माझ्या कवितेची शाई

माझ्या कवितेची शाई
आहे अजब मिश्रण
भस्म अधुऱ्या स्वप्नांचे
त्यात अश्रुंचे शिंपण

कधी माझ्या कवितेचा
शब्द निनादे आभाळी
कधी धरती विंधतो
कधी ग‌र्ज‌तो पाताळी

कवितेची ओळ माझ्या
कधी बोब‌डे बोल‌ते
कधी बोलता बोलता
गहनाशी झोंबी घेते

क‌वितेच्या रोम‌रोमी
फुंकीन मी प्राण जेव्हा
तेव्हा तुम्हा रसिकांचा
पाठीवरी हात हवा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान. मस्त आहे कविता. पण, आधीच्या कवितांइतकी 'इंटेन्स' वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

छान. मस्त आहे कविता. पण, आधीच्या कवितांइतकी 'इंटेन्स' वाटत नाही.

ते कसं आहे, लताची बाकी सगळी गाणी आपल्याला खूप आवडतात, पण, त्यांनीच गायलेले,

माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे

सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
या विश्र्वाची एकतानता हे माझे गाणे
हे ऐकताना तेवढेसे आवडत नाही,

तसेच याचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी शेंगा खाल्ल्या नाहीत, पण
टरफले मलाच उचलावी लागणार!

प्रतिसादाबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

बहिणाबाईंची कविता वाचून न आवरता आलेलं काव्यजातं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

कविता चांगली आहे. कुमारभारतीत लावावी इतकी चांगली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बालभारतीत लावावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

बोबड्या बोलांचा उल्लेख असल्यामुळे बालवाडीतील बोबडगीतांत (आपल्या परवानगीने) तिचा समावेश करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

तुम्ही फार लवकर चिडता बॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

आन्तरजालावर सुमार कवितांचं बेसुमार पीक निघत असताना त्यात आपल्या कविता वेगळ्या उठून दिसतात. सरासरीपेक्षा अधिक असं नक्कीच काहीतरी त्यांत असतं.
आणि ऐसीवर किती प्रतिसाद मिळाले यावर जाऊ नका. प्रतिसाद मिळाले हेच महत्त्वाचं कारण या कवितांची दखल घेतली गेली हे त्यातून दिसतं. लिहीत राहा. आम्ही प्रतिसाद देऊच असं नाही पण वाचू तरी नक्कीच.
ता. क. : या वर्षीच्या दिवाळी अंकांत तुमच्या काही कवित्या होत्या का? या शैलीतलं काही वाचल्यासारखं वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त कविता. तालासुरात गाता येइल ( चाल ही वापरावी: आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई )

हे असे तुम्हाला खरच वाटते का? का ह्यात काही गुढरम्य अर्थ दडला आहे.

कधी माझ्या कवितेचा
शब्द निनादे आभाळी
कधी धरती विंधतो
कधी ग‌र्ज‌तो पाताळी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विचारून त्यातील गूढरम्य अर्थ उलगडून घ्यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

क‌वितेच्या रोम‌रोमी
फुंकीन मी प्राण जेव्हा
तेव्हा तुम्हा रसिकांचा
पाठीवरी हात हवा: Kya baat hai! mastach!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0