महावितरण वीजबिलाचा झोल

जून महिन्यात महावितरणच्या सगळ्याच ग्राहकांची वीजबिलं नेहमीपेक्षा अधिक आल्याची तक्रार होती. जे ग्राहक तक्रार करायला गेले त्यांना उन्हाळ्यात पंख्यामुळे बिल जास्त येते असं कारण सांगितले. मी बिल नीट बघितले तर आमचे बिल १ महिन्याचे नसून १.३ महिन्याचे होते. म्हणजे ९ दिवस उशीरा मिटर रिडींग घेतले होते, त्यामुळे अधिक युनिट पडल्याने बिलही जास्त आले होते . बाबा तक्रार करायला महावितरणच्या कार्यालयात गेले, तेथील अधिकार्‍याने उशीरा रिडींग घेतल्याचे मान्य केले. पुढील महीन्यात ८-९ दिवस आधी रिडींग घेतले जाईल ,त्यामुळे पुढचे बिल कमी येईल. खरोखरच पुढील महिन्याचे बिल ०.७३ महिन्याचे म्हणजे २२ दिवसाचे आले , बिल कमी आल्याचे समाधान वाटले. वरवर पाहता ह्यात आपले काही नुकसान झाले नाही असं वाटेल, परंतू प्रत्यक्षात महावितरणने ग्राहकांच्या खिशातून पैसे चोरले आहेत.

ज्या ग्राहकांचा नेहमी महिन्याचा वीज वापर १०० किंवा वरील स्लॅबच्या आत असेल त्यांचे रिडींग १.३ महिन्याने घेतल्याने काही युनिट वरच्या स्लॅबमध्ये गेल्याने तितक्या युनिटला अधिक दर लागल्याने त्या ग्राहकाला नाहक भुर्दंड पडला. पुढील महिन्यात लवकर रिडींग घेतले तरी त्या ग्राहकाला त्याचा काहीही फायदा झाला नाही,कारण जरी एक महिन्यानी रिडींग घेतले असते तरी त्याचा वीज वापर ठरावीक स्लॅबच्या आतच आला असता. ह्याला महावितरणची छुपी भाववाढ म्हणायचे काय?

वीजबिलातील 'आकार' हे नक्की काय असतात हे कळतच नाही. नोव्हें.१६पर्यंत वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क व इंधन समयोजन आकार ह्यांचा समावेश होता. डिसें.१६ पासून त्यात वहन आकाराची भर पडली.वीज आकार स्थिर ठेवले जातात व बाकीचे आकार वाढवून वीज ग्राहकांची लूट केली जाते. स्थिर आकार एक वर्षात २०% ने वाढला. ग्राहकाला बुचकाळयात टाकणार्‍या ह्या आकारांची खरोखरच आवश्यकता आहे का?

field_vote: 
0
No votes yet

आमच्याकडे तर एका प्रकरणाची सध्या जोरदार पेपरबाजी चालूय. आयटीआय शिकलेल्या एका जणाने एक प्रकारचं रीमोटच तयार करुन विकलं अनेकांना जे वापरुन मीटर रीडींग चालू-बंद करता येत. महावितरणच्या सेक्युअर समजल्या जाणार्या मिटरची सुरक्षा सहज भेदली. वरुन हे पण आलय पेप्रात की महावितरण कडे वीज गळती कुठं होते हे शोधायचं तंत्र तंत्रज्ञान असून ते त्याचा म्हणावा तसा वापर करत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

म‌ध्ये आम‌च्या इथेही फिर‌ते विक्रेते याय‌चे. विजेच‌ं बिल‌ क‌मी यावं म्ह‌णून‌ क‌स‌ल‌ंस‌ य‌ंत्र‌ विकाय‌ला आण‌लेल‌ं. मेन‌ स्विच‌ ज‌व‌ळ‌ ब‌स‌वून‌ काहीत‌री क‌र‌णार‌ म्ह‌णे. आम्ही विक‌त‌ घेत‌लं नाही. प‌ण‌ आस‌पास‌च्या लोकांनी घेतल‌ं ब‌हुदा. त्यांच‌ बिल‌ क‌मी आल‌ं की नाही हे विचार‌ल‌ं नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0