अडाणीपणातून आलेला प्रश्न

ऐसीबद्दल एक अत्यंत अडाणी प्रश्न - ऐसीवरील अनेक सदस्य मोदी सरकार, प्रामुख्याने महाराष्ट्रातील आणि काही प्रमाणात इतर राज्यांमधील भाजप सरकारांबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख वगैरेंच्या लिंका टाकत असतात किंवा त्याबद्दल चर्चा करत असतात. या बातम्या/लेख यांतील मुख्य मुद्दा असा असतो की ही सर्व सरकारे अंडरपरफॉर्मिंग आहेत, दडपशाही करणारी आहेत, स्वत:च्या टिऱ्या बडवणारी आहेत. ऐसीवरील बहुतांश सदस्य याच्याशी सहमतही आहेत असे दिसते (अर्थातच, नाहीतर त्यांनी ह्या लिंका इथे टाकल्याच नसत्या).

मला प्रश्न असा पडतो, की जर इथलं आड्यन्स जर आधीच समविचारी आहे, तर त्यांना परत परत तोच डोस देऊन काय फायदा? जसं झोपचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही, तसं आधीच जागता असलेल्या माणसालाही जागं करता येत नाही. हां आता हा प्रयत्न मिपासारख्या ठिकाणी केला तर निदान काहीतरी धुमशान तरी बघायला मिळतं. आजकाल ऐसीवर पूर्वीसारखं 'अच्छे दिन वि. बुरे दिन' असं धुमशानही बघायला मिळत नाही. सगळे आपले 'बुरे दिन +१च' दिसतात. फिर ये सब मेहनत किस लिये? Wink

field_vote: 
0
No votes yet

Smile भटोबा. तसे तर मग कुठल्याच गोष्टिवर चर्चा नको. सर्वांची मते पक्की आहेत, कोणी कितीहि लिंका टाकल्या तरी बदलणार नाही.

---------------------------

सगळे आपले 'बुरे दिन +१च' दिसतात.

असे नाही. पुर्वी अधोगती -५% च्या रेट नी चालु होती, मोदी काळात ती -४% च्या रेट नी होतीय. म्हणजे तसे बघायला गेले तर अच्छे दिनच म्हणायला पाहिजे.
प्रॉब्लेम असा आहे की मी ९०% मिळवणार अशी टिमकी वाजवणारा विद्यार्थी पास होण्यासाठी पण धडपडतोय. म्ह्णुन आवाज होतोय. बाकिच्यांनी कधिच शिक्षण सोडुन दिल्यामुळे त्यांच्या बद्दल कोणाला अजुन निराश होण्याचा चांस नाही.
-----------
आधी केजरीवाल आणि आता मोदी : आता पापभिरु, नोकरपेशा, मध्यमवर्ग पुढची ३० वर्षे तरी स्वप्ने बघु शकेल असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile
>>आता पापभिरु, नोकरपेशा, मध्यमवर्ग पुढची ३० वर्षे तरी स्वप्ने बघु शकेल असे वाटत नाही.

आम्ही २०१४ च्या पूर्वी पण स्वप्ने बघितली नाहीत. आता आम्ही नोकरपेशे आणि मध्यमवर्गीय होतोच. पण बहुधा पापभीरू नसण्याची शक्यता आहे, त्यामुळे असेल. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेचाचा, मी विचारपूर्वक शब्द वापरले आहेत. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही ८४-८५ मध्ये स्वप्नं बघितली. ८८ सालानंतर नाही पाहिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>तसे तर मग कुठल्याच गोष्टिवर चर्चा नको. सर्वांची मते पक्की आहेत, कोणी कितीहि लिंका टाकल्या तरी बदलणार नाही.

फरक आहे. सगळ्यांची मतं ठाम पण वेगळी असतील तरच चर्चा होते. इथे सगळ्यांची मतं ठाम आणि सारखीच दिसतायत. त्यामुळे बदलण्याचा प्रश्नच येत नाही. चर्चा होतच नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. ज्यांना घाटावरचा भट 'सेंटर ऑफ लेफ्ट' म्हणतोय त्यांच्यातही आपसांत चिकार मतभेद आहेत. खाजगीत गप्पा मारताना ते सहज दिसतात. पण ते ऐसीवर दिसत नाहीत; बरेचदा ते मांडायचाही कंटाळा येतो. कारण त्यावर जी चर्चा चालते ती अतिशय बाळबोध छापाची असते. "दाखवा बघू कुठे उघडले कॉन्सन्ट्रेशन कँप्स," असली भावनिक रडारड सुरू झाली की चर्चा आणि चर्चा करण्याची इच्छा सगळंच संपून जातं.
२. उदाहरणार्थ, तिरशिंगरावांची मतं माझ्याएवढी मोदीविरोधक आहेत, असं मला वाटत नाही. याच धाग्या‌वर त्यांनी मोदी सरकारवर टीका केल्याचं दिसत आहे. आजूबाजूच्या गोष्टींमुळे लोकांचं मतपरिवर्तन होऊन, चर्चा एकाच बाजूनं होत असण्याची शक्यताही आहे.
३. चर्चा होते तेव्हा प्रत्येक वेळेस मतभेद असतात आणि ते दूर व्हावेत असा आग्रह असतो असंही नाही. कधी असंही होतं, की लोकांचे अनुभव निरनिराळे असतात; लोकांची जडणघडण निराळी असते. त्यांची मतं त्याप्रमाणे बदलतात. प्रत्येक वेळेस ही मतं बदलावीतच, असं वाटत नाही. मग 'असहमतीवर सहमती' किंवा 'अच्छा, असाही विचार करता येतो तर', असा विचार जाहीर वा व्यक्तिगत पातळीवर होतो.
४. सध्या सत्ता मोदीकडे आहे. मोदीवर चर्चा होणं स्वाभाविक आहे, त्याला पर्याय नाही. "आता का तुम्ही राहुल गांधीबद्दल बोलत नाही", याला राहुल गांधी सत्ताधारी नसेल तर काही अर्थ नाही. त्यातही सर्व जनतेच्या आयुष्याची प्रत काही किमान पातळीच्या खाली असेल तर जे कोणी सत्ताधारी असतील त्यांच्यावर टीका होणं स्वाभाविकच.
५. समूहाचा बुद्ध्यांक म्हणे त्या समूहातल्या सगळ्यात ढ माणसावर अवलंबून असतो!

मला व्यक्तिशः मोदीविरोध आणि मोदीस्तुती (मुद्दामच द्वेष आणि भक्ती हे शब्द वापरलेले नाहीत) या दोन्हींमध्ये फार रस नाही. माझा मोदीविरोध कधीही संपणार नाही (असं सध्यातरी वाटतंय). तरीही, कोणी अभ्यासू लेखांचे दुवे दिले किंवा अभ्यासपूर्ण मतं मांडली तर ती मला वाचायला आवडतात; मोदीविरोधी मतं मी चवीनं वाचते कारण माझा विरोध कसा योग्य आहे, ही भावना सुखावह आहेच. पण लेखांत मांडलेली मतं, विचार माझ्या मतं, विचारांच्या विरोधी असतील तरीही मी वाचते, कारण मला माझे विचार पुन्हा तपासून घेण्याची संधी मिळते.

दुर्दैवानं, मोदींच्या बाजूनं असं समग्र चित्र मांडणारं अभ्यासपूर्ण लेखन फार कुठे दिसत नाही. त्याचं कारण मोदींची बाजूच लंगडी आहे, का जरा धड लिहू शकणाऱ्या कोणालाच त्यांची दिशा ठीक वाटत नाही, वगैरे कारणं आणखी पुढची झाली. कोणत्याही विषयावर चर्चा करताना, सार्वजनिक ठिकाणी लिहिताना इतरांवर आगपाखड, 'कशी जिरवली'चा हट्ट, मुद्दे न मांडता भलताच कुजकेपणा वगैरे सोडून जऽरा वस्तुनिष्ठता दाखवली तरीही चर्चेची प्रत सुधारू शकेल.

मुळात मला धुमशान चर्चा फार आवडत नाहीत. काळा का पांढरा यावरच्या चर्चा बहुदा भावनिक रडारडीपर्यंत जातात. "तुम्ही मोदीविरोधक आहात म्हणजे तुम्ही काँग्रेसीच", असले प्रकार मला फार रटाळ वाटतात. मला व्यक्तिगतरीत्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयावरही मी लिहिणं बहुतेक सोडून दिलेलं आहे; कारण मला जशी चर्चा अपेक्षित असते तसलं काहीही बघायला मिळत नाही. कचरा सावडत बसण्यापेक्षा इतर बरेच बरे उद्योग मला आहेत.

अ. खवचटपणा आणि कुजकेपणा यात फरक असतो. खवचटपणा करण्यासाठी बुद्धी लागते; कुजकेपणा करायला कर्तबगारी, बुद्धी असले निकष नसतात. मला खवचटपणा आवडतो.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुर्दैवानं, मोदींच्या बाजूनं असं समग्र चित्र मांडणारं अभ्यासपूर्ण लेखन फार कुठे दिसत नाही.

हे चुकीचे वाटते.. अगदी अभ्यासपूर्ण लिहिणारे मोदीसमर्थक माहित आहेत. दुर्दैवाने अचकट विचकटपणे भक्ती करणारे संख़येने खुपच जास्त आहेत म्हणून असेल पण चांगल्या प्रकारे मोदींची बाजू मांडणारे अनेक लोक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

भटोबांचा मूळ प्रश्न 'ऐसीवर काय दिसतं' अशा स्वरूपाचा होता. समाजमाध्यमांवरही, म्हणजे माझ्या एकोचेंबरमध्ये, मला आवडतील, पटतील असेच लेख मला दिसतात. त्यामुळे मोदींना बरं म्हणणारे लेख माझ्या डोळ्यांसमोर येत नाहीत. तुम्हाला असे लेख दिसत असतील, तर जरूर त्यांचे दुवे ऐसीवर शेअर करा. मी भेळेच्या पुडीचे कागदही वेळप्रसंगी वाचत बसते, तर अभ्यासपूर्ण लेखन का नाही वाचणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नक्की..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

"दाखवा बघू कुठे उघडले कॉन्सन्ट्रेशन कँप्स," असली भावनिक रडारड सुरू झाली की

मे २०१४ पूर्वी या रडारडीस अत्यंत वास्तववादी स्वरुप होते.

चर्चा करण्याची इच्छा सगळंच संपून जातं.

संघाचे लोक बलात्करी असतात इ इ बरळलं कि तेव्हा पण असंच होतं. अदानींना अडाण्याला म्हटलं कि ...

सांगायचा उद्देश असा कि उदाहरणे संतुलित द्यावीत.
====================================================

तिरशिंगरावांची मतं माझ्याएवढी मोदीविरोधक आहेत, असं मला वाटत नाही.

बहुतेक कोणाचीच नसतील.
====================================

प्रत्येक वेळेस ही मतं बदलावीतच, असं वाटत नाही.

एकदा स्वत:स पुरोगामी मानलं कि लोकांची मते योग्य बाजूस वळवण्याची शक्ती आणि क्षमता केवळ आणि केवळ आपल्याकडेच आहे आणि मत बदलणे हे फक्त आणि फक्त समोरच्या पार्टीचे कर्तव्य आहे हे आलंच.
==========================

सध्या सत्ता मोदीकडे आहे. मोदीवर चर्चा होणं स्वाभाविक आहे, त्याला पर्याय नाही. "आता का तुम्ही राहुल गांधीबद्दल बोलत नाही", याला राहुल गांधी सत्ताधारी नसेल तर काही अर्थ नाही.

हे लॉजिक मोदी सत्तेवर नव्हता तेव्हा आम्हाला सुचलंच नाही.
=======================

त्यातही सर्व जनतेच्या आयुष्याची प्रत काही किमान पातळीच्या खाली असेल तर जे कोणी सत्ताधारी असतील त्यांच्यावर टीका होणं स्वाभाविकच.

विकसित देशांत राजनेत्यांवर टिका होत नाय?
=========================

दुर्दैवानं, मोदींच्या बाजूनं असं समग्र चित्र मांडणारं अभ्यासपूर्ण लेखन फार कुठे दिसत नाही. त्याचं कारण मोदींची बाजूच लंगडी आहे, का जरा धड लिहू शकणाऱ्या कोणालाच त्यांची दिशा ठीक वाटत नाही, वगैरे कारणं आणखी पुढची झाली.

मोदी, त्यांची बाजू मांडणारे असू द्या. कोणते स्रोत वाचावेत, कोणते नयेत, काय अर्थ काढावा, इ इ इतकं सोपं नसतं. त्याला वाचकही त्या दर्जाचा लागतो. आपली स्वत:ची बाजू लंगडी आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिवाय न्यायसंगत असायची एक अंतस्फूर्त इच्छा लागते. समजा असं नसलं तरी व्यक्ति न्यूनगंडीकरणाचा बळी आहे का हे देखिल महत्त्वाचं आहे.
मोदींचं दुर्दैव इन काइंड वा इ कॅश लाभ घेऊन विरोध करणारी बिकाऊ प्रतिभावंत मंडळी नाही. ही मंडळी इन टर्न ज्या प्रामाणिक पुरोगामी माणसाचा बळी घेतात नि प्रचंड मोठी विरोधकांची फळी इभी करतात ती आहे.
तुम्ही एवढ्या मोठ्या स्त्रीवादी! तीन तलाकवर सरकारचं एका शब्दानं तुम्ही कौतुक केलं नाही. कोणती माहिती उपलब्ध नाही या विषयावर? तुमच्यासारखे सगळेच यचं श्रेय सरकारला कसं नाही याची चर्चा करताहेत उघडौघड माध्यमात... कमाल आहे. तेच सिब्बलची भूमिका पहा. "रोल" पहा. सरकारमधे असताना त्यांनी काय केलं, केलं असतं ते पहा. शहाबानो आठवा.
तुम्हाला अजिबात काही कष्ट पडणार नाहीत विषयाची माहीती करून घ्यायला.
शिवाय आपल्या स्वप्नातले राज्यकर्ते आणि उपलब्ध पर्याय यांमधे वास्तव दृष्टी असावी.
===========================================================
पण मे २०१४ पासून विरोधक हळूहळू लिबरल झालेत ही आनंदाची गोष्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

किती तो पालथ्या घड्यात पाणी भरायचा अट्टाहास अजो. फालतू मुद्यांवरून शब्दार्थाचा कीस पाडत बसणारी जमात ही. कॉन्सण्ट्रेशन क्यांपवाली भावनिक बडबडच यांच्यासाठी योग्य आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही एवढ्या मोठ्या स्त्रीवादी! तीन तलाकवर सरकारचं एका शब्दानं तुम्ही कौतुक केलं नाही. कोणती माहिती उपलब्ध नाही या विषयावर? तुमच्यासारखे सगळेच यचं श्रेय सरकारला कसं नाही याची चर्चा करताहेत उघडौघड माध्यमात... कमाल आहे. तेच सिब्बलची भूमिका पहा. "रोल" पहा. सरकारमधे असताना त्यांनी काय केलं, केलं असतं ते पहा.

अजोंची तडाखेबंद फलंदाजी.

राडा, धुमाकूळ, हैदोस !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

राडा, धुमाकूळ, हैदोस !!!

एग्जॅक्टली. मी काही लोकांची नावं वाचूनच प्रतिसाद स्क्रोलून पुढे जाते. मला या राडा, धुमाकूळ, हैदोस, धत्तड-तत्तडमध्ये काहीही रस नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणत्याही विषयावर चर्चा करताना, सार्वजनिक ठिकाणी लिहिताना इतरांवर आगपाखड, 'कशी जिरवली'चा हट्ट, मुद्दे न मांडता भलताच कुजकेपणाअ वगैरे सोडून जऽरा वस्तुनिष्ठता दाखवली तरीही चर्चेची प्रत सुधारू शकेल.

.
.

वरील क्वोट तुमचाच आहे.

आयमिन ट्रिपल तलाक च्या मुद्द्यावर तुम्ही मोदींच्या धोरणाबद्दल व मोदी सरकारच्या कोर्टातील भूमिकेबद्दल् वस्तुनिष्ठ आहात का ?

प्रश्नाचे उत्तर स्वत:चे स्वत:ला च देणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझं या विषयावर सध्या काहीही मत नाही; कारण माझा अभ्यास नाही.

ही प्रथा मोडायला हवी याबद्दल कोणाचं काही दुमत असेल, असं वाटत नाही. ते अगदीच प्राथमिक काही बोलणं झालं; त्यात फार हशील नाही. त्यापलीकडे मुस्लिम समाजातल्या स्त्रियांसमोर काय प्रश्न आहेत, या निर्णयाचा त्यांच्यावर काय परिणाम होईल, त्यांना या निर्णयाचा फायदा उठवणं कितपत शक्य आहे, सहा महिन्यांपलीकडे(?) हा निर्णय टिकेल का, असे बरेच प्रश्न मला पडले आहेत. त्यांची उत्तरं मिळेस्तोवर अभ्यास नाही, म्हणून मत नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मनमोकळा प्रतिसाद मनापासून आवडला. सिरियसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझं या विषयावर सध्या काहीही मत नाही; कारण माझा अभ्यास नाही.

बाईंचा जी एस टी वर खत्तरनाक अभ्यास होता. सॅनिटरी नॅपकीन आणि कूंकू (कंकू हे फक्त स्त्रीयांचं, पुरुष लावतच नाहीत.) यांच्यावरील कर तोलून बाकी जी एस टी किती बकवास असेल, सरकारच्ची प्राधान्य कशी असतील हे मांडून झालेलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सॅनिटरी नॅपकीन आणि व्हिलचेअर वगैरे वर जीएसटी लावल्यामुळे त्या कश्या स्वस्त होतील हे सरकार नी सांगुन सुद्धा भावनिक रडारड चालुच होती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापटांना जी एस टी ची उद्दीष्टे, परिणाम इ इ वर व्हाइट पेपर पाहिजे असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

का ब्र असं वाटलं तुम्हाला ?
मी आधी च्या तुमच्या मते कामाच्या आणि माझ्या मते बिनकामाच्या गोष्टींची उद्दिष्ट आणि फलित याच्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून ? तुमच्या माहिती करता सांगतो GST ची उद्दिष्ट आधीच सांगितली गेली आहेत . आणि साध्य झाली का नाही हे अजून ठरायचं आहे . त्याला वेळ आहे अजून .( मुझे आप सिर्फ साठ दिन दे दो वगैरे असं कोणी सांगितलं नाही ) त्याची वेळ आल्यावर बोलू .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही जन धन योजनेला बिनकामाची म्हणू शकता तर कशालाही म्हणू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बापटण्णा म्हणतात कि नाही ते माहिती नाही पण मी मात्र जनधन योजनेला बिनकामाची आणि सरकारी रिसोर्सेस वाया घालवणारी योजना मानते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्यात आणि अदितीत फार फरक नाही कि मग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Smile
मला वाटले तुम्ही बापटण्णाना उद्देशुन लिहिले आहे.
-------
माझे आर्थिक विचार मोदी सरकारशी पटत नाहितच.
बरं ज्या साठी लोकांनी मोदिंना निवडुन दिले ( टॅक्स कमी होईल, पेट्रोल स्वस्त होइल आणि अजुन एक महत्वाचे कारण ), त्या बाबतित मोदी काही करतच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठीक आहे.

ज्या साठी लोकांनी मोदिंना निवडुन दिले

लोकांनी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोकांनी?

येस, लोक म्हणजे मी सोडुन दुसरे. माझे मत भाजला दिलेले नाहिये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्यात आणि अदितीत फार फरक नाही कि मग.

अनुतै, मी नसतं हो हे सहन केलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी मात्र जनधन योजनेला बिनकामाची आणि सरकारी रिसोर्सेस वाया घालवणारी योजना मानते.

सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बघा बापटण्णा आणि थत्तेचाचा.

आम्ही काँग्रेस विरोधी, समाजवादी विरोधी, सिक्युलर विरोधी लोक कसे प्रांजल असतो. मी आणि ढेरेशास्त्रींनी हे दाखवुन दिले आहे. उगाचच विरोध करायचा म्हणुन कशाला विरोध करत नाही.,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रथा मोडायला हवी याबद्दल कोणाचं काही दुमत असेल, असं वाटत नाही.

असं नाय हो. असं काहीही वाटून घेत जाऊ नकात. कारण ज्यांचं दुमत आहे त्यांचा विरोध करताना तुम्ही दिसत नाही (http://www.firstpost.com/india/triple-talaq-verdict-narendra-modi-amit-s... तुम्ही ज्यांचं कौतुक करता तेच आहेत ते म्हणून दिसत नसतील.), ज्या सरकारनं तलाकला बार्बेरिक म्हटलं त्याचं कौतुक करताना दिसत नाही, ज्या दोन जजांनी मिळमिळीत भूमिका घेतली त्यांना विरोध करत नाही, सपा/काँग्रेसला विरोध करत नाही, मुस्लिम प्र्सनल लॉ बोर्डला नाही.
अद्न्यान अशा वेळी उफाळून येणं अपेक्षितच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ज्या दोन जजांनी मिळमिळीत भूमिका घेतली

त्यातला एक कोण होता अजो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहा महिन्यांपलीकडे(?) हा निर्णय टिकेल का, असे बरेच प्रश्न मला पडले आहेत.

म्हणून निकाल कुराणाशी कसा सुसंगत आहे याचं कौतुक करणारांपेक्षा घटना एक्कं घटना ठणकावणाऱ्या "एकटे पडलेल्या" अर्णब गोस्वामीचे कौतुक करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घटना एक्कं घटना ठणकावणाऱ्या "एकटे पडलेल्या" अर्णब गोस्वामीचे

घटनेचा आणि ट्रिपल तलाकचा नक्की संबंध काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तलाक (वा काहीही) घटनात्मक पद्धतीनेच , घटनेशी सुसंगत असावं. (सध्याला निकाल कुराणाशी (देखिल) सुसंगत आहे म्हणून मान्य असं भजन चाललं आहे सर्वत्र.). उद्या दुसरा निकाल कुराणाशी सुसंगत नसेल तर? हे लोक विरोध करणार?
=========
अर्णबच्या मते फुल फ्रेमवर्क जस्ट असायची असेल तर घटना एक्कं घटना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इथे अर्नबचंच पटतंय. मुस्लिमांविषयी निर्णय घ्यायचाय तर कुराणाचा दाखला घेण्यात आला, हे गैरच आहे. उद्या हिंदूंच्या एखाद्या गोष्टीवर निकाल द्यायचा असेल तर कुठला ग्रंथ अभ्यासणार? तेव्हा घटना एके घटना म्हणाल तर मग तो भेदभाव नाही का होणार? तेव्हा जात, धर्म, लिंग काहीही असो, घटना एके घटना हेच बरोबर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मुस्लिम हा धर्म आहे तसा हिंदू हा धर्म आहे असं कोर्ट मानत नाही. परंतू हिंदू लग्नपद्धती मात्र मानली जाते.

कुणा महिलेने मुस्लिम धर्म अगोदर सोडून नंतर लग्न केल्यास तिला कुराणाचे नियम लागू न होता घटनेचे लागू होतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कुराणाचे नियम लागू न होता घटनेचे लागू होतील.

म्हणजे कोणते हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहा महिन्यांपलीकडे(?) हा निर्णय टिकेल का,

आता काय झाले आहे यावर जी इनडिफरन्ट प्रतिक्रिया आहे ती अशीच असेल तर काही टिकणार नाही.
==============================
मी स्वत:ला प्रतिगामी का म्हणवतो याचं गमक अदितीच्या या वर्तनात आहे. पुरोगाम्यांना स्वत:ला सुधार शक्य नाही, तशी मानसिकता नाही, प्रतिगाम्यांनी केला तर साथ नाही, उलट विरोध कडवट आहे, तरीही सुधार झाला तर आनंदित व्हायची मानसिकता नाही, साशंक होऊन दूर राहायचं...यापेक्षा थेट प्रतिगामी बरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>मुस्लिम समाजातल्या स्त्रियांसमोर काय प्रश्न आहेत, या निर्णयाचा त्यांच्यावर काय परिणाम होईल, त्यांना या निर्णयाचा फायदा उठवणं कितपत शक्य आहे, सहा महिन्यांपलीकडे(?) हा निर्णय टिकेल का, असे बरेच प्रश्न मला पडले आहेत.<<

काल पुणे विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांकडून आलेले दोन ताजे किस्से -
एका मुस्लिम मुलीचं शिक्षण अर्धवट सोडून घरच्यांनी तिच्या मर्जीविरुद्ध तिचा निकाह लावला. ती सासरी गेल्यावर सासरकडच्या लोकांनी तिला मोबाईल वापरता येणार नाही असा निर्बंध घातला. मुलगी वैतागून माहेरी आली. नवरा म्हणाला हे चालत नसेल तर खुश्शाल तलाक घे. माहेरचे म्हणाले आम्ही तुला पोसणार नाही. नंतर कळलं की मुलाचं आधीच एक लग्न झालं होतं. त्यानं त्या बायकोला सोडली होती आणि हिच्याशी लग्न लावलं होतं. आता तो पहिलीला म्हणतोय की मी तुला पुन्हा नांदवतो. पहिली तयार आहे कारण तिला टाकलं जाणं परवडत नव्हतं.
दुसरा किस्सा : एका मुस्लिम मुलीचं शिक्षण अर्धवट सोडून घरच्यांनी तिच्या मर्जीविरुद्ध तिचा निकाह लावला. ती सासरी गेल्यावर सासरकडच्या लोकांनी तिला (काॅमन) संडासात जातानासुद्धा बुरखा घालून जावं लागेल असं सांगितलं. मुलगी वैतागून माहेरी आली. नवरा म्हणाला हे चालत नसेल तर खुश्शाल तलाक घे. माहेरचे म्हणाले आम्ही तुला पोसणार नाही.

ह्या परिस्थितीत मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांसाठी पूर्वीपासून लढणारी मुस्लिम सत्यशोधक संघटना किंवा तत्सम संघटना (वेळोवेळी आपल्या तत्कालीन राजकारणासाठी सोयीस्कर भूमिका घेणारी काँंग्रेस किंवा इतर कोणत्याही सरकारच्या तुलनेत) अधिक कौतुकास्पद आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल चांगलीच गोष्ट आहे. कोणत्याही धर्माला मूलभूत मानवी हक्कांच्या आड येण्याचा अधिकार असावा ही परिस्थिती मला मान्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंजं, तुमची "मुस्लिम सत्यशोधक संघटना" पीडीत महिलांना मुस्लिम धर्म सोडुन द्यायला का शिकवत नाहित? त्यांना मुस्लिम च ठेवण्यात "मुस्लिम सत्यशोधक संघटननेचा" नक्की काय हेतू आहे?
बाबसाहेबांनी बघा, तुम्ही लोक सुधारला नाहीत् म्हणुन धर्म बदलला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे किस्से का घडत नाहीत :

एका मुस्लिम मुलीचं शिक्षण अर्धवट सोडून घरचे तिच्या मर्जीविरुद्ध तिचा निकाह लावत होते. मुलगी निकाह कबूल करायला अजिबात तयार झाली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका मुस्लिम मुलीचं शिक्षण अर्धवट सोडून घरचे तिच्या मर्जीविरुद्ध तिचा निकाह लावत होते. मुलगी निकाह कबूल करायला अजिबात तयार झाली नाही.

ज्या मुलींना लग्न हेच उदरनिर्वाहाचं साधन, निकाह लावून, नव्हे ठरवून दिल्यावर आम्ही तुला पोसणार नाही, असं शिकवतच मोठं केलं जातं; शिक्षण, आत्मसन्मान, उदरनिर्वाहाची इतर सोय असं काहीच नसतं, त्यांनी कशाच्या जिवावर अशी हिंमत करायची, असं तुमचं मत आहे?

दुसऱ्या बाजूनं, मुसलमान नसणाऱ्या - ट्रिपल तलाकची भीती ज्यांना नाही - अशा इतर सगळ्या भारतीय स्त्रिया घरच्यांनी मर्जीविरोधात लग्न लावून देण्याचा विरोध करू शकतात, असं तुम्हाला वाटतं का?

---

धाग्यासंदर्भात हे सगळे प्रतिसाद इथे अवांतर आहेत. पण तोंडातून चित्रविचित्र आवाज काढणं आणि सुसंगत भाषा वापरणं यांच्यातला फरक करून, भाषा वापरण्याला प्रतिसाद देणं मला सोयीचं वाटतं. एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चिंजंनी दिलेल्या उदाहरणांत एक वाक्य कॉमन आहे. (निर्बंधाला) वैतागून मुलगी माहेरी आली..
ही बंडखोरी निकाह आधीच का येऊ शकत नाही असा माझा सवाल आहे. वैतागून माहेरी येणे ही अगतिकता आहे असं मला लॉजिकली वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>वैतागून माहेरी येणे ही अगतिकता आहे असं मला लॉजिकली वाटत नाही.<<

हा शब्दप्रयोग माझा आहे. पण तो मुद्दा इथे अवांतर आहे. मुख्य मुद्दा असा की एकविसाव्या शतकात जगताना मोबाईल वापरावर बंदी किंवा संडासात जाताना बुरखा घालून जाणं अशा जीवनशैलीची सवय करून घेण्याची गरज नाही असा मुलींचा कल पडला. सासरी असं जगावं लागेल ही कल्पना त्यांना लग्नाआधी दिलेली नव्हती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोणत्याही धर्माला मूलभूत मानवी हक्कांच्या आड येण्याचा अधिकार असावा ही परिस्थिती मला मान्य नाही.

एक्झॅक्टली..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मी मांडलेले सगळे मुद्देच असतात. अर्थातच ते वाचणं देखिल पुरोगाम्यांना असह्य होतं.
============================
ईथे अदितीने तिची मतं कशी असतात इ इ लिहिलं आहे म्हणून तिच्या मत बनवायच्या स्टाईलवर लिहिलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इतर पुरोगाम्यांचं काय ते माहीत नाही; मी सुद्धा बहुतांश वेळा फक्त उदारमतवादी असते. पुरोगामीपणा दाखवण्याची संधी फार कमी वेळा मिळते. ते असो. जिबरीश*मधून अर्थ काढण्याचा प्रयत्न मी करत नाही. विनोद म्हणून हसणं सोपं.

*मराठी प्रतिशब्द?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जिबरीश* मराठी प्रतिशब्द?

स्त्रीवादी पुरोगामी विचार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुद्दा शेवटचा अन ५वा अगदीअगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही कुणाचाच वसा घेतला नसल्यामुळे , वर बापट म्हणाले तसं, चांगलं काम झालं तरच चांगलं म्हणणार, नाहीतर टीकाच करणार, अशा गटातलाच मी आहे. मला कॉन्ग्रेसचा भ्र्ष्टाचार नको आहे, तसाच, भाजपाचा ढोंगीपणा+ भ्रष्टाचार+ धार्मिक अजेंडा नको आहे. मोदींबद्दल जो थोडा आदर आहे, तो त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा पुरावा समोर येत नाही तोपर्यंतच. संघीय ढाचाचा जसा तिरस्कार आहे तितकाच काँग्रेसमधल्या शेपट्या हलवण्याच्या लाचार वृत्तीचा. त्यामुळे माझी मते वेळोवेळी वेगळी दिसणारच, पण ती चर्चेच्या प्रभावामुळे नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तुमची मतं चर्चेत आवर्जून दिसावीत असंं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला कॉन्ग्रेसचा भ्र्ष्टाचार नको आहे, तसाच, भाजपाचा ढोंगीपणा+ भ्रष्टाचार+ धार्मिक अजेंडा नको आहे.

वाक्यरचेनेवरून भाजप काँग्रेसपेक्षा वाईट आहे असं दिसतं. (सत्तेचा दंभ, माजोरडेपणा आणि अजून चार विषेशणं चालली असती.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रत्येक शब्दाशी सहमत.

अवांतर: तुमचं लेखन वाचून बरेच दिवस झाले... नवीन खाऊ कधी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

धागा हलवताना बापट अण्णांचा एक प्रतिसाद आणि त्याला असलेला माझा उपप्रतिसाद हे दोन्ही हलवलेले नाहीत. त्यामुळे अदितीचा प्रतिसाद संदर्भ सोडून आल्यासारखा वाटतोय. ही दुरुस्ती व्हावी अशी विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या धाग्यातून नवा धागा काढला. मूळ धाग्यावर आता तुमचा एकही प्रतिसाद दिसत नाही. सबब, उपरोल्लेखित प्रतिसादाची पर्मालिंक द्यावी ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गंमत आहे. मला नीट आठवतंय की 'प्रश्न ठीक पण...' अशा सुरुवातीचा बापटांचा प्रतिसाद होता. त्यावर ' मी कुठल्याही पक्षाचा/सरकारच्या बाजूचा नाही... मी ऐसीचं लेफ्ट ऑफ द सेंटर क्यारेक्टर मान्य करुनही ऐसीवर येतओ....' वगैरे प्रतिसाद होता. हे दोन्ही प्रतिसाद मूळ धागा आणि नवीन धागा दोन्हीकडे दिसत नाहीत. आणि त्यातील 'लेफ्ट ऑफ सेंटर' चा रेफरन्स अदितीच्या प्रतिसादात दिसतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अडाणीपणा नव्हे योग्य आणि रास्तपणा आहे प्रश्न विचारण्यात हे प्रथम सांगतो.

कोणतीही राज्यपद्धती वचक हरवल्यास ठोकशाही होण्यास वेळ लागत नाही. काही विरोध हवाच परंतू तो निर्णायक झाल्यास विरोधकांना आनंद होतो.
विरोधकांनी नेमक्या मार्गाचा वापर केल्यास ते थोडे असले तरी सरकारच्या ( सत्तेतल्या )निर्णयांना अडवू शकतात. ते निर्णय खरोखर योग्य/अयोग्य होते हा उपवाद ठरतो.

लोकशाहीतलं मतांचं गणित गंडलेलंच असतं ,अव्यवहार्य असतं तरीही कागदोपत्री तेच ग्राह्य असतं.

अंमलबजावणी धोरणे याविषयी बरीच उदाहरणं आपल्या समोरच असतात तरी आपण न बघितल्यासारखं करतो. ढोंगी आणि दुटप्पीपणा माझ्यातही आहे तर निवडून दिलेल्या ५८५ लोकांकडे का नसावा?

एकीकडे समाजवादाच्या नावाखाली जनतेने रेल्वेभाडेवाढीला विरोध करायचा आणि दुसरीकडे सोयी झाल्याच पाहिजेत नोकय्रा निर्माण झाल्याच पाहिजेत नावाखाली ओरड करायची,मोठे ओवरड्राफ्टट केन्द्राकडून काढायचे. समाजातल्या काही पेपरवाले,नागरिकांनी कोणतीतरी बाजू घेऊन झोडपायचं.
थोडं अवांतर झालंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कारण माझ्या मते ऐसीचा सध्याचा लिहिता वर्ग प्रामुख्याने नॉन-फिक्शन आणि करंट अफेअर्स वाला आहे. त्यामुळे तेच तेच सभासद कितीही बोलले तरी किती वेगळं बोलणार?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिंका टाकल्यावर पिंका टाकायची सोय होत नाही का? अस काय करता भटोबा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मंगेश पंचाक्षरींचे किती थंड स्वागत झालं ते तर दिसतच आहे. मुक्तपीठ काय अन असेच काही काही. मग फिक्शनवाले येतीलच कसे. बरेचदा फिक्शनला खूप थंड प्रतिसाद असतात.
बरेच सदस्य ॲप्रिशिएट करत असतील, पण प्रतिसाद देताना हात आखडता घेतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते विनय खंडागळे उत्तम लिहित होते, दिसले नाहीत नंतर..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आरामखुर्चीत जाडजूड ग्रंथ घेऊन बसल्यावर असं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यक्तीश: मला फिक्शन/कविता फार बोर वाटतात. विनोदी किंवा सस्पेन्स असले तर फिक्शन ठीक आहे. उपदेशपर लेखांनी वीट आणला आहे. नॉन फिक्शन - मग ते झेरॉक्स चे मशीन कसे चालते - हे सांगणारे का असेना , वाचनीय वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपदेशपर लेख

नॉन- फिक्शनच होतील ना? फिक्शन कसे? कथा, कविता हे फिक्शन ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बरोबर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग फिक्शनवाले येतीलच कसे. बरेचदा फिक्शनला खूप थंड प्रतिसाद असतात.

प्रतिक्रिया ठरवून येत नाहीत. चांगले साहित्य समोर आले तर आपसूकच दाद मिळते. त्यामुळे लेखकाने लिहित जावे. वाचणारा, दरवेळी त्याचे हात हातात घेईल, अशी भाबडी अपेक्षा ठेवू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सहमत आहे.

आणि दुसरं कारण ऐसी-स्पेसिफिक नाही.

१) आंजा हे माध्यम पारंपरिक फिक्शनला फारसं सूटेबल नाही. एक पारंपरिक कथा म्हटली तरी त्यात तीन हजार शब्द तर आलेच. ते बॅकलिट स्क्रीनवर वाचणं हा फारसा आनंददायक अनुभव नाही.

२) ठहराव. वाचकाला त्या फिक्शनचा आस्वाद घेताना जितके कमीत कमी अडथळे येतील तितकं चांगलं. आंजावर फिक्शन वाचताना ऑफिसची कामं, चेपु, ट्विटर, वत्स असे अनेक अडथळे असतात. (त्यामानाने चर्चा/काथ्याकूट सोपा. प्रतिसाद वाचायला आणि लिहायला फिक्शनइतका ठहराव लागत नाही.)

याचमुळे आंजासाठी फ्लॅशफिक्शनसारखे पर्याय निर्माण होताहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

फिक्शन ला प्रतिसाद जास्त येत नाहीत हे अगदी मान्य- आणि ते सहाजिकच आहे.
जर विषय ज्वालाग्रही असेल (जात, ब्राह्मण, मराठा, पुरोगामी इ.) तर मग फैरी झडतात.

पण मला वेगळं म्हणायचं होतं. { नेहेमीचे लेखक + ललित/प्रवास/चित्रपट समीक्षा/कविता } ह्या लिखाणाचा व्हेरियन्स प्रचंड असतो. त्यामुळे वाचताना आवडलं नाही आवडलं कसंही असलं तरी "तोचतोचपणा" जाणवत नाही.

ह्याउलट जर {नेहेमीचेच लोक+ करंट अफेअर्स} अशी जोडणी असली तर नवीन काही वाचायला मिळण्याची शक्यता फारच कमी.
--------------
शिवाय हा धागा ऐसीच्या सध्याच्या अवस्थेसाठी प्रातिनिधीक म्हणता येईल असे प्रतिसाद आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>पण मला वेगळं म्हणायचं होतं. { नेहेमीचे लेखक + ललित/प्रवास/चित्रपट समीक्षा/कविता } ह्या लिखाणाचा व्हेरियन्स प्रचंड असतो. त्यामुळे वाचताना आवडलं नाही आवडलं कसंही असलं तरी "तोचतोचपणा" जाणवत नाही.<<

समकालीन मराठी फिक्शनचा विचार करता असहमत. फक्त ऐसीवरच नव्हे तर सध्या कुठेही लिहिली जाणारी मराठी फिक्शन तोचतोचपणामुळे कंटाळवाणी वाटते. ऐसीवरच्या कुणालाही हे आव्हान म्हणून घ्यावंसं वाटलं तर मला आनंदच होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बघू कसं जमतं ते. सध्या दिवाळी अंकासाठी लिखाण चालू आहे.
शुचिंच्या प्रतिसादाशी असहमत. आंजा बरंच अद्ययावत आणि म्हणूनच नवीन वाचकवृंदासाठी असलेलंच लिखाण तिथे टिकणार. कोणाच्या लिखाणातील सरासरी विनोद बाबा जोक्स (बायकांच्या बाह्यरुपावरचे? Biggrin ) च्या पलिकडे जात नसतील तर त्यांचं हे होणं स्वाभाविक आहे.
किंबहुना म्हणूनच मी ऐसीवर टिकून आहे. नायतर गेलो असतो बाकी सायटींवर धागे पाडायला दनादन. तिथे सरासरी लिखाणाचंही भारी कवतिक असतं. आठवड्याला एक मटारसोल मध्यमवयीन प्रेमकथा, एक कॉलेजकॉफीरिलेशन नवयुवावर्ग प्रेमकथा, एक हृदयद्रावक कहानीमें ट्विस्ट दवणकथा अशा पाडत रहायच्या. एखाद्या विकांताला मध्येच समीक्षा घुसडली की मिळतो ना भाव!
--
ऐसीअक्षरेवर खातं उघडण्याआधी मी मिसळपाव, मायबोली बर्रंच वाचलं होतं. नंतर बऱ्याच महिन्यांनी मी ऐसीवरच खातं उघडलं, ते अशाच कारणांसाठी. नसत्या स्तुतीपेक्षा क्रिटीसिझम बरा. मग तो कन्स्ट्रक्टिव्ह बरोबरच काळागोरा येणार. स्वत:च्या धागेपाड कौशल्यावर खूश रहायचं असतं तर इथे आलो नसतो. सिंपल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

१४टॅनभौ,
मिपावर उत्तम कथा येतात. म्हणजे भरताड असते मान्य पण काही काही लेखक अतिशय सुंदर कथा लिहितात तिथे अभ्या, जव्हेरगंज, बोकाशेठ, बहुगुणी, अतिवास(आणखीही बरेच, सध्या नावे आठवत नाहीत) जुन्यातले तात्या,आणी सर्वात मुख्य म्हणजे रामदास हे जबरी कथामास्टर आहेत. मायबोलीवर सुद्धा भारी कथा वाचल्या आहेत. कथा ह्या फॉर्ममध्ये चांगले लिखाण ऐसीवरदेखिल व्हायला पाह्यजेलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************