मिस कॉल

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
( रविवारी दि 13 ऑगस्ट 2017 रोजी दै सकाळ मध्ये पान क्र 6 वर छापून आलेला लेख)

आमच्या सौ ला कोणी 'मोबाईल'वर फोन केला तर मुळात आपला फोन वाजतो आहे हेच त्यांना लवकर समजत नाही. कारण त्या रोज मोबाईलची 'रिंग' बदलत रहातात. मोबाईल ही वस्तू रोज 'वॉलपेपर , रिंगर आणि डीपी' बदलणे एवढ्या साठीच असते अशी सौ ची ठाम समजूत आहे. सौ च्या प्रत्येक पर्सला खूप सारे 'कप्पे' असतात. त्यातल्या कोणत्या तरी 'कप्प्यात' सौ मोबाईल ठेवतात. मोबाईल ठेवण्याचा 'कप्पा' कधीही फिक्स नसतो. त्यामुळं मोबाईल ची 'रिंग' वाजायला लागली की सौ पर्स मधून मोबाईल सोडून इतर सर्व सामान बाहेर काढून मोबाईलचा शोध घेऊ लागतात. एका पर्स मध्ये इतकं समान मावू शकते यावर सौ सह आमचाही विश्वास बसत नसतो. त्यात बऱ्याच वेळा पूर्वी घरभर शोधलेल्या वस्तूचा अचानक 'लाभ' होतो. सौ त्यात 'हरवून' जातात. इकडे मोबाईल ची 'रिंग' वाजतच रहाते. अखेर मोबाईलचं वाजणं आणि थरथरणं बंद होते. आता एवीतेवी रिंग बंद झालीच आहे तर मोबाईल 'शोधून' काय उपयोग असा विचार करून सौ मोबाईल बाहेर न काढताच पुनः सर्व सामान पर्समध्ये भरून ठेवतात. पर्सची चेन बंद केली जाताच पुनः मोबाईल वाजणे सुरू होतं. विशेष म्हणजे 'मोबाईल'चा शोध परत पहिल्या प्रमाणेच सुरू होतो.

बायकांनी लवकर मोबाईल न उचलण्याचे 'मूळ' हे त्यांच्या पारंपरिक पोशाखात आहे. बायका जनरली साडी किंवा पंजाबी ड्रेस या वेशात असतात. या पोशाखाना खिसा नसल्याने मोबाईल पर्स मध्ये ठेवण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. क्वचित काही स्त्रिया जीन्स वापरत असल्या तरी पुरुषांप्रमाणे जीन्स च्या खिशात मोबाईल ठेवण्याची बायकांना सवय नसते. घरात किचन मध्ये पोळ्या वगैरे करताना, घरकाम करताना त्यांना पटकन मोबाईल वापरता येत नाही. आजकाल घराघरांत बरीचशी भांडणे ही केवळ बायको ने वेळेवर मोबाईल 'न' उचलण्याच्या कारणाने होत असतात.

बायकांची मात्र नवऱ्याकडून चटकन 'मोबाईल' उचलण्याची अपेक्षा असते. नवऱ्याने मोबाईल उचलायला उशीर केला की बायको ला नको नको त्या 'शंका' यायला लागतात. नवरेही काही कमी नसतात. त्यांच्या मोबाईल मध्ये सर्वात जास्त 'मिस' कॉल हे 'मिसेस' चेच कॉल असतात. एरवी एखाद्या 'मिस' चा कॉल कोणी पुरुष कशाला 'मिस' करेल?

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
इमेल:- mangeshp11@gmail.com

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बायकांनी लवकर मोबाईल न उचलण्याचे 'मूळ' हे त्यांच्या पारंपरिक पोशाखात आहे. बायका जनरली साडी किंवा पंजाबी ड्रेस या वेशात असतात. या पोशाखाना खिसा नसल्याने मोबाईल पर्स मध्ये ठेवण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो.

आमचे एक मित्र नेमका हाच गहन प्रश्न घेऊन गेली अनेक वर्षे संशोधन करीत आहेत. इथे ऐसीवर सुद्धा त्यांनी फोकस ग्रूप केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साड्यांना खिसे का नसतात, हा प्रश्न आमच्या एका मित्रवर्यांना अजूनही पडलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोठे ठेवाल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

ते कै नाही. प्रश्न प्रसवणे महत्त्वाचे. भले मग त्यांना काही अर्थ असो वा नसो, भले मग ते प्रश्न अगोदर विचारलेले असोत वा नसोत, भले मग एका गूगल सर्चमध्ये त्यांचे उत्तर मिळत असो वा नसो. प्रश्नेरिया रॉक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पंजाबी ड्रेस ना आजकाल खिसे असतात...ॲण्ड व्हॉट रबिश पारंपारीक पोशाख़ वगैरे...
मी सणावाराला पंजाबी घालते. साड्या, कुणा जवळच्या नातेवाईकांच लग्न असेल तर. अदरवाईज जीन्स रॉक्स... आजीच्या जमान्यातल्या गोष्टी सांगून जनमानसात चूकीची प्रतिमा तयार करण्याचा दुष्ट प्रयत्न आहे हा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मालकीणबैंच्या कुर्त्याला खिसे असतात असे त्यांनी जेंव्हा ह्या विषयावर ऐसीवर गहन चर्चा झाली होती तेंव्हा सांगितले होतेच.

-------------

आजीच्या जमान्यातल्या गोष्टी सांगून जनमानसात चूकीची प्रतिमा तयार करण्याचा दुष्ट प्रयत्न आहे हा...

ह्याच प्रतिमेला मी किळसवाणे चित्र म्हणले होते पण अजोंना त्याचा राग आला Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर येण्यापूर्वी ऐसीवर टिनपाटांचा सुकाळ झाला होता. अगदी,
मागे उभा टिनपाट
पुढे उभा टिनपाट
अशी स्थिती झाली होती. आता, तुम्हा सर्वांचा हिशोब चुकता केला जाईल. आणि मग 'मांगल्यच मांगल्य" असे वातावरण प्रस्थापित होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'राम' हवा म्हणून 'त्यांना' बडवतो,काम हवे म्हणून 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे हो दास, आम्हाला बडवे होण्यातच रस|

'सही' सही आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो आणि बॅटमॅन, अनुराव आणि गब्बरसिंग ह्यात थोडं मिसमॅच होऊन अजो आणि अनुराव ह्यांच्यातलं वाक् युद्ध पहायला मिळावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

काही शब्द अवतरण चिन्हात का लिहिले आहेत हे काही आकळले नाही अजून, भातामध्ये खडे लागावे तसे टोचतात ते..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे बाकीचा लेख 'भात'?? वा! गौराक्का वा!! चांगले पांग फेडलेत ऐसीचे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

भात नै तर काय बिर्यानी म्हणावं काय मग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयोव.... पोराने चक्क माझी बाजू घेतली.... Blum 3Blum 3Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असणार ते बहुधा.
(कोटीला हसू नये)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

काही शब्द अवतरण चिन्हात का लिहिले आहेत हे काही आकळले नाही अजून

कोठे आणि कशावर (किंवा कशाला) हसावे, हे समजण्याची सोय व्हावी, म्हणून असावे बहुधा.

म्हणजे कसे आहे ना, की लहानपणी शाळेत वर्गात सदैव अगम्य किंवा रटाळ विनोदकथनाची सवय असलेल्या मुलास आम्ही सांगत असू, की बाबा रे, विनोद सांगून झाला, की मेहेरबानी करून हात वर करत जा, म्हणजे आम्हांस हसायचे कधी, ते कळेल, म्हणून. पण 'ऐसी'सारख्या माध्यमात हात वर करायची सोय नसते, म्हणून ही पर्यायी सोय असावी बहुधा.

किंवा, अमेरिकन (आणि कदाचित ब्रिटिशसुद्धा? चूभूद्याघ्या.) टीव्हीवरील विनोदी सीर्यलींत नाही का, अधूनमधून मोक्याच्या ठिकाणी 'कॅन्ड लाफ्टर' नावाचा प्रकार पेरून ठेवलेला असतो, तशातला काही प्रकार असावा.

(बादवे, प्रस्तुत शब्द अवतरणांत टाकण्याऐवजी जर अधोरेखित केले आणि/किंवा बोल्डटैपात टाकले, तर अधिक बरे दिसतील काय? कोठूनतरी लक्ष वेधल्याशी मतलब.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

मुक्तंपीठात जागा कमी पडली की पान क्र. ६ वर जादा जागा होती ती ह्या 'लेखा(?)'ने भरुन काढली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

मंगेशजी आप आगे बढो. हम तुम्हारे साथ है. समाज हा मुक्तपिठीयच्च असतो. आणि ऐसीच्या मांदियाळीत घुसून मुक्तपिठी घोषणा देण्याचं कौतुकच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.