बायको

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

आमचा प्रेमविवाह झाला. आजही आम्ही आमच्या बायकोच्या खूपच 'प्रेमात' आहोत. ती 'पुण्याची' आणि आम्ही 'नाशिकचे'. 'पुण्यापेक्षा मोठं आणि भारी शहर जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही नाही ' याबद्दल पुणेकरांना ठाम विश्वास असतो. त्यामुळं आमच्या सौ ना देखील 'पुण्याबद्दल' जबरदस्त प्रेम आहे. मी लग्नापूर्वी तिला भेटायला वारंवार पुण्यात जात असे. (आता आम्हा दोघांना एकमेकांत बोलायला फुकट फोन असूनही "आज गिळायला घरी येणार का बाहेरच हादडणार?" एवढाच काय तो संवाद होतो) त्यावेळी ती आम्हाला पुण्यातील एकेक महान ठिकाणं दाखवून 'तुमच्या 'नासिकला' असं काही आहे का ?' असं विचारून पुण्याचा जाज्वल्य अभिमान दाखवून देत असे . 'शनिवार वाडा, पर्वती, युनिव्हर्सिटी, लक्ष्मी रोड' असं काहीकाही दाखवून ती आम्हाला चकित करत असे. एकदा तर तिने मला (माझ्याच पैशाने) मस्तानी खाऊ घालून "नाशिकमध्ये मस्तानी आहे का?" असं विचारल्यावर "मस्तानी नाही पण नाशिकमध्ये बाजीराव आहे" असं उत्तर देऊन आम्ही नासिककरांची चुणूक दाखवली होती. नासिक हे अगदीच मागासलेले, जुनाट खेडे आहे असा पुणेकरांचा समज असतो त्यामुळे सौ जरी आमच्या प्रेमात असली तरी आमच्या होणाऱ्या सासूबाईंना एकूणच नासिकबद्दल बिल्कुलच आदर नव्हता. मी त्यांना नाशिकचे 'ऐतिहासिक' महत्व समजावून सांगताना "शुर्पणखेचे नाक इथे कापले म्हणून या ठिकाणाला 'नासिक' हे नाव पडलंय, तुमच्या पुण्याला आहे का अशी काही स्टोरी?" असं जरा आवाज चढवून विचारलं. तर सासूबाई म्हणाल्या "ती शूर्पणखा तरी बरी हो! तीने स्वतः चं नाक कापून घेतलं. आमच्या लेकीने तर तुमच्या प्रेमात पडून आमच्या सगळ्या घराण्याचे नाक कापून घेतलं!" शेवटी 'सासूबाई या सासूबाईच असतात' हे लक्षात ठेवा. आजच्या चाळीशी च्या बायकांनी 'आदर्श सासूबाई' कसं बनावं यासाठी आमच्या 'सासूबाई' कडे क्लासेस लावायला हरकत नाही.

यथावकाश आमचं लग्न झालं. आम्ही 'पंचाक्षरी' आणि ती माहेरची 'सातभाई'. दोघांच्या आडनावात आकडे आहेत. 'पाच' आणि 'सात' मिळून 'बारा' वाजल्यापासून 'नुमरॉलॉजी' वर आमच्या सौ चा गाढ विश्वास बसलाय. तरीही ती नेमाने 'वटसावित्री' ची पूजा करते. 'सात जन्म हाच पती मिळू दे' असा वर मागते. पूजेच्या दिवशी 'जीन्स आणि इतर फॅशन' करून पूजा करणाऱ्या काही 'वटसावित्री' आणि सोशल मीडियावर च्या काही चा'वट'सावित्री" पाहिल्यावर आम्हाला आमच्या गुणी, सुंदर, हुशार बायकोबरोबर सात जन्म घालवायला नक्कीच आवडेल. 'माझ्या सारख्या नवऱ्याला सहन करणारी, माझे लाड करणारी, संकटात पाठीशी उभी रहाणारी, मला सदैव धीर देणारी, सर्वतोपरी साथ देणारी' अशी बायको मिळणं हे माझं भाग्यच आहे. आता आमच्या घराजवळ सगळीकडे ब्लॉक्स, फरशा आणि सिमेंट चे रस्ते झाल्याने झाडांसाठी सुतभरही (की तसूभरही?) जागा शिल्लक राहिलेली नाहीये. तिथे पूजा करण्यासाठी 'वड' कुठून मिळणार? तरीही आमची सावित्री रोज मनोमन 'वड' पूजत असते. 'ती' च माझी आ'वड' आहे आणि मीच तीचा आधार'वड' आहे.

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
ई-मेल:- mangeshp11@gmail.com
(पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाकी सगळं ठीक आहे , पण ' जीन्स आणि इतर फेसन ' वगैरे रोचक वाटले . जीन्स ला फॅशन या सदरात टाकताय , म्हणजे काका तुमची नक्की पिढी कधीची म्हणायची ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमची पिढी म्हणचे ज्यांचे पुतणे अजून लहान आणि अज्ञानी आहेत (त्या पुतण्यास अजून वेगळी विशेषणं आहेत पण ती इथे लिहिण्यास आमची सभ्यता आड येतेय) ती आहे.
- काका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी बाबा जोक्स आहेत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१११ गौरक्का

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अग्ग्ग्गदी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमकं सि का शि हो? तुमच्या सासुबाईंना शि च वाटत असणार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

नासिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी त्या विशेषनामाचे विकरण 'नाशका' असे होते ('नासका' असे नव्हे), ते कसे काय ब्वॉ?

उदा.: नाशकास, नाशकाहून, नाशकाचा, नाशकात. (नासकास, नासकाहून, नासकाचा किंवा नासकात नव्हे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखात तसे केलेले नाहीये. मूळ शब्द नासिक आहे तो नाक या अर्थाने. नाशिकचा अर्थ तुम्हाला माहित असेल तर सांगावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या वडाला पारंब्या फुटतात त्यालाच आधारवड म्हणतात का हो ?

तुम्ही परवानगी दिली तरीही आम्ही हा लेख पुन्हा मुद्रित वा प्रकाशित करणार नाही, याची खात्री देतो. फारतर, व्हाटस ॲप वरच्या आमच्या शत्रुंच्या अंगावर सोडू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

नावे बदला. सातपुते, बारलिंगे, आठवले, चौबे अशी नावे घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांचं सातभाई आडनाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला शत्रू असणे साहजिक आहे. हा लेख जरूर त्यांच्यावर सोडा कारण ते तुमचे शत्रू आहेत म्हणजे नक्कीच समजदार , सभ्य, सुशिक्षित असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

वा वा , का(ळे) काका, तुम्ही पण ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नावड, चवड आणि कावड राहिले. पण परवड या शब्दाचा नवाच अर्थ लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये
काहो, घाबरता की काय बायकोला?! गम्मत केली हां जरा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

धन्यवाद, हा लेख आता वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मुक्तपीठ' मध्येहि नाकारलेले हे शाळ्करी लेख येथे टाकायला काही बंधन नाही म्ह्णून इथे येत आहेत का? 'संपादककाका, आम्हाला वाचवा!!'

पुन: वरतून 'पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये' ही तंबी? आम्हाला पैसे देऊ केले तरीसुद्धा तसले काही करणार नाही ह्याची खात्री असू दे. असले टुकार लेख आम्ही प्रकाशित करण्यासाठी 'हमे क्या पागल कुत्ते ने काटा है?'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उगाच 'मुक्तपीठा'चे नाव का घेता? 'मुक्तपीठा'लासुद्धा काही स्टँडर्ड आहे! (निदान एके काळी तरी होते.)

'मुक्तपीठा'ची बदनामी थांबवा!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दै. संध्यानंद चालेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचला नाही कधी (ऐकून असलो तरी), पण 'संध्यानंद'लासुद्धा काही किमान स्टँडर्ड असेल, असे वाटले होते. पण (आता तुम्ही रेकमेंड करताय तर) चालेलसुद्धा कदाचित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चालेल.
संध्यानंद पूर्वीचा राहिला नाही. मधे एकदा घेऊन २ रूपये खर्ची करून वाचला तर त्यात आरोग्यविषयक सल्ले, कुकिंग, म्यानेजमेंट करीअर असल्या फालतू गोष्टी आढळल्या.
तेव्हा आताचा संध्यानंद चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोल्हटकर वयस्क आहेत असा भ्रम का होता देव जाणे. हा एकदम तरण्या माणसाचा प्रतिसाद वाटतो.
====================
बाकी लेख जास्त प्रामाणिक आहे का हा प्रतिसाद याचा विचार करून मति कुंठित झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोल्हेकुई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निबंध आवडला. इतकं प्रामाणिक लिहिण्याइतकं धैर्य फारच कमी लोकांकडे असतं. ते येतं तेव्हा बय्राचदा सहस्रचंद्रदर्शनाचा आधारवड झालेला असतो. बायका मोठ्याने बोलतात त्यापेक्षाही पुटपुटतात त्यातला ऐवज भयानक असतो. बाकी गाडी नवरा वि बायको या रुळावरून नासिक वि पुण्यनगरी या रुळावरही जात होती. प्रत्यक्ष काहीच करता येत नसेल समोरच्याला तर खवचटपणाचा आधार असतोच. लेखनाला उगाच जॅमर का लावता? पसरू दे त्याचा परिमळ मुळामुठा-घोड-गोदावरीपर्यंत. एके दिवशी या सर्व नद्या जोडल्याच जाणार आहेत ना? कसला वडाचा फोन नी कसली आइडिया?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद, हा लेख आज वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत अचरटदादा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बायका मोठ्याने बोलतात त्यापेक्षाही पुटपुटतात त्यातला ऐवज भयानक असतो.

काय ते अचूक निरीक्षण, बाबाजी, जय हो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो