पाऊस आठवणींचा

पूर्वी तू जवळ असतांना
मला ओला चिंब करायचा
पाऊस तुझ्या प्रेमाचा!

आज तू दूर असतांना
मला अश्रूंनी चिंब करतोय
पाऊस तुझ्या आठवणींचा!!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वेलकम बॅक सिंघम.
शंका - "असतांना" असं असतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'काय वर' वर आलेली कविता, कवि अननोन.

एकदा पाऊस माझ्याकडे रहायला आला.
भिजून आला म्हणून थोडा त्याला पुसला.
हसून म्हणाला
' मी आतुनच ओला आहे ,
सुखदुःखाचा माझ्याकडे ठेला आहे .
नाही आलो तरी लोक रडतात.
जादा आलो तरी लोक रडतात.
मला त्यांची समाधान रेषा शोधायची आहे '
खिडकीजवळ बसला, स्वयंपाकघरात आला,
बेडरुमध्येही डोकावून गेला.
जाताना थोडा हेलावला.
मिठी मारून कानात म्हणाला
' काही झालं तरी हृदयाच्या कप्प्यात
ठेव थोडी जागा माझ्यासाठी..
आणि थोडा ओलावाही.
कधी कधी मला त्याची ही गरज भासते... '
जाताना थोडं पाणी माझ्या डोळ्यात ठेवून गेला..
एकदा पाऊस माझ्याकडे रहायला आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल पुस्तक पेठे चा श्रावणगाणी हा फार मस्त कार्यक्रम झाला. पावसावरील कविता कौशल इनामदार व मधुराणी प्रभुलकर यांनी सादर केला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/