स्धल-कालाचे ताणे-बाणे

अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे
झरझर सरत्या..
थेट धडकत्या...
अधुना मधुनी स्फटिक जन्मती अतिताचे

उत्पत्ती अन् स्थिती, लयाचा रहाट अविरत चालतसे
स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे..
अनंतरंगी घाट चणींचे..
पोहोरे माळुनी फिरत असे

स्धल-कालाचे ताणे-बाणे तोलुनी धरिती विश्वाला
जटिल नि बहुमित..
अमूर्त, अनवट..
रूप तयांचे गोचर केवळ गणिताला

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नाही आव‌ड‌ली. श‌ब्द‌बंबाळ वाट‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

.. हान्स रायशेनबाख चे "The Philosophy of Space & Time" वाचताना सुचत गेलेले विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. कदाचित, मूळ विषय व त्यात‌ल्या संकल्पना क्लिष्ट असल्याने असं झालं असावं. सोपं लिहिणं सर्वात कठिण हेच खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)