टॉयलेंट

टॉयलेट अन् टॅलेंट
च्यामारी, कुठ्ठं खुट्टा बसलाय की. इतकी झकमारी करुन वर्षभर डिझर्टीशनसाठी सगळे मोड्यूल्स तयार केलेत. स्वतंत्रपणे छान काम पण करतायेत, फ्रंटएंड मध्ये का नाही होतय? फक्त दहा दिवस बाकी. त्यादिवसापुरतं टोटल गिव्हअप करुन रात्री दोन वाजता झोपलो. सकाळी टकळी पडायच्या आधी पुन्हा फ्रंटएंडच्या भुतानं घेरलं. चडफडत उठून व्हिटॅमिन टी चा लार्ज डोस लाऊन पुन्हा उशीत डोकं खुपसून झोपलो. थोड्यावेळानं मग व्हिटॅमिन टी च्या कृपेने कॉल आला. टॉयलेटभेट. बसल्याबसल्या फ्रंटएंडच्या सगळ्या खटपटीचा स्लाइड शो मनात येऊन गेला, अन् हे एकsss मात्र राहिलं. यस्स. हे राहिलं, एवढं केलं तर हे पण करुन पाहू. उरलेली प्रोसेस स्पीडअप करुन सगळं उरकून कॉम्पुटरसमोर जाउन बसलो. अन् टॉयलेटमध्ये आठवलेली प्रोसेस करुन पाहिली. युरेका...युरेका...
पीजीच्या काळातली ही गोष्ट आजही तशीच्या तशी आठवते कारण त्यादिवशी मला माझ्यातल्या (आधीपासनं असलेल्या) टॉयलेंट ची जाणिव झाली.
नंतर मग ह्याची प्रचिती खुपदा आली/येतेय.
मनात कधी, कुठे अन् काय विचार येऊ शकतील याचा नेम नाही. मन या एकाच संकल्पनेवर अनेकांनी काथ्याकूट केला आहे.
तर असं हे अथांग मन नको त्या वेळी नको त्या ठिकाणी भरकटूही शकतं.
टॉयलेट, मोजक्या जागांपैकी एक असं ठिकाण जिथं थोडावेळ तरी (सुरुवातीनंतर) निवांत बसून स्वतःशी (मनाशी) हितगूज करता येऊ शकतं. बर्याचदा ते एकाग्र पण होतं/करता येतं. माझ्यासकट माझ्या दोन-चार मित्रांना थोड्याफार बऱ्या वाटणाऱ्या काही कविता, लेख तिथंच आठवतात.
माझ्या अनेक सटिक कल्पनांचा उदय ही तिथेच झालाय.
वाढलेल्या ढेऱ्या कमी करण्यासाठी फ्यूजन एक्सरसाईझची (तश्या जालावर लाखो-करोडो मिळतील, पण त्यातल्याच काही इफेक्टिव्ह,पण थोड्या सहज पद्धतीने) कल्पना मला इथंच सुचली अन् याच एक महिन्यात दिड किलो वजन कमीही झालं. दिवसातले पाचेक मिनीटं कंपल्सरी जिथं आपण सगळेजण व्यतीत करतो त्याजागेबद्दल अन् त्याजागेची थोडी हटके बाजू म्हणजे टॉयलेंट.
(Disclaimer: हा लेख वाचल्यानंतर, (कदाचित) स्वतःमध्ये आधी किंवा नंतर काही साधर्म्य आढळू शकते)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अगदी लहानपणापासूनच गम्मत वाटत आली आहे. काही लोकच चिंतनाला इतका वेळ देऊ शकतात. इतरांना उरकावं लागतं. टॅाइलट बाथरुम एकत्र ही संकल्पना इंटिअरिअर डिझाइनरांनी आणली तरी त्याचे स्वतंत्र अस्तित्व असण्याची गरज आहे.
एकदा कोकणातल्या कार्याला गेलो होतो तेव्हा बरेच पाहुणे येणार म्हणून दोन तात्पुरते ओपन ( वरून) टॅाइलटस बनवले होते. मी जरा आतला असल्याने तिकडे जाऊ नका म्हणाले परंतू पक्षांचे कुजन ऐकत वरती पाहात तिथे बसण्यात काय मजा आली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉलेजात असताना एनएसएस च्या कॅम्पात काही पोरांची लै पंचाईत झालती जेंव्हा पहिल्यादिवशी त्यांना परसाकडं जा म्हणून सांगितलं होत, अशीही पद्धत असते हे त्यांच्या गावी, स्वारी, शहरातही नव्हत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो