मराठी मालिकांची लेखनकृती

पूर्वतयारी:
१. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील.
२. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर. त्यातही आजकाल 'युवा' ह्या भंपक वर्गाची निर्मिती जी झाली आहे ती ह्यात येत नाही. त्या वर्गाला अनुसरून एक भारदस्त आडनाव घ्यावं.

साहित्य:
एक भारदस्त आडनाव. एक घर. घर हे लक्ष्य रसिकवर्गावर अवलंबून आहे. मोठ्ठा वाडा, मोठ्ठं बैठं घर आणि डायरेक्ट बीडीडी छाप चाळ. हे अनुक्रमे नॉमुंपु, मुंपु, मुंममव ह्यांसाठी. एक अति अति अति आज्ञाधारक हिरोईण निवडावी. हिरोईण कशीही चालेल. सावळी असेल तर कथा अजून फुलवायची संधी मिळते. हिरो मात्र गोराच्च बघून घ्यावा. हिरोही बऱ्यापैकी आज्ञाधारक असावा.
एक ऑप्टिमस प्राईम आजी/आजोबा. हे न्यायदेवतेसाठी. हे गोग्गोडच असले पाहिजेत. त्यांची मुले, म्हणजे डार्थ व्हेडर सासूबाई. सहाय्यक कलाकार म्हणजे हिरोईणीचे आईवडील, सासूबाईंची इतर मुले, शेजारी इत्यादी. एकदम बालकलाकार चवीपुरते. संध्याकाळच्या अर्ध्यातासाचा टाईमस्लॉट. एक मराठी वाहिनी. एक टायटल ट्रॅक, जे सगळ्या रसांत वाजवता यावं. (रौद्र/भीषण ते करूण/शृंगार पर्यंत.)

कृती:
कधीही हीरोईणीपासूनच सुरुवात करावी. तिला आणि हीरोला पुराणातील कॉम्प्लिमेंटरी, मॉडर्न टच असलेली नावं द्यावीत. त्यांची पार्श्वभूमी २-३ एपिसोडांत आटपावी. त्यांना पद्धतशीरपणे भेटवावं. पहिल्यांदा त्यांच्यात प्रेमबीम वगैरे होऊ देऊ नये. त्यांच्या भेटीगाठी होऊ देत रहाव्यात. मध्ये त्यांच्या मित्रमैत्रिणी, सहकारी इत्यादींकडून सारखं प्रेम प्रेमचा जप करवून घ्यावा. फायनली हिरोलाच पहिली स्टेप घ्यायला लावावं आणि हिरोईणीने ३ एपिसोड आढेवेढे घेऊन होकार द्यावा. इथे तुमच्या वाचनातील वाक्ये टाकायचा बर्राच स्कोप आहे.
लग्नाला उगीच विरोध दाखवावा. इथे व्हिलन/व्हिलनीण छान प्रस्थापित करता येते. ती सासू, नणंद, हिरोची मैत्रीण अशी. पुरूष जनरली नसावेत व्हिलन. ह्या सर्वांमुळे लग्न अगदी होतच नाही अशी खात्री करवून देऊन मग एकाएकी हिरोहिरवीणीचं पुनर्मीलन दाखवावं. पटकन लग्न ठरवून मोकळं व्हावं.
घर कसंही असलं तरी लग्न फुल्लॉन करावं. ह्या महाएपिसोडची जाहिरात कर-कर-करावी. लग्नात सगळं विधीवत आणि सगळ्यांच्या अंगावर भारी कपडे-दागिने असावेत. मुलीने सासरी जायच्या एका एपिसोडात वडिलांनी भाव खाऊन घ्यावा.
मुलगी सासरी गेली की खरंतर काम संपलं. आता इथे तुमची सर्जनशीलता१० दाखवावी. हिरोइण ज्यू असल्यागत छळ कर-कर-करावा. ह्या ह्या घराण्यात११ हे चालवून घेतलं जाणार नाही/आजपर्यंत झालं नाही/खपवून घेतलं जाणार नाही हे संवाद दर एपिसोडला ३-४ टाकावेत. हिरोईण 'टायटॅनिकफोड आइसबर्ग ची मानवी आवृत्ती' दाखवावी. हिरोचं तोंड बंद करण्यात यावं किंवा हिरोईणीच्या विरुद्धच वापरलं जावं.
हे चांगलं अडीच तीन वर्षं करत रहावं.
नवीन१२ लेखक/लेखिका आले की गाशा गुंडाळता घ्यावा. सगळ्या व्हिलनगणाचा नायनाट एकेका एपिसोडात आटपावा. इथे हिरोला हाताशी धरुन त्याचाही उदोउदो करावा. नातेवाईक व्हिलन्सचं मतपरिवर्तन करावं. हिरोईणच कश्शी बाई आदर्श आदर्श स्त्री ह्याचा पोवाडा गावा. सगळं कुटुंब एकत्र यावं. मालिका संपली. तुमचा ड्राफ्ट नवीन लेखकांच्या हवाली 'रेफरन्ससाठी' करावा.१३

मॅरीनेशन:
सग्गळे सग्गळे सण निगुतीने दाखवावेत. त्यात उगीच नवेपणाची फोडणी देणं१४ आवश्यक. हिरो हिरॉइणीची प्रेमकथा मात्र ह्या सगळ्यांवर मात करून चालू ठेवावी. मध्ये मध्ये चवीपुरतं हिरोईणीचं दुर्गारुप दाखवावं, एखाद्या सरकारी उद्यानात रोम्यांटिक गाणं टाकावं. बाकी हिरोईणीला मेंदू नाहीच अशी प्रेक्षकांची खात्री झाली पाहिजे.
भाषा अगदी ट्रेडमार्क दाखवावी पात्रनिवडीनुसार. लहेजा सोडून कोणी बोल्लाच तर त्याची जीभ छाटली जाईल अशी सूचना लिहून ठेवावी.
तमाशे१५ करता आले पाहिजेत. ह्यात तुमची सर्जनशिलता दिसते.
हिरो-हिरोईणीला आजकालचे कपडे दाखवू नयेत. आजकालचे छंदही दाखवू नयेत. ह्या दोन्ही गोष्टींवरून तमाशा करावा. एकत्र सिनेमा/जेवायला जाण्यावरून झकास एक एपिसोड तमाशा करावा.
हिरो आणि त्याचं मातृप्रेम जबरी दाखवावं. हिरोईणीच्या माहेरी जाण्यावरून तमाशा करावा. काही सुचलं नाही की उगीच काहीतरी परंपरा भंग करवून घेऊन तमाशा करावा. छोटे व्हिलन आणून, त्यांना गुंडाळत रहावं. मधोमध हिरोईणीचा अजूनच छळ करावा.
नाती नाती नाती, माणसं माणसं माणसं चा गजर करत रहावा. अगदी हार्डकोअर ममव मूल्ये प्रेक्षकांवर ठोकत रहावीत.

स्पष्टीकरणे:
१: मराठी मध्यम वर्गीय. काही हुच्चभ्रू लोकांचा नॉनहुच्चभ्रू लोकांना डिवचण्याचा 'कीवर्ड'. तिसरी जमात अस्तित्वात नसते.
२. फेसबुकावरचे फ्रँड्झ. हे तुमच्या दैनिक जिलब्यांना लग्गेच सुंदर, अप्रतिम, फुले, छान, अप्रतिम, फुले, सुंदर, फुले, आणखी फुले अशा कमेंट्स देत राहतात. त्यांना गोंजारत राहणं महत्त्वाचं. म्हणजे कल्ट प्रस्थापित होतो.
३. हे अनुक्रमे नॉन गावठी आणि गावठी असं वाचावं.
४. भारदस्त म्हणजे पाच अक्षरी. सरनाईक, सरपोतदार, जहागिरदार इत्यादी. २ मधील नॉन गावठी वर्ग असेल तर सुप्रसिद्ध आडनावेही खपून जातात. परब, गोखले, नाईक इत्यादी.
५. हिरोईण हे हिरोचं स्त्रिलिंगी रुप आहे. तिला मोजके पाच एपिसोड सोडून भाव द्यायचा नस्तो. तिचा भाव आणि तिचे भाव हिरोवर अवलंबून असल्याने तिचं नावही हिरोईण.
६. जनरली बुद्धी नाठी झालेले खवचटोत्तम आजीआजोबा नापास.
७. हे उपप्रकार हाताशी असू द्यावेत. हवे तसे उलटसुलट वापरता येतात.
८. माधव-माधवी, मिलींद-रुक्मिणी वगैरे जुनाट नाहीत. छोटीशी. यू गेट द पॉईंट.
९. पहा ५.
१०. नसते शब्दार्थ घेऊ नयेत. इथे तुमच्या सिरीअलची अद्वितीयता दिसते म्हणून तो शब्द.
११. इथे तुमच्या आडनाव निवडीतली ताकद दिसून येते. 'सान्यांच्या घराण्यात'ला 'सरपोतदारांच्या घराण्यात' इतका जोम नाही येत.
१२. हा विनोद आहे. आतापर्यंत कळला पाहिजे.
१३. कळला का १२ मधला इनोद मंडळी?
१४. इको फ्रेंडली गणपती, फटाक्यांशिवायची दिवाळी, पाण्याशिवाय होळी, सुताशिवाय वटपूजा इत्यादी.
१५. म्हणजे सासूबाईंचे साश्रुनयन, छोट्या व्हिलन्सच्या कानगोष्टी, प्लॅन कॅन्सल होणं आणि हीरोईणीचं टायटॅनिकफोड आईसबर्गपण जिंदाबाद. नातीनाती गजर चालू ठेवावा.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

एक ऑप्टिमस प्राईम आजी/आजोबा.

लोलेश!!
इथे फुटलो आहे. उरलेलं वाचतो आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यायला , मेटल जसं लक्ष देऊन ऐकायला लागतं , तसंच तुमच्या लेखनाचं आहे .कधी पुण्याची चक्कर झाली तर दर्शन द्या म्हणतो मी .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुणे जिल्ह्याच्या चकरा होत असतात, पुणे शहराच्या तितक्या नाही, म्हंजे कठीणच्चे जरा. सौरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

भारी, अतिशय उच्च लिहिलं आहे! सवडीने मोठ्ठा प्रतिसाद लिहितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पहिल्या दोन तीन भागात , हिरोईन चे काहीतरी लै भारी dreams दाखवायचे .. ती कशी वेगळी आहे वगैरे वगैरे आणि नंतर सासू सुनेचं दळण दळत बसायचं ..

वाईट म्हणजे घरातले मोठे भक्तिभावाने सिरिअल्स बघून उपदेश करत बसतात ..ती कशी आज्ञाधारक आहे ..जरा शिक काहीतरी ..वगैरे वगैरे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हंशिवलस भावा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचं वाचून बरेच दिवस झाले...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

अति अति उच्च!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आबांनी उच्च म्हटलं म्हणजे आजपर्यंतचा ऐसीवास सार्थकी लागला म्हणायचा!
हृदय ओव्हरफ्लो.
संपा: त्या मोठ्ठ्या प्रतिसादाची वाट पहातो आहे आबा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

छान लिहून काढलंत.
उद्या कधी मृद्गगंधा कु० / मांडलेकर /नवीन लेखकाने त्यांच्या छापाची कथा इथे टाकली तर काय स्वागत होईल हा एक विचार आला.
सध्या कथा कशी सरकावी हे निर्माताच ठरवतो. फीडबॅक -किती लोक पाहतात हा सेटटॅापबॅाक्समुळे आयताच मिळतो. तो प्रकार दुसय्रा कुठल्या मालिकेत असला तर इकडेही वाढवा सांगतो. डंपर पोकलेनवाले नवलेखक लगेच कामाला लागतात, भराव घालतात. एरप्रेशर हॅमर लावून खोदाखोदी करतात. असो.

ते कमावतात तर आपण का जळा.

एक राहिलं - वर्षातून एकदोनदा चलाहवायेऊद्याच्या मंचावर जाऊन कलाकारांनी जाहिरातउर्फकौतुक करून घ्यायचे. विडंबन पाहून खुर्चीतून खाली पडायचेखिदळायचे.

( मी मालिका पाहात नाही परंतू जातायेता लक्ष जाते तेवढ्या निरीक्षणांवर हे आहे॥
स्त्रीपुरुषांचे चविष्ट संबंध पाहायला सर्वांनाच आवडतात यावर भांडवली गुंतवणूक आणि कलाकारांचा मुक्त अभिनय कारणीभूत आहे. हे कोरडेपणाने लिहित आहे.
तळटिपा हव्यात्याठिकाणी टाकून वाचणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक राहिलं - वर्षातून एकदोनदा चलाहवायेऊद्याच्या मंचावर

मी जेमतेम एक एपिसोड पाहून जाम वैतागलेलो. सोडलंच ते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा पत्ता नाही.
अभिनय बाकी मुक्त वाटत नाही. सगळ्याच मालिकांमध्ये जवळपास सारखाच प्रकार असतो. साचेबद्ध कथानकामुळे अभिनयही साचेबद्धच असतो, म्हणून 'मुक्त अभिनय' ह्याच्याशी असहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

आता थोडी क्षणचित्रंही लावा लेखाबरोबर. तुपकट्ट बाया, मिळमिळीत पुरुष असले प्रकार बघून बराच काळ लोटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डायरेक्शनच्याही सूचना द्या.
म्हणजे,
एक पात्र काहीतरी सेंसेशनल बोललं की कॅमेरा, हजर असलेल्या सर्व पात्रांच्या चेहेऱ्यावरुन कमीतकमी दोनदा तरी फिरवा.
सर्व पात्रांना जास्तीतजास्त माना हलवायला सांगा, हातवारे आणि तोंडवारे सुद्धा.
मध्यमवयाचा कुटुंबप्रमुख दाखवताना, त्याचे बरोब्बर अल्टर्नेट केस पांढरे रंगवा.
मोठ्या वयाच्या बायकांना डायलॉग्ज बोलताना, शक्य तेवढ्या नाकपुड्या फुलवून बोलायला शिकवा. त्याचवेळेला कॅमेरामनला कॅमेराचा अँगल असा घ्यायला सांगा की, नाकातून घसा दिसला पाहिजे.
आणि अशा अनेक उपसूचनांचे स्वागत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अगदी अगदी अग्गदी!

हजर असलेल्या सर्व पात्रांच्या चेहेऱ्यावरुन कमीतकमी दोनदा तरी फिरवा.

मागून ढॅढॅण ढॅढॅण वाजवत...

आणि अशा अनेक उपसूचनांचे स्वागत आहे.

अगदी!
अजोंच्या 'इंग्रजी सिनेमांच्या थिमा'सारखा 'मराठी मालिकांचा पाण्चटपणा' ह्या धर्तीवर... बघू बाकी लोकांनीही असं कायकाय पाहिलंय ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

कॅमेरा, हजर असलेल्या सर्व पात्रांच्या चेहेऱ्यावरुन कमीतकमी दोनदा तरी फिरवा.

पण प्रत्येकाची रिअॅक्शन (दचकणं, आश्चर्य,आनंदाचं हसू, समाधानाचं स्मित, आणि ९९% वेळा गोंधळल्याचा भाव इ. पैकी) ही तातडीने सर्व पात्रांची एकाक्षणी न होता कॅमेरा पाळीपाळीने स्वतःच्या चेहर्याकडे वळल्यानंतरच उमटली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व पात्रांना जास्तीतजास्त माना हलवायला सांगा, हातवारे आणि तोंडवारे सुद्धा.
मध्यमवयाचा कुटुंबप्रमुख दाखवताना, त्याचे बरोब्बर अल्टर्नेट केस पांढरे रंगवा.

खी: खी: खी:

अजून काही:
१. व्हिलन/व्हिलनणीस एक थीमवाक्य (हे 'ब्रीदवाक्य'च्या चालीवर वाचावे) द्यावे. वारंवार त्याचा उपयोग करून पात्राचं व्हैलन्य सतत ठसवत रहावं. काही चालू उदाहरणे - 'एकटी बाई मी क्काय क्काय करणार!' (निशा), रम्पम्पोश रम्पम्पोश ('मामा').

२. घरात चार-पाच काकवा असल्या, तर एकीला सतत भयाण इंग्रजी-कम-मराठीत बोलायला लावून तितक्याच भयाण विनोदनिर्मितीचा प्रयत्न करावा.

३. सणवार नसतील, तर एपिसोडमधला किमान निम्मा वेळ जेवणासंबंधी चर्चा करण्यात घालवावा. वानगीदाखल एक प्रसंग.

शेखर गोखले, डायनिंग टेबलावर: "बडीशेप/शोप आहे का?"
ममव काकू १: "अगं स्नेहल कुठे आहेस? ही स्नेहल आयत्या वेळी कुठे कडमडते देवास ठाऊक!"
(इथे माफक त्रासल्याचा अभिनय)
ममव काकू २: "अगं सारिका, काय झालं? का ओरडतेस अशी?"
ममव काकू १: "अहो, स्नेहलला शोधतेय."
ममव काकू ३: "काय हो, काय झालं?"
ममव काकू १: "अगं स्नेहल कुठे गेली या भलत्या वेळी?"
ममव काकू ३: "अहो ती काकूंना घेऊन देवळात गेलीय. का, काय झालं?"
(लगबगीने येत) ममव काकू ४: "अहो, तिथे अण्णांचं (पक्षी: शेखर गोखले) जेवण होतं आलं. बडीशेप कुठंय?"
ममव काकू १: "अगं, तेच शोधतेय. स्नेहलने कुठे ठेवली डबी कुणास ठाऊक. अण्णांना तर बडीशेपेशिवाय चैन पडत नाही. आता गं काय करायचं?"

यात पाचेक मिनिटं खर्ची घालून बडीशेप शोधून, अण्णांना ती नेऊन द्यावी. अण्णांनी 'वा! बडीशेप खाल्ल्याशिवाय कसं जेवण झाल्यासारखं वाटतच नाही' छापाचा ड्वायलाक मारावा आणि ममवकाकूचतुष्टयाने (क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने) आपल्या चेहऱ्यावरून कृतकृत्यतेचे ओघळ वाहत असल्याचा अभिनय करावा. इथे शीन सुफळ संपन्न होतो आणि झी मराठीच्या 'सर्वोत्कृष्ट सासरा' आणि 'सर्वोत्कृष्ट काकू' पुरस्कारांसाठी मानांकनही पक्कं होतं!

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हैलन्य या शब्दामुळे वारण्यांत आले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सेम हिअर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

झी मराठी तर मागचंमुजिक पण सेम वाजवतंय सगळ्या मालिकांसाठी...
इतकं सहनशील कोण असतं? कै पण दाखवतात. एक कोणतरी त्रास देतोय, नाहीतरी घरात भारतातल्या लोकसंख्येचा प्रश्न किती जास्त आहे हे सिद्ध करायल्यागत माणसं भरलीयेत ना... घ्या आणि बुकला की सगळ्यानी मिळून.... ते नाही... फालतू टेबल चर्चा, बेडवर चर्चा, स्वैपाकघरात चर्चा...

बरं व्हिलन सुधारले तरी मग थोड्या दिवसानी परत बिघडतात... हे सगळे उतार चढाव येणाऱ्या सणांवर अवलंबून असतात. म्हणजे सण जवळ आला की सासूबाई सुतासार्ख्या सरळ, सण संपला की कारस्थान सुरू.
सगळ्यात वाईट्ट म्हणजे "मी आता ठरवलंय" हे वाक्य तर "एका एपिसोड मध्ये कमीत कमी तीनदा आलं पाहिजे नाहीतर एअर होणार नाही" अशी काहीतरी धमकी दिल्यागत येतं..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.

नवीनच पाहू लागलेल्या प्रेक्षकांच्या सोयीसाठी प्रत्येक पात्राच्या प्रत्येक सीनच्या एन्ट्री आणि डायलॉगमागे त्याच्या स्वभावाचं सिग्नेचर बॅकग्राऊंड म्युजिक हवं.

वटवाघळांचा कलकलाट, आऊssss वगैरे (दुष्ट, कपटी, कारस्थानी), कोल्हेकुई (लबाड, साळसूद), किंचाळी (भयप्रद), घंटानाद (सात्विक),
शंखनाद - खडं स्तोत्र (करारी), कवकवकवकवकव (छद्मी) इ.

म्हणजे भलंबुरं माणूस इन्टंट कळलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक ऑप्टिमस प्राईम आजी/आजोबा. हे न्यायदेवतेसाठी. हे गोग्गोडच असले पाहिजेत.६ त्यांची मुले, म्हणजे डार्थ व्हेडर सासूबाई. सहाय्यक कलाकार म्हणजे हिरोईणीचे आईवडील, सासूबाईंची इतर मुले, शेजारी७ इत्यादी. एकदम बालकलाकार चवीपुरते. संध्याकाळच्या अर्ध्यातासाचा टाईमस्लॉट. एक मराठी वाहिनी. एक टायटल ट्रॅक, जे सगळ्या रसांत वाजवता यावं. (रौद्र/भीषण ते करूण/शृंगार पर्यंत.)

अगागागा, दंडवत!

कं लिवलंय, कं लिवलंय!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक आभार, नंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||