बाळा, उरले तुजपुरती,

कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक अनाम सैनिक लढता लढता मृत्यू पावलाय... अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणलंय..... सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद त्याच्या मृत्यूचे दु:ख अन त्याच्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले..... वातावरणात एक अस्वस्थ करणारी , दुखरी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करून देतंय......

सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या अटळ परिस्थितीवर कविता लिहिली त्यावेळी ब्रिटनचा राजकवी असलेल्या आल्फ्रेड टेनिसन याने.

ती मूळ कविता (HOME they brought her warrior dead ) व तिच्या भावानुवादाचा मी केलेला प्रयत्न:

HOME they brought her warrior dead:
She nor swooned, nor uttered cry:
All her maidens, watching, said,
‘She must weep or she will die.’

Then they praised him, soft and low,
Called him worthy to be loved,
Truest friend and noblest foe;
Yet she neither spoke nor moved.

Stole a maiden from her place,
Lightly to the warrior stepped,
Took the face-cloth from the face;
Yet she neither moved nor wept.

Rose a nurse of ninety years,
Set his child upon her knee—
Like summer tempest came her tears—
‘Sweet my child, I live for thee.’

भावानुवाद:
=======
त्या निधड्या रणवीराचे
कफनात कलेवर बघुनी
विमनस्क वीरपत्नीच्या
डोळ्यात गोठले पाणी ...

कुणि अनुपमेय शौर्याच्या
तडिताघाताने दिपले
कुणि असह्य मित्रवियोगे
हेलावून आतून गेले….

पण नजर "तिची" थिजलेली
शून्यात जणू खिळलेली
धगधगत्या वैशाखाने
कोवळी पालवी जळली..

"अश्रूंना कोंडिल जर ही
उरी फुटेल पोर बिचारी
झेलील कसा मग असला
नियतीचा घाव जिव्हारी"

सारिले कुणी मग मागे
वीराचे कफन जरासे
पतिमुख पाहूनही तिजला
ना मूर्च्छा, नाही उसासे...

अश्राप तान्हुले त्यांचे
ठेविले कुणि तिज पुढती
कोसळता वळिव म्हणाली,
'बाळा, उरले तुजपुरती,
बाळा, केवळ तुजपुरती"...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

टेनिसनची मूळ कविता उत्त्मच आणि अनुवाददेखिल चांगला उतरला आहे.

अवांतर -
सुरेश भटांच्या "तरुण आहे रात्र अजुनी" ह्या गझलेकडेही ह्याच अर्थाने पाहता येते (मुलाच्या उल्लेखाचा अपवाद वगळता). विशेषत: खालील पंक्ती ज्या मूळ काव्यात आहेत पण आशाबाईंनी गायलेल्या गाण्यात नाहीत -

ओठ अजूनि बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे

अतिअवांतर -
भट साहेबांच्यांच "मेंदीच्या पानावर" ह्या गीतातूनदेखिल साधारणत: असाच करुण अर्थ निघतो काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्याच अर्थाने पाहता येते" हे मत मी इतरत्रही कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. पण मला ते पटलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

मूळ कविता व अनुवाद दोन्ही आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ कविता आणि अनुवाद उत्तम. इतका सुंदर अनुवाद खूप क्वचित वाचायला मिळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

भावानुवाद मस्त जमलाय !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

भावानुवाद भावला!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0