दहीहंडी

©®™मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(पूर्वपर्वांनगीशिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

'दहीहंडी' म्हणजे काय ग मॉम? प्रशांत उर्फ पॅटने आईला विचारलं. दहीहंडी म्हणजे 'गोविंदा' मॉम ने खुलासा केला. पण गोविंदा का खेळायचा?" पॅट ने विचारलं. "अरे, कृष्णाला लोणी खूप आवडायचं, मग गोकुळातल्या सगळ्या जणी लोणी मटक्यात लपवून ठेवायच्या, कृष्ण सगळ्या सवंगड्यांना म्हणजे फ्रेंड्सना गोळा करून ती हंडी फोडायचा. म्हणून हल्ली गोविंदा खेळला जातो. मॉम ने सांगितलं.

"मॉम, गोविंदा साठी कॉलनीत टू हँडरेड रुपीज कॉन्ट्रीबुशन रॉकीकडे द्यायचं आहे!" पॅटने सांगितलं. मॉमने रॉकिला बोलावून घेतलं. "हंडी कोण फोडणार?" मॉमने विचारलं. "बॉबी फोडणार आहे" रॉकी बोलला. "कोण? तो बबन? शी.." मॉम किंचाळली. "त्याने थ्री हँडरेड कॉन्ट्री दिलंय." रॉकी ने खुलासा केला.

त्यावर पॅटची मॉम म्हणाली "आमचा पॅट कृष्णासारखा दिसतो, शिवाय आम्ही त्याला कृष्णाचा कॉस्च्युम पण आणणार आहोत. फ्लूट, क्राऊन आणि त्यात फिदर पण आहे. अरे कृष्णाला लोणी आवडायचं तसं आमच्या पॅटला पण बटर खूप आवडत. तो पावभाजी खाताना सुद्धा बटर पावभाजीच मागवतो. हो की नाही रे पॅट?". पॅट ने मान हलवली.

"पण पॅट किती मोठा आहे, वय कमी असलं तरी त्याच वजन जास्त आहे. त्याला उचलणे सोपं नाहीये" रॉकी कुरकुरला.

"आम्ही फाईव हँडरेड कॉन्ट्री देऊ!" मॉमने तोडगा काढला.

अखेर पॅट ने उंचावरून खाली आणलेली हंडी फोडली. मॉम ने मोबाईल वर फोटो काढले. ते सोशल मीडियावर अपलोड केले. त्याला शेजारणीच्या मुलीच्या सकाळी भारतमाताच्या कॉस्च्युम मधल्या फोटोपेक्षा जास्त लाईक मिळाल्या. कॉलनीच्या व्हाट्स अप ग्रुपवर मॉमने त्याचे स्क्रीनशॉट टाकले. कॉलनीतल्या बायकांनी मुद्दाम त्या पोस्टनंतर रेसिपी, रांगोळ्या, अमेरिकेतील नातवाच्या बर्थडे याच्या पोस्ट्स टाकल्या. मॉम एकाचवेळी संतापल्या आणि बाकी बायका जळाल्या म्हणून खुश झाल्या.

मॉम आता पॅट ला गणेशा फेस्टिवल मध्ये कोणकोणत्या कॉम्पिटिशन मध्ये उतरवायचे याचं प्लॅनिंग करण्यात बिझी आहेत. तर बॉबीची मॉम यावेळी डबल कॉन्ट्री द्यायला तयार आहे.

-©®™मंगेश पंचाक्षरी, नासिक.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला हे एक प्रचंड आवडलेलं आहे. जबरी लिहीलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

हा एक माझ्या डोक्यात जाणारा उच्चार. एकदा मंकी ने खाकुरा घेतला ह्या वाक्यावर लोळुलोळु हसलो होतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...