उखाण्यातून नाव

©मंगेश पंचाक्षरी, नासिक.
आज रविवार दि 30 जुलै 2017 रोजी दै सकाळ मध्ये प्रकाशित झालेला माझा लेख

'उखाण्यातून' नवऱ्याचे नाव घेणे हा एक खास मराठी लोकांमधील लोकप्रिय उपचार आहे. नव्या नवरीला उखाणा घेण्यास किंवा नाव घेण्यास आग्रह केल्यानंतरचं तिचं आढेवेढे घेणे अन लाजणे इतके मोहक असते की उखाण्या पेक्षा ते 'दृश्य' च जास्त मजा देऊन जाते. अर्थात हे फक्त नव्या नवरीलाच लागू आहे असे नाही. कोणत्याही वयातील बाई असो, अगदी 80 वर्षांची का असेना, नाव' घेताना आढेवेढे अन लाजणे अगदी तसेच असते. लग्न समारंभ किंवा एखाद्या शुभ कार्यात हा ' नाव' घेण्याचा कार्यक्रम अगदी रंगत आणतो.. त्यातच मग एखादया बोल्ड बाई ने " चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत, आणि मनोहररावांशिवाय मला नाही करमत " असा रोमँटिक उखाणा घेतला तर मात्र विचारायला च नको.

शाळा कॉलेज मधली मुलगी लग्न होऊन जेव्हा ' वहिनी' होते तेव्हा त्या' चे मित्र आपोआपच ती चे 'भाऊ'जी होतात.. नाव घेण्याचा आग्रह करण्यात ते पुढे असतात. एका लग्नात तर खूप आग्रह करूनही नव्या नवरी ने एकच धोशा लावला होता, तो म्हणजे ' मला नाव नाही घेता येत हो' त्यावर " मग आडनाव घ्या" असा एक आवाज मित्रांच्या टोळक्यातून आला आणि एकच हशा पिकला. काही उत्साही तरुण तर लग्न कार्यात नुकतीच ओळख झालेल्या अविवाहित मुलीलाही नाव घेण्याचा आग्रह करून धमाल उडवून देतात.. मग ती मुलगी देखील
"रुप्या च्या मखरात, मूर्ती कोणाची ठेऊ,
आणि लग्नच नाही झालंय अजून
तर नाव कोणाचं घेऊ?"
असं प्रत्युत्तर देते.

खरं तर उखाण्यातून नाव घेणे म्हणजे अगदीच 'र' ला 'र' जोडणे असते, त्यात फार काही उत्तम काव्य असते, असे नाही. तरीही काही उखाणे खूपच सुंदर असतात. माझ्या मामी एक मोठा लांबलचक गुजराथी उखाणा घायच्या. तो ऐकण्यास आम्ही नेहमीच आतुर असायचो. तसेच काही चतुर बायका
"सोन्याच्या ताटात काटेरी हलवा,
कुठं गेले बाई, जरा 'संपतरावना' बोलवा"
असा योग्य वेळी योग्य संदेश देणारा उखाणा घेऊन बहार उडवून देतात. काही वेळेस तर पुरुषांनाही उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. अर्थात काही पुरुषही या संधीची वाट बघत असतात आणि मग चार पाच उखाणे घेऊन बायकांमध्ये भाव खाऊन जातात.

भाजीत भाजी सारखा अति वापरलेला उखाणा जसा आहे तसेच काही 'न' घेतले गेलेले उखाणे ही प्रसिद्ध आहेत. उदा.
"बाजारात आहे आमचा पानाचा ठेला
अन सखाराम मेला म्हणून तुकाराम केला"
किंवा
"अंधाऱ्या कोनाड्यात मिणमिणती पणती,
हे गेले वरती, अन मी राहिले खालती" असा कल्पना विस्तारही करून झालेला आहे.

एकूणच उखाण्याचा संबंध नऊवारी साडी, नथ या पेहेरावास जरा जास्तच शोभून दिसतो. पाचवारी साडी, शालू, पैठणी यांनाही हा प्रकार शोभून दिसतो.एकूण सर्वच बायका उखाणा घेताना छान वाटत असल्या तरी 'बॉय कट' करून 'स्लीवलेस' ब्लाउज घातलेल्या किंवा जीन्स वगैरे घातलेल्या आणि दिवसभर नवऱ्याला अरे संतोष, अरे दिनेश असे हाक मारणाऱ्या बायका जेव्हा उखाणा घेतात तेव्हा नाही म्हंटलं तरी जरा 'ऑड' वाटतं!

काहीही असो, पहिले तू घे गं, असं म्हणत लाजत पण आतून सुखावत, नवऱ्याकडे चोरटा कटाक्ष टाकत उखाण्यातून नाव घेणारी बाई, कानात प्राण आणून उखाणे ऐकणाऱ्या आणि हसून टाळ्या वाजवून दाद देणाऱ्या सख्या आणि "आम्हाला नाही ऐकू आला बुवा , परत नाव घे" असे म्हणणारे आप्त हे आपल्या परंपरेतील एक लोभस अन खास वैशिष्ट्य आहे.... "नावात काय आहे" असे म्हणणारा शेक्सपीयर जर या मातीत जन्मला असता, तर......?

- मंगेश पंचाक्षरी, नासिक.
दै सकाळ मधील लेख, रविवारी दि 30 जुलै 2017.
इमेल: mangeshp11@gmail
Com.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

"सोन्याच्या ताटात काटेरी हलवा,
कुठं गेले बाई, जरा 'संपतरावना' बोलवा"
असा योग्य वेळी योग्य संदेश देणारा उखाणा घेऊन बहार उडवून देतात

नाही समजल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या एका डॉक्टर मित्राने सांगितलेला किस्सा. त्याच्या एका डॉक्टर मित्राने लग्नात उखाणा घेतला होता की -

डायरियावर बहुगुणी मीठ साखर पाणी
____ चे नाव घेतो तूच माझी राणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परसातल्या अंगणात वाळू घातले गहू,
राव म्हणतात आज उभ्यानंच *ऊ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उभ्यानंच खाऊ! अहो अस उभ्यानच खाणे बर नाही.अंगाला लागत नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पकाकाका बनेल आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किंवा 'गाऊ'. उभ्याने गायला कोणाचीच हरकत नाही. तेवढाच आनंद मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

त्या 'आळंदीची वाट' सीरीज़मधील 'त्या' गाण्याच्या मूळ आवृत्तीतसुद्धा 'गाऊ' असेच असावे काय? नाही म्हणजे, संत-संतीण मंडळी (अभंग, भजने वगैरे) गाण्याव्यतिरिक्त दुसरे काय करणार? तस्मात्, आळंदीच्या वाटेवर मार्गक्रमणा करणाऱ्या एखाद्या संतास वाटलेही असू शकेल, की चालताचालताच
गावे. आणि म्हणून त्याने संतिणीस तसे प्रपोज़ केलेही असू शकेल, कोणी सांगावे?

..........

ज्याचे भंजन होऊ शकत नाही, तो.

'भंजने' नव्हेत. 'भजने'.

अर्थात, 'उभ्याउभ्या'. वारीत रांगत अथवा अन्य कोणत्या पोज़ वा पोज़िशनमध्ये मार्गक्रमणा करण्याची प्रथा आजतागायत नाही. तस्मात्, 'उभ्याउभ्या'च३अ.

३अ त्यांच्या या सनातन पोज़िशनीस त्यांच्या सन्मानार्थ इत:पर 'वारकरी पोज़िशन' अथवा 'संत-संतीण पोज़िशन' म्हणून संबोधण्यात यावे काय? (बोले तो, 'उभ्याउभ्या'?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

मजेदार!!!
काहीजण/जणी नाव घ्यायला सांगायची वाटच पाहात असतात. ---हिहि.
नाव घेताना पुरुषांना कोणते कपडे शोभतात मंगेशराव?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0