प्राय‌म‌र: त‌र‌ल, तांत्रिक थ‌रार

आजूबाजूचे चित्र‌प‌ट पाह‌त अस‌ताना, ख‌र‌ंच बुद्धिम‌त्तेला चाल‌ना देतील असे चित्र‌प‌ट पाह‌ण्याची उर्मी दाटून येणं स्वाभाविक आहे. हॉर‌र, मिस्ट‌री ह्यांनी तो कंडू श‌म‌त नाही. मेंदू अजून माग‌त अस‌तो. इंट‌र‌स्टेलार, आय‌डेंटिटी, डॉनी डार्को सार‌खे चित्र‌प‌ट ज‌रा क‌र‌म‌णूक क‌र‌तात प‌ण त्यांचा, त्याच त्या अंधाऱ्या बोळात‌ल्या क‌हाण्या, आणि संथ चाल‌लेल्या गोष्टींचाही कालांत‌राने कंटाळा येतो. हिंदीत‌ल्या जॉनी ग‌द्दार, आ देखें ज‌रा व‌गैरेंचा इथे उल्लेख‌ही न केलेला ब‌रा.

प्राय‌म‌र, हा चित्र‌प‌ट ह्याबाब‌तीत स‌ग‌ळ्या उणीवा भ‌रून काढ‌तो. मोठ्ठं आर्थिक पाठ‌ब‌ळ अस‌लेल्या, त‌ग‌ड्या चित्र‌प‌टनिर्मितीगृहांस‌मोर हा चित्र‌प‌ट, अग‌दीच त‌क‌लादू वाट‌तो. ख‌रोख‌र पाह‌ण्यासारखी आहे; ती त्याची क‌था. ही क‌था बाकी अनेक चित्र‌प‌टांम‌ध्ये वाप‌रुन जुन्या झालेल्या काल‍प्र‌वास विरोधाभासाव‌र आधारित आहे. हा चित्र‌प‌टाचा दिग्द‌र्श‌क-लेख‌क-नाय‌क-निर्माता शेन करूथ हा एक‌मेव माणूस आहे.

चित्र‌प‌ट सुरु होतो नाय‌काच्या गॅरेज म‌ध्ये, जिथे त्याचे तीन मित्र आणि तो एक यंत्र ब‌न‌वाय‌चा प्र‌य‌त्न क‌र‌त अस‌तात. ब‌ऱ्याच उलाढालींनंत‌र नाय‌क अॅर‌न आणि त्याचा स‌हकारी एब हे 'त‌सं' एक यंत्र ख‌र‌ंच ब‌न‌व‌तात. प‌हिल्यांदा निर्जीव गोष्टींनंत‌र ते अर्थातच त्यात स्व‌त: ब‌साय‌चा प्र‌य‌त्न क‌र‌तात. तो प्र‌य‌त्न य‌श‌स्वी (?) ही होतो. फ‌क्त, त्यात त्याच विरोधाभासातून, आणि मान‌वी भाव‌नांतून उद्भ‌व‌णारी एक त्रुटी अस‌ते. त्या त्रुटीमुळे चित्र‌प‌ट जास्त‌च जिव‌ंत, आणि वेग‌वान होतो. 'क‌र‌म‌णूकप्र‌धान' ह्या शीर्षकाखाली हा अजिबात येत नाही. असे चित्र‌प‌ट न आव‌ड‌णाऱ्या लोकांनी ह्याच्या वाटेला अजिबात जाऊ न‌ये. क‌थेत‌ले थ‌रार, भाव‌नांची आंदोल‌ने मात्र त्या शैलीमुळे अग‌दी जिव‌ंत आणि संपृक्त भास‌तात.

शेव‌ट‌च्या फ्रेमप‌र्यंत तीन‌दा ज‌री पाहिला त‌रीही अजिबात न क‌ळ‌णारा हा चित्र‌प‌ट आहे. प‌ण तेच त्याचं सौंद‌र्य आहे. उगीच क‌थेत‌ल्या वि़ज्ञानाचा ब‌ळी देऊन लेख‌काने चित्र‌प‌ट अजिबात मंचीय केलेला नाही. फ‌क्त ७ ह‌जार‌ डॉल‌र्स‌म‌ध्ये ब‌न‌व‌लेला हा चित्र‌प‌ट म्ह‌णूनच, चित्र‌प‌टशास्त्रात‌ल्या नाही, प‌ण त‌र्काच्या प्र‌त्येक पात‌ळीव‌र उत‌र‌तो. मुळात विरोधाभास दाख‌वाय‌चे अस‌तील त‌र थोडं स्वातंत्र्य जे घ्यावं लाग‌तं, तेव्ह‌ढं सोडून लेख‌काने चित्र‌प‌टाच्या भक्क‌म त‌र्क‌चौक‌टीव‌र अजिबात अन्याय केलेला नाही. ख‌रोख‌र मेंदूला चाल‌ना, बुद्धीला आव्हान देणाऱ्या चित्र‌पटांम‌ध्ये ह्याचं नाव काय‌म अग्र‌स्थानी असेल, इत‌कं न‌क्की.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त‌र‌ल थ‌रार

म्ह‌णजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त‌र‌ल हे विशेष‌ण चित्र‌प‌टाला आहे हो, 'थरारा'ला नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

अच्छा. पण तरल चा काय अर्थ अभिप्रेत आहे? फ्लुइड का चंचल? https://hi.oxforddictionaries.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AD%E...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Viscous हे त्याचं अचूक भाषांत‌र आहे. म‌राठी विज्ञान पाठ्य‌पुस्त‌कात 'त‌र‌ल‌ता' वाच‌ल्याचं आठ‌व‌तंय. खांड‌ब‌हालेंनी ज‌ब‌री श‌ब्द टाक‌लेत.

Marathi translation of viscosity
मराठी | Marathi meaning of viscosity

viscosity = पिच्छीलता | pichchhiiltaa
viscosity = प्रवाहिता | prvaahitaa
viscosity = विंश्यदिता | viNshyditaa
viscosity = विप्यंदिता | vipyNditaa
viscosity = विष्यंदिता | visshyNditaa
viscosity = श्यानता | shyaantaa
viscosity = सांद्रता | saaNdrtaa

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

अच्छा. पण तरल चा काय अर्थ अभिप्रेत आहे? फ्लुइड का चंचल?

माझ्या म‌ते दोन्ही नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तरलता म्हणजे subtlety असे मला वाटते।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

प्राय‌मर‌ अजिबात‌च‌ झेप‌ला न‌व्ह‌ता. ब‌रेच‌दा स्प‌ष्टीक‌र‌ण वाचाव‌ं लाग‌ल‌ं आणि म‌ग‌ थोडाफार‌ स‌म‌ज‌ला.
दिग्द‌र्श‌काचा हेतू म्ह‌णे "टाईम‌ ट्रॅव्ह‌ल‌" हा प्र‌कार‌ किती किच‌क‌ट‌ आणि न स‌मज‌णारा आहे" ते दाख‌व‌ण्याचा होता.
त‌स‌ं असेल‌ त‌र चित्र‌प‌ट‌ स‌ंपूर्ण‌ य‌श‌स्वी झालाय़.

नाही म्ह‌ण‌जे आय‌डिया आव‌ड‌ली- प‌ण‌ ब‌हुतेक‌ उच्च‌ बुद्ध्यांक‌वाल्यांसाठीचा चित्र‌प‌ट‌ असावा इत‌प‌त‌ झेप‌ला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0