आत्माराम, राधाबाई आणि रखमाबाई सगुण.

गूगलच्या मदतीने मी दुसरेच काही शोधत असता Radhabai Atmaram Sagun/Sagoon, Book publisher अशा एका नावावर माझी दृष्टि पडली. ह्यापूर्वी १८६०च्या दशकात स्थापन झालेल्या निर्णयसागर ह्या प्रकाशनव्यवसायाचे मूळ संस्थापक जावजी दादाजी आणि तदनंतर त्यांचे चिरंजीव तुकाराम आणि पांडुरंग ह्यांनी हा व्यवसाय सांभाळला होता. पांडुरंग जावजी ह्यांचा १९४० साली मृत्यु झाल्यानंतर जिजाबाई, सत्यभामाबाई आणि लक्ष्मीबाई ह्या चौधरी कुटुंबातील तीन विधवांनी आपल्या परीने काही वर्षे त्या व्यवसायाची ढासळती इमारत सावरून धरली होती. ह्या तिघा स्त्रियांशिवाय कोणा अन्य स्त्रीने प्रकाशनव्यवसायात काही कार्य केले आहे हे मला माहीत नव्हते. म्हणून ’राधाबाई आत्माराम सगुण’ ह्यांच्याबाबत आणखी काही माहिती मिळते काय असा मी बराच शोध घेतला. मिळालेली त्रोटक माहिती खालीलप्रमाणे:

१) आत्माराम सगुण आणि कंपनी ह्यांनी एक गुजराथी- इंग्लिश डिक्शनरी १८६३ साली प्रकाशित केल्याचा उल्लेख मिळतो. ह्याचा अर्थ आत्माराम सगुण ह्यांचा हा व्यवसाय १८६३ पूर्व काळातील आहे.

२) 'Report on the Administration of the Bombay Presidency for the Year 1876-77' ह्या सरकारी अहवालाच्या परिशिष्टांमध्ये Literature and Press अशा नावाचे एक परिशिष्ट आहे. त्याच्या ३२१ व्या पानावर - रोमन आकड्यांमध्ये CCCXXI - काळबादेवी रस्त्यावर एशिआटिक प्रिंटिंग प्रेस, मालक नारायण साज़बा, बालकृष्ण साजबा, आत्माराम सगुण ह्या प्रकाशकांचे नाव आहे आणि ते ’सुबोधपत्रिका’ नावाचे नियतकालिक काढत होते असा उल्लेख आहे.

३) ’Journal [afterw.] The Indian magazine (and review)’ ह्या पुस्तकाच्या पान २७ पासून काळबादेवी रस्तासंबंधाने ’A Great Indian Street' नावाचा एक लेख सुरू होतो. तेथे पान ३२ वर पुढील उतारा आहे:

Now if there is anything more interesting than another in the Kalbadevi Road, it is the book shop of Mr. Atmaram Sagoon, certainly the oldest and the most important book Bhop in the city of Bombay. He may be considered to be an unconscious public benefactor, deserving well of the public for supplying them with the best English books at the same price they are to be had in Paternoster Row, or at Mr. Waterton's, the bookseller, near Hyde Park Corner. There are thousands who have purchased their books for years together from Mr. Atmaram, beginning with the copper-plate, price three annas, up to a book published in June last, a beautiful and lasting memorial of the intelligence and patriotism of one of England's greatet sons—a record of his grand achievements in English speech.

४) ’Journal of the National Indian Association, in Aid of Social Progress in India’ ह्या नियतकालिकाच्या पान ४५० वर पुढील माहिती दिसते:
.

We learn that Mrs. Radhabai, widow of the late Mr. Atmaram Sagoon, recently established a business on own account, at Bombay, as bookseller and stationer, pending the result of a suit affecting the estate of her late husband. The fact of a Hindu widow faving done this is most significant. It is probably the first time that a respectable Hindu widow has ventured to carry on business in her own name since the laws of Manu were written, three thousand years ago, and we may hope that it is a step in the direction of female emancipation, which will not be without its effect in other parts of India." .

५) 'Publishers' Weekly: American Book-trade Journal, Volume 28' ह्या अमेरिकन व्यापारी नियतकालिकात पान २११ येथे पुढील नोंद दिसते:

It is interesting to learn that a Hindu widow, Mrs. Ramabhai has started in business at Bombay as a bookseller. Her husband, the late Mr. Atmaram Sagoon, was also a bookseller; but her shop is independent of the firm in which he was a partner. (ऑगस्ट १५, १८८५, पा. २११)

(नावामध्ये उघड चूक आहे.)

६) निर्णयसागरप्रमाणेच अनेक दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन आत्माराम सगुण अथवा राधाबाई आत्माराम सगुण ह्यांनी केलेले दिसते. लो. टिळकांच्या The Orion ह्या पुस्तकाची १८९३ मधली पहिली आवृत्ति राधाबाई आत्माराम सगुण ह्यांच्या तर्फे प्रकाशित झाली. 'Epic India or India as described in the Mahabharata and the Ramayana' ह्या चिं.वि.वैद्यांच्या पुस्तकाची १९०७ सालची पहिली आवृत्ति राधाबाई आत्माराम सगुण ह्यांच्याच नावे आहे. इतर अनेक दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन त्यांनीच केल्याचे दिसते.

७) 'The Theosophist Volume 16', येथे पान २६७ वर पुढील नवी माहिती मिळते:

Bai Rakhmabai Returns again.
That talented and high-minded young Hindu lady, Bai Rukhmabai, daughter of the late Dr. Atmaram Sagun, of Bombay, will have returned to Bombay with Miss F. H. Miiller, F.T.S. , before this number of the Theosophist reaches its readers. Her career has been cornpletely successful and earned for her general esteem. It recalls and rivals that of the lamented Anandabai Joshi, F.T.S., who, poor thing! died shortly after her return to India after gaining her M.D. degree in America. Rukhmabai has taken the Belgian full degree of M.D, after graduating at a Scotch Medical College most creditably. She was one of the first Hindu girls to call on H.P.B. in Girgaum, and her father and I were good friends. If I am not mistaken, she owes her medical education and personal support throughout her terms principally to the noble generosity of Mrs. Muller and her daughters, at whose homes in England she has been treated like a relative rather than a mere acquaintance. Undoubtedly she has a great future before her.

अशा रीतीने परदेशामध्ये जाऊन मराठी हिंदु स्त्रीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचे हे तकालीन तिसरे उदाहरण. पहिले म्हणजे आनंदीबाई जोशी, दुसरे रखमाबाई, डॉ. सखाराम अर्जुन ह्यांची सावत्र मुलगी आणि तिसरे रखमाबाई सगुण. पहिल्या दोघींबद्दल आता पुरेशी माहिती उपलब्ध आहे पण रखमाबाई सगुण ह्यांच्याबद्दल बराच शोध करूनहि मला इंटरनेटवर वरील त्रोटक माहितीपलीकडे काहीच मिळाले नाही. उदाहरणार्थ, मिळालेल्या ज्ञानाचा नंतरच्या आयुष्यात त्यांनी कसा उपयोग केला? हे समजायला जरा अवघड जात आहे. दुसर्‍या रखमाबाई युरोपातून १८९४ साली परतल्या तर तिसर्‍या रखमाबाई १८९५ साली परतल्या. त्या काळात कोणीहि स्त्रीने परदेशात जाऊन उच्च शिक्षण मिळवायचे ही निश्चितच भरपूर प्रसिद्धी मिळणारी गोष्ट असली पाहिजे. असे असतांना तिसर्‍या रखमाबाईंबद्दल माहितीचा इतका अभाव का असावा?

जुन्या मुंबईतील सामाजिक वातावरणाचा अभ्यास असलेल्या कोणाकडून ह्यावर काहीतरी नवीन मिळावे अशा अपेक्षेने हे लिखाण करत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लेखाब‌द्द‌ल अनेक‌ ध‌न्य‌वाद‌!
र‌ख‌माबाई स‌गुण‌ यांच्याब‌द्द‌ल प‌हिल्यांदाच वाच‌ले. प‌ण राधाबाई आत्माराम स‌गुण यांचा उल्लेख 'म‌राठी ग्र‌ंथ‌प्र‌काश‌नाची दोन‌शे व‌र्षे' या श‌र‌द गोग‌टेलिखित‌ पुस्त‌कात आहे: आर्य‌भ‌गिनी हे मासिक पुस्त‌क 'मिसेस‌ राधाबाई स‌गुण' यांच्या आश्र‌याने चाल‌त होते. आनंदीबाई लाड ह्या या मासिकाच्या सुरुवातीच्या संपाद‌क होत्या. प‌हिला अंक मार्च १८८६म‌ध्ये प्र‌काशित झाला. मासिकाची व‌र्ग‌णी स्वीकार‌णे व‌गैरे व्य‌व‌स्था 'राधाबाई आत्माराम स‌गुण आणि कंप‌नी'मार्फ‌त होत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I am currently reading The Orion by Lokmanya Tilak and this background regarding the publisher is extremely helpful.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंद कोल्हटकर जालावरुन रिटायर्ड झालेत काय ? हल्ली त्यांनी लिहिलेलं काही दिसत नाही. छान लिहायचे जुन्या आठवणी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0