अंड्याची गोष्ट

एक होते अंडे. त्याला शायनिंग खायची खूप हौस होती.
एकदा ते इमारतीच्या पहिल्या मजल्यावर चढले. ग्यालारीतून त्याने तळमजल्यावरील अंगणात उडी मारली. आणि आश्चर्य. ते फुटले नाही.
तात्पर्य : धडाडीला नशिबाची साथ मिळाली तर चमत्कार होऊ शकतात.
प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. गर्दी जमली.
छाती फुगलेले अंडे मग दुसऱ्या मजल्या वर गेले आणि तिथून अंगणात उडी मारली तरीही ते फुटले नाही.
तात्पर्य : यशातून आलेला आत्मविश्वास अवघड प्रसंगातून निभाऊन नेऊ शकतो.
गर्दीने आणखी टाळ्या वाजवल्या. अंड्याच्या धडाडीची स्तुती होऊ लागली.
उत्साहाने भारलेले अंडे मग तिसऱ्या मजल्यावर गेले. सव्वाशे कोटी अंड्यांच्या समोर त्याने तिथून अंगणात उडी मारली. आणि ... हाय दैवा – फुटले.
तात्पर्य : धडाडी आणि आत्मविश्वास हे काही अक्कल आणि शहाणपण यांना पर्याय होऊ शकत नाहीत.
खजील झालेले अंडे उभे राहण्याचा प्रयत्न करीत असताना सुद्धा गर्दीतून सवयीच्या टाळ्या वाजल्याच. अंड्याचे अवसान वाढले. फुटके कवच सावरीत ते पुन्हा उभे राहिले आणि नाकपुड्या फुलवीत, मुठी आवळीत म्हणाले “ मित्रों ! मै आमलेट ही तो बनाना चाहता था !”

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाहाहा.. मस्त..कोंबडी मात्र मौन राहिली असेल नेहमीप्रमाणे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

लौल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

मार्मिक्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबौ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधीच्या अंड्याचे आमलेट २००४ च्या शायनिंगमधेच झाले होते. आताच्या अंड्याची पार भुर्जी होण्याच्या मार्गावर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'राम' हवा म्हणून 'त्यांना' बडवतो,काम हवे म्हणून 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे हो दास, आम्हाला बडवे होण्यातच रस|

२००४ चे अंडे नासके होते. त्याचे तर ऑम्लेट पण कोणी खाल्ले नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मतभेद कारण :
२००४ चे अंडे , अंडे राहिले . त्याचे आम्लेट बनले नाही
आम्लेटी अंड्या पेक्षा ते अंडे सुसह्य होते . कारण :
१. ते अंडे विनम्र होते . त्याला दुसऱ्या , तिसऱ्या मजल्यावर जायची गरज भासली नाही .
२. ते अंडे सहृदयी पण असावे . (त्याला कोणाला ठेचून मारण्याची गरज भासली नसावी )
३. त्या अंड्याने कधीही सोसलंमीडियास्त्र सोडले नाही . आम्हाला त्रास दिला नाही .
४. त्या अंड्याने कधी "उनकी भासामे जवाब "देण्याची भासा केली नाही .
प्रेमळ शेजाऱ्याने घुसखोरी केल्यावर सरळ छोटे युद्ध युद्ध खेळून त्याला हुसकावून लावले . आणि हे करूनही छाती पिटली नाही .
५. त्या अंड्याने ८ नोव्हेंबर सारखे सर्जिकल स्ट्राईक केले नाहीत ( व त्या अनुषंगाने फुटल्यावर आम्लेट हि बन्ना चाहता था सारखी वेळ आणवून घेतली नाही )
६. त्या अंड्याने बाकी काय केले काय नाही केले माहित नाही , पण स्वर्णीम चतुष्कोण अर्थात हायवे सुधारून लोकांची दुवा आणि बरेच म्हणजे बरेच तेल
वाचवायची सोय केली .
अवांतर : त्या अंडयाला देशभक्ती वोग मध्ये आणण्याची गरज पडली नाही .
(म्हणूनच काय ते अंडे निवडणुकात झंझावाती वगैरे होऊ शकले नाही काय ? कुणास ठाऊक ? )
मला २००४ चे अंडे आवडते

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापटण्णा, पुन्हा गैरसमज.
२००४ चे अंडे मी बाजपाई नावाच्या माणसाबद्दल म्हणले होते.
बाजपाई नि पण वेळे आधीच तिसऱ्या मजल्यावर जाउन उडी घेतली,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीही त्याच माणसाबद्दल लिहिले आहे .
पम्याचा नादखुळा केला अन नशिबानं थट्टा कशी मांडली , एक गावी होता एक .. वगैरे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो एकदम नासका माणुस होता हो बापटण्णा. पम्याचा नाद केला पण तो करण्यासाठी कोणी डोक्याला पिस्तुल लागले होते का?
एका नासक्यानी दुसरा नासका निवडला.
इंदिराबाईंचा माणुस होता. रागा चा रिजंट म्हणुन साडेचार वर्ष काम बघितले. आता तिशी पार केलीय रागानी तर जरा कर्तेपण आले असेल असे वाटले सोगा ला. मग ह्यानी लगेच राज्यकारभार सोपावला सोगा कडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला दोन्ही अंडी ही 'भाजपायी' या आचरट पक्षाची वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'राम' हवा म्हणून 'त्यांना' बडवतो,काम हवे म्हणून 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे हो दास, आम्हाला बडवे होण्यातच रस|

कुणास ठौ, आधीच्या आंड्यायच्या च्या मनात बी लै कै कै आसल, पण त्या आंड्याचं मन मौन व्हतं नं. मम्मीची बगेर परमिशन घेता मन मौनच ठू आसबी आसल.
शेवटी क्यारेटच्या भैर फेकल्यावर उलीउली बडबडतय, ते बी परमिशननची आसु शकल. असो ज्यानी त्यानी भंजकदाची म्यानीपुलेटेड गोष्टीतलं आम्लेट आपापल्या टेष्टनी खा ही इनंती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

एक नंबर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती मॅनेजमेंटवाली गोष्ट आठवली. एक शेणात बसलेला कावळा, त्याच्याकडे एक ससा येतो इत्यादी.
खूप छान लिहीलंय. एकदम शफाअत खान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

हॅहॅहॅ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0