ती वाचत असता कविता

ती वाचत असता कविता
डोळ्यात तरळले पाणी
गवसले हरवले शब्द
आठवली विस्मृत गाणी

ती वाचत असता कविता
भळभळल्या बुजल्या जखमा
दु:खाच्या शाश्वत प्रहरी
मज कळला अश्वत्थामा

ती वाचत असता कविता
मी पुन्हा हलाहल प्यालो
अवलाद नवी सर्पांची
मी गळा माळुनी हसलो

ती वाचत असता कविता
शेवटची बेडी तुटली
करुणेची धून अनाहत
झंकारत आतून आली

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे छान कविता. एकही शब्द ओव्हरवेट किंवा अंडरवेट नाही. क्रिस्प. झकास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)