो दिवस राञ एक करत असे त्याला लहान मूलं आवडत. बार्बोसाच्या अशा प्रामाणीक व्यवहारामूळे व स्वराज्यासाठी सतत झगडण्याच्या कूशल वृत्तीमूळे तो जनतेचा प्रिय आदर्श राजा म्हणून नावारूपास आला होता.........पंरतू राजकूमार कँनाझारो सोबत त्याचे नेहमीच वाद होत असत कारण कँनाझारो आपल्या वडीलांच्या दैनीक कार्य कारभारात ढवळाढवळ करत असे. बार्बोसाच्या नकळत तो प्रजेतील गरीब रहीवाश्याना लूबाडत असे. त्यांचे हाल करून त्यांना लूटत असे परंतू तो बार्बोसाचा पूञ व राजकूमार असल्याने त्याच्याविरूद्ध कोणाचीही शब्द काढण्याची हिम्मत नव्हती. पण एके दिवशी एका खाजगी गूप्तहेरामार्फत कँनाझारोचं हे वाजवी रूप बार्बोसाच्या नजरेस आलं. त्यामुळे बार्बोसा खूपच अस्वस्त झाला.
रागाच्या भरात त्याने कँनाझारोला शीक्षा म्हणून आपल्या राज्यातूनच हद्दपार केलं. पूढे काही काळाने कँनाझारो आपल्या मिञाच्या वाईट संगतीने फ्रान्सीस्को पुजारोच्या टोळीत सामिळ झाला.

" ह्याचं नाव मी कूठेतरी ऐकलं होतं "
कँप्टन स्मीथनी क्षणभर फ्रान्सीस्कोचं नाव आठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मग विल्यमने पून्हा बोलण्यास सूरवात केली

" फ्रान्सीस्को पुजारो हा त्याकाळातील स्पेनमधील सर्वात मोठा दरोडेखोर म्हणून कूप्रसीद्ध होता. कँनाझारोची साथ मिळताच फ्रान्सीस्कोने बार्बोसाच्या राज्यात दरोडा लूट करण्यास सूरवात केली. बार्बोसाचं उत्तर-दक्षीण अमेरीकेतील बहूतांश राज्यांशी सलोख्याचे व्यापारी संबध होते. त्या बेटाला नैसर्गीकरीत्या सोन्याची उपलब्धी लाभल्यामूळे बार्बोसाचं राज्य सोन्याची निर्यात करण्यामध्ये अग्रेसर होत. त्यामुळे त्याच्या राज्याची संप्पतीही अफाट होती. आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी व सूखसुवीधांसाठी बार्बोसा राज्याच्याच तीजोरीतील सोन्याचा वापर करत असे. त्यामूळे किगं बार्बोसाच्या खजाण्यावर फ्रान्सीस्कोची वाईट नजर पडल्यावातून राहीला नसती तरच नवल. राज्यामध्ये चोरीच्या घटनांची संख्या हळू हळू वाढू लागल्याने बार्बोसाला आपल्या मैल्यवान खजाण्याच्या भावी संरक्षणाची चीतां भेडसाऊ लागली. एकीकडे बार्बोसा आपल्या राज्य कारभारात गूंतलेला असताना दूसरीकडे फ्रान्सीस्को व कँनाझारो स्पेनमधील एका छोट्या व्दिपक्षी राजाच्या मदतीने ग्रेट एम्पायर ऑफ बार्बोसाच्या बलाढ्य सैनेविरूद्ध यूद्ध पूकारण्याच्या तयारीत गूंतले होते.
आणी एके दिवशी अखेर व्हायचं तेच झालं. भल्या पहाटे फ्रान्सीस्को व कँनाझारोची सेना डोगंर-दरीतून बार्बोसावर चालून आली. बलाढ्य हत्तीच्यां चित्काराने अवघ्या जनतेची झोप ऊडाली नसती तरच नवल. फ्रान्सीस्कोचे सैन राज्यात घूसून एखाद्या सैतानासारखे अगांत वार भरल्यागत गरीबांची घरदारं ऊध्वस्त करू लागले. बार्बोसानेही प्रसंगवधान राखून सेनापतीच्या मदतीने आपल्या धाडसी सैन्याना लढ्यास सज्ज केले. बार्बोसाच्या सैन्याने द्विपक्षी राज्याच्या दृष्ट सैन्याना कठोर प्रतीकार करत त्यांना माघार घेण्यास भाग पाडले अखेर द्विपक्षी राज्याने शरणागती पक्तारली.
जरी अाकस्मीत रीत्या झालेलं हे यूद्ध बार्बोसा जिकलां असला तरी त्याच्या प्रजेचं अतोनात नूकसान झालं होतं. घरंच्याघरं त्यांनी लूटून ऊध्वस्त केली होती. बरीच जिवीतहानीही झाली होती. यूद्ध सूरू असतानाच व्दिपक्षी राज्याची एक टोळी गूप्तपणे राजवाड्याच्या दिशेने धावत गेली होती. त्यांनी राजवाड्यातील रक्षकानां ठार मारून बार्बोसाच्या पत्नीचा वध केला होता.
यूद्ध संपल्यावर बार्बोसाला ही बातमी कळताच तो खूप दुखी झाला.
बार्बोसाने फ्रान्सीस्कोचा वध करून त्याने लूटलेली संपत्ती पून्हा मिळवून देण्याचे वचन आपल्या प्रजेला दिले.
त्यासाठी कँलीफोर्नीयातील आपल्या एका मिञ राष्ट्राची मदत घेण्याची योजणा त्याने आखली. यूद्ध संपले असले तरी त्याच्या राज्याच्या तिजोरीला फ्रान्सीस्को पासून असलेला धोका अजूनही टळला नव्हता. कारण राज्याची डगमगलेली अवस्था पाहता फ्रान्सीस्को पुन्हा कधीही येऊन लूटमार करू शकला असता. त्यामूळे राज्याच्या भावी कल्याणाकरता व सरंक्षणासाठी बार्बोसाने राज्याच्या खजाण्यातील एक तृतीअंश हिस्सा कँलीफोर्नीयातील आपल्या दोस्त राष्ट्राच्या कठोर संरक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी उजाडताच भल्या पहाटे बार्बोसाने आपल्या नैदलातील, सैन्यातील मूख्य अधीकाऱ्यासह व काही विश्वालातील राज्यकर्त्यासह एक महत्वाची राज्यसभा घेतली.
अंटलाटीक मार्गे दक्षीण अमेरीकेच्या टोकाला वळसा घालून पँसीपीक महासागरात प्रवेश करायचा व पुन्हा व उत्तरेकडे प्रवास करत कँलीफोर्नीयाला पोहचायचं.
नैदलाच्या या प्रस्तावावर राजवाड्यामधील सर्व अनूभवी राज्यकर्त्यामध्ये चर्चा सूरू झाली अखेर प्रवासासंबधी रंगलेल्या त्या दरबारात नैदलाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
जरी हा सागरी प्रवास धोक्याचा असला तरी दक्षिण अमेरीकेच्या उत्तरेकडून कँलीफोर्नीयाला पोहोचण्यापेक्षा ते पँसीपीक मार्गे लवकर पोहोचू शकले असते. शीवाय आपल्या राज्यात लवकरात लवकर परतणंही तेवढंच महव्ताचं होतं.
स्वतःच्या अत्यतं विश्वालातील प्रधानावर राज्याची धूरा देत आपल्या मैल्यवान खजाण्यासह नैदलातील तीन प्रमूख जहाजांचा ताफा घेऊन बार्बोसाने दक्षीणेकडे कूच केली. मूख्य जहाजाच्या मध्यभागी खजाणा अगदी सूरक्षीत ठेवण्यात आला होता. त्याच्या दोन्ही बाजूला डावीकडे व ऊजवीकडे नैदलाची आणी लश्करी सैन्याची दोन संरक्षक जहाजे होती. उत्तर अमेरीकेला पोहोचण्यासाठी त्यांना अटलांटीक ओलांडून पँसीपीकमध्ये प्रवेश करणं भाग होतं. चार दिवसाच्या लाबंलचक प्रवासानंतर त्यांचे जहाज अखेर अटंलाटीकमार्गे दक्षिण अमेरीकेच्या केप हॉर्न पर्यतं पोहोचले. प्रवासाला खूपच उशीर झाला होता त्यामूळे केप हॉर्नला विश्रांतीसाठी फार वेळ न घालवता त्याच्या जहाजाच्या ताफ्याने ड्रेक पँसेजमधून पँसीपीक मध्ये प्रवेश करण्याची योजना आखली. परंतू झंझावती वाऱ्याच्या वादळाचा सामना करत त्यांच्या जहाजांनी कशीबशी ड्रेक पँसेजपर्यतच मजल मारली. पूढचा मार्ग तर खूपच खडतर होता. त्यातच वाऱ्याचा वेग बेसूमार वाढल्याने ड्रेक पँसेजमधून सूखरूप बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होऊन बसलं होतं.
असं म्हणतात की जहाजाच्या कँप्टनने धोक्याचा ईशारा आधीच दिला होता पण पाण्याच्या राक्षसी ओबडधोबड प्रवाहांवर आदळत आपटत त्यांच्या जहाजाचा ताफा दक्षिणेकडे वाहत चालला होता. तेवढ्यात जहाजाच्या होकायंञावर एक जोराचा नॉक झाला. त्यातून वीप एेकू येऊ लागली. जहाजाच्या सरळ रेषेत एक मोठं बेट दिसत होतं. त्या चिचोंळ्या मार्गातून पूढे जाणं खूपच अवघड असल्याने जहाजाच्या कँप्टनने व बार्बोसाने मिळून त्या लहानशा बेटावरच उतरण्याचा निर्णय घेतला.
तीच ही साऊथ शँटलँड बेट

" या सर्वच गोष्टी अगदी आच्छर्यकारक आहेत "
लूसी विल्यमने सांगीतलेली कथा एेकून
सून्न झाली होती.

" मग पूढे काय झालं विल्यम "
ज्यूलीने अर्धवट जळलेला एक लाकडाचा तूकडा आगीमध्ये पूढे सरकवत विचारलं.

" ट्रेजर हंन्टीग एजन्सी कडून मिळालेल्या पूराव्यानूसार बार्बोसाच्या नैसैनिकानी जहाजाच्या डेकवरून खाली पाय ठेवताच या बेटावरच्या स्थानीक चिब्बा आदिवास्यानी गूप्तपणे त्यांच्यावर बाणाचा वर्षाव करण्यास सूरूवात केली. जहाजाचां ताफा घेऊन आलेली ही माणसं आपल्या बेटावर कब्जा करायच्या हेतूने आली असावी असा गैरसमज झाल्यामूळे या आदिवास्यानी बार्बोसाच्या सैन्यावर हल्ला केला. मग दोन्ही पक्षामध्ये एक छोटीशी घनघोर लढाई जूंपली. त्या लढाईत नकळत कूठूनतरी वेगाने सळसळत येणाऱ्या एका विषारी बाणाने बार्बोसाच्या उजव्या खांद्याचा वेध घेतला. त्यामूळे बार्बोसा क्षणार्धात बेशूद्ध होऊन खाली कोसळला.
त्याबरोबर यूद्ध थांबले. पंरतू सत्य परीस्थीतीची जाणीव होताच या आदिवास्यानी बार्बोसाची माफी मागून त्याच्या जखमी खांद्याला कसल्यातरी विषविरोहीत झाडाच्या पाणांचा पाला लावला ती जखम भरून काढण्याचे या आदिवास्यानी अतोट प्रयन्त केले. व बार्बोसाला त्याच्या पूढच्या प्रवासासाठी मदतीचे आश्वासनही दिले. पण त्याच्या खाद्यांची जखम ईतकी खोलवर होती की बार्बोसाला जास्त दिवस तग धरून राहणे जवळजवळ अशक्यच होत. म्हणून लढाईतून सावरल्यावर सरंक्षणासाठी बार्बोसाने आपला दिव्य खजाणा जहाजातून उतरवून कोणालाही लवकरात लवकर सापडू नये यासाठी ईथल्या आदिवास्याच्या मदतीने या बेटावरील एका गूप्त गूहेत संरचना करून लपवून ठेवला.

" म्हणजे खजाणा कूठे आहे ते या आदिवास्याना माहीत होतं ?"
लहानग्या कॉर्नरने अगदी योग्य प्रश्न उपस्थीत केला

" कदाचीत माहीत असेलही "

" मग बार्बोसाचं पूढे काय झालं ?"

" एकीकडे बार्बोसा त्या अजान व्दिपावर अडकलेला असताना उत्तरेला कँनाझारोने व फ्रान्सीस्कोने विपक्षाची मदत घेऊन बार्बोसाच्या मूख्य प्रधानाला आपल्या बाजूने वळवून घेतलं. बार्बोसाच्या राज्यावर कँनाझारोने त्याची जालीम सत्ता अमलात आणली.

बार्बोसाचा सूड घेण्यासाठी व खजाण्याच्या लालसेपायी कँनाझारोने आणी फ्रान्सीस्कोने प्रधानाच्या मदतीने बार्बोसाच्या जहाजाचां मार्ग जाणून आपला मोर्चा दक्षीणेकडे वळवला. फ्रान्सीस्को खजाणा लूटण्यासाठी या बेटावर चालून येत आहे याची तिळमाञही जाणीव बार्बोसाला असती तरच नवल.
बार्बोसाचा आता कोणीही वारसदार नव्हता. शिवाय पत्नीच्या मृत्यृमूळे व मूलाच्या दृष्ट व्यवहारामूळे तो खूपच दूखावला गेला. त्यातच हाताच्या वेदनांनी कळस गाठला होता. कदाचीत स्वतःच्या मृत्यूची चाहूल त्याला अगोदरच लागली असावी. कारण त्याच दिवशी भर दूपारी कोणताही मागमूसा नसताना अचानकच फ्रान्सीस्कोची चोरटी जहाजे बेटाच्या कीनाऱ्यावर धडकली. अंगात वारं भरल्यागत त्यांचे लूटारू बार्बोसाच्या सैन्यांवर तूटून पडले. आयत्या वेळेला जागून दिलेल्या शब्दाचा मान राखत या बेटावरील आदिवास्यानी बार्बोसाच्या बाजूने लढ्यात भाग घेतला. त्या घनघोर यूद्धात दोन्ही पक्षाची बरीच जिवीतहानी झाली.
पण महत्वाची गोष्ट म्हणजे बार्बोसाच्या सर्वात विश्वासू प्रधानानेच त्याचा विश्वासघात करून फ्रान्सीस्कोला या बेटावर आणले. याची जाणिव होताच बार्बोसा स्वतःच्याच नजरेत उतरला. त्याला हा धक्का सहन होण्या पलीकडचा होता.
त्याच संधीचा फायदा घेत कँनाझारोने त्याच्या पित्यावर म्हणजेच बार्बोसावर मागूनच तलवारीचा एक जबरदस्त वार केला.
बार्बोसा क्षणार्धात खाली कोसळला. मरता मरता त्यांचे शेवटचे शब्द अवघ्या आसमंतात घूमूने गेले.

' नाश होईल तूम्हा सर्वाचां नाश होईल हि नियती क्षणार्धात सगळंच ऊध्वस्त करेल, एक सच्चा बालक यैधाच ह्या खजाण्याला प्राप्त करू शकेल. हि नीयतीच त्याला ईथपर्यतं घेऊन येइल. नाश होईल तूमचा अंतं जवळ आला आहे '
एवढं बोलून बार्बोसाने आपले प्राण सोडले. असं म्हणतात की तो मेल्यानंतरही काही क्षण त्याचा आवाज येत राहीला होता "

" मग "

" मग काय ?
एक स्मशान शांतता पसरली.....हो ती वादळापूर्वीची शांतता होती. अचानकच त्या रहस्यमयी शांततेचा भंग करत राक्षसी जीवघेण्या वाऱ्याने थैमान मांडले. अन क्षणार्धात सर्व दृश्यच पालटून गेलं. हिमाच्या वाजवी वर्षावाने व वाऱ्याच्या धूवांदार वेगाने कळस गाठला. जणू काही त्या वादळात संपूर्ण बेटच बूडून गेला असावा.
अखेर झूंझार प्रतीक्षेनंतर ते वादळ थांबलं खंर पण तोंपर्यत खूपच उशीर झाला होता. त्या ठिकाणी मृत्यूची रास पडली होती. काहीजण पाण्यात फेकले गेले होते. तर काही जण त्या गोठवणाऱ्या बर्फात अडकून जिवाच्या आकांताने ओरडत होते.
त्या घटनेनंतर अनेक कर्तूत्ववान राज्यानी बार्बोसाच्या खजाण्याचा शोध घेण्याचा खूप प्रयन्त केला परंतू त्यांच्याही हाती काहीच लागलं नाही ते बेट कोणालाच शोधता आलं नाही म्हणून आतापर्यतं जगाच्या ईतीहासात
' द ईलूजन टू इनव्हीजीबल ट्रेजर आॉफ कीग बार्बोसा ' या नावाने हा खजाणा काळानूरूप लयास पावला. जगाच्या कोणत्याच नकाशात या बेटाची नोदं नाही. पण कँलीफोर्नीयातील एका ट्रेजर हंटर एजन्सीने या बेटाचा शोध लावला. व एका गूप्त समितीचे आयोजन केले. त्या समितीने जवळजवळ खजाण्यासंदर्भात सर्वच माहीती मिळवली होती. त्या एजन्सी मध्ये जँकचे वडीळही कार्यरत होते "
एवढं बोलून विल्यम अखेर थांबला. त्याने ऊब मिळवण्यासाठी त्याचे थंडगार हात विस्तोपूढे पसरले
विल्यमने सांगीतलेल्या सर्वच घटना अगदी अच्छर्यकारक होत्या.

" रफहा वान्सू कार्मत होरफता "
खूप वेळ शांत बसून राहीलेल्या (नार्गोने) कटील्यातील म्होरक्याने अखेर बोलण्यास सूरवात केली.

" हा विचारतोय विल्यमने आता आपल्याला काय सांगीतलं.
मी सांगू का यांना " एलीजाबेथ

" हो यांनाही हे सर्व कळायला हवं "
कँप्टन स्मीथनी एलीजाबेथला परवानगी देताच विल्यमने सांगीतलेली बार्बोसाबद्धलची सर्व माहीती एलीजाबेथने त्या आदिवास्याना सांगून टाकली.

" आरम आरवैध्य बारफरबोसा
आरम मारफोया आरवू "

" याचं काय म्हणनं आहे यावर "
कँप्टन स्मीथनी एलीजाबेथला विचारलं

" हा म्हणतोय की आम्ही बार्बोसाचे आभारी आहोत. आम्ही सर्वजण तूम्हाला बार्बोसाचा गूप्त खजाणा शोधण्यासाठी मदत करू.
कारण जँकला ते बार्बोसाचं एक रूप माणतात म्हणूनच त्यांनी आपल्यावर आतापर्यतं हल्ला केला नाही "

" जर असं झालं तर खूपच बरं होईल. कारण या बेटावर तो खजाना शोधण्यासाठी आपल्याला यांची मदत तर मिळेलच शीवाय सी. एम. ए. चं सूरक्षा दल ईथे येईपर्यतं आपण या आदीवास्यांसोबत अगदी सूरक्षीत राहू "

जँक शांतपणे सर्व एकत होता. आपल्या वडीलांनी खजाण्याच्या शोधात दिलेले योगदान तो सहजासहजी विसरू शकत नव्हता. कारण त्याला वडीलांच स्वप्न पूर्ण करण्याची आस लागली होती.

क्रमशः
पूढील भाग लवकरच.................

प्रतिक्रिया

पालींची बदनामी थांबवा!!!!!!