आनंदवन

मज अवगत आहे उगम तुझ्या दु:खाचा
तू दोषी नसता कलंक का शरमेचा
करुणेचा इथला निर्झर निर्मळ वाहे
प्रारब्ध-भयाची रात्र संपते आहे

नि:शंक निकट ये, हाती दे तव हात
या दु:खार्तान्च्या देशी हाच प्रघात
परवलिची इथली एकच ह‌ळ‌वी खूण
जरि जखम तुला, तरि माझे हृदय विदीर्ण

जरि भग्न तुझे कर, घडवू शिल्प अभंग
जरि कभिन्न वास्तव, बदलू त्याचा रंग
या निबिड अरण्यी, भ‌व्य पाहुया स्व‌प्ने
आनंदवनाचे हेच ब्रीद, अन् गाणे

आनंदवनाचे हेच ब्रीद, अन् गाणे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाह‌!! खुप सुंद‌र‌!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

एका अत्य‌ंत बोअरिंग दिव‌साचा अंत ही म‌स्त क‌विता वाचून एक्द‌म छान झाला. म‌स्त क‌विता. आव‌ड‌ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

फार आव‌ड‌ली क‌विता..!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्र‌तिसादाब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)