असिधाराव्रत

अंधाराशी लढता लढता
चढवुन अपुला स्वर गदगदता
असिधाराव्रत सांगे कविता- माझी कविता

"कवेत आभाळ कोंडावे लागेल
आतले साचले सांडावे लागेल
बिजली झेलून गिळावी लागेल
सृजनावेणाही सोसावी लागेल
प्रत्येक टर्फल सोलावे लागेल
शिळेतले शिल्प शोधावे लागेल
पथ्थरा पाझर फोडावा लागेल
बुडून मौक्तिक काढावा लागेल
गर्दीत एकांत साधावा लागेल
शापांत उ:शाप शोधावा लागेल

उ:शाप हासत भोगावा लागेल
तेव्हाच मुक्तीचा सुगावा लागेल"

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एवढं सगळं करुन फक्त सुगावा लागेल ? त्यापेक्षा
' ठेविले अनंते तैसेची रहावे' हे सोपं आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंगी व्याली, चिंगी झाली, तिचे दूध किती
अठरा रांजण भरुन उरले प्याले बारा हत्ती|

"आंजावरी पिंका टाकित रहावे" हे जास्त सोप्पंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

व्हाय नॉट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==========
मला टांगण्याकरिता माझ्या चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मागू नये. मिळणार नाही.

पिंका टाकायच्या असत्या, तर प्रत्येक वेळीच टाकल्या असत्या हो ! तरीसुद्धा तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंगी व्याली, चिंगी झाली, तिचे दूध किती
अठरा रांजण भरुन उरले प्याले बारा हत्ती|

कविता 'ठीक' आहे. कल्पनांची घनता आणि वैविध्याच्या तुलनेत शब्दच जास्त आहेत. फार नाही आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा