Skip to main content

ती एक रात्र ...

ती एक रात्र ... गडद, गहिरी आणि नि:शब्द ...
शांत आणि गर्द कभिन्न
फिरत होती एकटीच... रात्रभर
पहाटवाऱ्याची वाट पहात.. मंद झुरत ..
आणि तिच्या सोबतीला होते ते अगणित तारे
बरंच काही देऊन गेली ती...
सांगून गेली त्या निरंव शांततेत ..
एकट्या फिरस्त्यासारखी
बोलायचं होतं तिला माझ्याशी ..
पाण्यावर उठतात तरंगलहरी ..
तश्या असंख्य संख्येने येतच होत्या त्या लहरी ..
प्रत्येक वाट निराळी आणि वेगळी ..सगळंच काही लहरी ..
फक्त तिचा स्वभाव समजायची वेळ मी शोधत होतो..
खोल मनातला अर्थ लावू पहात होतो ...
तो पण त्या एका रात्रीत ..
ओंजळभर रातराणीचा दरवळ
रात्रीच का, ते उमजून घेत होतो.
त्यासाठी कितीतरी वेळ ओंजळ धरून होतो ...
फार कठीण नव्हतं ते ..
फक्त एक रात्र तिला ऐकायचं होतं.
कानात, जीवात जीव आणून ..
अगदी मनापासून आणि मनातून.
मग उजाडायला फारसा वेळ लागला नाही ,
आणि आता ती रात्र कधी सरली
ते आठवतहि नाही ..
फक्त मलापण तिच्याशी बोलायचं होतं..
तेव्हापासून दिवसाची ओढ आपोआप कमी झालेय
आणि तिच्याशी सलगी साहजिकच वाढलेय ...
आता बोलत असतो फक्त...

मी आणि ती...एक रात्र ...

- आदित्य कलारसिक, २०.०८.२०१७