पुढील पाच मिनिटात,

पुढील पाच मिनिटात,
"अ" अतिरेकी बधीर करतील आपला मेंदू
"ब" बलात्कारी झुकवतील आपली मान शरमेने खाली
"क" कोवळी बालपणं विकली जातील छुप्या बाजारात
"ड" डोकी फुटतील धर्म/सत्तामार्तंडांच्या एका भृकुटीभंगाने आपल्या डोळ्यादेखत
ई-पेपर्स रिफ्रेश करून थकतील "अ" "ब" "क" "ड" च्या मिनिटागणिक वाढत जाणाऱ्या किंमती

आपल्या जीर्ण-शीर्ण त्वचेच॑ रोम-रोम जळताना
हे उत्सवी फिड्ल आता मीच वाजवायला घेईन म्हणतो

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप खूप छान. केऑस शब्दांत पकडता येणं इतकं सोपं नव्हे. आजच्या काळात ही कविता करायला धाडसही हवं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

अवांतर: मिपा वर याच कवितेवर आलेली एक प्रतिक्रिया "याला कविता किंवा रचना म्हणणे मनाला पटत नाहिये. जे काही लिहिले आहे त्याला 'र' ला 'ट' जोडणे म्हणतात. ..."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

आणि आपल्या प्रतिक्रियेलाही दुजोरा/दाद मिळावा/वी ह्या अपेक्षेने लिहीलेली वेगळी.
कविता बाऊन्सर जाणं त्याहूनही वेगळं.
तरीही, असतात आवडीनिवडी आपापल्या. असो.
मिपावर ह्याच मुख्य कारणासाठी मी लिहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

ती प्रतिक्रिया मीच दिली आहे. मात्र आजच्या तुमच्या दोन्ही कवितांना "चांगला" प्रतिसाद दिला आहे. (तिकडच्या आणि इकडच्या !)

अवांतर सुचना : कोण कोठे काय म्हणाले ह्याच्या खतावण्या लिहिणे सोडा. आयुष्य सुख:मय होईल. तिकडची धुणी इकडे धुण्यात काही पॉईंट नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व सुखमय आयुष्यविषयक सूचनेबद्दल धन्यवाद.
आमच्या वस्त्रस्वच्छालयाच्या अनेक शाखा असल्या तरी तिकडची धुणी इकडे धुणार नाही. अगदी खतावणी शपथ. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

धमु वरुन धमाल मुलगा हा आयडी आठवला. गेले ते दिवस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सर्व विचारवंत ज्याला नीरो म्हणताहेत त्याच्या हातचं फिडल का काढून घेता ? विचारवंत रागावतील ना ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

रागाकडे यथायोग्य दुर्लक्ष केले जाईल. तरी राग मानू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

खूप छान कविता.. आवडली!!

केऑस शब्दांत पकडता येणं इतकं सोपं नव्हे.

या वाक्याशी लई वेळा सहमत..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)