महालक्ष्मी

 मंगेश पंचाक्षरी, नासिक.
( गुरुवार, 31 ऑगस्ट 2017 रोजी महाराष्ट्र टाइम्सच्या पान क्र 4 वर प्रसिद्ध झालेला माझा लेख)

     एकेवर्षी मी एका महालक्ष्मी आरास स्पर्धेचा परीक्षक होतो. या निमित्ताने मला अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. महालक्ष्मी बसवणे हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय उत्सव आहे. त्यास जातीपातीचे बंधन नाही. तरीही ब्राह्मणांमध्ये देशस्थ लोक मूर्ती बसवतात तर चित्पावन खड्याच्या गौरी बसवतात. मूर्तींमध्ये उभ्या, बसलेल्या, हाताच्या, बीनहाताच्या, पायाच्या, बीनपायाच्या अशा अनेक मूर्ती असतात. शिवाय रथात, कमळात (याचा भाजपशी काही संम्बंध नाही ), मखरात, पालखीत अश्या विविध आरासी बघावयास मिळतात. हल्ली त्या भोवती लायटिंग वगैरे केलेली असते.   
   
  याचे मूळ हे बायकांच्या स्वभावात दडलेले आहे.
लहान मुलगी असल्यापासून बाहुलीला सजवणे, नटवणे , तिचे लाड करणे हे स्त्रीयांचे  भावविश्व असते. काही बायकांना मुली नसतात. मग त्या लहान मुलानाच मुलीसारखे कपडे आणि केशभूषा करून हौस भागवत असतात.  फार लोभस वाटते ते . पुढे बायका मोठ्या झाल्या तरी ही भातुकलीची हौस कायम असते. गौरी किंवा लक्ष्मीच्या सणाला बायकांची हि हौस पूर्ण होत असते. शिवाय त्यामागे धार्मिक अधिष्टान असल्याने बायकांना हा सण हवाहवासा वाटतो. महालक्ष्मीस अगदी कोरी, घडी न  मोडलेली साडी नेसवणे, विविध आभूषणांनी मढवणे , दागिन्यांनी सजवणे, छोटे बाळ  ठेवणे, त्यांच्यापुढे करंज्या इत्यादी प्रसाद ठेवणे, इतर डेकोरेशन करणे यात रमून गेलेल्या, कितीही धावपळ होत असली तरीही उत्साहात हे सर्व साजऱ्या करणाऱ्या बायकांच्या चेहऱ्यावरील समाधान बघणे खूप आनंददायक असते.      

       काही गौरीना अक्षरश: शंभरहून अधिक वर्ष जुनी परंपरा असते. काही नवसाला पावतात अशी श्रद्धा असते. गौरी माहेरवाशीण असतात. त्या बायकांशी बोलतात. त्यांच्या शांत, सोज्वळ, पवित्र चेहऱ्यावर तेज देखील येते. बायका त्यांचेशी गुजगोष्टी करतात. ज्यांच्याकडे महालक्ष्मी नसतात त्या बायकांना आपणही घरी गौरी किंवा लक्ष्मी बसवाव्यात अशी आस लागते. काही गौरी वडिलोपार्जित आलेल्या असतात तर काही इतर नात्यातून आलेल्या असतात. घरातील पुरूष वर्गाकडे मूर्तींचे मुखवटे साफ करणे, त्यास पोलिश करणे, डेकोरेशन करणे, लायटिंग करणे, स्पोट लाईट लावणे, थर्माकोलचे देखावे उभारणे आणि साड्या, दागिने, मुखवटे सरळ - योग्य बसले आहेत कि नाही यावर अंतिम मत देणे अशी कामे येतात. घरातील बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून पुरुष मंडळी देखील ही कामे उत्साहाने करतात.               

       तीन दिवसातील गौरींचे येणे, जेवण, लगबग, हळदी कुंकू, आरत्या आणि सोबत गणपतीचे घरातील वास्तव्य यात वेळ कसा निघून जातो तेच समजत नाही. आणि मग तिसऱ्या दिवशी जेव्हा गौरी विसर्जन होते तेव्हा बायकांचे डोळे पाणावतात, घर सुनेसुने होते. गौरीदर्शन टीवीवर, सोशल मीडियावर घडवले जाते. यथावकाश बक्षिसे जाहीर केली जातात. प्रथम, द्वितीय वगैरे क्रमांक हे आरासीना/ देखाव्याना दिले जातात. प्रत्येक स्त्रीसाठी मात्र तिच्या गौरीच नंबर एक असतात कारण त्यात तिच्या 'भावना' असतात. त्या आता पुनः सासरी जाणार असतात. त्यांची पाठवणी करताना बायका हळव्या होतात. घरातले पुरुष शांतपणे बायकोला डोळ्यांच्या कडांतून न्याहाळत रहातात. एरवी कडकलक्ष्मी असलेल्या बायकोचं हे रूप बघून त्यांना मनोमन पटते कि विसर्जन आरासीचे, डेकोरेशनचे होते. खरी लक्ष्मी तर इथेच आहे.  'त्या' महालक्ष्मीच्या पाऊलखुणा 'गृहलक्ष्मी' च्या रुपात घरभर निरंतर वावरत रहातात. 

- मंगेश पंचाक्षरी, नासिक.
इमेल: mangeshp11@gmail.com

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लहान मुलगी असल्यापासून बाहुलीला सजवणे, नटवणे , तिचे लाड करणे हे स्त्रीयांचे भावविश्व असते. काही बायकांना मुली नसतात. मग त्या लहान मुलानाच मुलीसारखे कपडे आणि केशभूषा करून हौस भागवत असतात. फार लोभस वाटते ते . पुढे बायका मोठ्या झाल्या तरी ही भातुकलीची हौस कायम असते

मालकीण बै, तुमच्या राज्यात हे काय चाललय?
तुम्ही चालवुन घेत असलात तरी मी निषेध करणार ह्या असल्या गोष्टींचा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा उल्लेख मालकीणबाई असा करणाऱ्या आणि स्वतःला सुधारणा झालेल्या समजणाऱ्या लोकांना मी फाट्यावर मारते, तर रतीबपाडू, काॅपीराइटधाऱ्यांकडे दुर्लक्ष का करू नये?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझा उल्लेख मालकीणबाई असा करणाऱ्या आणि स्वतःला सुधारणा झालेल्या समजणाऱ्या लोकांना मी फाट्यावर मारते

ओक्के मालकीणबाई. (मालिकादेवी? मलिका-ए-ऐसी?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही चालवुन घेत असलात तरी मी निषेध करणार ह्या असल्या गोष्टींचा

पण यात निषेध करण्यासारखे काय आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महालक्ष्मीच्या आराशीत वरती करंज्या का टांगतात?

दोन मूर्तींचे नाव काय काय असते (दोन्ही लक्ष्मी?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्येष्ठा कनिष्ठा असतात.
करंज्यांचं काय माहीत नाही बुआ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मातीच्या मूर्ती केलेल्या गौरी गोंडस दिसणाऱ्या असतात. धातूचे मुखवटे असलेल्या गौरी, कपिल शर्माच्या शो मधल्या स्त्रीवेषधारी पुरुषासारख्या दिसतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

विरोध कशाला आहे? असं लिहू नये वगैरे कुठे लिहिले आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महालक्ष्मी बसवणे हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय उत्सव आहे. त्यास जातीपातीचे बंधन नाही. तरीही ब्राह्मणांमध्ये देशस्थ लोक मूर्ती बसवतात तर चित्पावन खड्याच्या गौरी बसवतात.

(खड्याच्या) गौरी या (महा)लक्ष्मी कशा काय होऊ शकतात ब्वॉ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0