Guilty By Suspicion

आपल्यापैकी बरेच जण इतिहासात रमतो, तसा मी देखील रमतो. एखाद्या देशाचा, क्षेत्राचा इतिहास आपल्याला ढोबळ मानाने माहिती असतो. बऱ्याचदा पुस्तके, चित्रपट, पर्यटन यातून या इतिहासाचे अनेक कंगोरे, पदर आपल्यासमोर उलगडले जातात. कधी जाणूनबुजून हे असे वेगवेगळे पैलू समजून घेण्याचा केलेला प्रयत्न असेल किंवा सहजच आपसूक ते समोर आलेले असेल, ही खरं तर अलीबाबाची गुहाच असते. परवा असेच झाले. Guilty By Suspicion नावाचा, १९९१ मधील, तसा जुना, चित्रपट पहिला. प्रमुख व्यक्तिरेखेच्या भूमिकेत प्रसिद्ध नट Robert Di Niro हा होता, हो, तोच तो The Godfather II फेम. या चित्रपटामुळे अमेरिकेतील एका वेगळ्याच विषयाच्या, मनोवृत्तीच्या, जो आहे अमेरिकेच्या समाजावर, जनमानसावर एकूणच अवास्तव भीतीचा(paranoia) पगडा आहे त्याच्या इतिहासाबद्दल समजून घेता आले.

हा चित्रपट अमेरिकेतील कम्युनिस्ट चळवळीतील एका विशिष्ट कालखंडातील घटनांचा वेध घेतो. अमेरिकेत १९१९ मध्येच कम्युनिस्ट चळवळ सुरु झाली आणि तेव्हा पासूनच तिच्याकडे संशयाने पाहिले गेले. कारण उघड होते. ते म्हणजे रशिया. सुरुवातीच्या काळाला Red Scare असे म्हटले गेले. तर १९४७ ते १९५७ पर्यंतच्या काळाला Second Red Scare असे म्हटले गेले(त्याचा प्रमुख पुरस्कर्ता असलेल्या सिनेटरच्या नावाने McCarthysim असेही म्हणतात). हा चित्रपट दुसऱ्या कालखंडातील आहे. अमेरिकन सरकारने त्यावेळेस House on Un-American Activities Committee नावाची समिती स्थापन केली आणि त्याद्वारे अनेक जणांना संशयावरून पकडण्यात आले. तसेच त्यांचे लक्ष अमेरिकेतील चित्रपट व्यवसाय जो हॉलीवूड येथे आहे त्यावर गेले. आणि त्या क्षेत्रातील बऱ्याच जणांवर कम्युनिस्ट असल्याचा संशय घेऊन त्यावेळी त्यांना वाळीत टाकण्यात आले गेले. अश्या लोकांना Hollywood Blacklists असे म्हटले जाऊ लागले. अमेरिकेची ही अशी वेगवेगळया काळात विविध रूपात दिसणाऱ्या paranoid वृत्तीचा नमुना हा चित्रपट दाखवतो.

तर हा चित्रपट म्हणजे त्या काळातील अशाच एका चित्रपट दिग्दर्शकांची आहे. ते पात्र काल्पनिक आहे, ज्याची काही आवश्यकता नव्हती, खऱ्या खुऱ्या व्यक्तीवर हा चित्रपट येऊ शकला असता. Robert Di Niro ने हे पात्र साकारले आहे त्याचे नाव डेव्हिड मिलर असे आहे. तर हा डेव्हिड मिलर हॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याला ह्या Hollywood Blacklists मध्ये टाकले जाते आणि त्याचे आयुष्य, कारकीर्द उध्वस्त होते. वास्तवात, त्याने आणि त्याचा मित्रांनी, काही वर्षांपूर्वी अणुबॉम्ब विरोधासाठी, शांततेसाठी पाठींबा दिला होता; दोन-तीन सभांना देखील हजेरी लावली होती, पण तो काही कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य झालेला नव्हता(झाला असला तरी ते काही कायद्याप्रमाणे, नागरी हक्कानुसार चूक नव्हतेच). त्याची मग रीतसर सरकारी समितीतर्फे चौकशी होते. त्याच्या साथीदारांची नावे सांगण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जातो. तो त्याला बळी पडत नाही. पण त्याच्याकडून काम काढून घेतले जाते, घरावर पाणी सोडावे लागते. चित्रपट सृष्टीतील त्याचे सहकारी लांब जातात, तो एकटा पडतो. त्याच्या मनाची घालमेल होते, पण तो शेवटपर्यंत तत्वासाठी स्वार्थी होत नाही. Hollywood Blacklists मधील सर्वच जण असे वागले नाहीत, बऱ्याच जणांनी इतरांची नावे सांगितली. त्याकाळातील बरेच कलाकार, चित्रपट कंपन्या जसे की RKO Studios, 2oth Century Fox Studio वगैरेंचा संबंध चित्रपटात येतो. बरेचसे चित्रण हे आजूबाजूला स्टुडीओमध्ये काम सुरु आहे अशा वातावरणातील आहे. त्याकाळातील अमेरीकेतील प्रसिद्ध गायक, गीतकार Ray Charles याची गाणी, आणि त्याचे संदर्भ देखील येतात. हा असा संदर्भ असल्यामुळे, चित्रपट मनाची पकड घेतो. मध्यमवयीन पण उमद्या अश्या Robert Di Niro ने छान काम केले आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीस पडद्यावर त्या काळाबद्दल प्रेक्षकांना सांगितले जाते, ते असे: “In 1947 the House Committee on Un-American Activities began an investigation into Communism in Hollywood. Ten men who refused to ‘co-operate’ with the committee were tried, convicted, and sentenced to prison terms after the Supreme Court refused to hear their case. Thereafter, no one called to testify, either in public or in secret, could work unless he satisfied the committee by naming names of others thought to be Communist”. आणि चित्रपटाच्या शेवटी देखील प्रेक्षकांना असे सांगितले जाते: “Thousands of lives were shattered and hundreds of careers destroyed by what came to be known as the Hollywood blacklist. People like David and Ruth Merrill faced terms in prison, suffered the loss of friends and possessions, and were denied the right to earn a living. They were forced to live this way for almost 20 years. It was not until 1970 that these men and women were vindicated for standing up – at the greatest personal cost – for their beliefs”. या दोन्ही निवेदनावरून, आणि एकूणच चित्रपट पाहून अंदाज येतो की काय परिस्तिथी होती त्यावेळेस. बरेचसे लोक देश सोडून गेले, काहींनी सरकारला सहकार्य केले आणि आपले आयुष्य आणि कारकीर्द चालू ठेवली.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अमेरिकेतील कम्युनिस्ट चळवळीकडे रशियामुळे कायमच, Cold War मुळे, संशयास्पदरित्या पहिले गेले. सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कथित रशिया संबंध, तसेच अलीकडील काही घटना ह्या सर्व ह्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट पाहणे आणि त्या कालखंडाबद्दल समजावून घेणे हे नक्कीच रोचक आहे. अजूनतरी त्याला कोणी कम्युनिस्ट चळवळीचा रंग दिला नाही(काही अपवाद सापडले मला, एकात Donald Trump हे आजचे Joseph McCarthy तर नाहीत ना असा प्रश्न विचारला आहे), पण पुढे मागे दिला तर आश्चर्य वाटायला नकोय. सुरुवातीला इतिहासाबद्दल मी बोललो, पण असेही म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. ते म्हणजे अमेरिकेतील जनमानसावर paranoia चा पगडा असलेल्याचा. Unidentified Flying Object(UFO) घटना, किंवा विविध चित्रपटातून अमेरिकेवरील परग्रहावरून होणाऱ्या हल्ल्यांचे, अमेरिकी अध्यक्षांना पळवण्याचे होणारे चित्रण असेल, किंवा Hollywood Blacklists सारखा प्रकार, आणि आत्ताच्या काळात ट्रम्प प्रशासनाची जी धोरणे आहेत, ही सगळी त्याचीच उदाहरणे आहेत.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडला परिचय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0