प्रवासी वाहतूक नियम कोणासाठी?

शाळेत असताना मित्राच्या सायकलवर डबलसीट बसून शहरातील रस्त्यावर फिरायला मजा वाटायची. असंच एकदा फिरत असताना एका सिग्नलला पोलिसाने आम्हाला अडवलं. सायकलच्या दोन्ही चाकांचे वॉल्व खोलून चाकातील हवा काढून टाकली व वॉल्वची रबरी नळी काढून मित्राच्या हातात दिले. आम्ही दोघे गांगरून पोलिसाकडे बघतच राहीलो. कितवीला आहात तुम्ही? पोलिसाने विचारले. सातवीला, मित्राने सांगितले. मग डबलसीट सायकल चालवू नये हे तुम्हाला शाळेत शिकविले नाही? शाळेत तुम्हाला वाहतुकीचे नियम शिकवले असतील ना? पोलिसाने विचारलं. नाही शिकवलं असं म्हणायची आमची हिम्मत झाली नाही.

शाळेत नागरीक शास्त्रात , रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला, सिग्नलवर लाल दिवा दिसला तर थांबा, हिरवा दिसला तर पुढे जा, झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता पार करा अशा प्रकारचे वाहतुकीचे जुजबी नियम शिकवले होते. सायकल डबलसीट चालवू नये हे शाळेत कधीच शिकवले नव्हते. कॉलेजला गेल्यावर बाईकचं लायसन्स काढताना वाहतूकीचे नियम कळाले. बाईक चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही ह्याची कटाक्षाने काळजी घेतो. वाहतूक पोलिस तीनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणार्‍या रिक्षाला दंड करतात किंवा ओव्हरलोड मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पकडतात. अर्थात ह्यात चुकीचं असं काही नाही, प्रवाशांच्या व वाहनाच्या सुऱ़क्षिततेच्या दृष्टीने ते योग्यच आहे.

प्रत्येक वाहनांकरता त्या वाहनाच्या क्षमतेनुसार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असते. एसटीच्या साध्या बसला ५२ सीट व १३ की १६ उभ्या प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक केली जाते. सायकल, बाइक, रिक्षा, टॅक्सी,खासगी बसेस ह्यांच्यावर प्रवासी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याचे बघितले आहे , परंतू एसटीवर किंवा सिटी बसवर अशी कारवाई झाल्याचे कधी बघितले नाही.

ह्यावरून मला प्रश्न पडलाय, की एसटी व सिटी बसेसला प्रवासी वाहतुकीचे नियम लागू होत नाही का? प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे योग्य आहे का ?
बाईकला आरसा नसल्यास , इंडिकेटर नसल्यास दंड केला जातो. परंतू कित्येक एसटी व सिटी बसेसला हॉर्न,इंडिकेटर , दोन्ही बाजूचे आरसे नसले तरी वाहतूक पोलिस कारवाई का करत नाही?

field_vote: 
0
No votes yet

निय‌म‌ निर्वात‌ पोक‌ळीत‌ल्याप्र‌माणे ब‌न‌व‌ले अस‌तील‌ त‌र‌ लोक‌ ते धुड‌कावून‌ लाव‌तात‌.

स‌म‌जा एखाद्या मार्गाव‌र‌ खूप‌ प्र‌वासी आहेत‌ प‌र‌ंतु (काय‌देशीर‌ दृष्ट्या) भ‌रून‌ आलेल्या ब‌स‌म‌ध्ये आण‌खी प्र‌वासी घेत‌ले नाहीत‌ त‌र‌ त्या प्र‌वाशांना पुढ‌च्या ब‌स‌ साठी दोन‌ तास‌ थांबावे लागेल‌ अशी स्थिती असेल‌ त‌र‌ क‌ंड‌क्ट‌र‌ निय‌मापेक्षा जास्त‌ प्र‌वासी घेईल‌च‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्र‌वाशांना पुढ‌च्या ब‌स‌ साठी दोन‌ तास‌ थांबावे लागेल‌ अशी स्थिती असेल‌ त‌र‌ क‌ंड‌क्ट‌र‌ निय‌मापेक्षा जास्त‌ प्र‌वासी घेईल‌च‌.

माझ्या मते अशा प्रवाशांना बस मध्ये न घेतल्यास हेच लोक परिवहन मंडळाकडे जाऊन तक्रारी करतील - बसेस ची संख्या वाढवा म्हणून. हे टाळायचे म्हणून वाहक जास्त लोकांना आत उभे राहू देत असतील (किंवा त्यांना वरून आदेश असतील असे करा म्हणून)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

ब‌सेस‌ची स‌ंख्या वाढ‌वा अशी त‌क्रार‌ केल्याने स‌ध्याच्या क‌ंड‌क्ट‌र्स‌ना काय‌ तोटा होण्याची श‌क्य‌ता आहे की ते टाळ‌ण्याचा प्र‌य‌त्न‌ क‌र‌तील‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वाहकांना तोटा नसेल - पण त्यांना "वरून" आदेश आलेले असू शकतात असे करण्याचे. परिवहन मंडळाकडे बसेस घ्यायला पैसे नाहीत या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असे करत असावेत कदाचित. उद्या एखाद्या वाहकाने २२ प्रवाशी घुसले - अजून आत नाही बसू देत असे म्हटले तर तो सस्पेंड होणार नाही कशावरून ...

किंवा तुम्ही म्हणता तसे साधे कारण ही असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

>>परिवहन मंडळाकडे बसेस घ्यायला पैसे नाहीत या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून

म्ह‌ण‌जेच‌ "क्ष‌ इत‌केच‌ प्र‌वासी घेण्याचा निय‌म‌" निर्वात‌ पोक‌ळीत‌ ब‌न‌व‌लेला आहे. म्ह‌णून‌ तो धुड‌काव‌ला जातो.

क‌मी ग‌र्दी अस‌ल्यास‌ ब‌स‌ची जी कॅपिट‌ल‌ कॉस्ट‌ आणि ओव्ह‌र‌हेड‌ कॉस्ट‌ आहे ती क‌मी प्र‌वाशांव‌र‌ विभाग‌ली जाऊन‌ तिकिटाचे द‌र‌ वाढ‌तील‌. त्या ऐव‌जी प्र‌वासी अधिक‌ प्र‌वासी ब‌साध्ये अस‌ण्याचा प‌र्याय‌ मान्य‌ क‌र‌तील‌.
दुस‌रे उदाह‌र‌ण‌ - आम‌च्या गावात‌ शेअर‌ रिक्षा चाल‌तात‌. त्यात नेह‌मी चार‌ प्र‌वासी अस‌तात‌. स्टेश‌न‌ ते एक‌ विशिष्ट‌ पॉइंट‌प‌र्य‌ंत‌ मीट‌र‌ने रिक्षाचे ३०-३२ रु होतात‌. रिक्षावाला प्र‌त्येक‌ प्र‌वाशाक‌डून‌ १० रु घेतो. आणि चाळीस‌ रु क‌माव‌तो. त्याने असे पैसे घेत‌ले नाही त‌र‌ त्याला प्र‌त्येक‌ प्र‌वाशाक‌डून‌ १२ किंवा १३ रु घ्यावे लाग‌तील‌ कार‌ण‌ ब‌हुतांश‌ वेळा प‌र‌तीच्या प्र‌वासाला तीन‌ प्र‌वासी मिळ‌त‌ नाहीत‌. चार‌ प्र‌वासी नेले त‌र‌च‌ द‌हा रुप‌यात‌ नेऊ श‌क‌तो हे ग‌णित‌ प्र‌वाशांना स‌म‌ज‌ते आणि मान्य‌ अस‌ते. म्ह‌णून‌ हा चार‌ प्र‌वासी नेण्याचा बेकाय‌देशीर‌प‌णा प्र‌वासी (मुख्य‌त: ड्राय‌व्ह‌र‌शेजारी ब‌स‌णारा) मान्य‌ क‌र‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते लॉजिक ठीक आहे पण मुळात अमुक एक प्रवासी संख्या लिमिट का आहे हे समजून घ्यायला पाहिजे. सुरक्षिततेच्या दृष्टीने असे नियम बनवलेले असतील (उदा. काही गडबड झाली आणि सगळ्यांना बाहेर काढावे लागले तर)

प्रश्न सोडवायचा बरोबर मार्ग बसेस ची संख्या वाढवणे हा आहे - प्रवासी संख्या लिमिट करण्याचा नियम न बनवणे हा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

ते ख‌रे आहे. प‌ण‌ ते होणे आर्थिक‌ दृष्ह्ट्या श‌क्य‌ न‌सेल‌ त‌र‌ निय‌म‌ (प‌र‌स्प‌र‌स‌ंम‌तीने) तोड‌ले जाणे घ‌ड‌णार‌च‌.

>>मुळात अमुक एक प्रवासी संख्या लिमिट का आहे हे समजून घ्यायला पाहिजे. सुरक्षिततेच्या दृष्टीने असे नियम बनवलेले असतील

आण‌खी एक‌ उदाह‌र‌ण‌ दुकानांचे घेऊ. ब‌हुतेक‌ अधिकृत‌ दुकाने (म्ह‌ण‌जे म्युनिसिपालिटीला स‌ब‌मिट‌ केलेल्या प्लॅन‌म‌धील‌ दुकाने) मोठ्या आकाराची अस‌तात‌. ब‌हुधा २० फूट‌ बाय‌ १०/१२ फूट‌. याचे कार‌ण‌ क‌दाचित सुर‌क्षा, द‌र‌ चौ मीट‌र‌म‌ध्ये किती माण‌से व‌गैरे मान‌कांनुसार‌ असेल‌. प‌र‌ंतु एव‌ढ्या आकाराची दुकाने श‌ह‌रात‌ल्या दुकान‌दारांना प‌र‌व‌ड‌त‌ नाहीत‌. त्यामुळे ते अन‌धिकृत‌ रीत्या ट‌प‌ऱ्या (४ फूट‌ बाय‌ ६ फूट‌ व‌गैरे मापाच्या) बांधून‌ व्य‌व‌साय‌ क‌र‌तात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत. आपला टॅक्स योग्य ठिकाणी मार्गी लागला तर हे पैशाचे प्रश्न सुटतील का असा प्रश्न मनात येतो.

त्यामुळे ते अन‌धिकृत‌ रीत्या ट‌प‌ऱ्या (४ फूट‌ बाय‌ ६ फूट‌ व‌गैरे मापाच्या) बांधून‌ व्य‌व‌साय‌ क‌र‌तात‌.

रोचक उदाहरण. असे प्रॉब्लेम मुळापासून सोडवायचे तर मला वाटते दोन गोष्टी करायला हव्यात

१. सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन (-> लोक प्रक्षोभ ->) २. सरकारी यंत्रणांवर भष्टाचार न करता काम करण्याचा दबाव

कोणी नियम पाळलेच नाहीत तर या साखळीतली "लोक प्रक्षोभ" हि सिचुएशन निर्माण होत नाही आणि म्हणूनच सरकारी यंत्रणेवर दबावही वाढत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

प‌र‌ंतु एव‌ढ्या आकाराची दुकाने श‌ह‌रात‌ल्या दुकान‌दारांना प‌र‌व‌ड‌त‌ नाहीत‌. त्यामुळे ते अन‌धिकृत‌ रीत्या ट‌प‌ऱ्या (४ फूट‌ बाय‌ ६ फूट‌ व‌गैरे मापाच्या) बांधून‌ व्य‌व‌साय‌ क‌र‌तात‌.

दुकान‌ विक‌त घेणे प‌र‌व‌ड‌त नाही म्ह‌णुन अन‌धिकृत ट‌प‌ऱ्या टाक‌ल्या जातात हे गृहित‌क चुकीचे आहे.
स्व‌ताचे दुकान असुन ही दुकानाच्या बाहेर ट‌प‌री टाक‌णारे माल‌दार दुकान‌दार आहेत.

आप‌ल्या अन‌धिकृत ट‌प‌ऱ्यांम‌धुन प‌ण म‌ध्य‌म‌व‌र्गीय ग्राह‌क ख‌रेदी क‌र‌त‌ र‌हाणार ह्याची गॅरेंटी आणि कोणीही स‌र‌कारी अधिकारी आप‌ली अन‌धिकृत ट‌प‌री ह‌ल‌वु श‌क‌त नाही ह्याची गॅरेंटी ( जी पैसे मोजुन विक‌त घेत‌लेली अस‌ते ). ह्या दोन ह‌मींमुळे लोक अश्या ट‌प‌ऱ्या बांधुन व्य‌व‌साय क‌र‌तात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रश्न सोडवायचा बरोबर मार्ग बसेस ची संख्या वाढवणे हा आहे - प्रवासी संख्या लिमिट करण्याचा नियम न बनवणे हा नाही.

भार‌तात लाखो प्र‌श्न न‌ सोड‌व‌ले गेलेले आहेत. तुम्ही कीती धागे काढ‌णार? इथ‌ले ख‌ड्डे अस‌लेले र‌स्ते त‌री सुर‌क्षेच्या द्रूष्टीनी कुठ‌लेही वाह‌न चाल‌व‌ण्यासार‌खे आहेत का? काल‌च एक बाई मेली तिची बाईक ख‌ड्ड्यात प‌ड‌ली म्ह‌णुऩ्
अस‌ल्या प्र‌श्नांनी*** स्व‌ताचे डोके प‌क‌व‌ण्यापेक्षा स‌कारात्म‌क दृष्ह्टी ठेवा आणि म‌जेत र‌हा.
---------
*** : स्व‌ताला प्रश्न‌च पाडुन घ्याय‌चे अस‌तील त‌र आम‌च्या म‌नोबासार‌खे सृज‌नात्म‌क त‌री पाडा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धागा मी नाही काढला आणि चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

च‌र्चा व्हाय‌ला काहीच ह‌र‌क‌त नाही हो प‌ण च‌र्चेचा विषय "साडीला खिसे का न‌स‌तात?" असा काहीत‌री ग‌ह‌न पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लॉल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

च‌र्चा व्हाय‌ला काहीच ह‌र‌क‌त नाही हो प‌ण च‌र्चेचा विषय "साडीला खिसे का न‌स‌तात?" असा काहीत‌री ग‌ह‌न पाहिजे.

राडा !!!!

म‌नोबा च्या बौद्धिक स्वामित्वाच्या अधिकाराचे उल्ल‌ंघ‌न्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक प्र‌श्न‌ म‌ला अनेक व‌र्षांपासून‌ स‌ताव‌तो आहे. धाग्याच्या निमित्ताने विचारून घेतो.

चार‌चाकींम‌ध्ये सीट‌बेल्ट‌ लाव‌णे ब‌ंध‌न‌कार‌क‌ आहे. जे उत्त‌म‌च‌ आहे. प‌र‌ंतु, चार‌चाकी वाह‌न‌, जे मूळात‌च स्थिर‌ अस‌ते, खेरीज‌ ते ब‌ंदिस्त‌देखिल‌ अस‌ते, त्याला ज‌र‌ सीट‌बेल्ट‌ ब‌ंध‌न‌कार‌क‌ असेल‌ त‌र रिक्शा जी मुद‌लात‌ तीन‌ चाकी (अस्थिर‌) अस‌ते. शिवाय‌ द‌र‌वाजाविना अस‌ते, त्यातील‌ प्र‌वाशांच्या सुर‌क्शेबाब‌त‌ ह‌ल‌ग‌र्जीप‌णा क‌सा? ह्यात कुणाला anomaly क‌शी जाण‌व‌त नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बस मध्ये तरी सीट बेल्ट लावायची सक्ती कुठे असते? एसटीत तर सीट बेल्ट पण नसतात.

माझ्या मते रिक्षा (आणि बसेस) वर स्पीड लिमिट असल्याने सीट बेल्ट ची गरज वाटत नसावी किंवा त्यात सीट बेल्ट लावणे शक्य नसावे. रिक्षातल्या तिन्ही पॅसेन्जर ला एक सीट बेल्ट लावणार का वेगवेगळे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

सीट‌बेल्ट हा स‌मोरुन झालेल्या आघातामुळे डॅश‌बोर्ड छातीव‌र आप‌टून फुफ्फुसे दाब‌ली जाऊन‌ आक‌स्मिक मृत्यू होऊ नये म्ह‌णून अस‌तो. ज‌ड‌त्वासाठी. कार‌म‌ध्ये पायांना पुढे जाय‌ला जागा अस‌ते. रिक्षात पाय हे ड्राय‌व्ह‌र आणि प्र‌वाशांच्या म‌ध‌ल्या भिंतीमुळे अड‌लेले अस‌तात, म्ह‌णून छातीव‌र काहीही आप‌टाय‌चा धोका न‌स‌तो. आणि ४० म्ह‌ण‌जे एक‌द‌म "अबे शुमाक‌र‌की अव‌लाद..." टॉप स्पीड. क‌स‌ला इन‌र्शिया नी क‌स‌लं काय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

भारतातला/इतरत्रचा कायदा नक्की काय म्हणतो ते माहीत नाही, परंतु आमचे येथील मर्यादित माहितीच्या आधारावर तरी सीटबेल्टची सक्ती ही फक्त पुढील सीटवर बसणाऱ्या डायवर/प्याशिंजरांसाठी आहे. (चूभूद्याघ्या.)

(अपवाद फक्त मागच्या सीटवर बसणाऱ्या लहान मुलांचा. त्यांच्याकरिता केवळ सीटबेल्टच नव्हे, तर वय/आकार/वजनपरत्वे सुयोग्य अशी चाइल्डसीट/(मोठ्या मुलांकरिता काही ठराविक उंची+वजन गाठेपर्यंत) बूस्टरसीटसुद्धा म्याण्डेटरी करणारे कायदे आहेत. (ही चाइल्ड/बूस्टरसीटे पुढच्या सीटवर बसवू नयेत, असाही एक सुरक्षासंकेत आहे. आणि ८ वर्षांखालील मुलांस पुढच्या सीटवर बसवणे बेकायदेशीर आहे.))

(शिवाय, आमच्या राज्यात पिकअप ट्रकवाल्यांना सीटबेल्टची सक्ती नाही, असे अर्धवट ऐकीव माहितीवरून कळते (गैरसमज असू शकेल), परंतु त्यामागे सुरक्षिततेची कोणतीही गणिते नसून काही वेगळेच राजकारण आहे, असेही ऐकिवात आहे. पण असो.)

आणि ४० म्ह‌ण‌जे एक‌द‌म "अबे शुमाक‌र‌की अव‌लाद..." टॉप स्पीड. क‌स‌ला इन‌र्शिया नी क‌स‌लं काय.

असहमत. ४०च्या (बोले तो आमच्या मैलांच्या भाषेत २५च्या) स्पीडने एकदा एखाद्या झाडाशी नाहीतर खांबाशी सीटबेल्ट न लावता हेडऑन टक्कर घेऊन पाहा, नि मग (जगलावाचलात तर) सांगा कसे वाटले ते. (झाडाखांबासारख्या स्टेशनरी ऑब्जेक्टऐवजी समोरून येणाऱ्या वाहनाला हेडऑन धडकायचे असेल, तर त्याचा स्पीड तुमच्या स्पीडमध्ये मिळवायला विसरू नका. बोले तो, त्याचे ४०/२५ अधिक तुमचे ४०/२५, इफेक्टिव स्पीड ८०/५०.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी भार‌तात‌लं म्ह‌ण‌तोय. मैल म्ह‌ण‌जे न‌क्कीच ह‌म्रिका अस‌णार. ते असो.
४० चा स्पीड रिक्षा घेत‌च नाहीत. ब‌सेस फ‌क्त हाय‌वेव‌र, तोही मोक‌ळा मिळाला त‌र, आणि प्र‌वासी फार‌से न‌स‌ले त‌र घेतात ज्याची संभाव्य‌ता जव‌ळ‌पास दीड ट‌क्का आहे. रिक्षात‌ले स्पीडोमीट‌र म्ह‌ण‌जे चिल्ल‌र ठेवाय‌ची जागा अस‌ते. ह्यात स‌ग‌ळं आलं, त‌रीही- ऑटोरिक्षाचा टॉप स्पीड ४० अस‌तो. 'टॉप.' त्या तित‌क्या ज‌न्मात घेत नाहीत स्पीड, हा म्ह‌ण‌ण्याचा अर्थ होता. आणि मी आज‌पर्य‌ंत फ‌क्त २६/११ वाल्या दिव‌शी तो अनुभ‌व‌लाय. कार‌ण भ‌ल्या स‌काळी ७ वाज‌ता अख्ख्या र‌स्त्याव‌र कोणीही न‌व्ह‌तं.
आणि, रिक्षात तुम्ही म्ह‌ण‌ताय त‌शी हेडॉन ट‌क्क‌र घेत‌ली, त‌रीही मी म्ह‌ण‌तोय ते खोटं ठ‌र‌त नाही. गुढ‌घे जातील कामातून, प‌ण जीव न‌क्कीच वाचेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

स‌र‌क‌लेला रिक्षावाला असेल‌ त‌र‌ वेडावाक‌डा चाल‌व‌तो, स‌मोर‌ हाप‌ट‌ण्यापेक्षा बाजूनेच‌ प‌डाय‌ची भिती वाट‌ते. आरे कॉल‌नीम‌ध्ये स‌ह‌सा रिक्षावाले अंगात‌ आल्यासार‌खी रिक्षा चाल‌व‌तात‌ हा अनुभ‌व‌ खुप‌ वेळेस‌ घेत‌लाय‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑटोरिक्षाचा टॉप स्पीड ४० अस‌तो

नाही हो, लै पळवत्यात कधी कधी. अपे तर महाभयंकर वाहन आहे. रिक्षा अन अपेवाले कुठं, कधी अन कस वळण घेतील हे फक्त त्याला चालवणाराच सांगू शकतो. unpredictable. मी माझ्या रोजच्या ३० किमी प्रवासात किमान दोनदा तरी मनातल्या मनात त्यांची मम्मी दीदी करतो न चुकता ते ही कारण असतानाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

> शाळेत नागरीक शास्त्रात , रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला, …. अशा प्रकारचे वाहतुकीचे जुजबी नियम शिकवले होते. 

तुम्ही जर भारतात शाळेत गेला असाल तर ‘रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला’ असं शिकवायला हवं होतं. ट्रॅफिक आपल्या पाठीमागून पुढे निघून जाण्यापेक्षा त्याला सामोरं जाणं हे जास्त सुरक्षित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

वाहतुकीचे नियम तोडून कोण प्रवासी किंवा मालाची वाहतूक का करतो हा धाग्याचा विषय नाही. सार्वजनिक सरकारी वाहनांना प्रवासी वाहतूकीचे नियम आहेत की नाही? खाजगी वाहनांवर वाहतुकीचे नियम तोडल्यास त्वरीत कारवाई केली जाते त‌शी त्यांच्यावर कधी कारवाई होते का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाज‌गी वाह‌नांव‌र‌ही कार‌वाई केली जात‌ नाही. (मी त‌र‌ ह‌ल्ली ऑल‌मोस्ट‌ काय‌म‌ दुचाकीव‌र‌ तीन‌ माण‌से ब‌सून‌ जाताना पाह‌तो).
व‌र‌ दिलेल्या उदाह‌र‌णांतील‌ चार‌ प्र‌वासी नेणाऱ्या रिक्षा खाज‌गी अस‌तात‌.

न्यायाल‌याने हेल्मेट‌ स‌क्ती केल्याव‌र‌ आर‌ आर‌ पाटिल‌ यांनी "कार‌वाई क‌रू न‌का" असे तोंडी आदेश‌ दिले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खाज‌गी वाह‌नांव‌र‌ही कार‌वाई केली जात‌ नाही.

एखादे दिव‌शी ठाण्यात ट्रिप‌ल‌सिट‌ बाइक‌ चाल‌वून‌ ब‌घा, खास‌क‌रून‌ हाय‌वेला. किंवा स्टेश‌नव‌रून‌ मीट‌र‌ रिक्शात‌ चार‌ज‌ण‌(एक्स्ट्रा पैसे देउन्) घेतात‌ का ब‌घा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ठाणे जिल्हा बॅंक‌ (शिवाजी प‌थ‌) येथून‌ खोप‌ट‌ला रेग्युल‌र‌ली चार‌ प्र‌वासी अस‌लेल्या शेअर‌ रिक्षाने येतो. त्यावेळी अज‌राम‌र‌ चौक‌, एस‌टी व‌र्क‌शॉप‌ चौक‌ येथे पोलीसास‌मोरून‌ रिक्षा येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कांदिव‌ली पूर्वेला लोख‌ंड‌वाला स‌र्क‌लला जाणाऱ्या रिक्षा स‌ंध्याकाळी स‌हानंत‌र त‌ब्ब‌ल ६ प्र‌वासी घेतात. चाल‌क प‌क‌डून ७ लोक एका रिक्षात, आणि द‌र‌डोई २० रु.
एक‌दा मी (पोलिस स‌मोर अस‌ल्यामुळे फ‌क्त ३ प्र‌वासी नेणाऱ्या) रिक्षावाल्याशी भांड‌लो, की १५ चे एकाएकी २० का केले? तो म्ह‌ण‌तो, की उपकार‌च स‌म‌जा २० घेतोय, क‌धी संध्याकाळी येऊन ब‌घा ६ लोक ब‌सून प‌ण २०-२० रुप‌ये देतात. माझा काही विश्वास ब‌स‌ला नाही. दुसऱ्या दिव‌शी मी ते ख‌र‌ंच पाहिल‌ं. चाल‌काच्या दोन्ही बाजूंना एक-एक, आणि मागे चार.

चार प्र‌वासी त‌र खूपच कॉम‌न आहे. अग‌दीच. आज‌काल पोलिस‌ही पाहून-न-पाहिल्यासारखं क‌र‌तात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

१५ चे एकाएकी २० का केले?

आमच्या औरंगाबादेत सहसा ३० रुपये घेतात. पण प्रवासी मात्र तीनच. एरवी मी दुचाकीच वापरतो पण कधी अपरीहार्य कारणास्तव रिक्शात बसायचा योग आला की तर सरळ सांगतो की चौथा प्रवासी बसवलास की मी पैसे देणार नै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

हाय‌वेव‌र बिनधास्त‌ ट्रिप‌ल‌सिट‌ बाइक‌ चाल‌वून‌ ब‌घा. न‌सेल‌ चान्स‌ घ्याय‌चा त‌र माजिव‌डा फ्लाय‌ओव‌र‌खाली फ‌क्त‌ उभे राहून‌ पोलिस‌मामा वाह‌नचाल‌कांना क‌से व‌ का प‌क‌ड‌तात ते ब‌घाच‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वनफॉरटॅन , तुम्हीही या माजिव‌डा फ्लाय‌ओव‌र‌खाली. बाइक‌व‌र येणार‌ असाल‌ त‌र हेल्मेट‌ न‌ घाल‌ता या तेव्ह‌डाच‌ फ‌र्स्ट‌ हॅंड‌ अनुभ‌व‌ही येइल‌, व‌ खाज‌गी वाह‌नांचे प्र‌कार‌ही ब‌घाय‌ला मिळ‌तील‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0