आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे

Disclaimer : खालील लेख ऐसीवरील 'डू आयडी' विषयी नाही.

मी एकदा एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांची जेवणाची वेळ चालली होती. वाट पहात मी कार्यालयाच्या आवारात फिरत होतो. तेथे इतर काही लोकसुद्धा कार्यालयाच्या जेवणाची वेळ संपण्याची वाट पहात वेळ काढत होते.

आणि अचानक एक गृहस्थ माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिले. मला म्हणाले "नमस्कार! कसे आहात तुम्ही?" त्यांच्याकडे मी पाहिले पण माझ्या काही लक्ष्यात येईना की मी पूर्वी त्यांना कुठे भेटलोय ते! बरं त्यांना त्यांची ओळख विचारायला मला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. न जाणो खरंच ते माझ्या ओळखीचे असतील आणि मी त्यांना विसरून गेलो असेल, तर उगाच त्या बिचार्यांना वाईट वाटायचं.

मीसुद्धा नमस्कार केला "नमस्कार! काय म्हणताय?" पुढे दोन चार मिनिटे आमच्यात त्या कार्यालयातील असणाऱ्या आमच्या कामाबद्दल सर्वसाधारण बोलणे चालले. पण अजूनही माझी ट्यूब काही पेटेना की मी त्यांना अगोदर कुठे भेटलोय ते! मीसुद्धा भिडेखातर ते गृहस्थ जसे बोलतील तसे त्याला अनुसरून माझे संभाषण सुरू ठेवले.

आणि अचानक त्या गृहस्थांनी मला विचारले "तुमच्या ऑफिसमधले ते अमुक अमुक रिटायर झाले का हो?" मी विचारले "कोण हो?"  गृहस्थ "ते उंच, गोरे गोरे, घाऱ्या डोळ्यांचे?" मी "छे हो! अशा वर्णनाची व्यक्ती आमच्या ऑफीसमध्ये कधीच नव्हती. कोणाविषयी विचारताय तुम्ही?" त्यावर त्या गृहस्थांनी थोडेसे थांबून विचारले "तुम्ही अमुक अमुक कंपनीत काम करता ना?" मी "नाही हो! मी गेली तीस वर्षे तमुक तमुक कंपनीतच काम करतोय." गृहस्थ "तुम्ही जोशी ना?" मी "नाही हो! मी काळे." गृहस्थ "माफ करा हं! मी तुम्हाला जोशीच समजलो. पण तुम्ही अगदी डिट्टो त्या जोश्यांसारखेच दिसता हो, म्हणून माझा गैरसमज झाला. माफ करा." असं म्हणून त्यांनी काढता पाय घेतला आणि मी अवाक् होऊन  त्यांना जाताना पहात बसलो.

बऱ्याचदा असे होते की एखादी व्यक्ती आपल्याला कोणीतरी दुसराच समजून आपली त्याच्याशी घनिष्ठ ओळख असल्यासारखी आपल्याशी बोलू लागते. आपली चौकशी करू लागते. आणि आपल्याला जेव्हा समजते की समोरच्याला अपेक्षित असणारी व्यक्ती आपण नाही आहोत, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की त्या व्यक्तीचा आपल्याविषयी गैरसमज कसा काय झाला? आपल्या सारखीच दिसणारी व्यक्ती त्याने कुठे पाहिली असेल? कोण असेल ती? काय करत असेल? असा अनुभव आपल्या सर्वांनाच बहुतेक वेळा आला असेल याची मला खात्री आहे.

असे का होते? याचे उत्तर मी बऱ्याच वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते. तेव्हा केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले होते की संपूर्ण जगभरात एकसारखी दिसणारी, एकाच वयाची, एकाच रंगरूपाची आणि अंगकाठीची किमान सात व्यक्ती एकाचवेळी जगत असतात. फक्त त्या सात व्यक्ती जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असल्याने आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ न शकल्याने त्यांना समजतच नाही की आपल्यासारखीच दिसणारी जगभरात एकूण सात माणसं फिरताहेत. माझ्या मनात कधी कधी एक गमतीदार विचार येतो, की कदाचित विधाता वेगवेगळे मॉडेल बनवून बनवून आता थकला असेल. त्याची कल्पनाशक्तीसुद्धा आता बोथट झाली असेल. कदाचित कंटाळलाही असेल. म्हणूनच विधाता आता मनुष्यप्राणी बनवायला पुन्हा पुन्हा तोच तो साचा तर वापरत तर नसेल!?

अहो, पूर्वीतर माझे मित्र मला नेहमी म्हणायचे की माझ्या भावाने तुला मुंबईत इथे पाहिला, माझ्या बाबांनी तुला मुंबईत तिथे पाहिला. आणि मी तर तिथे तेव्हा गेलेलोच नसायचो. मला फार आश्चर्य वाटायचे. मुंबईत फिरणाऱ्या माझ्या डुप्लिकेटला भेटण्याची तेव्हा मला फार उत्सुकता असायची. पण मला तो कधी भेटला नाही.

हो! माझ्या तरुणपणी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला एक चित्रपट कलावंत मात्र होता. जो अगदी शेम टू शेम माझ्यासारखाच दिसायचा. मी जिथे जाईल तिथे लोकं मला त्याच्या नावाने बोलवायचे. अगदी माझं लग्न ठरलं तेव्हाही माझ्या सासुरवाडीची लोकं एकमेकांना म्हणायची. "आपला होणारा जावई ना, अगदी डिट्टो त्या हिरोसारखा दिसतो हो!!!" हे ऐकले की माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचं. खी: खी: खी:

असो. आपण नेहमीच वर्तमानपत्र आणि मासिकांत वेगवेगळ्या हिरो हिरोईनच्या डुप्लिकेटचे फोटो पहात असतो. चित्रपटावरून एक आठवलं. १९७८ साली 'नसबंदी' नावाचा आई. एस. जोहर यांचा एक चित्रपट आला होता. ज्यामध्ये पाच नायक होते. पण ते सर्वच्या सर्व त्या काळातील प्रसिद्ध हिरोंचे डुप्लिकेट होते. चित्रपट निर्माते असे डुप्लिकेट कुठून शोधून आणतात कोण जाणे? आमचेच डुप्लिकेट आम्हाला कसे भेटत नाहीत ते!!!

चित्रपटाप्रमाणे राजकारणातसुद्धा सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर केला जात होता. मी तर कुठेतरी वाचलं होतं की 'हिटलर'नेसुद्धा आपल्यासारखेच दिसणारे सात आठ हिटलर जमवले होते. अतिमहत्वाच्या व्यक्ती ऐतिहासिक (की पुराण?) काळापासूनच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना फसवण्याकरिता आणि त्यांना नामोहरम करण्याकरिता आपल्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर करीत असत.

पुन्हा असो. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की ह्या भूतलावर आपल्या प्रत्येकाचे सात सात डुप्लिकेट अस्तित्वात आहेत. ना जाणो कधी ते आपल्यासमोर येऊन उभे ठाकतील ह्याचा काय भरवसा? त्यामुळे, जागे रहा. रात्र वैऱ्याची आहे. नाहीतर त्या 'अंगुर' चित्रपटातील संजीवकुमारसारखं आपणसुद्धा इकडचा त्या घरात आणि तिकडचा ह्या घरात अदलाबदली व्हायचो.

माझा ब्लॉग  :  http://sachinkale763.blogspot.in

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी पण ह्याबद्दल. अनुभव छान शब्दबद्ध केलाय. खुप आधी जेट ली चा याच थीम वर "द वन" नावाचा सिनेमा आला होता ज्यानुसार वेगवेगळ्या ब्रम्हांडात त्याचे सात डुप्लिकेट असतात. अन् त्यांच्यापैकी जो दुसर्यांना ढगात पाठवेल तो सर्वांत बलवान होणार असतो (असंच काहीतरी आहे. लै दिस झाले बघून)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...

काही अंशी माझ्यासार‌खा दिस‌णारा व बोल‌णारा एक‌ज‌ण आम‌च्याच शाळेत‌ १ व‌र्ष सीनिय‌र होता म‌ला. ज‌न्म‌तारीख‌ही १ दिव‌स अगोदर‌ची होती. ते पाहून म‌जा वाटाय‌ची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@ टूच्चेश, बॅटमॅन, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याव्यतिरिक्त डुप्लिकेटचा आणखी एक प्रकार आहे. नावांचे डुप्लिकेट. माझे असे चार डुप्लिकेट आहेत (आणखीही असावेत). नाव-आडनाव एक, वडिलांचं नाव वेगळं.

त्यातला एक आहे तो माझ्यापेक्षा एक वर्ष लहान आहे, माझ्या पुण्यातल्या घरापासून 1 बष्टोप अलिकडे राहतो. आम्ही एकाच शाळेतही होतो. त्यामुळे माझ्या ईमेल त्याला - त्याच्या मला, माझे फोन त्याला - त्याचे मला वगैरे नेहमी होतं.

मला त्याच्या बँकेकडून OTP ची मेल यायची. आम्ही दोघांनीही तक्रार करूनही अनेक दिवस हा प्रकार चालू होता.

यापेक्षा विनोदी गोष्ट. मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीत काम करणारी एक अभिनेत्री काही काळ याची गफ्रे होती. एका नाटकाच्या अमेरिका दौऱ्यात तिचे एके शहरातले होस्ट म्हणजे माझा एक जवळचा मित्र. गप्पा मारता मारता त्या अभिनेत्रीने तिच्या क्ष-बॉफ्रेचं नाव मित्राच्या बायकोला सांगितलं. मित्राची बायको या चुरचुरीत गॉसिपने निळीजांभळी झाली. मित्राला या डुप्लिकेट प्रकरणाची कल्पना असल्याने त्याने चेपु दाखवून शंकानिरसन केलं!

आणखी एक डुप्लिकेट बॉडीबिल्डर आहे. बाकी पाचांच्या मिळून बॉड्या त्याला मिळाल्या असाव्यात. त्याच्यामुळे विविध प्रोटीन सप्लिमेंटच्या ऑफर्स मिळत असतात. अर्थात माझ्या अंगी पुरेसं प्रोटीन असल्याने त्या सध्या जंकमेली टाकल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

आबाबद्दल, जया अंगी प्रोटीण तया बॉडी कठीण, असं म्हणता येईल काय?

माझ्या (एका) नावाची डुप्लिकेट गेली काही वर्षं रुईया कॉलेजात शिकवते. तिचे विद्यार्थी मला अधूनमधून असाईनमेंट्स पाठवतात. सुरुवातीला मी सभ्यपणे, "चुकीच्या इमेलवर, आणि चुकीच्या व्यक्तीला हे पाठवलं आहेत", असं सांगायचे. त्यावर "मग योग्य इमेल कोणता" असं उत्तर अधूनमधून येत असे. ही नावाची डुप्लिकेट नक्की कोण, तिला कसं शोधायचं हे तेव्हा माहीत नव्हतं. अचानक एका मित्राच्या बायकोच्या फ्रेंडलिष्टीत असल्यानं ही दिसली. मग तिचा फेसबुकवर पाठपुरावा केला. तिला तिचा इमेल अड्रेस विचारला आणि त्यामागचं कारणही सांगितलं. "तुझी पत्रं तुला पाठवेन," असं सांगूनही पुढे काहीही उत्तर आलं नाही. आता अशी इमेलं आली की सरळ कचऱ्यात जातात.

त्यातून मला दोन नावं. अनौपचारिक - अदिती - नावाचीही एक डुप्लिकेट माझ्या चुलत परिचयाची आहे. काही मैत्रांची मैत्रीण. कधीमधी तिची इमेल्स मला येतात. पण बहुतेकदा मैत्रांकडूनच ही चूक होते, त्यामुळे त्यांना "राँग नंबर लावलात तुम्ही", एवढं कळवून पुरतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझं नाव आडनाव हे कॉम्बिनेशन इतका वेगळं आहे कि मला तरी अजूनपर्यंत माझ्या (पूर्ण ) नावाची व्यक्ती सापडलेली नाही.

त्यामुळे ती मी नव्हेच असा आव इच्छा असूनही आणता येत नाही कधी !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

सेम टु सेम‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्रूस वेन ?? Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

अग‌दी अग‌दी. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या नावाची डुप्लिकेट‌ वेश‌भुषाकार‌ आहे. एका सिरिय‌ल‌ च्या क्रेडिट्स‌ म‌ध्ये तिच‌ं नाव‌ वाच‌ल्याव‌र‌ य‌च्च‌याव‌त‌ नातेवाईक‌ , मित्र‌मैत्रिणींनी विचारुन‌ झाल‌ं.
न‌ंत‌र‌ न‌ंत‌र‌ क‌ंटाळा याय‌ला लाग‌ला तेव्हा हो ती मीच‌ आहे म्ह‌णून‌ ठोकून‌ द्याय‌चे.. म‌ग एकदा एका मित्राने सेट‌व‌र‌ घेउन‌ च‌ल‌ म्ह‌णून‌ सांगित‌लं तेव्हा मी कॉस्च्युम‌ डिझाय‌न‌र‌ आहे, धोबी नाही रोज रोज सेट‌व‌र‌ जाय‌ला म्ह‌णून‌ वाटेला लाव‌ल‌ं. तो येड‌प‌ट‌ अजून‌ मी क‌शी माज‌लेय‌ प्र‌सिद्धि मिळाल्याव‌र‌ म्ह‌णून‌ बोंब‌लत‌ हिंड‌तो. आणि मी शिंची क‌ट‌क‌ट‌ स‌ंप‌ली म्ह‌णून‌ आन‌ंदात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌ण म्ह‌णाय‌चं काय आहे ते क‌ळ‌लं नाही. लेख म्ह‌णून लिहीलाय की ग‌प्पांसाठी न‌वीन टॉपिक काहीत‌री?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

लेख म्ह‌णून लिहीलाय की ग‌प्पांसाठी न‌वीन टॉपिक काहीत‌री?>>> दोन्हीला लागू पडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व नवीन प्रतिसादकर्त्यांचे लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0