शब्दप्रपात

या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥धृ॥
शब्दांचे मौक्तिक चोहिकडे विखरावे..
लेखणीमधुनी भावतरंगांचे भरते यावे ॥१॥

या शब्दलतिकांची ऐसी गुंफण व्हावी
विताना सप्तरंगांची देखणी माला मिरवावी
या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥२॥

ह्या काव्यसुमनांची ऐसी उधळण व्हावी
तृण पातांवरी जलबिंदूंची शिंपण व्हावी
या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥३॥

या स्वैर विचारांचे ऐसे बंधन व्हावे
रंगीन छटांचे काव्यखंड निर्माण व्हावे
या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥४॥
―₹!हुल /२०.०७.१७

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पद्म.

अप्रतिम...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0