खाऊच्या गोष्टी...

काल परवा सोडा बॉटल ओपनरवालाला जाणं झालं, बिलासोबत समोर अवतरलं ते पॉपिन्स, रावळगाव, आणि इमली गोळी...
मन एकदम काही वर्ष मागे शाळेत गेलं. सगळ्यात पहिले माझी ओळख आणि आवड झालेली म्हणजे चटर मटर
Chatar matar
छोट्याश्या लाल गोळ्या, आंबट गोड, आणी खाताखात बोटांना रंग ही लावायच्या. पन्नास पैशांना मिळणारी ही मजा मला फारशी नंतर कुठे दिसली नाही.

माझे बाबा म्हणजे एक नंबर धूर काढणारे, लहान असताना रात्रीचं जेवण झालं की कडेवर घेऊन ते मैदाना बाजूच्या टपरीवर घेऊन जायचे. बाबा मला धनाडाळ घेऊन द्यायचे जी घशात अडकायची. पण त्याचं निळ पिवळं पॅकेट मला खूप आवडायचं
dhanadal
एकदा आईच्या मागे लागलेले मी मला पण बाबासारखी सिगरेट पाहीजे तेव्हा तिने पेपरमिंटची फॅण्ट्म सिगारेट घेऊन दिलेली, छान पांढरी सिगारेट, त्याच्या टोकाला लाल्चुटूक रंग, परत आणि मागून आरामात चोखली की आपोआप कमी होत जाणारी सिगरेट एकदम ग्रेटच होती.. आपण पण बाबासारखे झालो याचा कोण आनंद झालेला..
peppermint

आमच्या घरासमोर एक अनिलचं दुकान होतं तिथे सटरफटर गोष्टींसकट सगळं काही मिळायचं. त्याच्या दुकानातून फ्रॉकच्या रंगाला मॅचिंग रावळगाव चॉकलेट घेणं हा माझा आवडता उद्योग होता. पॉपिन्सची वाटणी पण माझ्या मैत्रिणींमध्ये फ्रॉकच्या रंगावरुनच व्हायची.
ravalgaonpoppins

शाळेत कुणाचा वाढदिवस असला की , मँगो बाईट्स, किसमी, कॉफि बाईट, इक्लेर, मेलोडी, अल्पेनलिबे वगैरे मिळायचं. रोज रोज कुणाचा तरी वाढदिवस असता तर किती बरं झालं असतं हे कायम मनात यायचं. बरेच दिवस कुणाचा वाढदिवस नाही आल की आईची पर्स ढुंढाळायची, एक तरी चॉकलेट असायचंच. आई शिक्षिका असल्याने तिला कायम जास्त चॉकलेटं किंवा कॅडबरी मिळायची. कॅडबरी हेच खरं चॉकलेट आहे आणि बाकी सगळी बंडल आहेत असंच काहीतरी डोक्यात होतं माझ्या, एक मुलाने वर्गात सगळ्यांना कॅडबरी वाटलेली तेव्हा तो मुलगा कसला भारी वाटलेला..

शाळेबाहेरच्या दुकानात एक रुपयाला आठ पेपरमिंट्च्या गोळ्या , ऑरेंजच्या गोळ्या, इमली गोळ्या, मिळायच्या. बंडल विषयाच्या तासाला झोप येउ नये किंवा बाईंपासून लपवून खाण्यात थ्रिल म्हणून त्या गोळ्या स्कर्टच्या खिशात असायच्या.
orange candy

शाळेबाहेर एक खोमचेवाला बोरं , राय आवळे, करमळ, मिठ लावलेली चिंच, सुकवलेली बोरं, ओली बडीशेप, लाल कैऱ्यांचे काप, चन्या मन्या घेऊन उभा असयचा, शाळा भरताना आणि सुटताना त्याच्यासमोर हीsss गर्दी असायची. तिखट मीठ टाकलेली कैरी संपेपर्यंत घर यायचं. घरी जाऊन कितिही हात धुतले तरी बोटांचा लाल रंग काही जायचा नाही. आणि चुकून पांढऱ्या शर्टावर डाग पडला तर मग कल्याणच.
kairi

संध्याकाळी खेळून झालं की अनिलच्या दुकानाकडे पेप्सि खायला आमची वरात कायम असायची. हे सगळ गनिमी काव्याने करावं लागयचं कारण आईल समजलं तर ओरडा ठरलेलाच. अनिल गटारच्या पाण्याने पेप्सि बनवतो, अनिलच्या फ्रिजात उंदिर मेलेले असतात, पेप्सि खाऊन घशाला फोड येतात असली सगळी कारणं त्या गार पेप्सिच्या पुढे फेल जायची. (नॉट टू फरगेट फ्रॉकला मॅचिंग). आईला घरी गेल्यावर कळायचंच तरीही.
pepsi

नंतर कधीतरी सेंटर शॉक च फॅड आलेलं, अस्मादिकांनी आणि बन्धुराजांनी एकदा बाबावर सेंटर शॉक चा प्रयोग केलेला. आतलं चॉकलेट त्याच्या हातावर ठेऊन प्रसाद आहे, खा म्हणून सांगितलं, बाबाने एकतर गपकन ते तोंडात टाकलं आणि कचकन चावलं, बाबाचा चेहरा काय वेडावाकडा झालेला बघून आम्ही दोघं हसून हसून पडायचे बाकी होतो. नंतर फक्त बाबाचा आरडाओरडा आणि आईचे फटके एवढंच ऐकू येत होतं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाहाहा ..गटारीच्या पाण्याची पेप्सी ... डिट्टो सेम ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे पेशवेपार्कच्या बाहेरच्या ऐसक्रिमवाल्याने ट्रे गटारच्या पाण्याने धुतलेले. मुलांनीही पाहिलं आणि खारे शेंगदाणे घेतले॥

चित्र टाकल्याने लेख मस्त झाला आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रेड बनवायचा कारखाना आमच्या घराजवळच होता. पायाने तुडवायचे कणिक अन् जोडीला दारातून वाहणारे गटारीचे पाणी. आमच्या गल्लीत कुण्णीच तिथलं ब्रेड नाही घ्यायचं.

एकदा गारीगार खायची आमची सवय मोडावी म्हणून आम्हाला त्या गारीगार वर मीठ व एकदा रॉकेल टाकून मध्ये वळवळणार्या आळ्या दाखवल्या होत्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

आवल्डा !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तं लेख. आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शाळेतले दिवस आठवले, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0