फिडबॅक

वर्गात interrupt शिकवायला चालू होतं. व्याख्या, व्याप्ती अन् एक-दोन real time उदाहरणं देउन झाली. तेवढ्यात दरवाजाची कडी वाजली, महामहिम. अन् मी विद्यार्थ्यांना म्हटलो, is called as??? एका सुरात उत्तर आलं interrupt... फिडबॅकसाठी आलेल्या महामहिमच्या कपाळावर पडलेल्या आट्या नजरअंदाज करत अन् हास्याची उबळ आवरत वर्गाच्या बाहेर पडलो.
चांगल्या रंगात आलेल्या तासात interrupt आल्यामुळं मनातल्यामनात चडफडत त्यांना ओरडून सांगावसं वाटत होतं , हे असले कृत्रीम फिडबॅक घेण्यापेक्षा वर्गात कुणी नसताना सगळ्या बाकड्यांवर येउन बसा एक-एक मिनीटं, वाचा की त्यावरचं. बर्यापैकी फिडबॅक मिळेल. झालंच तर पोरांच्या वॉशरुममध्ये पण चक्कर मारा, वर्गाच्या भिंती वाचा, विद्यार्थ्यांच्या वह्यांचे शेवटचे चार पानं तपासा. staff अन् students, अनेकांचा फिडबॅक मिळेल. असेल अक्षेपार्ह तर सोडून द्या पण जेवढा वर्गात मिळेल त्यापेक्षा कितीतरी प्रामाणिक मिळेल.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मुख्याध्यापक टपकले??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाय पण जबऱ्या ख्याक झाल्यागत वाटलं असेल बहुधा. interrupt शिकवताना interrupt येणं हा योगायोग मला योग्य उदाहरण द्यायला फिट्ट बसला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो